मी नाही प्रोजेक्ट केला

Submitted by वर्षा_म on 27 September, 2010 - 00:57

घड्याळात वाजले नउ
मायबोली उघडा पाहु
नविन लेखन पहाण्यात एक तास गेला Happy
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दहा
एक बीबी पेटला पहा
वाद घालण्यात एक तास गेला Biggrin
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले अकरा
जिगांना केलेय बकरा
मुक्ताफळे उधळण्यात एक तास गेला Angry
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले बारा
विंपुचा झालाय मारा
विपु विपु खेळण्यात एक तास गेला Rofl
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजला एक
प्राचीने लिहीला केक
रेसिपी वाचण्यात एक तास गेला Proud
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दोन
हा नविन आयडी कोण
डु आयडी ठरवण्यात एक तास गेला Uhoh
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले तीन
नविन काहीतरी लिहीन
कॉपी पेस्ट करण्यात एक तास गेला Wink
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले चार
योडीला कंटाळा फार
कंटाळा घालवण्यात एक तास गेला Light 1
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले पाच
मंदार म्हणाला कविता वाच
कविता वाचण्यात एक तास गेला Proud
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले सहा
दिवाळी अंकाची जहिरात पहा
विषय शोधण्यात एक तास गेला Lol
मी नाही प्रोजेक्ट केला

गुलमोहर: 

जो Lol

जिगांनी कविता चोरली
सगळ्यांनी बोंब मारली
वादावादीत एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला Proud

परिसादासाठी पुन्हा धन्यवाद Happy
गुरुजी तुम्हाला स्पेशल Proud

कित्ती "पावती तास" वाया घालवलेस >> कवितेप्रमाने फक्त ९ ते ६ म्हणजे ९ तास हो. बाकी बिलाचे म्हणाल तर तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाने पोट भरले... मग पगाराची गरज काय Lol

धन्यवाद लोक्स Happy

वर्षा जी ... "मोठ्ठा" वाला नमस्कार ... कविता छानच झ्हाली आहे ....
तुमच्या काव्य प्रतिमेला सलाम करत , घड्याळात राहिलेले दोन तास पूर्ण करत आहे ...
कविता "राउंड- द-क्लोक " करण्याचा हा छोटासा प्रयत्न ......आज्ञा असावी ..............

घड्याळात वाजले सात ..
आई म्हणे - "लाव वरण-भात "
भुका भागवण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला Lol

घड्याळात वाजले आठ ..
दिवसभर टाइम-पास झ्हाला भन्नाट
पाच्चाताप करण्यात एक तास गेला
[पण] मी नाही प्रोजेक्ट केला Wink

-जग्या

वर्षे, खूपच छान !
माबोकरांसमोर आरसाच ठेवलास. _________/\__________. Happy

Pages