हरवलेला भारतीय

Submitted by चाणक्य. on 26 September, 2010 - 02:28

प्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय" असणे. "भारतीय" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.

आसाममधे आसामी बिहारिंना मारतात. ओरिसामधे, संघ परिवार ख्रिश्ननांवर हल्ले करतो. आंध्रात तेलंगणा वरुन मारामार्या पेटतात.मायावती 'सर्वजन' चा वापर करुण निवडणुक जिंकते पण बाकि सगळिकडे राखिव जागांबद्द्लच बोलते. कौग्रेस साचार कमिटीचा वापर करुन मुसलमानांचे मन जिंकु पहाते. मनसेसाठी भारतीय म्हणजे फक्त मराठी. शिवसेनेसाठी मराठी महाराष्ट्रात, बाहेर हिंदु.

काहि हिदुंच्या मते एम एफ हुसेन वरचा हल्ला योग्य असतो, पण तस्लिमा वरचा हल्ला निंदनीय असतो.काहि मुस्लिमांच्या वते तस्लिमा वरचा हल्ला योग्य असतो पण गुजराथेत झालेले हत्या़कांड निंदनीय असते.काहि शिखांच्या मते डेरा वरचा हल्ला बरोबर असतो पण १९८४ च्या पुस्तकावरिल बंदि अयोग्य असते.

आपल्याला कशाचा नक्की राग येतो ? प्रत्यक्ष क्रुतिचा कि क्रुतिमागच्या अन्यायाचा ?

अशा प्रकारच्या निवडुन केलेल्या प्रतिक्रिया आपल्याला परत फक्त मध्ययुगात घेउन जाउ शकतात. प्रत्येक अशा क्रूतीचा तितक्याच तिव्रतेने निषेध केला पाहिजे मग ती कोणाकडुनहि असो - हिंदु असो वा मुसलमान वा शिख वा ब्राह्म्ण वा तामिळ आणी तो निषेध हिदु म्हणुन, शिख म्हणुन, दलित म्हणुन, नवबौद्ध म्हणुन न करता फक्त अन्यायाचा निषेध म्हणुन करण्याइतकी प्रगल्भता हवी.

आणी आपल्याला कशाचा निषेध करायचा असतो ? बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याएवजी राखिव जांगावरुन भांडणे केली जातात. शहरांवरच्या बोज्याचा प्रश्न सोडविण्याएवजी मरठी बिहारी भांडणे लावली जातात.

प्रत्येक क्षणी , प्रत्येक दिवशी 'भारतीय' तुटतोय. भारतीय लोक वेगळे होतायेत आणी हिदु, बिहारि, पंजाबी, तेलगु, शिख, मुसलमान, जन्माला येत आहेत. आज हिंदु म्हणुन मला मालेगावला जायला भिती वाटते. मराठी म्हणुन उत्तर प्रदेशात, बिहारि म्हणुन आसामात.

भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे आणी प्रांतीक/धार्मिक्/जातीय ओळखीची सीमा ओळखण्यातही!

सर जोन ग्रेशम म्हणाले होते की भारत असे काहिहि अस्तित्वातच नाहिये.वेगवेगळ्या भाषा, प्रांत, धर्म, जाती आणी संस्क्रुती याचे ते फक्त एक गाठोडे आहे. मास्लोव असे म्हण्ल्याचे एकिवात आहे कि भारतात superpower होण्याची क्षमता आहे पण superpower होण्याची wisdom नाहि! आजच्या भारताचे खरे अपयश हेच आहे कि भारतात हुशार लोक आहेत, शिकलेली लोक आहेत पण sensible आणी rational (सयुक्तीक) लोक नाहित.

गुलमोहर: 

>>भारतीयत्व हे १९५० साली निर्माण झालेल्या घटनेने निर्माण झालेले नाही. ती एक अनेक वर्षांची सामाजिक परंपरा आहे.
केदार जोशी यांचे रंगीबेरंगी पान अन संस्क्रूती विषयक लिखाण वाचले असेलच. त्यात भारतीयत्वाचा ऊहापोह आहे.

बाकी तुमची पोस्ट वाचून गहीवरायला होईल Happy पण हरवलेला भारतीय सापडणार नाही.
(हलके घ्या.)

शहाबानो च्या प्रकरणातली तत्कालिन सरकारची कोलांडी उडी असो की मुफ्ती महंमद सैद यांनी केलेली तडजोड असो बहुतांच्या नजरेतुन सुटली नाही म्हणुन बरोब्बर १२ वर्षांनी सत्तांतर झालेल दिसल.
--- दोन खासदारांवरुन २०० पर्यंत मजल मारण्याचे हिच दोन कारणे नव्हती... भोळ्या जनतेला राम मंदिराचे स्वप्न दाखवुन, त्यांची मते मिळवुनच २०० पर्यंत मजल गेली होती हे कसे दृष्टिस पडले नाही?

मला अरुंधती यांच्या पोस्ट आवडल्यात.

जरा काम संपले नि पुनः वेळ मिळाला तर पुनः येईनच! करमणूक हवीच.

डोकी फोडणे, माणसे मरणे हिच करमणुक वाटत असेल तर जरुर या. या देशात जो काहि जाती, धर्माच्या नावाखाली मुर्खपणा चालु आहे त्याबद्दल वाइट वाटते म्हणुन हा बाफ लिहिला. हि जर तुम्हाला करमणुक वाटत असेल तर वाइट वाटते.

उद्या कुणि उगाचच तुमच्या घरात घुसून तुमच्या भावंडांना मारले तरी तुम्ही अन्याय झाला असे ओरडायचे नाही.

