आपल्या धर्मात आपण अनेक उत्सव, सणवार मोठ्या उत्साहात साजरे करत असलो तरी एवढ्या उत्सवांच्या गर्दीतला 'गणेशोत्सव' हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा. आपल्यापैकी बर्याच जणांची इतर कोणत्याही देवावर श्रद्धा असली तरी गणपतीबाप्पा मात्र थोडा जास्तच जवळचा वाटतो. त्याला दरवर्षी निरोप देताना डोळ्यांचा कडा पाणावतात ते काय उगाच? बाप्पांच्या आगमनाची चाहुल लागली की मिठाईची दुकानेही कात टाकतात.. तर्हेतर्हेचे पेढे, बर्फींसोबत "येथे उकडीचे मोदक बनवून मिळतील" अशा पाट्याही दिसायला लागतात.
अशा आपल्या आवडत्या बाप्पाचे १२-१३ दिवस कोडकौतुक पुरवण्यात आपण कोणतीच कसर बाकी ठेवत नाही. घरोघरी सुगरणी आपापल्या पद्धतीने नैवेद्याचे प्रकार बनवतात आणि मग चांगला व नेहमीपेक्षा वेगळा नैवेद्य कोण बनवणार याची चढाओढ सुरु होते. तर मग या दालनात तुम्ही बनवलेल्या वा चाखलेल्या आगळ्यावेगळ्या नैवेद्याबद्दल लिहा. पाककृती, फोटो किंवा नैवेद्याबरोबर जोडला गेलेला एखादा किस्सा वा आठवणी सर्वाना सांगा.
हा बाप्पासाठी नैवेद्य.
हा बाप्पासाठी नैवेद्य. मूगडाळीचा शिरा.
दोन वाट्या मूगडाळ कोरडीच मिक्सरमधे भरड दळून घ्या. लागेल तसे तूप टाकत (साधारण अर्धी ते पाऊण वाटी) मंद आचेवर भाजून घ्या. शेजारी अर्धा लिटर दूध तापत ठेवा. त्यातच केशर घाला. डाळीचा रवा भाजला (म्हणजे त्याचा कच्चट वास गेला) कि तो गरम दूधात टाका. व दूधाखालचा गॅस बंद करा. लाकडी चमच्याने भरभर ढवळा. मिश्रण एकजीव झाले कि एक ते सव्वा वाटी डिमेरारा (ब्राऊन( साखर त्यात मिसळा, व परत ढवळून मिसळून घ्या. शिरा तयार. याचेच थोडे निवल्यावर लाडू पण करता येतील.
पाणी न वापरल्याने, हा शास्त्रोक्त नैवेद्य झाला. वरुन हवा तो सुका मेवा घाला,
गणपती बाप्पा मोरया! बाप्पाला
गणपती बाप्पा मोरया!
बाप्पाला झटपट रवा लाडू,
बाप्पासाठी झटपट रवा लाडू पहिल्या नैवेद्यासाठी (महानैवेद्या आधीचा नेवेद्य).
मी रेसीपी आधी इथे लिहिली होती, त्यात जरा बदल केला.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115676.html?1208819394
वेळः
मोजून १५ मिनीटे व लाडू वळायला २५ मिनीटे= ४० मिनीटात ४५ लाडू.
सामानः
अडीच वाटी बारीक रवा,
१४ ऑन्स कॅन कन्डेन्स्ड मिल्क,
MTR बदाम पॉवडर ४ चमचे,
अर्धा वाटी शुद्ध तूप,
पाव वाटी दूधात ३ मोठे चमचे सुखे खोबरे टाकून गरम करून घ्यायचे.(मला ओले खोबरे आवडते पण ते लाडू खराब होतात म्हणून सुखे खोबर्याला चव आणण्याकरता हि ट्रीक).
कृती:
बारीक रवा खमंग भाजून तूपात झाला की मावेत जरासे दूध व खोबरे एकत्र गरम करून रव्यात मिक्स करायचे. मग condensed milk टाकून गॅस मंद करून नीट मिक्स केले की झाकून ठेवा १० मिनीटे, मग हाताने मळून लाडू बांधा. चव घेवून पहा जर अगोड वाटलेच तर २ चम्चे वगैरे साखर मिक्स करून मळून बांधा. मी तरी साखर टाकली नाही. बाहेर ६-७ दिवस टिकतील. ज्यास्त टिकतील काय माहित नाही कारण संपतात लवकर.
मूळ रेसीपी आईची आहे ज्यात ती सुरुवातीला ओले खोबरे टाकून आटीव दूध साखर बनवून घ्यायची मग मिश्रणात टाकायची अगदी आरतीच्या आधी एक तास करायची, पण हे लाडू टिकत नाहीत म्हणून मग सुखे खोबरे टाकून करायची पण ती खास चव नाही यायची ओल्या खोबर्याची, मग पुन्हा बदल करून condensed milk. मग मी केलेला बदल.
आताच करून आले(पहाटेचे ३ वाजले) करूनच पहा. तोंडात विरघळतो.. बाप्पा हि खुष नक्कीच होईल.
