जर्मन भाषा

Submitted by रोचीन on 4 September, 2010 - 05:59

नमस्कार!! मी नुकतीच जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. ईथे कुणी जर्मन शिकले असल्यास त्यांच्याकडून मार्गदर्शन हवे आहे.अभ्यासासाठी कुणी जाणकार साइट्स सुचवू शकेल का?? आंतरजालावरिल मुक्त शब्द्कोश, इतर उपयुक्त साईट्स, इपुस्तके वगैरे बद्दल माहिती हवी आहे. अनुवादक असल्यामुळे भाषांतर, व्याकरणात मदत व्हावी अशा साहित्याची अपेक्शा आहे.
धन्यवाद!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठपर्यंत शिकला आहात आपण? कुठे शिकता आहात?
पूर्वी Altavista Babelfish ने ठिकठाक व्हायचे.
Langenscheidt ची Dictionary Beginners साठी उत्तम मानली जायची.

मी आताच सुरु केलय! ३ लेक्चर्स झलि आहेत. सर घरी येउन शिकवतात. नोकरी करत असल्यामुळे कुठे जाऊन शिकायला वेळ नाही. मॅक्स मुलरला बाहेरुन बसणार आहे. Langenscheidt ची Dictionary त्यानी दिलि आहे. पण ऑफिसात बसल्या बसल्या अभ्यास करायला म्हणून माहीति हवी आहे. एखादि चांगली ऑनलाईन डिक्शनरी माहीत आहे का?
आणि क्रुपया मला आपण वगैरे म्हणु नका !! Happy

गूगल ट्रान्सलेशन मध्ये बर्‍यापैकी योग्य शब्द मिळतात आणि वाक्य सुद्धा बर्‍यापैकी योग्य असतात.. थोडाफार बदल क्वचित करावा लागतो..

परिक्षेच्या आभ्यासाठी एम एम बी च्या पुस्तकांसारखे दुसरे काहीच नाही.. सगळ्यात बेश्ट मटेरियल..

हिम्याला अनुमोदन रोचीन. नुकतेच शिकायला सुरवात केली तर क्रमिक पुस्त्तकं पुरेत सध्या. भाषा सोपी आहे, मराठी भाषिकांसाठी तर अजूनच. पाठांतराला पर्याय नाही (सुरवातीला) कारण articles.
मॅक्सम्युलरची लायब्ररी उत्तम आहेच आणि क्रमिक पुस्तकांना लेवलनुसार पर्याय तिथे मिळतातच. टेप्सही असतातच. छोटी गाणी, गोष्टी वाचायला चिक्कार मिळतील.

About.com वर बेसिक जर्मन होते.
Mittelstufe पर्यंत पोचल्यावर मग अनुवादाच्या दृष्टीने थोडासा विचार करायला हरकत नाही. Happy

ऑनलाईन डिक्शनरी साठी leo.org ही साईट वापरुन बघा. शब्दांचे अर्थ आणि उच्चार चांगले दिलेले आहेत.

धन्यवाद सर्वांना !!! About.com पाहीली. leo.org हे पण बघते!! आणि तुम्ही सर्व वेळोवेळी असालच मदतीला!!
(अशी अपेक्शा!!) Happy

leo.org आताच पाहिली. प्ण ती साइट फक्त जर्मन - इंग्रजी अशी आहे. इंग्रजी-जर्मन अशी पण हवी ना!! कुणाला माहित आहे का?

मी पण एक वर्श शिकले जर्मन. व्याकरणा बरोबरच कलोक्विअल म्हणजे बोलीभाषेतील शब्द, टेक्निकल शब्द पण शिकून घे त्याचा फार फरक पड्तो. दुसरे म्हणजे जर्मन संस्क्रुतीचा त्यांच्या कला नाट्य संगीत यांचा बॅकग्राउंड अभ्यास कर म्हणजे बरेच भाषिक संदर्भ लक्षात येतात. अडखळावे लागत नाही. अनेक शुभेच्छा. तू एवढ्या मेहनतीने शिकत आहेस ग्रेट. भाषांतर करणार का?

जर्मन लोक लई परफेक्ट टेक्निकली. माझ्या भावाने एक उदाहरण सांगितले. आपण हवा गरम आहे फार गारठा आहे वगैरे म्हणतो पण ते अगदी इट इज १६.६ डीग्रीज. असे म्हणतात. त्यांची मानसिकता समजली की भाषा आलीच.