वैयक्तीक अन्यायाचा प्रतिकार करणे आणी संघटीत पणे genocide करणे ह्यातला वेगळेपणा प्रथम समजाउन घ्या म्हण्जे मी काय म्हणतो ते कळेल. उगिचच कुठुनहि कुठे चालला आहात.

अरुंधती कुलकर्णी

तुम्हि मी मांडलेल्या उत्तरांना उत्तर म्हणुन फक्त प्रश्न मांडताय. पण तुम्हि स्वता: मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहि आहात.
फार वैयक्तीक घेउ नका. मला कोणीच इथे तशी चर्चा करताना दिसले नाहि. मी म्हणले ते कदाचीत स्वप्नातील असेलहि. पण निदान ते उत्तर तरि होते बाकिच्यांनी प्रश्न निर्माण केले , नाहितर मी कसा चुकिचा आहे हा दावा करताना चिखलफेक.


मग पोटाची खळगी भरायला, पाच-पन्नास रुपयांसाठी ते भाडोत्री गुंड बनणार.... जाळपोळ करणारे, दगडफेक करणारे बनणार!

बरोबर आहे. पण मग यावर उपाय काय ? त्याना रोजगार निर्माण करणे ? हाच उपाय असु शकतो ना ? रोजगार तेव्हाच निर्माण होइल जेव्हा भारतातील सर्व लोक राजकारण्यांवर दबाव देतील की जाती-पाती, धर्म सोडुन development पाहिजे म्हणुन. वीज, रस्ते, रोजगार, पाणी यातिल development. हा दबाव तेव्हाच येइल जेव्हा लोक धर्मा, जात-पात, प्रांत हे सोडुन देतील.

अजुन एक - केवळ पोटाची खळगी भरायला, पाच-पन्नास रुपयांसाठी करणारे लोक नाहियेत ह्यात. शिकलेले, कमवणारे लोकहि आहेतच. इंटरनेट वापरणारे हि आहेत Wink

वीज, रस्ते, रोजगार, पाणी यातिल development. हा दबाव तेव्हाच येइल जेव्हा लोक धर्मा, जात-पात, प्रांत हे सोडुन देतील.

---- धर्म, जात, प्रांत, भाषा (मी अजुन रंग, लिंग भेद यांची पण भर टाकतो) ह्यांच्या पासुन फारकत घ्यायला अजुन किमान ५०० वर्षे लागणार असतील तर तुम्ही तेवढा काळ थांबणार आहात कां?

जे आपल्या (तुटकी फुटकी साधने :स्मित:) जवळ आहे त्याच्यातुन मार्ग कसा काढता येईल यातच sensibility - rationalism आहे. मी कुणा एका कंपू तील आहे, पण मला तुमच्या कंपू बद्दल पण तेव्हढाच आदर आहे. आता एव्हढ्या साध्या विचारसरणिवर एकत्र येऊन काम करता येत नाही कां?

भारतीयत्व हे १९५० साली निर्माण झालेल्या घटनेने निर्माण झालेले नाही. ती एक अनेक वर्षांची सामाजिक परंपरा आहे.>>> ये ब्बात! मला वाटते नितिन, आपल्या दोघांचे पहिल्यांदाच कशावर तरी एकमत झाले असावे!
भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे>>> सर्वथा अमान्य, आपल्याला आपली ओळख 'ऑन द स्लीव्हज' मिरवायची सवय नाही आहे, याचा अर्थ असा होत नाही की अशी ओळख अस्तित्वातच नाही. आत्यंतिक क्रायसिसशिवाय ही ओळख उफाळून येत नाही.

मी कुणा एका कंपू तील आहे, पण मला तुमच्या कंपू बद्दल पण तेव्हढाच आदर आहे

दुर्देवाने हेच नाहिये. उदा. जेव्हा मराठे (मराठी जात) एकत्र येतात तेव्हा ब्राहमणांवरचा द्वेष हा ग्रुहितच असतो. दुसर्याच्या कंपुबद्दल आदर निर्माण होणे हे जात/धर्म/प्रांत याबद्दल जरा अवघडच आहे. जर तसे झाले आनंदच आहे.

दुसरे हे की ह्या गोष्टींना आता इतका इतिहास आहे (आणी जो इतिहास समजला जातो तो हि तसा नाहि तर कसा आमच्या कंपुप्रमाणे आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न - उदा - दादोजी कोंडदेव प्रकरण) हे सगळे असल्यामुळे आदर जेव्हढा आहे तेवढाहि उलट कमी होत जाइल

पण माझा आक्षेप मुळात blind belief लाच आहे. आपण स्वताला हिंदु, शीख, दलित, ठाकुर वगैरे समजणे यालाच!

आत्यंतिक क्रायसिसशिवाय ही ओळख उफाळून येत नाही.

याचाच अर्थ हा नाहि का की भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे ?
बाहेरच्या शक्ती तुमच्यावर आक्रमण करतात तेव्हा एकत्र येणे हे तर होणारच (तेव्हाहि ते बर्याचदा दिसत नाहि) कारण तो तर मोठा कंपु आहेच. मुसलमानांविरुद्ध नाहि ब्राह्म्ण आणी मराठा एकत्र येत ?

पण हे नस्ताना कुठे असतो भारतीय ?

जेव्हा मराठे (मराठी जात) एकत्र येतात तेव्हा ब्राहमणांवरचा द्वेष हा ग्रुहितच असतो<<
परत चर्चा भारतियत्वा वरून जातियते कडे जात आहे.
भारतियत्व म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे हे स्पष्ट करावे तुम्हाल नेमके काय अपेक्षीत आहे ते समजत नाहिये.

