एगलेस बनाना केक

Submitted by सीमा on 27 August, 2010 - 20:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सेल्फ रायझिंग फ्लॉवर : १ आणि ३/४ कप *
बटर : १/२ कप
साखर (पांढरी किंवा ब्राउन ) : ३/४ कप
दही: ३ टेबलस्पुन्स
बनाना: ३ (खुप पिकलेले)
बेकिंग पावडर:१/४ टिस्पुन
बेकिंग सोडा:१/४ टिस्पुन
व्हेनिला इसेन्सः १/२ टिस्पुन

चिमुटभर मीठ
जर नट्स घालणार असाल तर वॉलनट्स १/२ कप. मी घातले नाहीत.

* सेल्फ रायझिंग फ्लॉवरची रेसीपी: १ कप ऑल पर्पज+ १ १/२ Tsp बेकिंग पावडर+१/२ Tsp मीठ
(इथून रेसीपी घेतली. http://allrecipes.com/recipe/self-rising-flour/)

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर, बेकिंग सोडा,बेकिंग पावडर्,मीठ मिक्स करुन घ्या.
रुम टेंपरेचर वरचे, बटर आणि साखर फेटुन घ्या. जास्त फेटण्याची गरज नाही. त्यात बनाना मॅश करुन घाला.
आता त्यात १/३ फ्लॉवर आणि एक चमचा दही अस आलटुन पालटुन , प्रत्येकवेळी बीट करत घाला. सर्व मिक्स्चर एकत्र झाल्यावर एकदा व्यवस्थित फोल्ड करा. (नट्स,बेदाणे घालणार असाल तर आत्ता घाला.)

बेकींग टिन किंवा पॅन बटर आणि फ्लॉवर लावुन केक साठी तयार करुन घ्या. (मी कुकिंग स्प्रे वापरला.)
त्यात हे मिक्स्चर घालुन ३३ ते ३५ मिनिटांसाठी ३५० F ला बेक करा. टुथ पिक टेस्ट करुन बघा. केक तयार झाला असेल तर साधारण गार झाला कि मग कट करुन खा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

बनाना खुप पिकलेले असण मह्त्वाच आहे. म्हणजे जवळ जवळ टाकायच्या लायकीचे पिकलेले पाहिजेत. Happy
ओव्हन चा टाईम अंदाजे दिला आहे.अगोदर ५ मिनिटे वाटल्यास टेस्ट करुन बघा आणि त्यानुसार ठरवा.

माहितीचा स्रोत: 
पुस्तक : "ग्रेट केक्स , विदाऊट एग्ज"
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा
आजच हा केक केला. एकदम मस्त स्पॉन्जी झालाय, अंडी न घालता मी पहिल्यांदाच केक केला.
EgglessBananaCake.JPG

तू दिलेला ३३-३५ मिनीटाचा वेळ मला कमी पडला. बनाना लोफ मी माझ्या ओव्हन मधे ३५० फॅ. वर ५०-५५ मिनीटे बेक करते. हा पण साधारण ५० मिनीटे बेक करावा लागला.

रुनि , छानच. कलर जास्त छान आलाय तुझ्या केकला. नेक्स्ट टाईम मी पण थोडा जास्त वेळ बेक करेन. Happy
मी वरती पुस्तक लिहिलय ते मिळत का बघ लायब्ररीत. एगलेस केक साठी छानच आहे ते पुस्तक.
एग रिप्लेसर घालून माझा केक बहुतेकदा चांगला झाला नाही आहे. Sad त्यामुळे ह्या अशा मेथडने जास्त चांगल वाटत केक करायला.

सीमा, रुनी, तुम्ही दोघी जणींचा केक फारचं छान दिसतो आहे. मला फार आवडतो केळी घातलेला केक. त्यात हा पुर्ण अंडेविरहीत म्हणजे खूपचं छान. सचित्र कृती नेहमीच करुन पहाविशी वाटते. धन्यवाद, सीमा-रुनी.

मस्त दिसतोय हा केक.
एक शंका. सेल्फ रायझिंग फ्लोअर घेउन पण बे. पा. आणि सोडा घालायचा आहे का?
आणि मग सेल्फ रायझिंग फ्लोअरच्या ऐवजी मैदा घेतला तर बे. पा. आणि सोडाचे प्रमाण काय घ्यायचे?

सीमा, हो माझा पण एग रीप्लेसर वापरून नीट झाला नाही कधी. पुस्तक बघेन आता लायब्ररीत. पुढच्या वेळी ३ केळ्यांऐवजी मी २ केळी वापरून करेन, माझ्यामते ३ केळी वापरल्याने ५०-५५ मिनीटे लागली असावीत.

बी, सेल्फ रायझिंग आणि मैदा थोडे वेगळे आहेत.
मैदा + बेकींग पावडर + किंचीत मीठ = सेल्फ रायझिंग फ्लावर.

आस, हो मैदा घेवून केक करायचा असेल तर वरच्या कृतीत दिलेले बेकींग पावडरचे प्रमाण वाढवावे लागेल.
मी सेल्फ रायझींग फ्लावर तयार करण्यासाठी १०० ग्रॅम मैदा + एक ते दीड टी स्पुन बेकींग पावडर + अर्धा टी स्पुन मीठ या प्रमाणात साहित्य मिसळुन लागेल तेवढे पीठ तयार करुन चाळुन घेते.

