हरवलेला भारतीय

Submitted by चाणक्य. on 26 September, 2010 - 02:28

प्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय" असणे. "भारतीय" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.

आसाममधे आसामी बिहारिंना मारतात. ओरिसामधे, संघ परिवार ख्रिश्ननांवर हल्ले करतो. आंध्रात तेलंगणा वरुन मारामार्या पेटतात.मायावती 'सर्वजन' चा वापर करुण निवडणुक जिंकते पण बाकि सगळिकडे राखिव जागांबद्द्लच बोलते. कौग्रेस साचार कमिटीचा वापर करुन मुसलमानांचे मन जिंकु पहाते. मनसेसाठी भारतीय म्हणजे फक्त मराठी. शिवसेनेसाठी मराठी महाराष्ट्रात, बाहेर हिंदु.

काहि हिदुंच्या मते एम एफ हुसेन वरचा हल्ला योग्य असतो, पण तस्लिमा वरचा हल्ला निंदनीय असतो.काहि मुस्लिमांच्या वते तस्लिमा वरचा हल्ला योग्य असतो पण गुजराथेत झालेले हत्या़कांड निंदनीय असते.काहि शिखांच्या मते डेरा वरचा हल्ला बरोबर असतो पण १९८४ च्या पुस्तकावरिल बंदि अयोग्य असते.

आपल्याला कशाचा नक्की राग येतो ? प्रत्यक्ष क्रुतिचा कि क्रुतिमागच्या अन्यायाचा ?

अशा प्रकारच्या निवडुन केलेल्या प्रतिक्रिया आपल्याला परत फक्त मध्ययुगात घेउन जाउ शकतात. प्रत्येक अशा क्रूतीचा तितक्याच तिव्रतेने निषेध केला पाहिजे मग ती कोणाकडुनहि असो - हिंदु असो वा मुसलमान वा शिख वा ब्राह्म्ण वा तामिळ आणी तो निषेध हिदु म्हणुन, शिख म्हणुन, दलित म्हणुन, नवबौद्ध म्हणुन न करता फक्त अन्यायाचा निषेध म्हणुन करण्याइतकी प्रगल्भता हवी.

आणी आपल्याला कशाचा निषेध करायचा असतो ? बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याएवजी राखिव जांगावरुन भांडणे केली जातात. शहरांवरच्या बोज्याचा प्रश्न सोडविण्याएवजी मरठी बिहारी भांडणे लावली जातात.

प्रत्येक क्षणी , प्रत्येक दिवशी 'भारतीय' तुटतोय. भारतीय लोक वेगळे होतायेत आणी हिदु, बिहारि, पंजाबी, तेलगु, शिख, मुसलमान, जन्माला येत आहेत. आज हिंदु म्हणुन मला मालेगावला जायला भिती वाटते. मराठी म्हणुन उत्तर प्रदेशात, बिहारि म्हणुन आसामात.

भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे आणी प्रांतीक/धार्मिक्/जातीय ओळखीची सीमा ओळखण्यातही!

सर जोन ग्रेशम म्हणाले होते की भारत असे काहिहि अस्तित्वातच नाहिये.वेगवेगळ्या भाषा, प्रांत, धर्म, जाती आणी संस्क्रुती याचे ते फक्त एक गाठोडे आहे. मास्लोव असे म्हण्ल्याचे एकिवात आहे कि भारतात superpower होण्याची क्षमता आहे पण superpower होण्याची wisdom नाहि! आजच्या भारताचे खरे अपयश हेच आहे कि भारतात हुशार लोक आहेत, शिकलेली लोक आहेत पण sensible आणी rational (सयुक्तीक) लोक नाहित.

गुलमोहर: 

इथे तुझ्यापेक्षा वेगळं काहीही लिहिणार्‍या लोकांबरोबर तू इतका वितंडवाद घालतोयस.
'agree to disagree' लांबच राहिलं, ऐकून घ्यायलाही तयार नाहीयेस, स्वतःचं म्हणणं एका क्षणाकरताही सोडायला तयार नाहियेस आणि @ the same time बाकिच्यांनी मात्र त्यांची मत/इतक्या वर्षांची शिकवण/जात्/धर्म लग्गेच सोडून द्यावा अशी अपेक्षा करतोयस.