गणू, मी फक्त तुम्ही व इतरांनी मांडलेले मुद्दे वाचून जे काही विचार येत आहेत ते मांडत आहे. ते ''उत्तर'', ''चर्चा'' प्रकारात मोडणारे असतीलच असे नाही, परंतु ''प्रतिक्रिया'' निर्विवाद आहेत. त्या प्रश्नांचाही विचार व्हायला हवा असे मला वाटते. तुमच्या लेखात आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादांमध्येच तुम्ही निष्कर्षही काढलेला आहे. त्यामुळे त्यावर मी काय टिप्पणी करणार? तुम्ही तुमचे मत ठरवून ठेवले आहेत. बाकीचे काय म्हणत आहेत त्याविषयी खुलेपणाने विचारही व्हायला हवा ना!

तुम्हीच म्हटले आहे << कळ्प सोयीनुसार बदलले जातात. एक किंवा दोनच प्रभावशाली गट असते तर कधीच विभाजन झाले असते. पण तसे नाहिये. त्यामुळे भारताचे विभाजन होणे शक्य नाहि. आणी याला दुर्देव म्हणावे सुदैव हा पश्न आहे. कारण ह्याचा अर्थ एकच आहे - कि हा कळ्प प्रकार तसाच चालु राहिल, अजुन कळ्प बनतील, अजुन मार्यामार्या होतील,स्थानीक दहशतवाद वाढेल पण हे थांबवायचा उपायच नसेल. >>

येथे तुम्ही तर भविष्यकथन केले आहे, की धर्म/ जाती/ पंथ/ प्रादेशिकता/ भाषा अशा अनेक बंधनांना जरी ओलांडले तरी कळप मानसिकता चालूच राहील.... त्यातून एका कळपाने दुसर्‍यावर वर्चस्व गाजवायचे, शोषण करायचे, शोषित कळपाने अन्यायाविरुध्द वाचा फोडायची, हिंसाचाराचा मार्ग अवलंबायचा..... तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे तर चालूच रहाणार!!

कळप मानसिकता ही धर्म, जाती, पंथ, राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडची आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आदिम मानसिकता आहे ती. प्राण्यांपासून माणसापर्यंत सर्वांमध्ये दिसणारी. कळपाला स्वतःची अशी अक्कल नसते. आणि अशी अक्कल असली तरी ती योग्य प्रकारे वापरली जातेच असे नाही. मात्र ह्या कळपाला कसे चांगल्या प्रकारे मोटिव्हेट करायचे ते काम समाजातील नेतेमंडळी, धुरंधर व्यक्ती करू शकतात. समाजातील दुष्प्रवृत्ती कमी होऊन त्यांची जागा सत्प्रवृती घेतील ह्यासाठी त्या समाजनेत्यांनी काय करावे असे तुम्हाला वाटते?

बरं, ह्या कळपात सामील न होणारे त्यांच्या नकळत ''सामील न होणार्‍यांच्या'' कंपूत जाऊन बसतात किंवा स्वतःचा - समविचारींचा एक वेगळा कंपू बनवतात. कळप प्रक्रिया पुढे चालूच राहते.

भारतातल्या संतांनी आपल्या वाङ्मयातून समाजाला ह्याअगोदरही दिशा दाखवली आहे, उत्तम - कलहविरहित आयुष्य जगण्याचा व्यवहारी मार्ग दाखवला आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात दडली आहेत. त्या मार्गाचे अनुसरण व्यक्तिशः व सामूहिक रीतीने केले तरी बरेच प्रश्न सुटतील. पण तसे करण्याची इच्छाही निर्माण व्हावी लागते.

पण माझा आक्षेप मुळात blind belief लाच आहे. आपण स्वताला हिंदु, शीख, दलित, ठाकुर वगैरे समजणे यालाच!
---- येथे तुम्ही तुमच्या नकळत blind belief न मानणार्‍यांचा कळप तयार करत आहात. त्या कळपालाच निधर्मी कळप असे पण म्हणता येईल.

रच्याकने, आज दुपारी ३.३० नंतर भारतीय लोक काय करणार आहेत?? सकाळपासुन सगळीकडे फक्त हीच चर्चा चालु आहे. आज दुसरा विषय नाही.

बरं, ह्या कळपात सामील न होणारे त्यांच्या नकळत ''सामील न होणार्‍यांच्या'' कंपूत जाऊन बसतात किंवा स्वतःचा - समविचारींचा एक वेगळा कंपू बनवतात. कळप प्रक्रिया पुढे चालूच राहते.

येथे तुम्ही तुमच्या नकळत blind belief न मानणार्‍यांचा कळप तयार करत आहात. त्या कळपालाच निधर्मी कळप असे पण म्हणता येईल.

मी फक्त धर्माबद्द्ल बोलत नाहिये, जातीय, प्रांतीक अशा सर्वच बीलीफ्स बद्दल बोलत आहे. त्यामुळे असा परत कळ्प निर्माण होणे शक्य नाहि कारण मी स्वताला अशा सर्व कळपासुन तोडण्याबद्दल बोलत आहे.

निधर्मी बद्दल दुसरे म्हण़जे - जर एखादा माणुस कोणताच धर्म मानत नसेल तर तो निधर्मी कसा होउ शकतो ? ज्याच्या द्रुष्टीने धर्म असे काहि नाहिच, त्याला धार्मिक माणूस जरुर निधर्मी महणेल पर त्याच्या स्वताच्या द्रुष्टीने या अशा लेबल लावण्याला काहिच अर्थ नाहि.

