चौकट

Submitted by भुंगा on 17 September, 2010 - 08:28

चौकट.................!

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

माझ्या चौकटीत तुला बसवायचं
आणि, तुझ्या चौकटीत मी शिरायचं
निरंतर चालणारी ही खटपट असते.........

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीला चार बाजू , चौकटीचे चार कोन,
प्रत्येक चौकटीचा एक प्रश्न
आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दोन.
उत्तर निवडायची झटापट असते........

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीच्या बाहेर कोणी डोकावत नाही,
जो तो आपल्या चौकटीला चिकटूनच राही
चौकटीला छेद द्यायला कोणी धजावत नाही,
आपल्या चौकटीतून बाहेरचा तमाशा पाही.
एकमेकांबरोबर होणारी फरफट असते.......

प्रत्येकाची एक चौकट असते
आयुष्यभर या चौकटीची कटकट असते.

चौकटीतुन बाहेर येऊन डोळे उघडून पहा,
दुसर्‍याला द्या आनंद आणि आपण सुखी रहा
डबक्यासारखे साचण्यापेक्षा नदीसारखे वहा,
अग्नीकुंडात करा तुमच्या चौकटीचा स्वाहा
चौकटीविना आयुष्याची गोडी अवीट असते....

जेंव्हा कुठलीही चौकट नसते,
तेंव्हा आयुष्य अमर्याद असते.......... !!!!!

गुलमोहर: 

तुम्हाला जे काही गरळ ओकायचे असेल ते तुम्ही विपुत किंवा अन्य ठिकाणी खुशाल ओका......
इथे माझ्या (स्वतःच्या, चोरलेल्या नाही) कवितेच्या प्रतिसादात येऊन उगाच पाने भरु नका.....
मला तुमच्यासारखा प्रतिसादाची शंभरी करण्याचा अजिबात सोस नाही....... Angry

भुंग्या कविता कैच्याकै नाही हलव आधी इथुन.

माझ्या चौकटीत तुला बसवायचं
आणि, तुझ्या चौकटीत मी शिरायचं
निरंतर चालणारी ही खटपट असते.........
आयुष्य म्हणजे ही अखंड चालणारी खटपट आहे रे. त्यामुळे ह्या चौकटीत राहायला पण आवडत आपल्याला.
कविता मस्त.
बाकी कवितेवर आणि कवितेवरच लक्ष केंद्रीत कर, प्रतिसादावर नको. जास्त सांगणे नलगे.

अगदी १०० आणे बोललीस गुब्बे.
भुंग्या..सोड रे..
खरंच नको वेळ दवडु प्रतिसादांवर..तेवढ्यात आणखी काहीतरी छान लिहायला घे Happy

गुब्बे, सुमे, राजे धन्स........... आता तेच करतो. एनर्जी वाया घालवण्यात अर्थ नाही.... Sad

अहो मला पण तुम्हाला प्रतिसाद देन्यात काहिच रस नाही मग तुम्ही का मझ्यावर कविता केली,
माझ्या कवितेमधे का गरळ ओकलीस. बघीतल ना स्वतःवर जेव्हा येते तेव्हा कसं वाटते ते..........

म्हणुन दुसर्‍याबद्दल बोलतांना सोडासा विचार करित जा... म्हणजे झाल.
कुनाच्या सहनशीलतेची ईतकीही परीक्षी बघु नवे आणि कुनाला मग कसाल हिनवता हो.......स्वत मधे तर काहिच ताकत नाही सहन करन्याची............

फूल चोरले तरी,गंध चोरता येईल का ?
गाजी सांग कधी मृदगंध चोरता येईल का ?

मान्य केली चोरी तरी शिक्का पुसला जाईल का ?
थेंबाने जी गेली अब्रू हौदाने ती येईल का ?

माझेच ते लाल असा अट्टहास तो जाईल का ?
तूम्हीच केले शत्रू सारे अक्कल कधी येईल का ?

भुंगा... कविता छान आहे... आणि जिगा तुझ्याबद्द्ल वाचलेय बरेच... गिरे तो भी टांग ऊपर असला प्रकार आहे...

Pages