गणराजासाठी काजू मोदक (घरी
गणराजासाठी काजू मोदक (घरी केलेले)
मन:स्विनी, ती रवा लाडवांची
मन:स्विनी, ती रवा लाडवांची रेसिपी इथेच लिहा नां, कारण यावर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा नाहीये. याच धाग्यावर तुम्ही बाप्पासाठी केलेला नैवेद्य लिहिणं अपेक्षित आहे.
हा माझा आजचा नैवेद्य. या
हा माझा आजचा नैवेद्य. या ताट्लीत इतकेच मावले .
नैवेद्यम् समर्पयामि..
नैवेद्यम् समर्पयामि..
लालू, मस्त आहे हा...
लालू, मस्त आहे हा...
दरवर्षीप्रमाणेच यंदाचं
दरवर्षीप्रमाणेच यंदाचं नैवेद्याचं ताटही सुंदर गं लालू.
लालू , बघूनच तोंपासु .
लालू , बघूनच तोंपासु . मोदक पाठव .
वा सगळ्यांचे नैवेद्य सुरेख!
वा सगळ्यांचे नैवेद्य सुरेख! लालू ताट एकदम छान गं.
अप्रतिम लालू!!
अप्रतिम लालू!!
(No subject)
माझे २१ पाकळ्यांचे २१ मोदक.
माझे २१ पाकळ्यांचे २१ मोदक.
वा वा सुरेख मोदक आर्च!!
वा वा सुरेख मोदक आर्च!!
मस्तच ग...
मस्तच ग...
हा आमच्या बाप्पाचा प्रसाद
हा आमच्या बाप्पाचा प्रसाद
हा माझा आजचा, एक निवरी व २१
हा माझा आजचा, एक निवरी व २१ कळ्यांचा मोदक. बाकी ९ कळ्यांचे.
आज ऋषीपंचमी. तेव्हा बाप्पाला
आज ऋषीपंचमी. तेव्हा बाप्पाला ऋषीपंचमीच्या भाजीचा नैवेद्य. (बाप्पा परदेशात ज्या भाज्या मिळाल्या, त्या घेतल्या. अधिक ऊणे, गोड मानून घ्या.)
वा वा, सगळ्यांचे एवढे छान छान
वा वा, सगळ्यांचे एवढे छान छान नैवेद्यं खाऊन बाप्पा तृप्त झाले असणार!
दिनेशदा, हे भाजी खासच दिसतेय.
लालू , आर्च नेहमी प्रमानेच
लालू , आर्च नेहमी प्रमानेच सुरेख मोदक आणि ताट. तुम्हा दोघींनी केलेले मोदक पाहिल्याशिवाय गणेशोत्सव सुरु झालाय असे वाटत नाही.
हे माझ्याकडचे कालचे नैवेद्याचे ताट.
दिनेश , भाजी क्लासच. बेबी
दिनेश , भाजी क्लासच. बेबी कॉर्न पण घातलेले दिसताहेत.
हो सीमा, बेबी कॉर्न, बटरनट,
हो सीमा, बेबी कॉर्न, बटरनट, अरारुट...
लालू, आर्च, सीमा तूम्ही मोदक वाटीत का ठेवता ? काहि खास कारण ? आमच्याकडे तो कधीच वाटीत ठेवत नाहीत.
पण खाताना मोदक फोडून त्यात साजूक तूप, किंवा नारळाचे दूध घालून खातात.
आम्हे जेवणाचे ताट वेगळे व २१
आम्हे जेवणाचे ताट वेगळे व २१ मोदक असे केळीच्या पानात ठेवून दाखवतो नैवेद्य.
ह्यावरून आठवले. आई दर वर्षी १०८ उकडीचे मोदक करायची एकटीने पुर्वी, आता बंद केले. पहिल्या दिवशी एकूण ४५ एक माणसे फक्त घरातलीच जेवायला असायची. १०८ मोदक गायब एका दिवसात.
सगळ्यांचे नेवैद्य मस्तच ! !
सगळ्यांचे नेवैद्य मस्तच ! ! खिरापत किंवा पंचखाद्य कसं करायचं ते प्लीज लिहिना कोणीतरी.
वा, वा मस्त नैवेद्य
वा, वा मस्त नैवेद्य सगळ्यांचे!
दिनेशदा, माझ्या मते मोदकाला वरण-आमटी, कोशिंबीर यांच्या ओघळापासून वाचवायला मोदक वाटीत ठेवला असेल
आज माझा बाप्पा जाणार...
आज माझा बाप्पा जाणार...
सकाळी उपवास म्हणून केसर दूध व फळे होती.
आजची बाप्पा घरी जाताना हि शिदोरी,
चवळीची पालेभाजी, बेडवी सागातील नुसते साग, ताजे दही, तांदूळाची भाकरी(हाताने थापून केलीय), फक्त रवा घालून केलेले तळणीचे मोदक.
सहीच...
सहीच...
सही आहेत सगळेच नैवद्य !
सही आहेत सगळेच नैवद्य !
आमच्याकडचे मोदक आणि
आमच्याकडचे मोदक आणि नैवेद्याचे ताट..
हा आमच्या बाप्पासाठी प्रसादः
हा आमच्या बाप्पासाठी प्रसादः केशर मलई बर्फी
Pages