ह्याच कारणासाठी मला जर कोणी विचारले तुमचा जात काय ? तर माझी फार अडचण होते. माझ्यासाठी तर जात हि conceptच नाहि, मी काहिहि बोललो - जरी मी बोललो कि माझी कोणतीच जात नाहि तरिहि जात हि concept मान्य केल्यासारखी होते. पण दुर्देवाने बोलावे तर लागेल - जोपर्यत जात हीconcept जगात आहे तोपर्यत माझी कोणतीच जात नाहि हे सांगावेच लागेल . आता अशा लोकांना ते एका कळ्पात आहेत ते म्हणणे हे दुर्देव आहे- आणी त्या लोकांचा कोणताहि दावा नसताना.

साधना
आताच निकाल एकला. हिदु म्हणत आहेत "आम्हि जिंकलो" मुसलमान म्हणत आहेत "आम्हि जिंकलो" भारतीय आहेत कुठे ?

काल कुठे ही अनुचित प्रकार घड्ला नाही. अजून काय प्रूफ हवे भारतीयत्वाचे? आपला देश खूप चांगला व मोठा आहे मनाने. निराश होऊ नका.

अमा, अनुमोदन. Happy

गणू, तुम्ही कधी समाजशास्त्र विषयाचा अभ्यास केला आहे का? मला होते ते कॉलेजात अभ्यासाला. त्या पुस्तकांमध्ये तर स्पष्ट म्हटले आहे की कोणत्या ना कोणत्या हेडिंगखाली कळपात राहाणे ही मनुष्याची गरज व मानसिकता आहे. कधी ते जात, धर्म, प्रांत, स्तर, भाषा इत्यादीचे हेडिंग असते तर कधी अगदी व्यवसाय/ आवडता फिल्मस्टार - क्रिकेटपटू- नेता/ राहणीमान/ संघटना/ संस्था इ. इ. चे हेडिंग असते.

मल्टिप्लेक्स मालक विरुध्द चित्रपट निर्माते
आमीर खान चाहते विरुध्द शाहरुख खान चाहते
युवराज सिंग चे चाहते विरुध्द अजून कोण्या क्रिकेटपटूचे चाहते
बँक कर्मचारी संघटना विरुध्द बँक व्यवस्थापन
अपार्टमेन्ट्स मध्ये राहणारे विरुध्द शेजारील झोपड्या- वस्तीत राहणारे
शेतकरी संघटना विरुध्द शेतमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांची संघटना
राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक विरुध्द भारतीय जनता दल समर्थक
कामगार संघटन विरुध्द उद्योजक.....

ह्या सर्व उदाहरणांमध्ये तुम्हाला कळप मानसिकता दिसून येत नाही का? तुमचे म्हणणे असे आहे का, की ह्यांनीही आपले ''कळप'' सोडावेत?

<< मी फक्त धर्माबद्द्ल बोलत नाहिये, जातीय, प्रांतीक अशा सर्वच बीलीफ्स बद्दल बोलत आहे. त्यामुळे असा परत कळ्प निर्माण होणे शक्य नाहि कारण मी स्वताला अशा सर्व कळपासुन तोडण्याबद्दल बोलत आहे. >>

मग उत्तम आहे की! तोडा खुशाल! पण इतरांनाही आपली कळपाची आवड/ नावड जोपासण्याचा पर्याय खुला आहे भारतीय राज्यघटनेनुसार हे लक्षात असू द्या! Wink

<< निधर्मी बद्दल दुसरे म्हण़जे - जर एखादा माणुस कोणताच धर्म मानत नसेल तर तो निधर्मी कसा होउ शकतो ? ज्याच्या द्रुष्टीने धर्म असे काहि नाहिच, त्याला धार्मिक माणूस जरुर निधर्मी महणेल पर त्याच्या स्वताच्या द्रुष्टीने या अशा लेबल लावण्याला काहिच अर्थ नाहि. >>

नसे ना का अर्थ! ज्याला धर्म आहे अगर नाही याने फरक पडत नाही, ज्याच्या दृष्टीने धर्म असे काही नाहीच, त्याला माणूस नावाचा ''धर्म'' तरी मान्य आहे का? इथे धर्मचा अर्थ रिलिजन असा नसून तो कृपया ''वे ऑफ लाईफ'' असा घ्यावा. मग तुम्ही धार्मिक/ निधर्मी किंवा अजून कोणी असलात तरी काय फरक पडतो? एनी वे, तुम्ही स्वतःला कळपातले समजत नाही! मग इतर कोणी काहीपण म्हणेनात अगर समजेनात!

<< ह्याच कारणासाठी मला जर कोणी विचारले तुमचा जात काय ? तर माझी फार अडचण होते. माझ्यासाठी तर जात हि conceptच नाहि, मी काहिहि बोललो - जरी मी बोललो कि माझी कोणतीच जात नाहि तरिहि जात हि concept मान्य केल्यासारखी होते. पण दुर्देवाने बोलावे तर लागेल - जोपर्यत जात हीconcept जगात आहे तोपर्यत माझी कोणतीच जात नाहि हे सांगावेच लागेल . आता अशा लोकांना ते एका कळ्पात आहेत ते म्हणणे हे दुर्देव आहे- आणी त्या लोकांचा कोणताहि दावा नसताना. >>

काही कंपल्शन नसते कोणावर आपली जात सांगायचे! जिथे कार्यालयीन/ सरकारी कामासाठी कायद्याने तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागतो तिथे ते द्यावेच लागते! त्यासाठी कायद्याशी भांडा. इथे सांगून काही उपयोग होणार नाही हो! आणि बाकीच्या ठिकाणी कोणी जात विचारली तर काय संबंध? अशा लोकांना सरळ सांगून टाकावे, माझी जात - माझा धर्म - माझी भाषा - इ. इ. ''भारतीय'' आहे. लोक दहादा विचारतील, शंभर वेळा विचारतील, १०१ व्या वेळेला गप्प बसतील. काहीजण त्यातून योग्य तो अर्थबोध घेतील, काही खिल्ली उडवतील. पण तुम्हाला त्याने काय फरक पडतो? नसेल सांगायचे तुम्हाला तर कोणीही तुमच्यावर सक्ती करू शकत नाही! मात्र तरीही तुम्ही असे सांगणार्‍यांच्या ''कळपात'' गणले जाणार हे नक्की! भले तुमची इच्छा असो अगर नसो. समाजात राहण्याची ती एक किंमत समजा हवी तर! इथे लेबलिंग फार झटकन व मोफत करून मिळते! ते योग्य असतेच असे नाही. पण तीच ती कळप मानसिकता येथेही लागू होते!!

