चौकट.................!
प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.
माझ्या चौकटीत तुला बसवायचं
आणि, तुझ्या चौकटीत मी शिरायचं
निरंतर चालणारी ही खटपट असते.........
प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.
चौकटीला चार बाजू , चौकटीचे चार कोन,
प्रत्येक चौकटीचा एक प्रश्न
आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दोन.
उत्तर निवडायची झटापट असते........
प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.
चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत नाही,
जो तो आपल्या चौकटीला चिकटूनच राही
चौकटीला छेद द्यायला कोणी धजावत नाही,
आपल्या चौकटीतून बाहेरचा तमाशा पाही.
एकमेकांबरोबर होणारी फरफट असते.......
प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....
जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!
चौकटीबाहेरची
चौकटीबाहेरची कविता.......
एकदम चोक्कस...
(No subject)
भुंग्या तरीही ..
भुंग्या तरीही .. गुण्यागोविंदाने.. आनंदाने राहणार्या कुटूंबाच्या घराला चौकट हि असतेच ना रे ?
मग त्या चौकटीचा अर्थ काय ?
सुकी, इथे मला प्रत्येकाने
सुकी, इथे मला प्रत्येकाने जपलेल्या आपल्या "ईमेज" बद्दल लिहायचय रे मित्रा....... घराची चौकट वेगळी.
डॉ., मंदार, सुकी धन्यवाद.........
अचानक गंभीर? छान आहे!
अचानक गंभीर? छान आहे!
आपण भ्रमर आहात्,त्यामुळे
आपण भ्रमर आहात्,त्यामुळे आपणाला कोणतीही चौकट नाही.
परंतू आम्हा पामरांना चौकटीतच राहून जगावे लागते.
कुटुंबाची चौकट,
संस्कारांची चौकट,
जबाबदारीची चौकट,
कायद्याची चौकट,
आणि सरतेशेवटि,चार खांद्यांवरुन जाण्यासाठीची ''लाकडी'' चौकट.
आपली कविता आवडली.
भरतजी, बाळकवी
भरतजी, बाळकवी धन्यवाद.....
बाळकवी, तुम्ही तर मला पार मोकाट सोडलेला समजलात की काय????
तसं नव्हे हो. भुंगा हा एका
तसं नव्हे हो.
भुंगा हा एका फुलावरून दुसर्या फुलावर्,वगैरे,
म्हणून मी आपणास चौकट नाही असे म्हणालो.ते आपण व्यक्ती म्हणुन नाही.भुंग्यास म्हणालो.
आणि हो ,आपली कविता आवडल्याचे नमूद केलेय हो मी.
भुंग्या, कविता आणि त्यातून
भुंग्या, कविता आणि त्यातून दिलेला संदेश खुप आवडला
भुंग्या, कविता आवडली रे.
भुंग्या,
कविता आवडली रे.
चौकटीची चौकस कविता
चौकटीची चौकस कविता
अमित, निंबुडे, सानी, बाळकवी
अमित, निंबुडे, सानी, बाळकवी धन्यवाद....!
छान कविता भुंग्या...भा.पो
छान कविता भुंग्या...भा.पो
चांगली आहे
चांगली आहे
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....
जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!
भारी जमलय !!!!!!!!
छान संदेश आहे!!!
छान संदेश आहे!!!
सुंदर कविता. चौकटीच्या बाहेर
सुंदर कविता.
चौकटीच्या बाहेर डोकावण्यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावण्याची प्रेरणा जागृत हवी.
सर्वांचे मनापासुन आभार...!!!
सर्वांचे मनापासुन आभार...!!!
व्वा! व्वा!
व्वा! व्वा!
चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत
चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत नाही,
जो तो आपल्या चौकटीला चिकटूनच राही
चौकटीला छेद द्यायला कोणी धजावत नाही,
आपल्या चौकटीतून बाहेरचा तमाशा पाह
हे झकास रे..... जाम आवडली
महाभुंगराज खासच जमलिये चौकट
महाभुंगराज
खासच जमलिये चौकट
काकाक नक्कीच नाहिये... कविता मधे शिफ्ट कर
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....
जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!
पटलं..!! भुंग्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास रे..!!
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....
जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!
पटलं..!! भुंग्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास रे..!!
अगदी नावाला साजेशी! आवडली
अगदी नावाला साजेशी! आवडली
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे
चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....
भुंग्या या ओळी अप्रतिम आहे पण त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे झाल.....
या कवितेच काहितरी सार्थक होईल............. नाहितर लोका सांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण असु होवु देवु नका म्हणजे झाल.....
मी "चोरट्यांचे" सल्ले घेत
मी "चोरट्यांचे" सल्ले घेत नाही...........कशावरून हा सल्लाही कुठल्या तरी प्रतिसादकाचा चोरलेला नसेल........ शेवटी "चोर तो चोर" आणि इथे तुला शिरजोर होण्याचा चान्स मिळणार नाही जिगा. तेवढा जोरही नाही तुझ्यात.......
इथे साळसूदपणा दाखवून माझीच ही कविता इतर कुठेतरी स्वतःच्या नावाने खपवु नका.......
चोर लेकाचा..........
जिगा, त्या ओळी खर तर
जिगा, त्या ओळी खर तर तुमच्यासाठी आहेत. नेहमी आपल्याच कवितेची री ओढण्यापेक्षा माबोवरच्या इतर कविता /जुन्या माबोवरच्या कविता वाचा. 'डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा' आणि मग दुस-याना सल्ले द्या!
>>अचानक गंभीर? छान
>>अचानक गंभीर? छान आहे!
ह्म्म्म. मलाही आश्चर्य वाटलं. पण कविता आवडली रे. मनाला भिडणारी आहे
>>भुंग्या या ओळी अप्रतिम आहे पण त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे झाल.....
कवीची कविता ही त्याला अनुभव आल्यावरच लिहायला हवी किंवा त्याप्रमाणे त्याने वागायलाच हवे असे तुमच्या बालबुद्धीला कसे वाटले गावंडे जितेंद्र साहेब?
उद्या भुंग्याने बायकांना होणार्या प्रसूतीवेदनांविषयी एखादी गंभीर कविता केली तर तो ती कशी 'अनुभवणार'?
तेव्हा येडपटासारखी विधाने करणे थांबवा आणि मी_आर्या ने लिहीले आहे त्याप्रमाणे तुमचा वाचन व्यासंग वाढवा आधी
दुख पचवायला जेवढ शक्ती लागले
दुख पचवायला जेवढ शक्ती लागले तेवढीच खरं बोलायला पण लागते ,भुंगा ,मी_आर्या , मंदार_जोशी
चोरी करन हा गुन्हा आहे पण मान्य करायला पण हिम्मत असावी लागते म्हणुनच तर मी मान्य केलं कारण माझ्यात धमक आहे............ तुम्ही सगळे मास्याला गिळनारे हंस आह्त याचा विचार करा..
आणि दुसर्याला जेव्हा तुम्ही बोंट दाखलीता तेव्हा बाकी बोटे तुम्हच्या कडे असतात याचा विचार करा..
आणि मी माझी चुक मान्य केलेली आहे......
चुक मान्य करायला पण धाडस लागलय..................
अरे देवा! माझ्याकडे तर चूक
अरे देवा! माझ्याकडे तर चूक करायला लागते तितकेही धाडस नाही.
Pages