गझल - तांत्रिक सहाय्य
गझल लिहू इच्छिणार्या नवोदितांना गझलविषयक तांत्रिक सहाय्य सहज
उपलब्ध व्हावे या हेतुने येथे काही लेखांच्या लिंक देत आहे.
गझलेच्या संदर्भात वेगवेगळ्या बाफवर/ किंवा विपुमध्ये चर्चा करण्याऐवजी
येथे चर्चा केली तर एक चांगले माहीती संकलन होईल असे वाटते.
.........................................
१) कविवर्य सुरेश भट यांनी लिहीलेली बाराखडी
प्रस्तावना
गझलेचा आकृतिबंध
काफिया आणि रदीफ
स्वरचिन्ह उर्फ अलामत
स्वरचिन्ह उर्फ अलामत-२
शेवटी महत्वाचे
.........................................
४) गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)
५) गझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. )
............................................................................
तांत्रीक बाबीवर चर्चा झालेल्या काही गझला.
१) तिजोरीत मोठा चमत्कार आहे!
२) ती स्वप्नसुंदरी
.............................................................................
यथावकाश पुन्हा काही महत्वाच्या लिंक द्यायचा प्रयत्न करतोय.
वाचकांनीही त्यांना माहित असलेल्या लिंक अवश्य द्याव्यात.
छान मुटेजी..... याची आवश्यकता
छान मुटेजी..... याची आवश्यकता होतीच. माझ्यासारख्या नवोदितास याचा खूप उपयोग होईल.
चांगली सुरुवात.धन्यवाद.
डॉ.कैलास
मायबोलीच्या पहिल्या
मायबोलीच्या पहिल्या कार्यशाळेची लिंक http://www.maayboli.com/hitguj/messages/75/123104.html .
शोनू, दुवा क्र. ३,४ आणि ५
शोनू, दुवा क्र. ३,४ आणि ५ माबो कार्यशाळेचे आहेत..
वरील सर्व लिंकवर दिलेले निकष
वरील सर्व लिंकवर दिलेले निकष पुर्ण करून जर एखाद्याने गझल लिहीली तर
त्या रचनेला गझल म्हणता येईल काय?
या प्रश्नाचे उत्त्तर नाही असे आहे. कारण गझल लिहून प्रकाशित केली की त्या
रचनेला पुन्हा वेगवेगळे निकष लावले जातात.
उदाहरणार्थ :-
१) गझल लयबद्ध असावी जेणेकरून गझल लयीत म्हणता यायला हवी.
२) सामाजिक आशयावर नसावी.
३) गझलेत व्याकरण शुद्धता आणि शुद्ध मराठी भाषेचा वापर असावा.
४) ग्रामिण भाषेचा वापर नसावा.
यथावकाश बाकी मुद्दे.
मुटेजी.... आपल्या रचनेस ''
मुटेजी.... आपल्या रचनेस '' गझल'' आहे/नाही असे प्रमाणपत्र मिळावयाची आवश्यकता नाही......
मी प्रथितयश गझलकारांच्या गझल संग्रहा मध्ये, अशुद्ध कवाफी वाचल्या आहेत...... अलामत भंगल्याचे पाहिले आहे.फक्त ४ च शेर पाहिले आहेत. अन तरीही कुणी त्यांस ही '' गझल'' नाही असे म्हटल्याचे स्मरत नाही.आपण रचलेली रचना तंत्र आणि आशय ह्या दृष्टीने '' हृदयास भिडली '' की झाले...... आणि आपल्या रचना तश्या आहेत.
तंत्र आणि आशय असलेली रचना निर्मिली जावी हे खरे.
डॉ.कैलास
मुटे तुमच्या नं २ व ४ च्या
मुटे तुमच्या नं २ व ४ च्या मुद्याला मी अ अ जोशी ह्यांचा बाफ वर उत्तर दिले आहे. ( ते मी दिलेले नसून खुद्द सुरेश भट व फिराकसाहेब ह्यांनी दिले आहे.)
मुटे छंदोरचनेची लिंक
मुटे छंदोरचनेची लिंक दिल्याबद्दल शतशः धन्यवाद....लयबद्धता हे काव्याचे व्यवच्छेदक लक्षण आणि गद्यापासून त्याला वेगळे ठरवणारा मुख्य निकष ....त्याचा विचार किती गझलांमधे दिसतो?
इथे आताच ३ वर्ग सुरु झालेत,
इथे आताच ३ वर्ग सुरु झालेत, आणखी किती होणार? कवितांवरही वैयक्तिक (personal) न होता चर्चा होऊ शकत नाही का?
मुटेजी खुप धन्यवाद लिंक
मुटेजी खुप धन्यवाद लिंक दिल्याबद्दल!
आकृतीबंधाप्रमाणे रचना
आकृतीबंधाप्रमाणे रचना रचल्यानंतर इतर प्रश्न उद्भवतात.
धन्यवाद!
>>त्यामुळे, एखादी रचना गझल
>>त्यामुळे, एखादी रचना गझल आहे किंवा नाही याबाबतची चर्चा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिली जावी असे वाटते. त्यात कुणावरही निंदाजनक लिखाण करायचा हेतू नसून ती एक चर्चा असते. तसेच, ती चर्चा आवश्यक आहे असेही वाटते.
मान्य! पण ती चर्चा अ.अ. जोशींच्या बा.फ. वर आहे ना? ईथे निव्वळ ज्यांन्ना गझलेचे तंत्र (जे काही आहे ते) मान्य आहे अन गझल लिहायची आहे त्यांच्यासाठी हा बा.फ. आहे ना?
फार उपयुक्त माहीती आणी
फार उपयुक्त माहीती आणी चर्चा......
धन्यवाद
<< ईथे निव्वळ ज्यांन्ना
<< ईथे निव्वळ ज्यांन्ना गझलेचे तंत्र (जे काही आहे ते) मान्य आहे अन गझल लिहायची आहे त्यांच्यासाठी हा बा.फ. आहे ना? >>
गझलेचे तंत्र सहज उपलब्ध व्हावे, हा उद्देश आहे.
मेधा.. लाख धन्यवाद... ही link
मेधा.. लाख धन्यवाद... ही link मी खूप दिवसांपासून शोधत होतो...