ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

Submitted by शिवंजय on 19 August, 2010 - 12:55

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.ज्योतिषशास्त्र वर पाश्चात्यांनी संशोधन सुरु केलेले आहे. मिशेल गौकालीन
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होय
गम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातच
काढले जाते.
शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.
तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.
हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि ,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.
या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .
राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदार ज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिले
या मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे, ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?
यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"
या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक abhyas व संशोधन सुरु होणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .
या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाची परीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर नियत्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.
आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारण भारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.

dr.sanjay honkalse.
drsanjayhonkalse@gmail .com

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे कि नाही यावर वाद घालन्या पुर्वि काही गोष्टी विचारात घेणे गर्जेचे आहे असे
मला वट्ते............... अश्या बर्याच्श्या गोष्टी आहेत कि ज्या आहेत पण आपल्याला गवसलेल्या नाहीत
उदा: आकाशात ९ ग्रह आहेत असे आपण भुगोल मधे वाचतो, प्रत्यक्षात किती लोकान्नी ते उघड्या डोळ्यान्नी पहिल्यात.........? याबाबतीत "रमेश रावळ" यान्चे मत मला पट्ते
जर एखाद्या गोष्टीपर्यन्त आपण पोहचू शकत नाही, तर ती गोष्ट्च अस्तीत्वात नाही असे म्हणने किती चुकीचे आहे, नाही का?

तिकडे केदार वेदकालीन संस्कृतीवर लिहितो आहे तसा समग्र लेख इथे कोणी लिहिणार का? कोणते आधार आहेत या अशास्त्राला ते तरी कळेल (by declaration व्यतिरिक्त).

आहो महशय ,
तुमच्या ज्योतिष शास्त्रात ९ ग्रह आहेत त्यातील राहू केतू कोठे आहेत? शिवाय आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा उल्लेख का म्हणून आपल्या शास्त्रात नाही ? बस, एवढेच पुराव्यानिशी सांगा आम्ही सर्व तुमचे ऐकू ....

वेदांचे डोळे भविष्य आहे,म्हणजे आशावादी समाज निर्मानकरून पोट भरणे. आज भविष्य सांगणारे ९९% लोक श्रीमंत झाले हे लोकांच्या कमकुवत मनाचा फायदा घेवूनच. आस्थेचा प्रश्न केला तर हे ज्योतिषी फुकट काही सांगत नाही . त्यांना भविष्याच्या जोरावर कधीही समाजाला शांती समाधान देता आले नाही. उलट हे लोक भविष्य पुरांनांच्या आधारावर समाजाला दैवावादाकडे वळवतात. .. >>>

वेदांचा काय संबंध तो द्याल का? वेदांचे डोळे भविष्य म्हणजे नेमके काय?

दैववादाकडे वळविने म्हणजे काय? समजा तुम्ही, मी आणि माझे मायबोलीवरचेच मित्र विकु हे तिघही भविष्य पाहत नाहीत. (माझ्या अन विकुंच्या बाबतीत खरेच आहे ते, मी ही पाहत नाही, त्यांचा प्रतिक्रियेवरुन ते ही पाहत नसावेत असे वाटते) तर आपल्याला (तिघांना) भविष्याच्या जोरावर दैववादाकडे भविष्य सांगनारे कसे वळवतील हे कळले नाही. भविष्य पाहने ही वैयक्तीक क्रिया नाही का? पाहणार्‍याला कोणीही पकडून आणत नाही, मग तो दैववादी कसा बनेल? आणि जर एखादा पाहतच असेल तर तो मुळातच दैववादी नाही का? म्हणून हे काही पटले नाही.

दुसरे उदाहरण इथलेच; इथे २०१२ च्या भविष्यकथनाचा एक बाफ आहे, ते वाचून कोणी दैववादी झाल्याचे गेल्या एक दोन वर्षात आढळले नाही.

तसेच जर तो बिझनेस म्हणून करत असतील तर त्यात नेमके चुक काय? सगळ्याच दात धुणार्‍या पेस्ट मुळे दात साफ निघतीलच ह्याची खात्री कुठे आहे? किंवा फेअर अ‍ॅन्ड लवली विकत घेतल्यावर २ हफ्ते मे गोरा बनता येईल काय? तो जसा बिझनेस तसाच हा देखील नव्हे काय?

