Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:58
संस्कारभारतीची मोठी रांगोळी, रांगोळीने काढलेली शिवाजी महाराजांची एखादी तसबीर, पाने-फुले, मणी वगैरे वापरून काढलेली सुबकशी रांगोळी यांची काढलेली छायाचित्रे हा आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - रांगोळी
तुम्ही काढलेली/पाहिलेली रांगोळी.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेश, वा! काय मस्त रांगोळ्या
दिनेश, वा! काय मस्त रांगोळ्या आहेत. पाण्यावरच्या रांगोळीचा प्रयोग केला होता. खूपदा प्रदर्शनातही पाहिल्यात. पाण्याखालची कधी पाहिली नाही.
बाईमाणूस, गालिचा रांगोळी मस्त आहे. जरा मोठा फोटो टाक की!
पाण्याखालच्या रांगोळीचा
पाण्याखालच्या रांगोळीचा प्रयोग करुन बघता येईल कि येत्या दिवाळीत. मस्त दिसते !
दिनेश, एकसे एक आहेत ह्या
दिनेश, एकसे एक आहेत ह्या रांगोळ्या.
पाण्याखालची रांगोळी एक वेळ काढता येइल पण त्यात चमच्याचमच्याने पाणी ओतण जरा कठिण वाटतय.
अमृता, जरा मोठा चमचा घ्यायचा
अमृता, जरा मोठा चमचा घ्यायचा ! (अगदी भसकन पाणी ओतले तर रांगोळी विस्कटते )
इथे भिवया, चष्मा, साडिचा पदर ...
बामा मस्त आहेत फोटो. जरा मोठे
बामा मस्त आहेत फोटो. जरा मोठे टाक, नाहीतर मला मेल कर.
दिनेशदा तुम्ही टाकलेल्या रांगोळ्यापण खासच!
मलाही आवडले असते मोठे फोटो
मलाही आवडले असते मोठे फोटो टाकायला पण ते कॉलेजच्या जमान्यात मोबाईलवर काढलेले फोटो आहेत गं .. सुदैवाने save केलेले असल्याने सापडले
साधीशीच फुलांची,
साधीशीच फुलांची,
आज झब्बू द्यायचा राहिलाच
आज झब्बू द्यायचा राहिलाच होता. हा माझा:
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
सगळ्यांच्या रांगोळ्या एकसे एक
सगळ्यांच्या रांगोळ्या एकसे एक आहेत.
काल सुट्टी होती. त्या मुळे ह्या झब्बुत मी भाग घेऊ शकले नाही. मी माझ्या रांगोळ्या "आमच्या कडचे गणपती" ह्या सदरात टाकल्या आहेत.
माझ्या घरी नेट नाहिये.
रांगोळी माझा आवडता
रांगोळी माझा आवडता विषय....
ईथल्या रांगोळ्यातर एक से बढकर एक
योगेश ... अतिशय सुंदर रांगोळ्या...
माझा पण एक- 1) 2)
माझा पण एक-


1)
2)
माझ्या मोठ्या बहीणी च्या
माझ्या मोठ्या बहीणी च्या लग्नातली रांगोळी!!!!!!!
दिनेशदा... हल्ली रांगोळी
दिनेशदा... हल्ली रांगोळी प्रदर्शने फारच कमी झाली आहेत. परळच्या आर.एम्.भट शाळेत एका वर्षी रांगोळी प्रदर्शन भरले होते... त्यावेळी गुणवंत मांजरेकरांनी मधुबालाची रांगोळी काढली होती... काय वर्णावे... केवळ अप्रतिम!
Pages