आपल्या धर्मात आपण अनेक उत्सव, सणवार मोठ्या उत्साहात साजरे करत असलो तरी एवढ्या उत्सवांच्या गर्दीतला 'गणेशोत्सव' हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा. आपल्यापैकी बर्याच जणांची इतर कोणत्याही देवावर श्रद्धा असली तरी गणपतीबाप्पा मात्र थोडा जास्तच जवळचा वाटतो. त्याला दरवर्षी निरोप देताना डोळ्यांचा कडा पाणावतात ते काय उगाच? बाप्पांच्या आगमनाची चाहुल लागली की मिठाईची दुकानेही कात टाकतात.. तर्हेतर्हेचे पेढे, बर्फींसोबत "येथे उकडीचे मोदक बनवून मिळतील" अशा पाट्याही दिसायला लागतात.
अशा आपल्या आवडत्या बाप्पाचे १२-१३ दिवस कोडकौतुक पुरवण्यात आपण कोणतीच कसर बाकी ठेवत नाही. घरोघरी सुगरणी आपापल्या पद्धतीने नैवेद्याचे प्रकार बनवतात आणि मग चांगला व नेहमीपेक्षा वेगळा नैवेद्य कोण बनवणार याची चढाओढ सुरु होते. तर मग या दालनात तुम्ही बनवलेल्या वा चाखलेल्या आगळ्यावेगळ्या नैवेद्याबद्दल लिहा. पाककृती, फोटो किंवा नैवेद्याबरोबर जोडला गेलेला एखादा किस्सा वा आठवणी सर्वाना सांगा.
अहाहा... तोपासू... पराग, मोदक
अहाहा... तोपासू...
पराग, मोदक मस्तच रे
हा आमच्या बाप्पाला त्याच्या
हा आमच्या बाप्पाला त्याच्या घरी जाताना आरतीसाठी केलेला प्रसादः बेडवी पुरी नी साग. रेसीपी मायबोलीकर सुलेखा ह्यांनी दिलेली आहे.
धनु, खिरापत मी करते. सुकं
धनु, खिरापत मी करते. सुकं खोबरं किसून थंड करुन घे. चवीप्रमाणे पिठीसाखर, चारोळी, पिस्त्याचे काप घाल. खरी खिरापत अशीच करतात. पण मी त्यात डिंक तळून घालते. त्यामुळे मस्त कुरकुरीत चव येते. माझ्या नैवेद्याच्या फोटोत आहे बघ खिरापत
धनु, खिरापत मी करते. सुकं
धनु, खिरापत मी करते. सुकं खोबरं किसून थंड करुन घे. चवीप्रमाणे पिठीसाखर, चारोळी, पिस्त्याचे काप घाल. खरी खिरापत अशीच करतात. पण मी त्यात डिंक तळून घालते. त्यामुळे मस्त कुरकुरीत चव येते. माझ्या नैवेद्याच्या फोटोत आहे बघ खिरापत
आमच्याकडे पहिल्या दिवशी
आमच्याकडे पहिल्या दिवशी दर्शनाला आलेल्या एका मामीने खाऊ म्हणून चीक आणला. मग काय.. दुसर्या दिवशीचा नैवेद्य 'खरवस;.. मस्त गूळ आणि वेलची घातलेला
अरे वा.. बाप्पा नक्कीच तूप्त
अरे वा.. बाप्पा नक्कीच तूप्त झाले असतील असे नैवेद्य खाऊन

दिनेशदा त्रूषीपंचमीची भाजी एकदम खास..... तोडाला पाणी सुटले
राखीने लिहिले आहे त्याच
राखीने लिहिले आहे त्याच कारणासाठी मी वाटीत ठेवते. आजूबाजूचे तिखट पदार्थ लागू नयेत म्हणून. घरी बाकीच्या नैवेद्याचा आणि २१ मोदकांचा वेगवेगळा नैवेद्य दाखवतात.
पराग, मोदक छान दिसत आहेत. बर्फी, खरवस.. बाप्पाची मजा आहे.
जयश्री धन्स ग. उद्याच करीन.
जयश्री धन्स ग. उद्याच करीन. आजच नेवैद्य दूधीहलवा आहे.
धनू....... . सुकं खोबरं
धनू....... . सुकं खोबरं भाजून, थंड करुन घे...........असं वाच. चुकून "भाजून " लिहायला विसरले.
आजचा नैवेद्य ! या प्रकाराला
आजचा नैवेद्य !
या प्रकाराला काय म्हणतात ते माहीत नाही. आईला बहुतेक तिच्या कारवारी मैत्रिणींने सांगितला होता. करायला सोपा आणि रुचकर.
पाउण वाटी वासाचे तांदूळ भिजत ठेवा. एक वाटी मूगाची डाळ, कोरडीच तूपावर भाजा. त्यात पाणी घालून शिजवा. त्यातच एक वाटी ओले खोबरे खवणून घाला. त्यात भिजवलेले तांदूळ घाला आणि सगळे एकजीव शिजवून घ्या. मग त्यात एक ते दिड वाटी साखर वा गूळ घालून, मिश्रण आळू द्या. वासाला वेलचीपूड टाका. याच्या थापून वड्या करता येतात. गरम वा गार, कसाही खाता येतो.
आम्ही (गोव्याचे कोंकणी) अगदी
आम्ही (गोव्याचे कोंकणी) अगदी अशीच खीर बनवतो. तूपाची फोडणी देताना लवंगाची एक दोन काडी टाकतो. मग मूगाची डाळ भाजतो. साखर नाही पण गूळच टाकतो. मस्त लागते हि खीर. सहसा आंबेमोहर नाहीतर दुसरा एक वासाचा तांदूळ असतो जो गावी मिळतो तो वापरतो.
मनःस्विनी - पुर्या मस्त
मनःस्विनी - पुर्या मस्त दिसतायत. रेसिपी ची लिंक दे ना.
जय गणेश! सगळ्यांचे प्रसाद
जय गणेश!
सगळ्यांचे प्रसाद मस्त
हे आमाच्या बाप्पासाठी घरी केलेले मावा मोदक.
आणि हे पिस्ता पेढे.
वा, वा! मस्त झालेत लाजो.
वा, वा! मस्त झालेत लाजो. मोरया!
अरे वा! सुरेखच झालेत मोदक,
अरे वा! सुरेखच झालेत मोदक, लाजो!
मस्त झालेत मोदक लाजो
मस्त झालेत मोदक लाजो
सगळ्यांचे नैवेद्य एकदम मस्त!
सगळ्यांचे नैवेद्य एकदम मस्त! बाप्पाचा पोटोबा भरला असेल नक्कीच!
कसले मस्त नैवेद्य आहेत
कसले मस्त नैवेद्य आहेत सगळ्यांचे.. मी इतके दिवस बघितलेच नाहीत.
लाजो पिस्ता पेढे घरीच केलेस का.. मस्त दिसताहेत.
सुदर
सुदर
मस्त झालेत मोदक लाजो! माफ करा
मस्त झालेत मोदक लाजो! माफ करा दुसयानि लिहिलेले कोपि करते.
Pages