थोडक्यात आपण भविष्य कथनाला व त्याआजूबाजूच्या गोष्टीला जास्त महत्व देत आहात, असलेल्या वा नसलेल्या भविष्यशास्त्राला नाही हे आपल्या प्रतिक्रियेवरुन दिसते. तसे नसावेही कदाचित, तर हे शास्त्र कसे नाही हे आपण व्यवस्थित मांडावे. ते कसे आहे हे लेखकाने मांडण्याचा थोडाफार प्रयत्न केला त्यामुळे प्रतिपक्षाला ते कसे नाही हे व्यवस्थित मांडणे भाग आहे असे वाटते.

आता यांचेच भविष्य पुढे काय असणार आहे कोणास ठाऊक ? पुढची पिढी यांना मागासलेले म्हटल्याखेरीज राहणार नाही....>> हे मात्र पटत नाही, गेली हजारो शतके भविष्य कथनात व ऐकण्यात लोक गुंतलेली आहेत, ह्या पूर्ण काळात बरेचदा भारत प्रगत, अप्रगत, प्रगत अशा अवस्थेत होता पण तरीही भविष्य ऐकणे लोकांना आवडते कारण आपल्याला न माहिती असणार्‍या गोष्टी कळाव्यात ही माणूस असण्यचे व्यवच्छेदकलक्षण आहे. त्यातून काही जन मग शोध लावतात तर काही भविष्यपण पाहतात. त्यामुळे भविष्याकडे पाहणे ( मग त्यात पत्रिका, भविष्य - भारतासंबंधी) हे चालूच राहिल असे वाटते. कदाचित हे विचारी लोकांना पटणार नाही, पण न पटणार्‍या सर्वच गोष्टी होत नाही असे नाही.

तटि : भविष्य शास्त्र आहे की नाही ह्या बाबत मला निश्चित काहीच माहित नाही. पण ते असावेच वा नसावेच ह्याबद्दल मात्र माझे आग्रही मत नाही. ज्ञानलालसे मुळे आपणाला पहिला प्रश्न विचारत आहे इतकेच.

केदार
राहू केतू आणि पृथ्वी बद्दल बोला.
प्रत्येक भविष्य वाले गळ्यात माळा. पाठीमागे आशीर्वाद देणारे मोठे मोठे फोटो लावतात . त्यामुळे वातावरण निर्मिती होते ... व्यवसाय करायचा तर तो माल विकूनच ... जो माल शिजतच नाही तो माल हॉटेलात कसा विकायचा ? दैव म्हणजे नशीब, हे बरोबर असेलतर दैववाद नाही का ?
मी प्रत्यक्ष बऱ्याच भविष्य कथन करणाऱ्यांना भेटलो आहे. कित्तेक जन भविष्याचा संबंध वेदांशी जोडतात व दाखले देतात .वेदांच्या ६ अंगापैकी एक अंग ज्योतिष आहे.हे तर आपणास माहिती असेलच?
एक राशीचे एक नक्षत्राचे आणि समान कुंडली असणारे जगातील सर्व लोक एकत्र करा आणि बघा त्यांचे भविष्य एकच आहे का ??? यावर हे उत्तर देतात मागच्या जन्माचा थोडा प्रभाव या जन्मात राहतो. मग सांगा केदारजी दैववाद आला का नाही ?
नाहीतर एक करा ... भारतातील सर्व ज्योतिषी एकत्र बोलवा आणि त्यांच्याकडून भारताच्या भविष्याबाबत उपाययोजना ठरवा ...
त्यांच्या कडून भविष्यातील पाकिस्थान चीन बंग्लादेशांच्या हालचाली ओळखून सैन्याचे नियोजन करा. नाहीतर सर्व धोरणात्मक उपाययोजना यांच्याच मार्फत होउद्या म्हणजे आपला विकास इतर देशांच्या मानाने अधिक होईल .. आपण कधी संतांच्या मार्गावर चालणार ?

अहो आपला गैरसमज झाला आहे. मी ज्योतिष्य शास्त्र आहे असे अजिबात म्हणत नाही, फक्त ह्या विषयावरिल आपल्या प्रतिक्रियेचा फोकस वेगळा वाटला म्हणून ते दाखले दिले. खरे सांगायचे तर मी तळटीपेत लिहल्यासारखे मी ज्योतिष्य शास्त्र आहे वा नाही ह्याबाबतीत आग्रही नाही. कारण मला माहित नाही.