नानबा, मी वादच घालतो आहे ना ? एखादा लेख नाहि आवडला तर त्याविरुध्द मी लेखच लिहित आहे ना ? डोकि फोडायला, घरे जाळायला, जीव घ्यायला तर जात नाहि ना. agree to disagree म्हण़जे , मला जे agree नाहि झाले त्याविरुध्द मी लिहिणारच नाहि असे तर नाहि ना ?

जर agree to disagree म्हणून कोणीहि स्वताची बाजु माडलीच नाहि तर गोष्टी बदलणारच नाहित मग. पण जी लोक माझ्यावर हल्ले करत आहेत त्यांना विचारा - ते तर agree to disagree पण नाहित.निखिल वागळेचे मत आवडले नाहि कि त्याच्यावर हल्ला, मोबाइल कंपनीने मराठित उत्तर दिले नाहि म्हणुन त्यांच्या औफिस्वर हल्ला. त्यांना का तुम्हि हा प्रश्न विचारत नाहि ?

मंदारसाहेब, ते पुस्तक नाहि हो बरोबर वाटत तुमच्याबरोबर. तुम्हि तर क्रुती करणारि माणसे. तलवार, रामपुरी असे काहि घ्या उशाशी.!
Proud Proud

हा हा हा, गणू माझे कसलेही कन्फ्यूजन नाहीए.... म्हटलं होतं ना, तुम्हाला उत्तर दिलं, समाधान सुचवलं की तुम्ही त्याला फाटे फोडणार, त्यांना प्रतिप्रश्न करणार..... ज्याची उत्तर ऐकायचीच मनःस्थिती नाही, ज्याचे कान व मन दोन्ही स्वतःच्या म्हणण्याखेरीज काहीही ऐकायलाच तयार नाहीत त्याला काही सांगून उपयोग नसतो. त्यामुळे माझी ही पोस्ट तुमच्यासाठी नाहीचे हे तुम्ही गृहित धरून चाला.

सेन्सिबल आणि रॅशनल मध्ये वैचारिक व भावनिक संतुलन येते. डावा मेंदू व उजवा मेंदू यांच्या कार्याचे संतुलन. तर्क व भावना यांचे संतुलन. एकवेळ विचारांचे संतुलन होऊ शकते. परंतु भावनांना संतुलित करावे हे आपल्याला कोणतीच शाळा, अभ्यासक्रम शिकवत नाहीत. त्यामुळे क्रोध, चिडचीड, दु:ख, मत्सर, द्वेष, हाव इत्यादींना कंट्रोल कसे करावे किंवा त्यांच्यामुळे आपले आयुष्य भरकटण्यापासून कसे वाचवावे ते अनेकांना कळत नाही. मग क्रोध, संताप, मत्सर, सूड यांसारख्या भावना वरचढ ठरल्या की त्यातून काय काय गैरकृत्ये होतात ती आपण पेपरात वाचतोच! हेच लोक व त्यांच्या भावना भडकावलेही जातात. जर आध्यात्मामुळे संतुलितपणे विचार करायचे बळ व ऊर्जा मिळणार असेल तर असा मार्ग कधीही श्रेयस्कर! ध्यानसाधना इत्यादींमुळे हे संतुलन शक्य होते - त्याला मदत मिळते असे वैज्ञानिक संशोधन सांगते. आजकाल व्यवस्थापकीय व कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यामुळे ध्यानसाधना शिकण्यास प्रोत्साहन देतात. आध्यात्माला धर्म नसतो. माझ्या परिभाषेत आध्यात्माला तुम्ही कोणत्याही धर्माच्या चौकटीत बांधू शकत नाही. ते तुम्हाला उत्तम पध्दतीने, चांगल्या रीतीने आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवते. चुकीच्या मार्गाने जाणार्‍या अनेक लोकांच्या वागण्यात झालेले चांगले बदल आध्यात्मामुळे झाल्याचे माझ्या पाहाण्यात आहे.

