शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १२

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:58

संस्कारभारतीची मोठी रांगोळी, रांगोळीने काढलेली शिवाजी महाराजांची एखादी तसबीर, पाने-फुले, मणी वगैरे वापरून काढलेली सुबकशी रांगोळी यांची काढलेली छायाचित्रे हा आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - रांगोळी

तुम्ही काढलेली/पाहिलेली रांगोळी.

2010_MB_Jhabbu_Raangoli.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख रांगोळ्या!
योगेश, कसल्या सुंदर आहेत बाप्पाच्या रांगोळ्या. रांगोळी वाटतच नाहीये ती.

rangoli.jpg

एक से बढकर एक झब्बु Happy

कसल्या सुंदर आहेत बाप्पाच्या रांगोळ्या>>>इतरही रांगोळ्यांचे प्रचि भरपुर आहेत, पण या खास गणेशोत्सवासाठीच निवडल्या :).

लालू, क्यूट फोटो.
इतरही रांगोळ्या भारी आहेत एक से एक.
ही मी एका वर्षी दिवाळीत काढलेली -

Rangoli2.jpg

सुरेख ललिता. रंगसंगती छान आलीये. फक्त रांगोळी झाली कि बाजुचे ठिपके पुसुन टाकायचे. Happy
यंदा दिवाळीत ह्या बाफचा भरपूर उपयोग होइल. Happy

योगेश, पुन्हा एकदा मस्त. Happy

संयोजक, आज उत्सवाचा शेवटचा दिवस, त्यामुळे माझे हे एकत्रित ६-७ झब्बु गोड मानुन घ्या. Happy (फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.>>>>>या नियमाच्या हे विरूद्ध आहे हे मान्य, पण आजचा शेवटचा दिवस म्हणुन :).)

(तटि: सगळे झब्बु एकत्रित दिलेत कारण जर संयोजकांचा नकार आला तर डिलीट करणे सोप्पे जावे ;-)).

संस्कार भारती (भांडुप) यांनी काढलेल्या विविध भागातील रांगोळी Happy

सगळ्याच रांगोळ्या छान आहेत.

संस्कार भारतीच्या रांगोळ्यांना काय साचा वगैरे असतो का? इतक्या सिमेट्रीकल असतात म्हणून विचारते.

काय एक से एक रांगोळ्या आहेत. एकदम जबरी.
आर्च नाही संस्कार भारती रांगोळीत साचा नसतो, हाताने काढतात रांगोळी. त्यांचे वर्ग असतात तिथे शिकवतात, मी त्यांच्या वर्गाला जात होते तेव्हा तरी साचा नव्हता. इतर वेळी रस्त्यावर काढतात तेव्हापण हातानेच काढलेली बघीतली आहे. पाच बोटांची रांगोळी पण म्हणतात याला कारण पाचही बोटे वापरून रांगोळीने जाड रेष मारतात.

रुनी म्हणतेय ते बरोबर आहे. त्याचा साचा नसतो. हाताची पाचही बोटं बापरुन काढतात ही रांगोळी. मी पण जायचे ह्या वर्गांना.

