शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १२

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:58

संस्कारभारतीची मोठी रांगोळी, रांगोळीने काढलेली शिवाजी महाराजांची एखादी तसबीर, पाने-फुले, मणी वगैरे वापरून काढलेली सुबकशी रांगोळी यांची काढलेली छायाचित्रे हा आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - रांगोळी

तुम्ही काढलेली/पाहिलेली रांगोळी.

2010_MB_Jhabbu_Raangoli.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, वा! काय मस्त रांगोळ्या आहेत. पाण्यावरच्या रांगोळीचा प्रयोग केला होता. खूपदा प्रदर्शनातही पाहिल्यात. पाण्याखालची कधी पाहिली नाही.
बाईमाणूस, गालिचा रांगोळी मस्त आहे. जरा मोठा फोटो टाक की!

दिनेश, एकसे एक आहेत ह्या रांगोळ्या.
पाण्याखालची रांगोळी एक वेळ काढता येइल पण त्यात चमच्याचमच्याने पाणी ओतण जरा कठिण वाटतय. Proud

मलाही आवडले असते मोठे फोटो टाकायला पण ते कॉलेजच्या जमान्यात मोबाईलवर काढलेले फोटो आहेत गं .. सुदैवाने save केलेले असल्याने सापडले Happy

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.

सगळ्यांच्या रांगोळ्या एकसे एक आहेत.
माझ्या घरी नेट नाहिये. Sad काल सुट्टी होती. त्या मुळे ह्या झब्बुत मी भाग घेऊ शकले नाही. मी माझ्या रांगोळ्या "आमच्या कडचे गणपती" ह्या सदरात टाकल्या आहेत.

रांगोळी माझा आवडता विषय....
ईथल्या रांगोळ्यातर एक से बढकर एक Happy
योगेश ... अतिशय सुंदर रांगोळ्या...

दिनेशदा... हल्ली रांगोळी प्रदर्शने फारच कमी झाली आहेत. परळच्या आर.एम्.भट शाळेत एका वर्षी रांगोळी प्रदर्शन भरले होते... त्यावेळी गुणवंत मांजरेकरांनी मधुबालाची रांगोळी काढली होती... काय वर्णावे... केवळ अप्रतिम!

Pages