पोटाची खळगी भरणे आणि मानसिक शांती मिळवणे ह्या गोष्टी सायमल्टेनियसली होऊ शकतात. खेड्यांमध्ये किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गासाठी एकाच वेळी रोजगार निर्माण करणे, त्यांना रोजगार प्रशिक्षण देणे व त्याच वेळी त्यांना मनातील नकारात्मक भावना, तणाव यांचा निचरा करण्याचे प्रशिक्षण देणे असे दुपदरी कार्य आज भारतात अनेक सेवाभावी संस्था करत आहेत. अशा काही उपक्रमांना मी प्रत्यक्ष भेटही दिलेली आहे. भारतातील तिहारसारख्या तुरुंगात आज रोजगार प्रशिक्षण, रोजगार निर्मिती व आध्यात्म साधना यांची सांगड घालून किरण बेदींनी एक चांगला पायंडा पाडला आहे व त्याचा अनेक कैद्यांनी लाभ घेतला आहे, जेणे करून तुरुंगाबाहेर पडल्यावर त्यांना पोटापाण्याचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांनी गुन्हेगारी मार्गाकडे पुन्हा वळू नये.

समाजातील काही चांगले लोक किंवा संस्था अशा प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. हां, लोकसंख्येच्या मानाने असे कार्य करणार्‍या संस्था खूप कमी आहेत. त्यांची संख्या व व्यापकता जरूर वाढायला हवी. मला अशा उपक्रमांमध्ये जास्त विश्वास आहे. नुसत्या बदल घडवून आणण्याच्या चर्चा करण्यापेक्षा हे लोक ते कार्य प्रत्यक्ष करत आहेत. मी त्यांना जिथे जमेल तिथे मदत करत असते, सामील होत असते. वैचारिक डोकेफोड करण्यापेक्षा मला ते जास्त महत्त्वाचे वाटते. ह्या अनेक संस्थांचा पाया आध्यात्माचा आहे. आणि त्यातूनच त्यांना असे कार्य करण्याची प्रेरणा मिळालेली आहे.

तुम्हि तर क्रुती करणारि माणसे. तलवार, रामपुरी असे काहि घ्या उशाशी.!
--- तलवार, रामपुरी पेक्षा पुस्तकाची शस्त्र म्हणुन धार जास्त परिणामकारक असते. कृती करणे म्हणजे केवळ तलवार बाळगणे हाच तुमचा समज आहे कां?

गणू - तुम्ही अरुंधती यांच्या पोस्ट वाचल्यात कां? तुम्हाला त्यात न पटण्यासारखे काय दिसले?

गणू - तुम्हाला मानवता हा धर्म (अरुंधती यांनी योग्य शब्द वापरला आहे - जगण्याची पद्धत) मान्य आहे कां? कागदावरचा जात आणि धर्म नाहिसा करण्यासाठी काय उपाय आहेत? जो पर्यंत कागदावरचेच जात - धर्म जात नाही तर मनात असणारे जायला अजुन अनेक अनेक दशके लागणार आहेत.

छे छे असं काही नाही. आधी तो धर्म (त्यातल्या त्यात हिंदू) बुडवा मग पुढचे बोला!

मग काही काळानंतर ज्यांचाकडे जास्त संपत्ती आहे अश्यांचा एक कळप आहे तो ही बुडवायला हवा (तसा तर तो आत्ताही आहे आणि काही संघटना तो बुडवा म्हणत आहेतच).

मग आणखी काही काळाने सर्व गरीबच झाले, मग त्यांचाही एक कळप झाला मग तो ही बुडवा.

तो पर्यंत झालंच तर आमचे खास दोस्त बेफिकीर अन त्यांच्या कथावरिल त्यांना वाटणार्‍या उचित अनुचित प्रतिक्रियांचे कळप, (उदाहरणार्थ कोसला भक्त आणि सात सक्क त्रेचाळिस भक्त) असे दोन कळप वावरत आहेत त्यांनाही बुडवू.
अरे हो मग बुद्धिप्रामाण्यवादी आणि देववाले असेही दोन कळप आहेतच, त्यांच काय करायचं?

