युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2010 - 13:57

बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू
उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू

मास्तरीणबाई:
समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला
डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन
सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन

मास्तरीणबाई:
भरलेली शाळा खुपच आवडते मला
वर्ग कधीच ठेवणार नाही मोकळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
प्रयोग करायसाठी आहे ही प्रयोगशाळा
बाजूलाच उभी केली व्यायामशाळा

मास्तरीणबाई:
कृषीशाळेत घेतला मी हाती विळा
तण काढून दाखवले मी कितीक वेळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
हि घंटा मी अशी हातात पकडीन
शाळा सुटायची घंटा मी वाजवीन

मास्तरीणबाई:
चला शिकवू दोघे मिळून मुलांना
आता मुले झालीत शाळेत गोळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१०/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाभे यांनी लिहिलेल्या एका लावणीच्या निमित्ताने त्यांची ही जुनी रचना (हे कोणाचेही नाव नाहीये) आठवली. नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.

Pages