एका डॉक्टरच्या कविता-४: देव; आहे की नाही?

Submitted by डॉ अशोक on 22 September, 2010 - 03:19

एका डॉक्टरच्या कविता-4

देव: आहे की नाही?

मरणाच्या दाराशी जावून
परतलेला पेशंट
ऐकून, पाहून
देव आहे असंच वाटतं

सासरच्यानी जाळलेली विवाहिता
पुराव्या अभावी सुटलेले सासरचे
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मुलाच निरागस हसू
आजारात हरपतं
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मरणान्तीक प्रसव वेदना सोसून
तान्हूल्याला पाजणारी माय
ऐकून, बघून
देव आहे असच वाटतं

ग्राहक मंचात
डॉक्टर- पेशंट आमने सामने
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

चरक, सुश्रूत
पाश्चर, नायटिंगेल
ऐकून, पाहून
देव आहे असच वाटतं

--अशोक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाचून एक जोक आठवला....,

स्वर्गाच्या खिडकित एका माणसाची प्रतिमा येत असते...जात असते....
पुन्हा येते,पुन्हा जाते....

यमराज म्हणतात्,अरे , ये तरी,नाही तर जा तरी... अशी ये जा का करतोयस?

यावर तो माणूस म्हणतो, काय करु,? तिकडे एक इंटर्न मला सी.पी.आर. देतोय... Happy

सी.पी.आर. = कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन... (ढोबळमानाने= मरणासन्न व्यक्तीस छातिस मसाज करुन जगवण्याचा अंतिम प्रयत्न )