गणू पाजी तुमच्यावर काही बाबतीत आमच्या मधुकरभाउजींचा प्रभाव जाणवतो. तो ही एक कळपच म्हणावा का?

तुमची भावना शुद्ध आहे हे मात्र मान्य करावे लागेल पण काय की भरपुर पाखंड साहित्य वाचल्यामुळे वा नको त्या प्रभावामुळे ब्रेन वॉश होतो एखाद्याचा, आधीच असलेले कन्प्युजन वाढीस लागते, तशी काही त्रिशंकू अवस्था तुमची झाली.

आणि मग .. मिळलेच हरवलेला भारतीय. तो पर्यंत चर्चा करा.

खरेतर आम्ही अ‍ॅडमरावांना (अ‍ॅडमिनरावांना नाही बर) सांगीतले होते, इव्हबाईंना नका आमत्रंन देऊ. नसते कळप तयार होतात, त्यांनी ऐकले नाही अन आता आपल्याला भोगावे लागते. हे राम!

देशी, अहो सगळे कळप होणारच आहेत आता नाहिसे. जिथे जिवस्रुष्टीच नाहिशी होइल तेथे कळप काय घेउन बसलात ?

"जिथे जिवस्रुष्टीच नाहिशी होइल तेथे कळप काय घेउन बसलात ?"

मग तसे आहे तर उरलेले दिवस उगाच वादावादी, भांडाभांडी करण्यापेक्षा हसत खेळत घालवा की.

मायबोली वर लिहीणार्‍यांचा पण एक कळप आहे. तिथे तुम्ही येऊन सांगता की कळप नष्ट करा. मग कशाला येता या कळपात?

एकतर तुमच्याच मते, तुमचे म्हणणे इथल्या पुष्कळ लोकांना कळलेच नाही. अशीहि एक पुसट शंका मनाला चाटून जाते की कदाचित् तुम्हाला पण या कळपातले लोक काय म्हणताहेत ते कळत नसावे. किंवा कळत असेल तर मान्य नसावे.

मग तुम्ही आपले म्हणणे घेऊन दुसरीकडे कुठेतरी जा. मनोगत, मिसळपाव इ. जागी. तिथे कुणाला कळले तर ठीक आहे.

भारतातील लोकांना 'भारतीय" म्हणुन एकच ओळ्ख मिळवण्यात अपयश आले आहे आणी प्रांतीक/धार्मिक्/जातीय ओळखीची सीमा ओळखण्यातही!
प्रत्येक क्षणी , प्रत्येक दिवशी 'भारतीय' तुटतोय
गणु,
तुमच्या या वाक्यात बारा आणे तरी तथ्य आहे अस वाटतं !
चांगली शिकलेली (सुसंस्कृत नाही) पिढी देखील एकतर्फी,एकांगी विचार करु लागली आहे,जातीयता वाढतच आहे..
Happy

धन्यवाद अनिल!

मग तसे आहे तर उरलेले दिवस उगाच वादावादी, भांडाभांडी करण्यापेक्षा हसत खेळत घालवा की.

त्यापेक्षा जीवस्रुष्टी नष्ट न होण्यापेक्षा प्रयत्न करणे महत्वाचे नाहि का ?

जिथे जिवस्रुष्टीच नाहिशी होइल तेथे कळप काय घेउन बसलात ?
----- जिवसृष्टी का नाहिशी होणार आहे? कशाच्या आधारावर हे विधान आलेले आहे?

त्यापेक्षा जीवस्रुष्टी नष्ट न होण्यापेक्षा प्रयत्न करणे महत्वाचे नाहि का ?

खरे आहे. तुमच्या प्रयत्नांना सुयश येवो ही प्रार्थना. तुम्ही प्रयत्नशील आहात. तुम्हाला यश मिळेल.
पण इथल्या लोकांना तुमचे मार्ग आवडत नाहीत असे दिसते.