वरती संस्कार भारती, पारंपारीक अशा अनेक रांगोळ्या दिसताहेत. संस्कार भारतीच्या रांगोळ्या त्यातील आकर्षक रंगसंगतीमूळे आता चांगल्याच लोकप्रिय झाल्यात. या रांगोळ्यांसाठी, मुक्त हस्त चित्रकलेत हात तयार असावा लागतो.
पण काही वर्षांपुर्वी श्री गुणवंत मांजरेकर (चुभुद्याघ्या) आणि त्यांचे शिष्य, अप्रतिम रांगोळी प्रदर्शने भरवत असत. दादरला रानडे रोडच्या सिग्नलजवळ एक म्युनिसिपल शाळा होती. तिथे हे प्रदर्शन भरायचे. या रांगोळ्या म्हणजे या माध्यमात काढलेली चित्रेच असत. सर्व बारकावे त्यात असत.
मोठी मोठी चित्रे तर असतच, पण ग्रामोफोनची रेकॉर्ड, केळिच्या पानावरचा अबोलीचा गजरा, दहा रुपयांची नोट, खण नारळ वगैरे अगदी खरेखुरे वाटेल असे रेखाटलेले असे.
या रांगोळ्या काढायचे एक वेगळे तंत्र होते. नेहमीप्रमाणे चिमटीने हि रांगोळी काढत नसत. कापडाची छोटिशी पुरचुंडी करुन, त्यात रंग भरुन, एका बोटाने ते हळुवार हलवत रंग भरत असत.
एका रांगोळीला सहज सहा ते आठ तास लागत. यावेळी पंखा लावता येत नसे, दारे खिडक्या बंद ठेवाव्या लागत. कारण वार्‍याने रंग पसरत असत. डोळ्यांत रंग भरताना तर कलाकाराची कसोटी लागत असे. एकेका रांगोळीजवळून पाय निघता निघत नसे. (मी पण थोडे फार शिकलो होतो. डोळे वगैरे जमत नसत, पण बाकी चित्रे जमत. उत्सव मधली रेखा काढली होती. ) या रांगोळ्यात भरदार मिश्यांचा आणि फेटा गुंडाललेला म्हातारा, गुबगुबीत मांजरे वगैरे अगदी देखणी जमत.
आता हि प्रदर्शने तुरळक झालीत. दादरची शाळा कधीच पडली. कुर्ला, नेहरु नगर मधल्या काहि रांगोळ्यांचे फोटो टाकतो. पण समजा झब्बू नाही मिळाला, तर माझ्या रंगीबेरंगी वर टाकतो.
हे कुणाचे पोर्ट्रेट आहे कल्पना नाही. पण कलाकार कथ्थक नर्तक असावा. नुकत्याच शेव्ह केलेल्या, मिशा, डोळे, कुर्ता अगदी बघून घ्या.

rangoli portrait.jpg

या रांगोळ्यांच्या बाबतीत एक अत्यंत खेदजनक बाब म्हणजे, या टिकवणे अशक्य असते. काहि कलाकार त्यावर अलगद काच ठेवून ती काहि दिवस टिकवत असत. लहानपणी या रांगोळ्या, प्रदर्शन संपल्यावर पुसल्या जाणार हि कल्पनाच मला सहन होत नसे.
आता हि आणखी एक कलाकृती बघा. त्या मुलीच्या चेहर्‍यावरुन, खास करुन हनुवटीखाली ओघळणारे पाणी...

Rangoli paaNee.jpg

काय सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या!
पोर्ट्रेटवाल्या तर महान आहेत.

@मामी, तुम्ही काढलेली रांगोळी माझी पण अगदी पेट्ट रांगोळी आहे Happy

या प्रदर्शनात पाण्यावरची आणि पाण्याखालची असे दोन रांगोळ्यांचे प्रकार असायचे. त्याही मी काढत असे. पाण्यावरच्या रांगोळ्यांसाठी परातीत पाणी घेऊन त्यात एक लाकडी चौकट तरंगत ठेवायची. त्यात कोळश्याचा चुरा पसरायचा. मग त्यावर कोळश्याचीच बारिक पूड चाळणीने पसरुन टाकायची आणि त्यावर रांगोळी काढायची. मग चौकटीबाहेरचे पाणी स्वच्छ करायचे.

पाण्याखालच्या रांगोळीसाठी, परातीला व्हॅसलीन लावून घ्यायचे. त्यावर रांगोळी काढायची. मग परात उलटी करुन जास्तीचे रंग काढून टाकायचे. आता रंग व्हॅसलीनमधे पक्के बसलेले असायचे. मग त्यावर चमच्या चमच्याने अलगद पाणी टाकायचे.
या दोन्ही रांगोळ्या सुंदर दिसायच्या. बरीच बर्षे झाली बघून..

माझ्या भाचीने काढलेली रांगोळी, तिच्या मनानेच तीने रंग निवडून तिला पाहिजे तसा आकार दिलाय. मी ठिपके फक्त काढून दिले. वय वर्षे=७.
rangoli-3_0.jpg

Pages