ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

Submitted by शिवंजय on 19 August, 2010 - 12:55

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.ज्योतिषशास्त्र वर पाश्चात्यांनी संशोधन सुरु केलेले आहे. मिशेल गौकालीन
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होय
गम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातच
काढले जाते.
शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.
तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.
हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि ,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.
या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .
राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदार ज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिले
या मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे, ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?
यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"
या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक abhyas व संशोधन सुरु होणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .
या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाची परीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर नियत्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.
आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारण भारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.

dr.sanjay honkalse.
drsanjayhonkalse@gmail .com

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही यावर वाद सुरूच आहेत, आपण लिहिलयं तसं या शास्त्राची शास्त्रशुद्धता नक्कीच तपासून पहायल हवी. पण राषिभविष्य, फलज्योतिष अथवा नुसतेच ज्योतिष यांची अचूकता कितपत आहे हे पाहायला हवे.
आपण या विषयावर लिखाण केलेत याबद्दल धन्यवाद. Happy

प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो

>>>

प्लुटो ग्रह नाही Proud

कमाल आहे. १३९ फॅक्टर्स व त्याचा सिग्नीफिकन्स शोधुन पाऊसमानाचा अंदाज वर्तवण्याचे मॉडेल बनवले गेले. पावसाचे अंदाज चुकल्यावर अल निनो फॅक्टर जास्तच प्रभावी झाल्यामुळे अंदाज चुकला असे शास्त्रज्ञ म्हणु शकतात. या मॉडेलसाठीचे शासकिय अनुदान चालुच आहे. शास्रज्ञ तर सरकारी नोकरच आहेत. हे चालु शकते.

पण स्वतःच्या खर्चाने ज्योतीष विषयावर संशोधन लोकांनी केलेले आहे. त्याला मान्यता मिळवायला येव्हडी वकिली करावी लागते हे दुदैव आहे.

हे दुदैव आहे.>>>

दुर्दैव काय त्यात ??

शास्त्र म्हणवुन घ्यायचं असेल तर

" बाप दाखव नाहीतर श्राध्ह घाल " असल्या कठोर परीक्षेतुन जावेच लागेल ...

एक लॉजिकचा भाग आहे. ज्योतिष शास्त्र (?) हजारो वर्षापासुन अस्तित्वात आहे. तरि आजुन त्याला शास्त्र म्हणुन मान्यता मिळेना. इतर शास्त्राना तशी मान्यता मिळविण्यासाठी लागलेला कालावधी लक्षात घेता. जोतीश हे शास्त्र नसुन थोतांडच आहे म्हणुन कित्येक शतका नंतरही आजुन मान्यतेच्या प्रक्रियेतुन हा शास्त्र काहि बाहेर पडताना दिसत नाही.
मग आजुन किती हजार वर्षे खोट्या गोष्टिला मान्यता मिळविण्याचा अट्टाहास करणार, हे ज्योतिष वाले?
ज्योतिष हे कमजोर मनाच्या लोकांची लुबाडनुक करण्यासाठी शास्त्राच्या नावाखाली आळशी व कामचुकार लोकांकडुन चालविलेलं थोतांड नाहि का वाटत. मला तरी तसे वाटते.

ज्योतिष हे कमजोर मनाच्या लोकांची लुबाडनुक करण्यासाठी शास्त्राच्या नावाखाली आळशी व कामचुकार लोकांकडुन चालविलेलं थोतांड नाहि का वाटत

>>> ही टीका भलती कडे जाणारी वाटते . Angry

जोतीश हे शास्त्र नसुन थोतांडच आहे>>>

येवढ्या ठामपणे बोलत आहात , आपण हे सिध्द करु शकता का ???

येवढ्या ठामपणे बोलत आहात , आपण हे सिध्द करु शकता का ???>> हो, जगतल्या कुठल्याही ज्योतिषाला बोलवा. माझ्या पुढे ऊभं करा. मी लगेच ते सिद्ध करुन दाखवितो.

अहो,
मी ब-याच ज्योतिषाना भेटुन आलोय.
मी त्याना त्यांच्या फिजच्या दुप्पट पैसे दयायला तयार झालो. पण माझे भविष्य सांगण्या ऐवजी माझा भुतकाळ सांगावा असा आग्रह धरला.
तर ज्योतिषानी म्हटलं. "ते तर तुम्हाला माहितच असतं. आम्हि का म्हणुन सांगु".
मी: अहो पण या मुळे तुम्ही सांगणार भविष्य कितपत खर असेल याची खात्री पटेल.
ज्यो: नाही बुवा, आम्ही भुतकाळ वगैर नाही सांगत.

हे असे एका वाक्यात ढेर केले मी बरेच ज्योतीष.
समझे.

येवढ्या ठामपणे बोलत आहात , आपण हे सिध्द करु शकता का ???>> हो, जगतल्या कुठल्याही ज्योतिषाला बोलवा. माझ्या पुढे ऊभं करा. मी लगेच ते सिद्ध करुन दाखवितो.

>>>

सोडा . ही लोकशाही नाही मेजॉरीटी आहे म्हणुन तुमचंच खरं होणार नाही Proud

मधुकरजी माफ करा. आपल्याला ज्योतिष शास्त्र मान्य नसेत अजिबात आग्रह नाही. मा. नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मुलनासाठी कायदा आणला आहे पण अद्याप कोणत्याही ज्योतिषावर गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले नाही.

तुम्ही त्यांना मदत करायला जा. ज्योतिषा सांगणार्‍यावर वर गुन्हा दाखल करुन दाखवा. बंदी घालुन दाखवा ज्योतिष सांगणार्‍यावर ?

