टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस ओळख - १

Submitted by केदार on 1 September, 2010 - 16:26

आपण सर्वच जन नेहमी ऐकत असतो की फलाण्या माणसाला शेअर्स मध्ये एवढा फायदा झाला, तेवढा फायदा झाला. प्रत्येक गुंतवणूकदाराला वा ट्रेड करणार्‍याला असे वाटते की आपल्यालाही हा फायदा झालाच पाहिजे.

पण बाजारात शेअर्सचे, फ्युचर्स / ऑप्शन्सचे ट्रेडिंग करताना बरेचदा नुकसान होते व ह्या सर्वातील आधी असणारा उत्साह मग कमी होतो.

परदेशी जायला जशी इंग्रजी आवश्यक तसेच मार्केट मध्ये राहण्यासाठी त्यांची भाषा तुम्हाला माहित होणे फार आवश्यक आहे. ती भाषा आपण शिकू. ही भाषा टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस करताना नेहमी वापरली जाते, सपोर्ट, टारगेट्, रेसिस्टन्स, ओपन, हायर टॉप, डोजी, रिव्हर्स हॅमर अशी काहीशी अगम्य भाषा मार्केट मधिल लोक बोलत आसतात.

टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिसचे फायदे.

१. किमतीचा इतिहास पाहून सहज निर्माण होणारे ट्रेन्ड ओळखता येतात.
२. फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस सारखे ह्यात वित्तविषयक ज्ञान असायला हवे असे नाही.
३. एखादी कंपनी खूप चांगली असूनही त्याचे भाव का पडतात तर मार्केट मधिल अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शन.फक्त किमतीचा चढ-उतार व माणसाची त्यापाठची मनोभुमीका (भिती, हाव इ इ) हे ओळखता येते. मार्केट म्हणजे शेवटी लोक. आणि हे लोकं प्रत्येक बातमी (न्युज)ला रिअ‍ॅक्ट होत असतात, ते चार्ट वरुन चार्टिस्ट ओळखतात.

तक्ता १
Chart_1.gif

डावीकडून दुसरी उभी रेषा बघा. लक्ष दिल्यावर कळेल की त्याला छेदनार्‍या दोन आडव्या रेषा आहेत. एक रेषेच्या उजब्या बाजूला व दुसरी डाव्या. डाव्या बाजूची आडवी रेषा तो समभाग त्या दिवशी कुठे "ओपन" झाला हे दाखवते, तर उजव्या बाजूची आडवी रेषा ही कुठे "बंद, क्लोज" झाला हे दाखवते. वरचा भाग म्हणजे त्या दिवसाचा टॉप तर खालचा भाग म्हणजे अर्थात बॉटम.

ह्याप्रकारच्या चार्टला OHLC चार्ट म्हणतात. (Open, high, Low, Close). ह्या शिवाय आणखी दोन मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट व लाईन. पैकी लाईन चार्ट सगळ्यांना माहिती असावा. कॅन्डलस्टिक चार्टवरुन अनेक पॅटर्ण निर्मान होतात. ते आपण नंतर विस्तृत पाहू.

Candal_1.gif

ह्या मेनबत्ती वरुन लक्षात येईल की वरची बाजू म्हणजे ओपन, खालचा रेषा म्हणजे क्लोज व मुख्य मेनबत्ती म्हणजे बॉडी. जर ही बॉडी रिकामी असेल तर त्या दिवशी तो समभाग वर गेला, जर भरलेली असेल तर तो खाली गेला. रोज ही मेनबत्ती कशी येते ह्यावरुन डोजी, रिव्हर्स हॅमर, हॅमर इ इ प्रकार व अशा प्रकारातून विविध सिग्नल्स मिळतात. त्यावरुन मार्केट वर जाईल का खाली जाईल हे ह्याचा अंदाज लावला जातो. ह्या प्रकारच्या अभ्यासाला चार्टिंग म्हणतात.

टिप : कॅन्डल चार्ट मधिल ओपन, क्लोज च्या पोझिशन्स लक्षात घ्या.

आता वरच्या चार्ट (१) कडे लक्ष देउन पाहा. डावीकडे एक हिरवी रेषा आहे, त्यानंतर येणार्‍या सर्व रेषा (एक अपवाद) सोडला तर ह्या सगळ्या मागच्या रेषेपेक्षा वर प्लॉट झाल्या आहेत, एकापेक्षा, दुसरी, दुसरीपेक्षा तिसरी. मार्केट ३४० ला सुरुहोऊन काही दिवसात ३८५ पर्यंत गेले आहे.

