झोका

Submitted by akashkandeel on 1 September, 2010 - 14:21

ही कवीता माझ्या एक वर्षाच्या मुली साठी (तिला लाडाने 'माउताई' म्हणतो)केली आहे.

उंच माझा झोका गेला आकाशी
माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी
चांदोमामा आला मग तक्रार घेउन
माउताई मग बसली कॉट खाली लपून.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहे. हा माझा झब्बु Happy

उंच माझा झोका गेला आकाशी
माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी
चांदोमामा आला मग तक्रार घेउन
माउताई मग बसली कॉट खाली लपून.

घरभर फिरुन चांदोबा दमला
उपाशी पोटी कॉटवर निजला
रात्री अचानक जाग त्याला आली
तार्‍यांशी खेळताना माउताई दिसली

तोही आता झाला सामील खेळात
खुप भुक लागली थोड्याच वेळात
ग्लासभर दुध केले मामाने फस्त
त्रुप्तीची ढेकर दिली मस्त

थोड्याच वेळात सुर्यदेव आले
सगळे घाबरुन चडीचुप झाले
चांदोबा म्हणाले कानात हळु
माउताई आपण रोज रात्रीच खेळु

चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा

http://www.maayboli.com/node/19359

छान!!
वर्षा झब्बु खुपच आवडला Happy

घरभर फिरुन चांदोबा दमला
उपाशी पोटी कॉटवर निजला
रात्री अचानक जाग त्याला आली
तार्‍यांशी खेळताना माउताई दिसली>>>>>मस्तच Happy

चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा

सुंदर....

खुप छान वर्षा_म . खुपच छान झाली आहे आता कविता. सगळ्याचे धन्यवाद कविता वाचल्याबद्दल. खास करुन वर्षा चे !

छान