वेदांच्या ६ अंगापैकी एक अंग ज्योतिष आहे.हे तर आपणास माहिती असेलच >> हो. पण त्या अंगात केवळ भविष्य येत नाही. जे फक्त भविष्याला वेदांग माणतात ते चुक करतात. ज्योतिष ह्या वेदांगातर्गत खगोल शास्त्र, बीजगणित ह्यांचा सखोल अभ्यासही आहे. त्यावरील भाष्य आहेत. त्यामुळे ज्योतिष्य हा शब्द वेदांमध्ये व्यापक अर्थाने योजला आहे.

>>>>>राहू केतू आणि पृथ्वी बद्दल बोला<<<<<
आपली प्रतिक्रीया वाचुन लशात येते की आपण या शास्त्राचा कीती अभ्यास केला आहे आणि ज्या विषयी
अभ्यास,अनुभव नाही त्या विषयी मत देण्याचा अधिकार नाही.राहु केतु,पृथ्वी,रवी,चन्द्र हे ग्रह नाहीत हे काय त्याना माहीत नव्हते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?पण हे शास्त्र अनुभवावर आधारीत आहे राहू केतू हे छेदन बिन्दु असुनहि त्याचि फळे अनुभवास येतात(अर्थात त्यासाठी अनुभव हवा)एकाद्याच्या कुन्ड्लीत ग्रह ग्रहनयुक्त आसेल तर त्याची निश्चीतच तीव्र फळे अनुभवास येतात.आणि ज्योतिषीय गणित हे भुकेन्दीत असल्याने पृथ्वी त्यात येत नाही.

>>>>>एक राशीचे एक नक्षत्राचे आणि समान कुंडली असणारे जगातील सर्व लोक एकत्र करा आणि बघा त्यांचे भविष्य एकच आहे का<<<<<

ज्योतिष गणिताबद्दल आपणस माहित नसेल म्हणुन सागतो कि कुन्डलि बनविताना ३ गोष्टीची आवश्यकता असते १.जन्म तारीख २.जन्म वेळ आणि ३.जन्म ठिकाण म्हणजे एकाच वेळी व एकाच दिवशी जन्मलेल्या दोन वेगवेगल्या ठिकाणावरील बालकाची कुन्डली वेगळी येइल. आणि असाच प्रश्न ज्योतिषमार्तड कूष्ण्मुर्ती याना पड्ला होता त्याची पद्धत आपणास माहित असती तर वरील प्रश्नच आला नसता आणि ती पद्धत समजावुन सागण्याचे हे ठिकाण नाहि.जमल्यास इतर ठिकाणाहुन माहिती करुन घ्या व अनुभव घेवुन बघा.
>>>>>दैव म्हणजे नशीब, हे बरोबर असेलतर दैववाद नाही का ?<<<<<
ज्योतिष मानसाला दैववादी बनविते हे मुळातच चुकिचे आहे.समजा एकाद्या मुलाला जोतिषाने सागितले कि तुला परिशेच्या दुष्टिने ग्रहमान चागले नाहीत.तर अशावेळि त्या मुलाने रोज करतो तसा अभ्यास केला तर परिशेला खराब ग्रहमान मुळे त्यानि जे प्रश्न वाचले नाहित ते जादा पडतील वा येन वेळी आठवणार नाही मग ज्योतिष सल्ला एकून त्याने अभ्यास वाढवायला पाहिजे ४ तास रोज करतो त्या एवजी ६ तास केला पाहिजे तो निश्चितच यश मिळवेल आणि याउलट जर त्याला सागितले कि तुला ग्रहमान चागले आहेत व अशावेळि त्या मुलाने अभ्यासच केला नाही तर तो कसा पास होणार?ग्रहमान चागले म्हणजे जे प्रश्न वाचले ते जादा पडतील,येन वेळी,आठवेल ७०%अपेशा असेल तर ७५%पडतिल. बि पेरणे म्हणजे कर्म तेवड्यानेच यश मिळत नाही पाउस पडणे म्हणजे दैव.
ज्योतिष हे तूम्हाला मार्गद्र्शन करते त्याच्या आहारि जाउ नये हे ही तितकेच खरे