मग तुम्ही आपले म्हणणे घेऊन दुसरीकडे कुठेतरी जा. मनोगत, मिसळपाव इ. जागी. तिथे कुणाला कळले तर ठीक आहे.>>>>>>>..

तिथे अजुनही खतरनाक चिरफाड होइल. माबोवरील मंडळी तुलनात्मक दृष्ट्या खुप सभ्य शब्दात आपले विचार मांडतात. Wink

तिथे अजुनही खतरनाक चिरफाड होइल. माबोवरील मंडळी तुलनात्मक दृष्ट्या खुप सभ्य शब्दात आपले विचार मांडतात

केवळ यातच मजा येणारी माणसे असतात माहित आहे. म्हणुनच तर जग असे आहे हो!

गणूजी, जग कसे आहे ते जाऊद्या, आधी माणूस हा "जनावरान्चाच" एक प्रकार आहे हे मान्य करुन घ्या
अन बहुतान्श जनावरे/प्राणी कळपाने/समुहाने रहातात हे आजमावा! एकदा ते उमगले की माणसान्चे वेगवेगळ्या वैशिष्ट्यान्वर आधारीत वेगवेगळे कळप वा कम्पू वा समुहान्चे तुम्हास येवढे आश्चर्य वाटणार नाही!
त्यातुनही या व्यवस्थाच बदलायच्या अस्तील तर "गणूवादी कम्युनिस्ट पक्ष" काढा, अन भारतातलेच समुह/कळपच काय, तर आख्ख्या पृथ्वीवरील देश्/राष्ट्रे नामक कळप मोडीत काढून एकचएक समाजवाद आणायचा प्रयत्न करा! कसे? Proud तसेही राष्ट्रवादाला थोताण्ड म्हणणारे बौद्धिक जीव अस्तित्वात आहेतच, त्यान्चेही सहाय्य घ्या! इथेही मिळतील कदाचित तसे नरपुन्गव.

एक चांगला अनुभव लिहीत आहे.

मी परवा ओरिसात कामाला गेले होते. एक तर भुवनेश्वर मध्ये मंदिरे खूप आहेत व तसेच ओरिसात देवभक्तीचे वातावरण जास्त आहे. मला संध्याकाळी नेट कनेक्षन हवे होते म्हणून जिंजर हॉटेल मध्ये कार्ड मागितले त्यासाठी मोबाइल नं लागतो. मला नेटवर्क मिळत नव्हते म्हणून मी हॉटेलच्या माणसाला रिक्वेस्ट केले कि तू तुझ्या नंबर वर लॉगिन कर म्हणून, मी नेट्वर्क मिळतेय का बघते. त्या नादात मी हॉटेलच्या बाहेर बरेच अंतर चालत गेले. मग अजून जरा पुढे काही दुकाने दिसत आहेत तिथपरेन्त जावुया म्हणून गेले तर तिथे एक साधे मंदीर होते चला दर्शन तरी घेऊन परत फिरू म्हणून मी तिथे गेले तर तिथे साई बाबांची आरती सुरू झाली.
शुद्ध मराठीत. आता मी काही बाबा देव वगैरे फार करत नाही पण त्या हवेत रात्रीच्या वेळी ते सूर ऐकून अतिशय प्रसन्न वाट्ले. मराठी म्हणून आणिकच ग्रेट वाट्ले. आई म्हणत असे त्या सर्व आरत्या व आपले घालीन लोटांगण वगैरे श्लोक होते. बरोबरीचे पब्लिक सर्व ओरिया, काही जैन पंजाबी,तेलुगु मध्यम वयीन स्त्रीया तरुणी पुरुष आय्टीतले बॅकपॅक घेतलेली मुले वगैरे. संपल्यावर स्त्रीयांना पहिले दर्शन घेऊ दिले व
तीर्थ प्रसाद होउन आरती संपली. कोणताही चकचकाट बडेजाव नाही. अगदी सामान्य जनता. सर्व भारतीय.
भारतीयांना जोड्णारे कितीतरी धागे आहेत त्यात हा एक श्रद्धेचा पण आहे.

