चौकट

Submitted by भुंगा on 17 September, 2010 - 08:28

चौकट.................!

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

माझ्या चौकटीत तुला बसवायचं
आणि, तुझ्या चौकटीत मी शिरायचं
निरंतर चालणारी ही खटपट असते.........

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीला चार बाजू , चौकटीचे चार कोन,
प्रत्येक चौकटीचा एक प्रश्न
आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दोन.
उत्तर निवडायची झटापट असते........

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत नाही,
जो तो आपल्या चौकटीला चिकटूनच राही
चौकटीला छेद द्यायला कोणी धजावत नाही,
आपल्या चौकटीतून बाहेरचा तमाशा पाही.
एकमेकांबरोबर होणारी फरफट असते.......

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!

गुलमोहर: 

चौकटीबाहेरची कविता.......

एकदम चोक्कस... Happy

भुंग्या तरीही .. गुण्यागोविंदाने.. आनंदाने राहणार्‍या कुटूंबाच्या घराला चौकट हि असतेच ना रे ?

मग त्या चौकटीचा अर्थ काय ?

सुकी, इथे मला प्रत्येकाने जपलेल्या आपल्या "ईमेज" बद्दल लिहायचय रे मित्रा....... घराची चौकट वेगळी.

डॉ., मंदार, सुकी धन्यवाद.........

आपण भ्रमर आहात्,त्यामुळे आपणाला कोणतीही चौकट नाही.
परंतू आम्हा पामरांना चौकटीतच राहून जगावे लागते.
कुटुंबाची चौकट,
संस्कारांची चौकट,
जबाबदारीची चौकट,
कायद्याची चौकट,
आणि सरतेशेवटि,चार खांद्यांवरुन जाण्यासाठीची ''लाकडी'' चौकट.

आपली कविता आवडली.

भरतजी, बाळकवी धन्यवाद.....

बाळकवी, तुम्ही तर मला पार मोकाट सोडलेला समजलात की काय???? Lol

तसं नव्हे हो.
भुंगा हा एका फुलावरून दुसर्‍या फुलावर्,वगैरे,
म्हणून मी आपणास चौकट नाही असे म्हणालो.ते आपण व्यक्ती म्हणुन नाही.भुंग्यास म्हणालो.

आणि हो ,आपली कविता आवडल्याचे नमूद केलेय हो मी.

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!

भारी जमलय !!!!!!!!

सुंदर कविता. Happy

चौकटीच्या बाहेर डोकावण्यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावण्याची प्रेरणा जागृत हवी.

चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत नाही,
जो तो आपल्या चौकटीला चिकटूनच राही
चौकटीला छेद द्यायला कोणी धजावत नाही,
आपल्या चौकटीतून बाहेरचा तमाशा पाह

हे झकास रे..... जाम आवडली Happy

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!


पटलं..!! भुंग्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास रे..!!

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!


पटलं..!! भुंग्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास रे..!!

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

भुंग्या या ओळी अप्रतिम आहे पण त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे झाल.....

या कवितेच काहितरी सार्थक होईल............. नाहितर लोका सांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण असु होवु देवु नका म्हणजे झाल.....

मी "चोरट्यांचे" सल्ले घेत नाही...........कशावरून हा सल्लाही कुठल्या तरी प्रतिसादकाचा चोरलेला नसेल........ शेवटी "चोर तो चोर" आणि इथे तुला शिरजोर होण्याचा चान्स मिळणार नाही जिगा. तेवढा जोरही नाही तुझ्यात.......

इथे साळसूदपणा दाखवून माझीच ही कविता इतर कुठेतरी स्वतःच्या नावाने खपवु नका....... Angry

चोर लेकाचा.......... Angry

जिगा, त्या ओळी खर तर तुमच्यासाठी आहेत. नेहमी आपल्याच कवितेची री ओढण्यापेक्षा माबोवरच्या इतर कविता /जुन्या माबोवरच्या कविता वाचा. 'डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा' आणि मग दुस-याना सल्ले द्या! Angry

>>अचानक गंभीर? छान आहे!

ह्म्म्म. मलाही आश्चर्य वाटलं. पण कविता आवडली रे. मनाला भिडणारी आहे Happy

>>भुंग्या या ओळी अप्रतिम आहे पण त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे झाल.....

कवीची कविता ही त्याला अनुभव आल्यावरच लिहायला हवी किंवा त्याप्रमाणे त्याने वागायलाच हवे असे तुमच्या बालबुद्धीला कसे वाटले गावंडे जितेंद्र साहेब?
उद्या भुंग्याने बायकांना होणार्‍या प्रसूतीवेदनांविषयी एखादी गंभीर कविता केली तर तो ती कशी 'अनुभवणार'?
तेव्हा येडपटासारखी विधाने करणे थांबवा आणि मी_आर्या ने लिहीले आहे त्याप्रमाणे तुमचा वाचन व्यासंग वाढवा आधी

दुख पचवायला जेवढ शक्ती लागले तेवढीच खरं बोलायला पण लागते ,भुंगा ,मी_आर्या , मंदार_जोशी

चोरी करन हा गुन्हा आहे पण मान्य करायला पण हिम्मत असावी लागते म्हणुनच तर मी मान्य केलं कारण माझ्यात धमक आहे............ तुम्ही सगळे मास्याला गिळनारे हंस आह्त याचा विचार करा..

आणि दुसर्‍याला जेव्हा तुम्ही बोंट दाखलीता तेव्हा बाकी बोटे तुम्हच्या कडे असतात याचा विचार करा..

आणि मी माझी चुक मान्य केलेली आहे......

चुक मान्य करायला पण धाडस लागलय..................

Pages