ज्योतिषाला विचारून सल्ला घेवून अभ्यास वाढविला पाहिजे >>>>>>>>>>>>
मग त्याला ज्योतिष कशाला पाहिजे?? अशी किती उदाहरणे आहेत ४०० वर्षा पासूनच्या इतिहासात कि ज्यांनी ज्योतिषाच्या मार्गदर्शनाखाली स्वताची व देशाची क्रांती केली ????
अहो महाशय ज्या सूर्य चंद्राचा आपण ग्रह म्हणून कुंडली मध्ये उपयोग करता ते मुळात ग्रह नसून, सूर्य तारा व चंद्र हा उपग्रह आहे.
सावित्रीबाई फुले जन्माला येईपर्यंत या देशामधल्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये २००० वर्ष शिक्षणाचा योग नव्हता . या १०० वर्षात तो भराभरा कसा आला.??? का सर्व ग्रह तारे नक्षत्र स्त्रियांना अनुकूल झाले ? ब्रिटिशांच्या कुंडलीमध्ये कोणता योग होता कि ज्याने त्यांनी जगावर राज्य करून सर्वांना लुटले ? मोबाईलचा योग जगाच्या कुंडलीत १५० पूर्वी होता का ??
माणसाच्या शरीरात ७०% पाणी व समुद्रातही ७०%पाणीच मग समुद्राला भारती आहोटी येते {चंद्रामुळे} माणसावर का परिणाम होणार नाही आस उक्तिवाद करतात .परंतु याला काही एक अर्थ नाही. कारण उंदराला चार पाय , एक शेपूट, रंग काळा तसेच हत्तीला चार पाय एक शेपूट व रंग काळा,मग कायहो उंदीर हत्ती होतो का,???
एक किस्सा खरा घडलेला ...एकदा शाहू महाराजांच्या दरबारी एक भविष्य सांगणारा ज्योतिषी आला.त्याने राजभाविष्य सांगण्यास सुरवात केली तोच महाराजांनी त्याला तुरुंगात टाकण्याची आज्ञा केली.आणि दुसऱ्या दिवशी सोडले.एका अधिकार व्यक्तीने असे का केले विचारले असता ते म्हणाले . याला स्वताचे एक दिवसाचे भविष्य समजले नाही त्याला देशाचे काय समजणार ??

>>>ज्या सूर्य चंद्राचा आपण ग्रह म्हणून कुंडली मध्ये उपयोग करता ते मुळात ग्रह नसून, सूर्य तारा व चंद्र हा उपग्रह आहे.<<<<<

तसा वाद घालण्यात काहीएक अर्थ नाहि आहे कारण निव्वळ वादासाठी वाद घालायचा म्हन्ट्ला तर काहीही घालता येतो.तरी या शास्त्राचा अभ्यासक म्हणून राहवत नाही म्हणून माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.पुर्वीच म्हटल्या प्रमाणे ज्योतिषाना काय सूर्य चन्द ग्रह नसुन तारा व उपग्रह आहेत हे काय माहीत नव्हते का?आणि ग्रहाची व्याख्या कुणि केली ?सूयाला तारा म्ह्ट्ले काय आणि ग्रह म्हटले काय सुर्य हा सुर्यच राहिल व त्याचे ज्योतिषीय परीणाम व्हायचा तोच होइल.
सव्रात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाकिचे लोक काय इतके मुर्ख नाहीत कि कोणी त्याना सहजासहजी फसवेल आणि सारखे सारखे ते लोक फसतील कारण ज्योतिष बघायला या असे कुणाला निमन्त्रन नसते दिलेले तरी ज्योतिषाकडे लोक जातात आणि त्यामध्ये वकिल,डाक्टर,सिनेकलाकार इ. मन्डलीही आहेत.
मला एक दिवस बरे नव्हते मी मामाकडे गेलो होतो मामाच्या मुलाने डाक्टराकडे जावून येवू म्हणून नेले.गावात एका ठिकाणि दवाखान्यात रान्गा लावून गर्दी होति.मला आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटले कि तिथून जवळच दुसरा एक दवाखाना होता तिकडे गर्दी नव्हती तरी तिकडे कोणि जाइना मी मामाच्या मूलाला विचारले "अरे तिथे लगेच नम्बर येइल असे असताना इकडेच गर्दी का म्हणून?" तो म्हणाला "अरे,सुरवतीला तिकडे ही गर्दी होती परन्तु थोड्याच दिवसात लोकाना जानवले कि या डाक्टरचा काही गुण येत नाही मग हि माणस अडाणि असली तरी काही वेडि नाहीत सारख तिकडेच जावून पैसे घालवायला"असो.
ज्योतिषी फक्त तर्कावर उत्तर देतो (कारण ग्रहाचा परिणाम आपनास मान्य नाही) तर तर्क आपणही चान्गलाच करु शकता तर आपण एक ज्योतिषी आहोत असे लोकाना सान्गून फक्त तर्कावर त्याच्या प्रश्नाचि उत्तरे देवुन बघा.अनूभव खूप वाइट येइल.