मी हॉटेलात परत आले तर हॉटेलातील मुलाने सांगितले मॅड्म मी तुमच्यसाठी नेटघेऊन ठेवले होते बाहेर परेन्त आलो तुम्हाला शोधत. कुठे गेल्या तुम्ही.? मग त्याने मला परत लॉगिन करून दिले. एक धागा
इंटरनेट चा पण आहे. फक्त भारतातच हे व असे सीमिंगली विरोधी धागे एकमेकात घट्ट गुंतून त्यांचा गोफ झालेला अनुभवता येतो.

मामी, चान्गला अनुभव, मनात नोन्दलात हे विशेष!
पण काय हे ना, देव खोटे, त्यावरील श्रद्धा/भक्ति/अर्चना हे सगळे झूठ, मूळात धर्मच नको - धर्मशास्त्रे वेद पुराणे वगैरे हिन्दु "मटेरिअल" नकोच नको, असलाच तर मानवतावादी (? म्हन्जे काय काय की!) धर्म असूदे वगैरे फाटे अस्ताना, तुमच्या विवेचनाचा कितपत उपयोग होईल, शन्काच आहे! असो.

मामी छानच अनुभव आहे. पण काय आहे कि हा अनुभव येण्यासाठी साइबाबांचे मंदीर असावे लागत नाहि. जेव्हा माणुस - दुसर्याकडे माणुस म्हणुन पहतो तेव्हा असे अनुभव येतातच.

हो रे पण मी फार इतर माणसांकडे पाहू नाही शकत ना लोकांचे गैरसमज होतील. मी पण साईबाबा वगैरे तून एकता म्हणत नाहीचे. तो एक श्रद्धेचा भूमिगत प्रवाह आहे. जो तुम्ही भारतात नाकारू शकत नाही. गरीब, नाकारलेली, अनेक पातळ्यांवर असुरक्षिततेचा सामना करणारी सामान्य जनता कुठेतरी एका पातळीवर एक होते. आपल्याबरोबर दुसरा पण सहन करतो आहे हे बघितल्यावर कुठेतरी बंध जुळतात. गरीबी बघूनच कसेतरी होते ओरिसात. पण लोक अगदी मदत करणारे आहेत. आपण अ‍ॅटिट्यूड दाखिवली नाही तर.

आश्विनिमामी, छान छान.
मला वाटते भारताला, भारतातलेच लोक जास्त नावे ठेवतात. मला लोक नावे ठेवतात कारण मी लिहीलेले खरे असते, म्हणून ते झोंबते, पण माझ्या सारखे भडकू भारतीय इथे फार नाहीत. बरेचसे समतोल दृष्टीचे आहेत.

इथे मी दोनदा प्रयत्न केले की भारताबद्दल चांगले काय तेच लिहा. एकदा माझ्या पानावर, नि नुकतेच 'इतर घडामोडी' या सदरात.

पण कसले काय नि कसले काय? कुण्णि मनावर घेतले नाही.

हे असे होते म्हणूनच गणू सारखे लोक निराश होतात, चिडतात, त्यांचा आशावाद नाहीसा होतो नि मग ते पराकोटीच्या गोष्टी करू लागतात. त्यांना भारत चांगला व्हावा याची कळकळ असते, पण त्यांना योग्य मार्गावर नेणारे कमी. नि मग, नेहेमी वाईटच गोष्टी ऐकून त्यांचा राग वाढतच जातो. माझा पण.

कायम, भारत चांगला आहे, भारताचा भविषयकाल उज्ज्वल आहे, भारतात हुषार, उद्योगी लोक आहेत, भारताची झपाट्याने प्रगति होत आहे असे लिहीत जावे. आता वाईट काही लपवायचे नाही, पण त्याला किती किंमत द्यायची नि चांगल्या गोष्टींना किती हे जरा भान असावे.

असे स्वतःच स्वतःच्या देशाची, भाषेची चांगली बाजू मांडण्या ऐवजी वाईटच लिहीले, तर दूरवर बसलेल्या, भारताशी संबंध पार तुटलेल्या लोकांचे काय मत होईल?

Pages