मी आधी वर म्हटल्याप्रमाणे भारतात एवढी वर्षे इतक्या भाषा, संस्कृती, धर्म, प्रांत, श्रध्दा, विचारधारा एकत्र नांदत आहेत हीच मोठी नवलाची बाब आहे. असे जगात कोठे इतरत्र पहावयास मिळते का तेही सांगा! (येथे कृपया जगातील महानगरांची उदाहरणे देऊ नयेत. तिथे सर्वच लोक पोटापाण्यासाठी एकत्र नांदताना दिसतात.)

ह्या सर्व उदाहरणांमध्ये तुम्हाला कळप मानसिकता दिसून येत नाही का? तुमचे म्हणणे असे आहे का, की ह्यांनीही आपले ''कळप'' सोडावेत?

तुम्हि फार घोळ घालता आहात कारण फार confuse दिसता. मी परत सांगतो - मी आंधळ्या विश्वासाबद्दल बोलतो आहे - स्वताला हिंदु./ मुसलमान समजणे वगैरे. तुम्हि काय वाटेल ते लिहिता आहात. अहो सगळे मल्टिप्लेक्स मालक सगळ्या चित्रपट निर्माते विरुद्ध सारख्याच मार्यामार्या करत नाहित हो.


काही कंपल्शन नसते कोणावर आपली जात सांगायचे! जिथे कार्यालयीन/ सरकारी कामासाठी कायद्याने तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागतो तिथे ते द्यावेच लागते!

अरे देवा, तुम्हि तर लगेच जातच घेतली फक्त. ताइ, मुद्दा समजाउन घ्या.

माणूस नावाचा ''धर्म'' तरी मान्य आहे का? इथे धर्मचा अर्थ रिलिजन असा नसून तो कृपया ''वे ऑफ लाईफ'' असा घ्यावा.
अहो आपण कसाहि अर्थ घेउ हो. डोकी फोडणारे तसा अर्थ घेतात का ?

मी आधी वर म्हटल्याप्रमाणे भारतात एवढी वर्षे इतक्या भाषा, संस्कृती, धर्म, प्रांत, श्रध्दा, विचारधारा एकत्र नांदत आहेत हीच मोठी नवलाची बाब आहे
याचे उत्तर दिलेले आहेच.

काल कुठे ही अनुचित प्रकार घड्ला नाही. अजून काय प्रूफ हवे भारतीयत्वाचे

निकालच तसा होता - सगळ्यांना नपुंसक करणारा.
एका बाजुने निकाल लावायची हिम्मत आपल्या न्यायव्यवस्थेत नाहि याचे दुर्देव मानावे का कालच्या निकालाचे सुदैव हा प्रश्न आहे.

<<आजच्या भारताचे खरे अपयश हेच आहे कि भारतात हुशार लोक आहेत, शिकलेली लोक आहेत पण sensible आणी rational (सयुक्तीक) लोक नाहि<<>>
असे अनेक लोक भारतात आहेत पण ते सत्तेत किंवा राजकारणात नाहीत. भारतात ज्या काही बर्‍या गोष्टी चालु आहेत त्या अशाच लोकांमुळे की.
असे लोक सत्तेत येऊ पण शकत नाहीत. विद्येचे माहेरघर म्हणवुन घेणार्‍या पुण्यातुन अतिभ्रष्ट 'कलमाडी' निवडुन येतो आणि भाटियांचे डीपॉझिट जप्त होते , याला काय म्हणायचे?
मेधा पाटकर , बंग दांपत्य्,आमटे कुटुम्ब ही सगळी प्रसिद्ध मंडळी आहेतच पण याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी हजारो माणसे आहेत.

समान नागरी कायदा आणल्याशिवाय सर्व धर्म , जाती चे भारतीय लोक एकसमान कसे काय होतील ? एकाला सवलती देउन दुसर्‍याला जर साधे शिक्षणाचे हक्क ही नाकारले जात असतील तर ह्या भींती कधीच तुटणार नाहीत.
लोकसंखेचा प्रश्न एव्हढा गंभीर असुनही एका जोडप्याला एकच मुल असा कायदा करण्याची ताकद कोण्त्या राजकीय पक्षात आहे.

डेलियाच्या पोस्टीला अनुमोदन!

गणू,

<<तुम्हि फार घोळ घालता आहात कारण फार confuse दिसता. मी परत सांगतो - मी आंधळ्या विश्वासाबद्दल बोलतो आहे - स्वताला हिंदु./ मुसलमान समजणे वगैरे. तुम्हि काय वाटेल ते लिहिता आहात. अहो सगळे मल्टिप्लेक्स मालक सगळ्या चित्रपट निर्माते विरुद्ध सारख्याच मार्यामार्या करत नाहित हो.
>>

आंधळा विश्वास ह्या शब्दाला ह्या संदर्भात वापरण्यास माझा आक्षेप. ह्याचा अर्थ भारत संविधानाने ह्याच आंधळ्या विश्वासानुसार कायदे केलेत (हिंदू पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ इ.) असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? माणसाने स्वतःला आधी माणूस समजावे, मग आपापल्या देशाचे नागरिक आणि त्यानंतर तुमचा जो कोणता धर्म/ विचारधारा असेल त्याप्रमाणे वर्तन करावे हे मलाही मान्य आहे. केवळ स्वतःच्या धर्मापुरते स्वतःला मर्यादित करून आपली वाढ/ प्रगती रोखू नये, इतर धर्माच्या लोकांनाही आपलेसे करावे ह्या मताची मी आहे. परंतु त्याचबरोबर लोकशाही राष्ट्रात कोणी स्वतःला कोणत्या का धर्माचे मानेनात का..... त्यांना त्याची मुभा कायद्याने दिलेली आहे. आणि ते जर त्यांना कायदेपुराव्यानिशी सिध्द करता येत असेल तर त्याला तुम्ही आंधळा विश्वास म्हणून कसे काय संबोधता?