>>>सावित्रीबाई फुले जन्माला येईपर्यंत या देशामधल्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये २००० वर्ष शिक्षणाचा योग नव्हता.<<<<<
आपले म्हणने एकदम मान्य.परन्तू ज्योतिषिय सिधान्त हे स्थल सापेश,काल सापेश असतात परिस्थिति नुसार्,समाजा नुसार उत्तरे द्यावी लागतात. एक उदाहरण देवून सान्गण्याचा पर्यत्न करतो माझ्याकडे चान्गल्या उदाहरणाचा सन्ग्रह नाही पण आशा आहे मतितार्थ कळावा.-'किमति कमी झाल्या की मागणी वाढते"असे अर्थशास्त्र सान्गते मग कोकणात नारळाच्या किमति तेथील दुकानदारानॅ कमी केल्या तर मागणि वाढेल का हो? नाही कारण या उदाहरणा मध्ये स्थळ कोणते आहे हे लशात घ्यावे लागते.तसेच ज्योतिषशास्त्राचे आहे पुर्वी बालविवाहाची पध्दत होति त्या नुसार काही नियम पुर्वीच्या ज्योतिषानी बनविले. आत्ता तसे ग्रहमान आढळल्यास विवाह लवकर होइल असेच सान्गावे लागेल आता लवकर,उशीरा हे त्या त्या समाजाच्या रुढी-परमपरेवर अवलन्बून राहील्.तसेच विशिष्ट ग्रहमानात व्यक्ती गोरी होते असे वाचुन निव्वळ वाद घालण्याकरीता विचाराल 'मग आफ्रिकेतील लोक काळे का असतात त्यान्च्या पत्रिकेत गोरे होण्याचे योग नसतात काय?' असतात परन्तु ते जरा वेगळ्याप्रकारे अभ्यासायचे असतात स्थळाचे भान ठेवून.ती व्यक्ती निश्चितच त्यान्च्यात उजवी असेल्.तसेच शिक्षणयोग म्हणजे शाळेमध्ये किन्वा कालेजमध्येच गेले पाहीजे असे कुणि सान्गीतले?त्या स्त्रियान्ची ग्रहणक्षमता नक्किच इतर स्त्रियान्च्या पेक्शा जास्त असेल त्यावेळचे त्यान्चे शिक्षण (स्वयपाक करणे,कलाकूसरीचीकामे)यामध्ये त्या पारन्गत असतील.
>>>माणसाच्या शरीरात ७०% पाणी व समुद्रातही ७०%पाणीच मग समुद्राला भारती आहोटी येते {चंद्रामुळे} माणसावर का परिणाम होणार नाही आस उक्तिवाद करतात.<<<<<
हा युक्तिवाद नाही तर सत्य आहे पुर्णचंद्राचा परिणाम वेड्यावर होतो.मानसिक विकुतीतून जे गुन्हे घडतात त्यान्ची सन्ख्या पुर्णिमा-आमावसेच्या दरम्यान जास्त असते.
एक सल्ला पोर्णिमेच्या शितल चान्दण्यात प्रेयसिबरोबर फिरून बघा आणि आमावस्येला ही एकदा अनुभव घ्या.(अर्थात स्वःताची प्रेयसी असावी हे सान्गने न लगे)

>>>एक किस्सा खरा घडलेला .<<<<<
याचा अर्थ डाक्टराना रोग होउ नये असा तर नव्हे ना?कि वकिलाच्यावर केस होउ नये?कि ड्योळ्याच्या डाक्टराना चष्मा लागू नये?