प्रत्येक दिवसागणिक हा आलेख वर जात आहे. म्हणजेच हायर टॉप कारण टॉप वरचा टॉप निर्मान झाला म्हणून हायर टॉप म्हणायचे, तर बॉटम कडे पाहिल्यावर लक्षात येईल की बॉटम पण हायर आहेत, म्हणजेच ह्याला आपण हायर टॉप, हायर बॉटम म्हणू. आलेखाकडे बघितल्यावर लक्षात येईल की आलेख
चढता आहे म्हणजेच "अप ट्रेन्ड" आहे.

ह्याला डेली चार्ट म्हणायचे. पण फक्त ह्यावरुन अंदाज काढता येत नाही तर विकली चार्टही पाहावा लागतो. विकली चार्ट मध्ये प्रत्येक आठवड्याची एक रेषा, ओपन म्हणजे त्या आठवड्यातील ओपन, क्लोज म्हणजे आठवड्यातील सर्वात कमी किंमत ज्याला तो बंद झाला, लो म्हणजे आठवड्यातील सर्वात कमी भाव. मग त्यावर बंद होओ वा न होओ. ह्या सर्वांचा मिळून एक आठवडा व त्याचा चार्ट.

डेली चार्ट व विकली चार्ट जर हार्मनी मध्ये असतील Happy म्हणजे असा अपट्रेन्ड दाखवत असेल तर मार्केट डेफिनेट अप ट्रेन्ड मध्ये आहे असे म्हणले जाते.

पुढच्या भागात अजून काही गोष्टी पाहू.

मी भाषा मुद्दाम तिच वापरत आहे, उदा हार्मनी, हायर टॉप, कॅन्डल वगैरे. त्याला पर्यायी शब्द वापरले तर ती भाषा बाजारभाषा होणार नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती . मराठीतून लवकर समजते. इटी नाउ वर एक आशू आहे त्याचा ८ - ११ प्रोग्राम असतो तो मी रोज बघते. त्याचा अप्रोचही तुमच्या सारखा आहे. अगदी बॅलन्सड.

धन्यवाद सई आणि मामी. Happy
आशूची नौकरी मिळाली (त्याची न जाता) तर बरे होईल. Happy

TA (टेक्नीकल अ‍ॅनॅलिसीस) वर लिहू का? की ह्यापेक्षा रॅन्डम एखाद्या शेअर किंवा जनरल इकॉनॉमी वर लिहू? (खर तर लिहायला पाहिजेच असेही काही नाही. Happy )

मामी ना अनुमोदन! मराठीतून लवकर समजते! Happy
मी वाट पाहात होतेच ह्या माहितीची.. खरच उपयुक्त आहे हे!
धन्यवाद केदार!

केदार,

धन्यवाद! खूपच उपयुक्त माहिती सोप्या शब्दात सांगत आहात.

तुम्ही एखादा शेअर घेऊन (उदा. एल अ‍ॅण्ड टी) त्याच्या किंमतीचे भाकित (अल्पकालीन, मध्यम कालावधी व दीर्घ कालावधी करता) टेक्निकल अ‍ॅनालिसिसच्या सहाय्याने समजावून सांगाल का?

>>TA (टेक्नीकल अ‍ॅनॅलिसीस) वर लिहू का? की ह्यापेक्षा रॅन्डम एखाद्या शेअर किंवा जनरल इकॉनॉमी वर लिहू? (खर तर लिहायला पाहिजेच असेही काही नाही. )

केदार, सर्वच गोष्टींवर लिही .. समजेल तरी मला. छान माहिती Happy

केदार
Excellent.
वत्सा तू रावण कुळातला का? कधी ही न झोपणारा एखादा हरवलेला भाउ. रामायण काळात भारत नॉर्थ पोल च्या जवळ होता असे एकले होते म्हणून विचारले.
वीकली एक भाष्य निफ्टी व शेअर्स वर पण लिही.
God bless.

वत्सा तू रावण कुळातला का? >> Lol नाही. मी झोपतो, पण ज्या दिवशी मार्केट दिशा बदलेल असे वाटते, त्या दिवशी बराच वेळ मग जागा राहतो.

वीकली एक भाष्य निफ्टी व शेअर्स वर पण लिही. >> हो विचार करतोय. प्रत्येक आठवड्यात काही तरी लिहायचा.

God bless. >> धन्यवाद. Happy

टेक्निकल अ‍ॅनालिसिसच्या सहाय्याने समजावून सांगाल का >> हो कालच निफ्टी बद्दल लिहले होते, माझ्या जुन्या रंगीबेरंगी वर मी असे सेल व इतर शेअर्स बद्दल चार्ट काढून लिहले होते.

