झोका ( झब्बु )

Submitted by वर्षा_म on 2 September, 2010 - 01:27

उंच माझा झोका गेला आकाशी
माउताई ने तारे तोडुन आणले हाताशी
चांदोमामा आला मग तक्रार घेउन
माउताई मग बसली कॉट खाली लपून.

akashkandeel च्या या कवितेला मी लावलेले शेपुट Happy
http://www.maayboli.com/node/19347

////////////////////////////////////////////////////////////

घरभर फिरुन चांदोबा दमला
उपाशी पोटी कॉटवर निजला
रात्री अचानक जाग त्याला आली
तार्‍यांशी खेळताना माउताई दिसली

तोही आता झाला सामील खेळात
खुप भुक लागली थोड्याच वेळात
ग्लासभर दुध केले मामाने फस्त
त्रुप्तीची ढेकर दिली मस्त

थोड्याच वेळात सुर्यदेव आले
सगळे घाबरुन चडीचुप झाले
चांदोबा म्हणाले कानात हळु
माउताई आपण रोज रात्रीच खेळु

चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा

गुलमोहर: 

चंदेरी रथाचे उघडताच द्वार
चांदोबा झाले रथात स्वार
चांदन्यांनी केले माउला टाटा
चांदोबा म्हणे आता रात्री भेटा ...

वर्षा.. मस्तच आहे तुझा झब्बू... आता झोक्यात बसल्यावर झोका द्यायचं काम कर गुमान Proud

ए योग्या,
मी आधीच बसलेय. माझा झोका घेऊन झाला की तुला देईन. नीट रांग करून उभे रहा बाकीचे जे कोण आले असतील ते. Happy

छान Happy