अहो महाशय,
म्हणजे आपण मान्य करता स्थिती, काळ .......
मनुष्याच्या अवतीभोवती असणाऱ्या परिस्थितीवर जर मनुष्याचे भविष्य आसेल तर हात आणि कुंडली कशाला पाहायची ?
आणि मी स्वयंपाकाचा विषय शिक्षण म्हणून नाही काढत आहे...मी तर शाळातील प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलत आहे.आणि आपण उत्तर देताय शिक्षण योग्य परिस्थिती झाली होती .आणि त्यावेळी त्या स्वयंपाकात पारंगत असतील....म्हणजे आजची चंद्र मोहिमेवर जाणारी स्त्री आणि त्या काळची स्वयंपाकात पारंगत असणारी स्त्री हि सम ग्रहण क्षमतेची ?? शिक्षणाच्या योगानेच आजची महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली आहे.
काय हो ?पौर्णिमेला प्रियसि नेली आणि अमावस्याला नेली.त्याने प्रेम कमी जास्त होते का ?
आहो प्रेमाला भाषा, प्रांत, अमावस्या, पोर्णिमा काहीही नसते .हे संस्काराचे परिणाम आहेत .
मुद्दा १ माणसे अडाणी नाहीत. >>>>>>>
माणसे अडाणी नाहीत ती परिस्थितीमुळे लाचार झाल्यावर मनाने खचतात अशावेळी आशेचा किरण आपण दाखून त्यांना भ्रमित करता.
मुद्दा २ पूर्वीच्या काळी बालविवाह होता म्हणून त्या सारखे नियम ज्योतिषांनी बनवले.>>>>>>>>>>>>>>> म्हणजे तुम्ही परिस्थिती प्रमाणे किंवा पाहून ज्योतिष सांगता ..म्हणजे शास्त्राप्रमाणे ज्योतिष एक सूत्रात बांधता येत नाही.मग शास्त्र कसे कि जे वारंवार बदलते. ........याचा आर्थ
१०० वर्ष्या पूर्वीच्या पूर्वीच्या ज्योतिषांना आत्ताच्या लोकांचे भविष्य माहित नव्हते ?? मग कलयुग येणार , पृथ्वी बुडणार.१४ वर्षाची मुलगी गरोदर होणार हि पुराणातील भाकिते कशी केली ? आहो लहान मुलगा कसा वागतो या वरून आई वडीलांना समजते त्याला कसे सांभाळावे व त्याला पुढे कोणती गरज लागणार... हे शास्त्र ज्योतिष नाही.तर तो आई वडिलांचा अनुभव आहे.
१०० जणांना एकत्र केले आणि सांगितले.तुम्हाला आज झोप लागणार नाही.त्यातील एक दोन जणांना काहीतरी कारणांनी नाही लागली तर आपले भाकीत खरे झाले समजून आपण त्या दोघांची मुलाखत घेतली आणि विचारले सांगा तुम्हाला झोप लागली का ? तर पाहणारे लोक म्हणतील ज्योतिषाने खरे भाकीत केले..खरे आहे परंतु एक दोन सोडून ९८ माणसांचे काय ? त्यांची कोण मुलाखत घेणार ???

आपल्याकडे (भारतात) असणार्‍या अनेक चांगल्या गोष्टींचा (पुस्तके, ज्ञान, ऐतिहासिक ठेवा, इ.) परकीयांनी नाश केलाच आहे. आता ज्ञानाची उपेक्षा करून उरलासुरला नाश स्वकीयच करत आहेत. या बाबतीत देशाचे भविष्य काही चांगले दिसत नाही.

आरे राजा ,
या पुस्तकांच्या [ भविष्य कथा,पुराण ] नादि लादल्यामुळे समाज दैववादाकडे वळला त्यामुळे देव धर्माच्या नावाखाली आर्यवर्ताची युद्ध उपयोगी शक्ती क्षीण झाली व परकीयांनी आपल्या देशावर विजयाक्रमण केले.हा इतिहास माहिती आहे का ?? ब्रिटिशांनी प्रिंटिंग प्रेस आणली .त्या आधीचे ग्रंथ काही हस्तलिखित होते व काही मौखिक होते.
या जादू टोना, भानामती.भविष्य अशा विषयांना संतांनी थोपविले ..मला वाटते आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचा आणि हा त्यात एखादा शब्द भविष्य आला कि म्हणू नका ,बघा संत साहीत्यात उल्लेख आहे. तो का आहे हे समजून घ्या
आणि आपला देश या असल्या पुस्तकावर स्वतंत्र नाही झाला कि आता त्याला वाईट दिवस येतील.
आमच्या शंका मांडल्या त्या तुम्ही वाद म्हणून जाहीर केले .आरे आपल्या मनाला एकदा शांत विचारा आपण काय करतोय, भारतीय संस्कुतीचा ठेवा हा तत्वज्ञानावर आधारीत आहे , भविष्य ज्योतिष वर नाही .
मी काही तुमचा निंदक दुश्मन नाही ..
शब्द प्रामाण्य मानणारे आपण बुद्धी प्रमाण्यावर आलो व चिकित्सा करू लागलो आणि सत्यापाशी पोहचलो नाही का ?? नाहीतर पारायण आयुष्यभर करायची आणि त्यातील एकहि ओळीचा अर्थ आयुष्यभर समजला नाही तर त्या ज्ञानाचे महत्व काय ??
मला पण आनंद आहे भविष्य पुराण हे प्राचीन देन आहे. परंतु आपण त्याचा अभ्यास जाणीवपूर्वक करावा.व त्याचा उपयोग पोटभरने , लोकांना फसवणे यासाठी न करावा , आपल्याला आलेला अनुभव प्रथम तर्कशुद्ध कसोटीवर तपासून पाहावा व नंतर जगाला सांगावा...आणि तर्कशुद्ध कसोटीसाठी जनमत घेणे उचित आहे. त्याला वाद समजू नका.