आणि कोण म्हणतं हिंदु-मुस्लिम-ख्रिश्चन-शीख सारख्या मार्‍यामार्‍या करतात म्हणून? तसं असतं तर आज भारतात थोड्या-फार प्रमाणात जी काही शांतता दिसते ती दिसली नसती तुम्हाला. त्यांना भडकावले की भडकतात. पण ते तर जगातील कोणत्याही कळपाला लागू होते. दुखर्‍या नसेवर बोट ठेवायचे, कुरापती काढायच्या, आगीत तेल ओतायचे, हक्क डावलायचे यांसारख्या गोष्टी होत राहिल्यावर किंवा जाणून बुजून केल्यावर जगातील कोणता कळप शांत बसेल तेही तुम्हीच सांगा!

<< अरे देवा, तुम्हि तर लगेच जातच घेतली फक्त. ताइ, मुद्दा समजाउन घ्या. >>

मुद्दा कळलाय हो.... पण मीही काय म्हणते आहे ते समजतंय का? जोवर लेबल्स आहेत, समाजाचे विभिन्न गटांमध्ये वर्गीकरण होत आहे तोवर कोणत्या ना कोणत्या लेबल खाली तुम्हाला वावरायला लागणारच. अन्य देशात गेल्यावर जात नाही विचारणार कदाचित, पण देश आणि वंश, वर्ण ह्यावरून तुमचे वर्गीकरण होतच राहील! जोवर भारतात एकसमान नागरी कायदा येत नाही व त्याची कडक अंमलबजावणी होत नाही तोवर ह्या जाती, धर्म इत्यादींवरून निर्माण केले जाणारे प्रश्न सर्वांनाच येत राहणार!

<< अहो आपण कसाहि अर्थ घेउ हो. डोकी फोडणारे तसा अर्थ घेतात का ? >>

डोकी फोडणार्‍यांना कोणतेही निमित्त पुरते. त्यासाठी धर्म हेच एकमेव निमित्त असू शकत नाही. अनेकदा धर्माचे कारण वरवरचे, नैमित्तिक असते. त्याखाली असतो तो गरीबी, लाचारी, असहायता, सूड भावना आणि दैन्यावस्थेचा असंतोष. किंवा असते ती निव्वळ विध्वंसक वृत्ती. जी आपली भ्रष्ट नेतेमंडळी स्वार्थापोटी जोपासतात. दोन गटांमध्ये भांडाभांडी लावतात. आणि तरीही हीच मंडळी पुन्हा निवडून येतात.

जोवर लेबल्स आहेत, समाजाचे विभिन्न गटांमध्ये वर्गीकरण होत आहे तोवर कोणत्या ना कोणत्या लेबल खाली तुम्हाला वावरायला लागणारच.

अहो मग तेच तर बदलायचा प्रयत्न करायचा का नाहि ? का आहे हे असेच आहे म्हणुन रडतच बसायचे ? अजुनही तुम्च्या पोस्ट मधे हे बदलण्यासाठी तुमच्या मताप्रमाणे काय करायला लागेल हे दिसतच नाहिये. जे probelms आहेत तेच तुम्हि परत परत शब्द बदलुन मांडताय.

आणि कोण म्हणतं हिंदु-मुस्लिम-ख्रिश्चन-शीख सारख्या मार्‍यामार्‍या करतात म्हणून?
जगातील बरिच युद्धे (जवळ-जवळ सर्वच) अशाच प्रकारच्या ideology साठी झाली आहेत. ह्या लिन्क वर बघा - आणी हे फक्त २०व्या शतकातील आहेत. -- http://users.erols.com/mwhite28/warstatz.htm#RelCon

हक्क डावलायचे यांसारख्या गोष्टी होत राहिल्यावर किंवा जाणून बुजून केल्यावर जगातील कोणता कळप शांत बसेल
अहो हे कळले तरी देखील कळपाच्या बाजुने कसे बोलता ?

अनेकदा धर्माचे कारण वरवरचे, नैमित्तिक असते. त्याखाली असतो तो गरीबी, लाचारी, असहायता, सूड भावना आणि दैन्यावस्थेचा असंतोष.

असे असते ना ? मग ते बदलावे म्हणुन धर्म/जाती आता कचर्यात फेकुन द्या ना. जो राग आणी त्वेष धार्मिकतेबद्दल/जातीयतेबद्दल दाखवला जातो त्याच्या १ परसेंट जरी वीज नाहि, अन्न नाहि, घरे नाहित, नोकरि नाहित म्हणुन दाखवला तर सगळे जगच बदलेल.

संदिप, धन्यवाद!