स्मिता अग ती सीमा आहे सानी नाही. Happy

सीमा तुझा धागा हॅक केल्याबद्दल क्षमस्व.

छान आहे रेसिपी, मला करायचा आहे (एकदाचा)
हे सेल्फ रायजिन्ग फ्लोअर कोणत्या कंपनीचे आणावे? मी अजून कधी आणले नाहीये.

रुनी, तुझी काय केळ्यांची बाग आहे का Wink

रुनी, तुझी काय केळ्यांची बाग आहे का >> नसावी. पण ती नी चं फारसं ऐकत नसावी Light 1
बाकी केक भारी जमलाय. रुनी तुझ्याकडे आले की मला असलेच पदार्थ करुन खावू घाल.

सीमा, मी पण करुन पाहीला हा केक आज, मस्त झाला, आधी कॅरेट केक करणार होते पण तुझी एगलेस केक ची रेसीपी पाहील्यावर हाच करायचा ठरवलं. आणी छान झाला.
मला सुद्धा केक बेक करायला ५० मि. लागली. ब्राउन शुगर घातल्याने चव आणि रंगही छान .
थॅन्क्स गं .

थॅन्क्यू सीमा! नवर्‍याचा वाढदिवस ऐन नवरात्रामध्ये आल्यामुळे एग्-लेस केकच्या (सोप्प्या) रेसिपी च्या शोधात होते, जेणेकरून बाळाला साम्भाळूनही करता येइल... आणि अचानक तुमची ही रेसिपी सापडली... खूप खूप थॅन्क्स! मस्त झाल केक.. नवर्‍याला पण खूप आवडला... हा माझा केक...

IMG_0280.JPG

आणि हो, मी ४५ मिनिटे बेक केला १८० से. वर... मस्त झाला...

रेस्पी वर आणायला पोस्ट. ह्या वीकेंडला करेन बहुतेक.

सेल्फ रायझिंग फ्लावर साठी सब्स्टिट्यूट सांगितल्याबद्दल रुनीला धन्यवाद

कृती, सेल्फ रायझींगच्या रेसीपी सहित अपडेट केली आहे.
सगळ्यांना धन्यवाद. मी बघितल्याच नव्हत्या नंतरच्या प्रतिक्रिया.

हल्ली केक विक चालू आहे, म्हणून रेसेपी वर आणतेय. सेल्फ रेसिंग फ्लोअर, स्टार बाजार ला मिळतेच तसेच ऑनलाईन बिग बास्केटला पण आहे. हे असले की काम सोप्पे.

सीमा, केक फारच तोंपासू आहे. केळ्याचे आईस्क्रीम खाल्लेय ते तर जबरी असतेच. केक कधी खाल्ला नव्हता आता करुन बघावा लागेल. एकंदरीतच ब्रेड, केक, बन असे लाईनीत घेऊन करावे लागतील.

मस्तच.
बनाना केक / लोफ बनवायला रेसिपी शोधत असताना मला बनाना चॉकलेट चीप्स चा video दिसला. आणि आवडतं combination असल्याने घरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करून बघितला..

कृती साधारण अशीच आहे, तेव्हा वेगळे काय केले ते लिहीते..

खूप पिकलेली 3 केळी घेऊन साखरेबरोबर मिक्सर मधून स्मूथ प्युरी बनवली. (साखर १८० ग्राम/ ३/४कप कँस्टर शुगर)
त्यात ½ कप (१२० ml) साधं तेल 1 tsp vanilla extract, 1 tsp विनेगर मिक्स केले. (Blender ने, मिडीयम वर)
1½ cup / २५० gm पिठ (मैदा + आटा) आणि ½ cup (५० grm) कोको (harsheys unsweetened) + 1 tsp बे.पावडर + ¼ tsp बे. सोडा + ¼ tsp मीठ + ½ cup (120 ml) पाणी व दुधाचे मिक्स घालून blenderने  maximum speed वर मिक्स केले ३ ४ मि. 
चॉकलेट चिप्स वरून टाकले.

बेकिंग - 30 -35 मि. 180℃ OTG मध्ये.
Preheat the OTG for 10 mins (@200 / 250℃)

IMG-20200320-WA0006.jpg

Bhannat ahe recipe! nakki try karte, me sglech cake eggless karte so he mastach wattay! me banan aiwaji carrot cake karun baghitla ahe khupda! ata Banana karen mhante!
@Piku prachanda sundar distoy cake tumcha! Topasu ekdm!

Me try kelela Eggless Carrot cake, me cooker madhe kiva mothya pan madhe stand theun bake karte!Sadhya oven nahie..
carrot cake.jpg
Ani magchya varshi gharche ambe ale hote tevha eggless Mango cake karun pahila!

थँक्स TI .. Happy
Ice cream ,बरोबर केक.. सही.. आॉ.ट.फे..

Thanks Piku! Vanilla scoop sobat farach masta lagto carrot cake! tea time cake asla tari dinner dessert mhanun pan chan watla!
Tumchya ajun kahi cakes recipes astil tar nakki share kara! Happy