मला अमर१०८ चे म्हणणे पटते..
मी स्वतः २/३ वर्षे फलज्योतिषचा अभ्यास करत आहे.
माझ्या निरीक्षणानुसार ज्योतिषशास्त्रातील astronomical data तेव्हडा खरा खरा असतो.. बाकी सगळा कल्पनेचा खेळ!

मिलिंद कृष्णा ,
धन्यवाद,
पहा या सर्व ज्योतिषांनी जर शास्त्रीय बेसवर अभ्यास केला तर निश्चित अजूनही चांगले शोध लागतील.अजूनही या विश्वाचे रहस्य उलगडलेले नाही.प्राचीन ऋषींनी तसा प्रयत्न केला होता.परंतु त्यावेळी साधने प्रगत नव्हती .आज अतिशय प्रगत साधने उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून प्राचीन ऋषींचे प्रयत्न पुढे नेले पाहिजेत..आपण आपल्या दीर्घ संशोधनातून नवीन शोध लावले पाहिजेत.....उगाचच मला सर्व भविष्य समजते असे म्हणू नये.........
बराक ओबामा भारत भेटीवर येणार आहेत, तेव्हा आपण त्यांचा मनातील नेमका हेतू ओळखून . आपले इस्पित साध्य केले पाहिजे.आपण तेव्हा देशाची कुंडली पाहत बसण्यापेक्षा देशाच्या भविष्याची चिंता वाहिली पाहिजे.

ज्योतिष शास्त्र हे शास्त्र आहे नाही हयामधे मला काही स्वारस्य नाहीये... पन मला कधीकधी प्रश्न पदतो... एखादी त्सुनामी लात येते / भुकम्प होतो आनि लाखो लोक म्रुत्यु पावतात... हे सार कोनत्या ग्रहच्या प्रभावाने होत? भोपाल दुर्घ्ततना नागासाकी हीरोशीमा ह्य घतना पाहता मानुसच जबाबदार नाही का?
असो, ज्योतिष शास्त्रातील आकदेमोदीमुले गनितात प्रगती झाली हे नक्की! फलज्योतिष सिदध करायचे असेल तर computerised programme hi palvat nahi upyogi padnar... tumhala case-studies karun data statistically correlate karavach lagel... durdaivane he karayla farsa kunala vel nahi peksha interest nahi... dhanda sodun asle research etc che dhande kon karnar? ani mag kuni US/ Europe / China madhlya somyagomyane amchich akkal amhala capsule madhun pajali... Mars effect mhanun asa aapan kangava karnar...
Yashala palvata nastat.... tumhala aajchya jagat jagayche asel tar aajchi modern tech. jashi tumhi day to day life madhe use karta... tasach Scietific world madhe sthan nirman karayla scientific methodology vaprun re/search karun data collection,analysis n interpretation karun present karan aavshyakch aahe! aani tya Scientific approach babtit aapan aaj nakki kami padtoy!

ज्योतिष हे जर शास्त्र असेल तर एक पत्रिका पाहून सर्व ज्योतिषांनी वर्तवलेली भविष्ये सारखी असायला हवीत.---- अस कस म्हणता? मग एकाच रोगावर अनेक डॉक्टरांची ऑपिनीयन्स का घेता? मुम्बई आणि पुणे वेधशाळेचे अंदाज सारखे का येत नाहित? शेवटी ज्याचा अभ्यास सखोल त्याचे निदान जास्तीत जास्त बरोबर, (मी अचुक म्हणत नाही). जगात प्रत्येक गोष्टीचे शास्त्र आहे. अभ्यास केल्याशिवाय काही सांगता येत नाही.

पान १ वर आहे.. महाराष्ट्र ज्योतिष परिषेदेने यात सुसुत्रता आणुन अभ्यासक्रम - परिक्षा इ ज्योतिष शात्री हा अभ्यासक्रम निर्माण केला आहे.

यांचा संपर्क नंबर, पत्ता, वेब साइट वगैरे देऊ शकाल का?