गणू

<< अहो मग तेच तर बदलायचा प्रयत्न करायचा का नाहि ? का आहे हे असेच आहे म्हणुन रडतच बसायचे ? अजुनही तुम्च्या पोस्ट मधे हे बदलण्यासाठी तुमच्या मताप्रमाणे काय करायला लागेल हे दिसतच नाहिये. जे probelms आहेत तेच तुम्हि परत परत शब्द बदलुन मांडताय.>>

बदलायचा प्रयत्न करावासा तुम्हाला वाटतोय. सर्वांनाच त्याची निकड नाही हो भासत. आपापल्या कळपांमध्ये मस्त आहेत लोक. त्यांना आपापल्या कळपात सुरक्षित वाटते. आपण कोणीतरी आहोत असे वाटते. आपल्या म्हणण्याला, वागण्या-बोलण्याला एक प्रकारचे वजन किंवा अनुमोदन मिळवायला बरे वाटतात त्यांना असे कळप. ज्यांना कळपात असण्याचा हा ''लाभ'' होतोय ते कशाला कळप सोडतील? कशाला बदल घडवू बघतील? बरं, एक कळप सोडला तर दुसरा कळप धरतील ते! कारण त्यांना त्याखेरीज सुरक्षित कसे वाटणार?

आणि ज्यांनी असे आधीचे कळप सोडले त्यांनी नवे कळप धारण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मग फायदा काय झाला? नवी झूल चढवली फक्त!!!

माझ्याकडे प्रश्नांची उत्तरे ढीगभर असली तरी ती उत्तरे ऐकून घ्यायची तयारी असेल तर उत्तर देण्यात, प्रश्नाचे समाधान करण्यात अर्थ आहे. अन्यथा उत्तराला प्रतिप्रश्न विचारले जातात आणि मूळ मुद्दा मागे पडतो.

<<असे असते ना ? मग ते बदलावे म्हणुन धर्म/जाती आता कचर्यात फेकुन द्या ना. जो राग आणी त्वेष धार्मिकतेबद्दल/जातीयतेबद्दल दाखवला जातो त्याच्या १ परसेंट जरी वीज नाहि, अन्न नाहि, घरे नाहित, नोकरि नाहित म्हणुन दाखवला तर सगळे जगच बदलेल >>

नाही पटत.

जात?? मी काय करु तिला फेकून? मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी जात फेकून दिली तरी इथे कार्यालयीन कामकाजात, सरकारी अधिनियमांमध्ये, कायद्यात ती येतेच ना.... मला अगदी जन्मल्यापासून ते शाळेचा दाखला, पुढे नोकरी मिळणार की नाही, सवलत मिळणार की नाही, विशेष तरतुदींचा लाभ होणार की नाही, ह्या बाबतीत जातीवरच सगळे काही अवलंबून असते हो भाऊ! कोणत्याही सरकारी अर्जात असतेच ती! मग तिला फेकून कसे बरे देऊ? तिथे काय लिहू? कोणता धर्म लिहू? आणि समजा मी लिहिले की माझा कोणताही धर्म नाही किंवा माझी जात कोणतीच नाही, तर ग्राह्य धरतील का हो तो अर्ज? तुम्ही काय लिहिता तुमच्या अर्जांमध्ये?

येथे नोकरी, वीज, अन्न, घरांच्या बाबतीत इतकी वर्षे राग, हिंसा, मारामारी, आंदोलने इत्यादी बर्‍याच प्रमाणात झाली. तसे होऊन देखील अजूनही स्थितीत विशेष सुधारणा नाही. जसे राजनीतीकरण धर्म - जाती यांचे केले जाते तस्सेच राजनीतीकरण वीज, पाणी, घरे, नोकर्‍या इ. प्रश्नांचेही केले जाते. फरक फक्त इतकाच आहे की धर्माच्या मामल्याशी लोकांच्या आत्मियतेच्या, श्रध्देच्या भावना अधिक गहिर्‍या असतात. आणि जिथे भावना जुळलेल्या असतात, गहिर्‍या असतात तिथे तर्क मागे पडतो. त्या भावनांना चुकीच्या पध्दतीने खतपाणी घालण्यात राजनीतीवाले पटाईत असतात. परंतु ह्याच भावना योग्य पध्दतीने विकसित केल्यास समाजाला पोषकही ठरु शकतात.

(आता तुम्ही उत्तर/ उपायाचा इतका आग्रहच धरत आहात तर.....)

मनातील भावना अधिकाधिक सकस, सकारात्मक, समृध्द व व्यापक करण्याचे प्रशिक्षण लोकांना दिले व त्यांनी ते घेतले तर नक्कीच त्याचा सर्वांना फायदा होईल.

भावनांचे व्यवस्थापन हा एक वेगळा विषय आहे, परंतु तुम्ही मांडलेल्या विषयाशी निगडित आहे. हिंसाचार हे मनातील वरचढ झालेल्या नकारात्मक भावनांचे दृश्य स्वरूप! मनातील क्रोध, त्वेष, मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांचा निचरा करणे आणि सकारात्मक ऊर्जा देणार्‍या भावनांचे पोषण करणे ह्यालाच कोणी आध्यात्म म्हणतात. समाजातील खदखदणारा रोष, संकुचित स्वार्थबुध्दी यांचा निचरा करण्याची ताकद आध्यात्मात नक्कीच आहे. समाजात व प्रत्येकाच्या मनात शांती, समाधान नांदावे ह्यासाठी आध्यात्माकडे उत्तर आहे. सवाल हा आहे की समोरच्याची त्या मार्गाकडे जायची तयारी आहे का?

अरुंधती उत्तम पोस्टस.
निकालच तसा होता - सगळ्यांना नपुंसक करणारा >>> तु जर न्यायाधिश असतास तर काय निकाल लावला असतास.
गणू माफ करा , मला वाटलं होतं तु चांगली चर्चा चालु केली आहेस पण नाही ,तुझ्या प्रतिक्रियांवरनं , तुझ्या पोस्टस पेक्षा अरुंधतीच्या पोस्टस जास्त समजदार आणि प्रगल्भ वाटतात.
एनीवे चालु द्या तुमचं.