अश्विनीमामी, धन्यवाद!!
>>भाषांतर करणार का?
अहो मी अनूवादक म्हणूनच काम करते!! जपानी शिकले आहे. आता नव काहीतरी म्हणून जर्मन. मला मूळात वाचायला खूप आवडत असल्याने भाषेचीहि खूप आवड!!म्हणून हा एवढा प्रपंच!!
>>मी पण एक वर्श शिकले जर्मन.
कुठे शिकलात तुम्ही?? माझी मदत कराय्ची बरं का!!

ती साइट फक्त जर्मन - इंग्रजी अशी आहे. >> नाही ती साइट इंग्रजी-जर्मन आणि जर्मन - इंग्रजी अशी आहे. तिथे असलेल्या flags वर click केले की मोड चेन्ज करता येतो.

मी कालेजात असताना जर्मन भाषेच 'क्रॅश कोर्स' केला होता, पण माझे आणि शिक्षकांचे वर्गामध्ये वैचारिक मतभेद झाल्या कारणाने दोनदा वर्गत्याग करावा लागला होता. Happy

असो त्यावेळी भरपूर साहित्य मिळालं होतं. ऑडिओ सेशन्स आहेत, पुस्तक आहे व एक डिक्शनरी पण मिळाली. जर्मन लोक उच्चारांबद्दल फार जागरुक असतात. त्यामुळे शब्द उच्चारताना फार काळजे घ्यावी लागते सुरुवातीला.

http://www.deutsch-lernen.com/ ही पण वेबसाइट चांगली आहे. शुभेच्छा.

>>तिथे असलेल्या flags वर click केले की मोड चेन्ज करता येतो.
ओह!! बघते करुन!! धन्स!!
>>माझे आणि शिक्षकांचे वर्गामध्ये वैचारिक मतभेद झाल्या कारणाने दोनदा वर्गत्याग करावा लागला होता.
Happy Happy
>>http://www.deutsch-lernen.com/ ही पण वेबसाइट चांगली आहे.
बघते!!!
धन्स सर्वांना!!!

ही भाषा मास्तर लाऊनच शिकावी लागते का? माझ्यासारख्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीशिवाय काहीही न येणारीला या भाषेची तोंडओळख करुन घ्यायला कुठली साईट आहे का?

सहज शक्य होत असेल तर थोडं हात पाय मारुन बघेन म्हणते.

जर्मन लोक लई परफेक्ट टेक्निकली. माझ्या भावाने एक उदाहरण सांगितले. आपण हवा गरम आहे फार गारठा आहे वगैरे म्हणतो पण ते अगदी इट इज १६.६ डीग्रीज. असे म्हणतात. त्यांची मानसिकता समजली की भाषा आलीच.>>>> अश्विनीमामी Happy खरं आहे...आणि मी जर्मनीत राहत असल्याने जर्मन परफेक्शनचा पदोपदी अनुभव येतो.

रोचीन, धागा वाचल्याबरोबर मीही तुला leo.org च सुचवायला आले होते. पण प्रतिक्रिया पाहिल्या. leo वर कुठलेही सेटिंग चेंज करायची गरज नाही. हवा तो शब्द नुसता लिही, अनुरुप भाषेत भाषांतर लगेच दिसेल तुला.

नमस्कार...भाषा ग्रुप मधे आत्ताच जॉइन झाले..हे दिसले आणि मदत करावी म्हणून आले.. Happy
http://www.dict.cc/ आणि http://www.woerterbuch.info/
ह्या तान्त्रिक / लीगल भाषान्तरासाठी चान्गल्या आहेत..
डुडेन चे शब्दकोश रेकमेन्डेड..
एम एम बी तून करणार असाल तर लगेच लायब्ररी लावा... नवीन शिकणार्‍यान्साठी खूप पुस्तके आहेत..(पुण्यातले सान्गु शकते!) Happy

http://german.about.com/
ईथे ऑडीओ पण उपलब्ध आहे त्यामुळे उच्चार पण शिकायला मिळतात.
बिगीनर ते अ‍ॅडव्हान्ससाठी छान धडे आहेत.

http://www.germanpod101.com ही साईट पण खुप उपयुक्त ठरेल! त्यांच्या बहुतेक सर्व भाषांसाठी अशा साईट आहेत. रजिस्टर करावे लागेल तिथे. मी जपानी शिकण्यासाठी वापरत होते आणि बराच फायदा झाला होता.

माझी मदत कराय्ची बरं का!!

>>
मला मदत करायची बरं का !! असे हवे. अनुवादक ना तुम्ही ? असेच अनुवाद करता का? Angry

मी आहे म्हणून ठीक आहे , पेन्डसे गुरुजी असते तर? Proud