अलीकडेच वाचनात आलेल्या काही लेखांवरून असे लक्षात आले की फलज्योतिष्यास थोतांड मानले की आपण विज्ञाननिष्ठ, पुरोगामी विचारांचे ठरतो अशी बहुतेक लोकांची समजूत असावी..... आणि काही लेखांमध्ये मूळ विषय बाजूला राहून वितंडवादच जास्त झाला...
माझ्या माहितीप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच जर शास्त्र कशास म्हणावे असे तर त्यासाठी एक फार महत्वाचा निकष लावला जातो... तो म्हणजे.... त्या शास्त्राचे निष्कर्ष हे सदासर्वकाळ .. सर्व ठिकाणी ... सर्व लोकांस त्या त्या परिस्थितीत जसे मिळावयास हवे... तसेच सारखे मिळावयास हवे..... फलज्योतिष्यात तसे होत नाही... बर्‍याच ज्योतिष्यांचे एकाच व्यक्तीच्या कुंडली बाबत निरनिराळे मत असू शकते...... वेगवेगळे भविष्य का सांगितले जाते... ???? एक उदाहरण देतो... आजचे वैद्यकशास्त्र हे पुष्कळच प्रगत झाले आहे.... त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.... समजा अ‍ॅलोपॅथी ह्या एका शाखेत विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेला... विद्यार्थ्यांनी तो ग्रहण केला...... डॉक्टर्स... आता सर्वांना एकच अभ्यासक्रम शिकवला गेला आहे..... ज्यात सर्व रोगांची लक्षणे ... निदाने ठाम आहेत ... तेव्हा सर्व डॉक्टर्स ने केलेले रोगनिदान सारखे यायला हवे... सर्वांची उपचार पध्दती सारखी असायला हवी...... आणि सर्व काही सारखे असल्या कारणाने उपचारांपासून मिळणारे परिणामही सारखे असायला हवे.... पण तसे होत नाही.... कित्येक ऑपरेशन्स फेल जातात.... निदाने चूकतात..... सर्वात महत्वाचे म्हणजे आपणही सेकंड ओपिनियन घेतो....... या सर्वात एक गोष्ट आपण साफ विसरून जातो ती म्हणजे कुठलेही शास्त्र शिकणार्‍या विद्यार्थ्याची वैयक्तिक ग्रहणक्षमता.... त्या ज्ञानाचा योग्य तो उपयोग करण्याची क्षमता.....
हल्ली ज्योतिष्य सांगणार्‍यांचे भरघोस पीक आले म्हणजे ते सर्व जण ज्योतिष्यशास्त्रात तितकेच निष्णात आहेत असे आपण कसे गृहीत धरतो.... बनावट पदव्या मिळवून नोकरीधंदा करणारे पुष्कळजण आहेत आपल्याकडे .... सगळ्यांना एकाच माळेत ओवण्यासारखी गोष्ट आहे ही... अजून एक मुद्दा असा की ते चमत्कारिक..बुध्दीला न पटणार्‍या गोष्टी सांगतात....किंवा त्यांनी जे सांगितले त्या मागचा कार्यकारणभाव नाही आला माझ्या लक्षात , त्यांनी जे सांगितले तसे झाले नाही .... म्हणून सरसकट ज्योतिष्यशास्त्र हे शास्त्रच नव्हे असे म्हणणे माझ्या तरी बुध्दीला पटत नाही..आणखी एक गोष्ट अशी की आपल्याला झटपट परिणाम हवे असतात म्हणूनच डॉक्टर्सकडे आयुर्वेदाचार्यांपेक्षा जास्त गर्दी असते.. तीच गोष्ट ज्योतिष्यशास्त्रास लागू होते की.......

कुठलीही माहीती असलेली गोष्ट किंवा माहिती ही वैज्ञानिक दृष्टीकोनातून सिद्ध नाही झाली याचा अर्थ असा नव्हे की ती चूक आहे...... कदाचित त्यामागील कारण कळावयास आणखी कालावधी लागू शकतो की...... आणि कुठले शास्त्र परिपूर्ण आहे.... ?? संशोधनास आणि सुधारणेस अनंत वाव आहे.

सांगण्याचा मुद्दा असा की ....एखादी गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत मी स्वत: करत नाही ... ती गोष्ट मुळासकट जाणून घेत नाही.. अनुभवत नाही... त्याचे काही प्रयोग स्वत: करुन तपासत नाही किमान तो पर्यंत तरी मी त्या गोष्टी बाबत माझे मत नाही ठरवणार........
हेच ज्योतिष्य”शास्त्रा” बाबत मला वाटते ....

Pages