मनातील भावना अधिकाधिक सकस, सकारात्मक, समृध्द व व्यापक करण्याचे प्रशिक्षण लोकांना दिले व त्यांनी ते घेतले तर नक्कीच त्याचा सर्वांना फायदा होईल.

छान! आता तुम्हि अध्यात्मावर आलात. अहो आधी म्हणताय की " कसे करणार त्यांना सेन्सिबल आणि रॅशनल? आणि त्यांना ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर त्यांचा संताप कोणत्याही निमित्ताने भडकणार..... मग पोटाची खळगी भरायला, पाच-पन्नास रुपयांसाठी ते भाडोत्री गुंड बनणार.... जाळपोळ करणारे, दगडफेक करणारे बनणार!! बरं, त्यांच्या रोजीरोटीची सोय केली तरी जाणार आहे का त्यांचा संताप? " हे तुमच्याच आधीच्या पोस्ट मधुन घेतले आहे मी.

आता पोटाची खळगी भरणारे लोक अध्यात्म वापरुन "सकारात्मक ऊर्जा देणार्‍या भावनांचे पोषण" करणार की स्वताच्या शरिराचे पोषण करणार ?

माझ्या मते तसे वागण्यासाठी उजवा व डावा मेंदू संतुलित रीतीने वापरावा लागेल. मात्र त्यासाठी पोषक परिस्थितीही निर्माण व्हायला हवी. शिवाय जिथे लोकांना उपासमारी, कुपोषण, बेघर असणे, रोगराई - दुर्घटना - नैसर्गिक आपत्ती यांसारख्या भेडसावणार्‍या समस्या असतात तिथे त्यांना काय सांगणार, सेन्सिबल आणि रॅशनल वागा म्हणून!!! ते म्हणतील आधी आम्हाला छत द्या, दोन वेळचे पुरेसे अन्न द्या, आमच्या मुलाबाळांचे भवितव्य सुरक्षित करा हे ही आधीच्याच पोस्ट मधील आहे.

बरे दोन्हि बाजुने तुम्हिच बोलताय. असो चालु द्या. तुम्हि तुमचे स्वताचे confusion आधी दुर केले तर बरे होइल.

ज्याला मी sensible आणी rational म्हणतोय त्याला तुम्हि मनातील भावना अधिकाधिक सकस, सकारात्मक, समृध्द व व्यापक करण्याचे प्रशिक्षण म्हणताय हे तुम्हाला लवकर कळले तर बरे होइल. केवळ वेगळे शब्द वापरता आह


सवाल हा आहे की समोरच्याची त्या मार्गाकडे जायची तयारी आहे का?

शेवटी हे वाक्य. अहो तयारी नाहिच आहे ना. आणी मी आशा करतो की अध्यात्म म्हणजे "हिंदु" अध्यात्म म्हणायचे नसेल तुम्हाला. नाहितर मग आहेच ये रे माझ्या मागल्या!

अरुंधती उत्तम पोस्ट्स. मला तुझ्या इतके चांगले विचार मांड्ता येत नाहीत.

निकालच तसा होता - सगळ्यांना नपुंसक करणारा>> असे कदाचित काहींना वाट्त नसेल. सलोख्याने प्रशन सोड्वणे, अहिंसेने राहणे हे सर्व एनेबलिन्ग गूण आहेत. त्याने आपल्याला कमी पणा येत नाही. सम्राट अशोकास पण नरसंहारानंतर त्यातील फोलपण कळले होते.

तु जर न्यायाधिश असतास तर काय निकाल लावला असतास.

जर तर च्या प्रश्न्नाना काहिहि अर्थ नसतो साहेब. जर न्यायव्यवस्था योग्य न्याय देउ शकत नसेल तर त्याला न्यायव्यवस्था म्हणायचे कशाला ?

तुझ्या प्रतिक्रियांवरनं , तुझ्या पोस्टस पेक्षा अरुंधतीच्या पोस्टस जास्त समजदार आणि प्रगल्भ वाटतात. इथे कोणतीहि स्पर्धी चालु नाहिये की कोण जास्त चांगले लिहिते ते. मुळ प्रश्न आहे तो असुरक्षित झालेले आयुष्य.

गणू, साधी गोष्ट आहे.

इथे तुझ्यापेक्षा वेगळं काहीही लिहिणार्‍या लोकांबरोबर तू इतका वितंडवाद घालतोयस.
'agree to disagree' लांबच राहिलं, ऐकून घ्यायलाही तयार नाहीयेस, स्वतःचं म्हणणं एका क्षणाकरताही सोडायला तयार नाहियेस आणि @ the same time बाकिच्यांनी मात्र त्यांची मत/इतक्या वर्षांची शिकवण/जात्/धर्म लग्गेच सोडून द्यावा अशी अपेक्षा करतोयस.
जे आत्ता तुझं ह्या मतांच्या बाबतीत होतय, तेच त्यांचं त्यांच्या धर्माच्या बाबतीत, त्यांच्या प्रातांच्या बाबतीत कशावरून होत नसेल?
(तिथे तर डायरेक्ट हितसंबंध गुंतलेले असतात - इथे आतंरजालावरच्या पोस्टच्या बाबतीत, 'माझं सगळ्यांनी ऐकलं/सगळ्यांनी वा वा म्हटलं' ह्या इगो व्यतिरिक्त कसलेही हितसंबंध गुंतलेले नसतानाही आपल्याला सोडता येत नाही)

तुला दिसतोय का विरोधाभास?

(माझी शेवटची पोस्ट - वितंडवाद घालण्याची इच्छा नाही!)

Pages