माझा उद्देश "मला किती माहिती आहे" असा नसून मला माहिती असलेली माहिती इतर सर्व मराठी वाचकात पोचावी व त्यातून त्यांनी मार्केट मध्ये भिती न बाळगता गुंतवायला सुरुवात करावी हा आहे.

काल खरे तर मी माझे ट्रेड सिक्रेट (म्हणजे रुल बुक) लिहायला सुरुवात केली, पण लक्षात आले की जर ट्रेड कसा करतो, चार्ट कसा वाचतो हेच माहिती नसेल तर त्या रुल्सचा काय फायदा? म्हणून ते डिलिट करुन हे लिहले. चांगली ओळख झाल्यावर (चार्टसची) मग मी माझे रुल बुक लिहायला सुरुवात करेन. त्यात उदाहरणांसहित ट्रेड लिहायची इच्छा आहे.

गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सदगुरू. असच एका गुरूवारी आठवल.
केदार नाथ खूप छान.

मस्त माहिती केदार.

मी भाषा मुद्दाम तिच वापरत आहे, >>> हो बोलीभाषाच वापर अशी विनंती. शेअर म्हंटलेस तरी (मला) चालेल Happy

हो खरच मराठीतून छान वाटतेय. विषयात Interest आहे नि English मध्ये खंडीभर माहिती उपलब्ध आहे. पण वाचायला लागले की डोळे बंद व्हायला नि जांभया यायला सुरुवात होते Happy पण हा पूर्ण लेख वाचता आला तो मराठीत असल्यामुळेच.

आणि हो शब्द तेच ठेव कारण ह्या शब्दांमुळेच बहुतेक बाकीचे लेख 'अन' वाचणेबल होतात!

वरती कुणीसे म्हटल्याप्रमाणे कुठल्यातरी शेअर चे उदाहरण देऊन दाखवलेस तर बरे होईल. तसेच शेअर मार्केट (सेन्सेक्स) चा ट्रेण्ड अपवर्ड असताना एखाद्या शेअरचा ट्रेण्ड डाऊनवर्ड का असतो तेही समजावले तर बरे होईल. म्हणजे त्याचे काही अ‍ॅनॅलिसीस करता येईल का ते.

वरचा क्लास! याचीच वाट बघत होतो की कुठे नेमकं कळेल, तूच मनावर घेतलंस ... क्या बात है! आता शंका प्रतिसादातून विचारू का? Happy पहिली, अमेरिकन मार्केटपण टेक्नीकल्स फॉलो करतंय का सध्या? काय वाट्टेल ते सुरू आहे म्हणून.

केदार,

माहितीपूर्ण, उपयुक्त लेख.

सध्या वैदिक संस्कृतीला आराम करायला पाठवून दिले आहेस का? हरकत नाही हा पण तेवढाच उपयुक्त विषय आहे. तुझ्या पोतडीत अजून काय काय भरलं आहे? Happy

केदार,

आपण महान अहात. अपल्याला २०० वर्शा आयू ष्य लाभो

आपला आभारी आहे.

धन्यवाद

ओळख करुन घेत आहे... आता उदाहरणासहित रुलबुकपण येऊ द्यात Happy

माझा उद्देश "मला किती माहिती आहे" असा नसून मला माहिती असलेली माहिती इतर सर्व मराठी वाचकात पोचावी व त्यातून त्यांनी मार्केट मध्ये भिती न बाळगता गुंतवायला सुरुवात करावी हा आहे.

अतिशय चांगला उद्देश आहे. आणि इथले लिहिलेले वाचताना "मला किती माहिती आहे" हे दाखवण्याचा उद्देश आहे असे मला तरी कधी वाटले नाही. उलट तुम्ही स्वतः काय ट्रेड केलेत/प्रॉफिट बुक केलात तेही मोकळेपणे मांडलेत. माणसे अगदी छातीठोक सल्ला नेहमी देतात पण स्वतः किती कमावले/गमावले ते कधी सांगत नाहीत. Happy

केवळ मनात भिती म्हणुन या सेगमेंटकडे अजुन वळले नाही. तुमचे अ‍ॅनॅलिसिस वाचुन आता सुरवात करणार नक्कीच.

केदार सर थँक्यु तुमच्या वर्गात मी पण आहे Happy

माझ्या सारख्या नुकत्याच D-Mat A/C सुरु केलेल्या आणी ट्रेडिंगचा अ, ब , क हि माहित नसलेल्यांना पण तुमच मार्गदर्शन हव आहे, तुमच्या गाईड लाईन्स प्लीज इथे टाकत जा.

सध्या मी SBI च्या साईट वर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे पण अजुन शेअर्स कसे विकत घ्यावे, विकावे हे माहित नाही . SBI साईट वर काही गाईड लाईन्स आहेत त्या वाचुन फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. Happy