गझल
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
21
भासली शाबासकी, की घातलेला घाव होता?
सोसलेल्या चेहर्यांचा, शापितांचा गाव होता..
हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली,
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?
सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता!
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले?
बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?
टाळले सौख्या जरी, ते प्राक्तनाला मान्य होते
लागता हातास काही, वाद होण्या वाव होता!
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
स्वाती आंबोळे ह्यांची, ही गझल लिहिताना खूप मदत झाली. वेळोवेळी दाखवलेल्या चुका आणि केलेल्या सूचना, ह्याबद्दल स्वातीचे खूप आभार.
विषय:
प्रकार:
शेअर करा
चालताना सोबती होता जरी अंधार
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
चांगली गझल शैलजा जी...
वरील शेर अत्यंत भावला.
खूप छान शैलजा प्रयत्न चांगलाच
खूप छान शैलजा
प्रयत्न चांगलाच आहे
पुढेही असाच चालू ठेव
टाळले सौख्या जरी, ते
टाळले सौख्या जरी, ते प्राक्तनाला मान्य होते
लागता हातास काही, वाद होण्या वाव होता!
सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता!
वाह!!! वाह!!! वाह!!! आयटे..
स्वातीला ही एक वाह!!!
छान . घालता कोडे, जवाबाचे
छान .
घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले?
बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?------------सहजसुंदर... !!!
आवडली
आवडली
मस्त
मस्त
(No subject)
>>चालताना सोबती होता जरी
>>चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
मस्तच !
छानच जमलीय ! [कोकणसय मनाचा
छानच जमलीय !
[कोकणसय मनाचा एक कोपरा होता
कां असं वाटावं, शेर तिथे उपराच होता ]
सुंदर गझल शैलजा मतला जास्ती
सुंदर गझल शैलजा मतला जास्ती आवडला.
टाळले सौख्या जरी, ते
टाळले सौख्या जरी, ते प्राक्तनाला मान्य होते
लागता हातास काही, वाद होण्या वाव होता!
शैलजा.. एक एक शेर जबरदस्त ! सारासार विचार न करता अगदी खोल मनातल्या भावनांशी संवाद करणारी गझल.
चालताना सोबती होता जरी अंधार
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता... >>> मस्त
उत्तम रचना!!!
उत्तम रचना!!!
मस्त आवडली गझल.
मस्त आवडली गझल.
मस्त ग शैलजा. आवडली.
मस्त ग शैलजा. आवडली.
डॉ., सुशील, सत्या, गिरीश,
डॉ., सुशील, सत्या, गिरीश, चिन्नु, योगेश, अमित, नंद्या, भाऊकाका, श्यामली, सूर्यकिरण, मिल्या, ह.बा., अनुजा आणि प्राची - तुम्हां सर्वांचे खूप आभार!
चालताना सोबती होता जरी अंधार
चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...
हं.........मलाही या ओळी खूप आवडल्या. शैलजा...मस्तंच गं!
एकदम छान!!
एकदम छान!!
मानुषीताई, गणेश धन्यवाद.
मानुषीताई, गणेश धन्यवाद.
मस्त जमलीय ही गझल
मस्त जमलीय ही गझल
मस्त गं!
मस्त गं!