असली आव्हान स्वतः मा. नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेस दिली. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेस हे आव्हान अनेक वेळा स्विकारले एकाच अटीवर की ज्योतिष हे शात्र आहे किंवा नाही हे ठरवणारे किमान शात्र विषयाचे पदवीधर असावेत व तुमच्या सारखा त्यांचा पुर्वग्रह दुषीत नसावा.

या लेखी पत्राला उत्तर तर नरेंद्र दाभोळकरांनी दिलेच नाही वर दहा पत्रकार परिषदा बोलावुन ज्योतिष हे थोतांड आहे असे म्हणत राहिले.

काहीतरी रास्त बोला राव साप म्हणुन भुई धोपडण्याचे सोडा. जगात ज्योतिषांना विमानाने बोलाऊन सल्ला विचारला जातो. कै. गजेंद्रगडकरांनी असे लिहले आहे एका दिवाळी अंकात की नेपाळ नरेशांनी त्यांना विमानाने बोलाऊन सल्ला विचारला. दुसर्‍या बाजुला पोपट घेऊन फिरणारे अज्ञान लोक सुध्दा आहेत. तुम्ही कुणाला आव्हान देणार आहात ?

रस्त्यावरच्या लोकांना आव्हान द्यायचे असेल तर सोप्पे आहे.

नितिन,
अगदी साधा प्रश्न आहे.
१) ज्योतिष काय सांगतं ?
उत्तर : भविष्य सांगतं.

मग हे जे तुम्ही म्हणताय ते विमान वाले माझं भविष्य सांगु शकतिल का ? आणि हो, ते खरं आहे के कळण्याचे दोन मार्ग
अ) सांगितलेलं काळ (भविष्य) येईस्तोवर वाट बघुन पडताळुन पाहणे.
ब) आजच पडतळा करायचं म्हटलं तर भुतकाळ सांग, लगेच दुध का दुध पाणि का पाणी.

बर हे पडतळे करण्यासाठी ज्योतिष्याची पदवी कशाला लागते?

ज्योतिष हे शात्र आहे किंवा नाही हे ठरवणारे किमान शात्र विषयाचे पदवीधर असावेतविष हे विषारी असतं अस म्हणणारे किमान रसायन शास्त्रतली पदवीधर असावे म्ह्टल्यागत काहितरी काय बोलता राव Happy

तुम्ही त्यांना मदत करायला जा. ज्योतिषा सांगणार्‍यावर वर गुन्हा दाखल करुन दाखवा. बंदी घालुन दाखवा ज्योतिष सांगणार्‍यावर ? >> कायदयाच्या कसोटीत तो गुन्हा ठरत नाही. ईथे तर्कावर त्याच्या (अ)सत्यतेची बाजु मांडतोय मी.

शास्त्र म्हणवुन घ्यायचं असेल तर

" बाप दाखव नाहीतर श्राध्ह घाल " असल्या कठोर परीक्षेतुन जावेच लागेल ...

१००% अनुमोदन.

माझा जोतिषांवर विश्वास नाही पण तरीही मी जिथे जोतिषी दिसेल तिथे जाऊन हात दाखवतो. आपल्या भविष्याविषयी कुणीतरी काहीतरी सांगतेय याची खूप गम्मत वाटते. ज्योतीष शास्त्र नाही असे सिध्द झाले तरी मी ज्योतीषाला विचारायचे सोडणार नाही. मला वाटते ज्याना ते पटत नाही त्यानी मनोरंजन म्हणून पहावे. ज्याना पटते त्यानी विश्वास ठेवावा. नंदिबैलाला विचारले जाते की पाऊस पडेल का? तो मान हलवतो मग आपण म्हणतो हो म्हणाला किंवा नाही म्हणाला... किती लोक यावर विश्वास ठेवतात? बहुतांश लोक गंम्मत म्हणूनच पाहतात... अशा बर्‍याच प्रथा आहेत ज्या आज खुळ्यात निघाल्या आहेत. आणि बर्‍याच अशाही आहेत की ज्या आजही विश्वसनिय वाटतात.

मधुकरराव, तुम्हाला मानल.
ज्योतिष सांगण इतक सोप असत तर कोणी विचारल नसत. आपल स्वतःच भविष्य स्वतः जाणुन घेतल असत.

आपण बारावीच्या शास्त्र शाखेचा अभ्यास केला असेल तर त्यात probability आणि statistics हे दोन विषय आहेत. एखाद नाण हवेत उडवल तर छापा वर येईल का काटा याच उत्तर probability देते.

कसे देते. दहा वेळा नाणे उडवा आणि जर सात वेळा छापा आला तर तर ७०% शक्यता छापा येण्याची आहे.

एक रुपयाच्या नाण्याबाबत जर बोलत असु तर सर्वच नाण्यांची हीच probability असेल असे नाही. प्रत्येक नाण्याची वेगवेगळी असु शकेल. यात ही बाकीच्या सर्व भौतीक स्थिती कायम आहेत असे गृहीत धरुन उदा. हवेचा वेग, प्रयोग शाळेतले तपमान. मशिनच्या सहायाने नाणे उडवायचे ठरले तर उडवण्याचा फोर्स इ.

मानवी भविष्य वर्तवताना जन्मकुंडली हा आधार घेतला जातो. ( इथे हातावरुन किंवा चेहेर्‍यावरुन या बाबत चर्चा नाही ) ही कुंडली प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. आता साधारण अश्या प्रकारच्या कुंडलीला एखाद्या प्रकारच्या फलादेशात काय फले मिळतात याचा विचार केला जातो.
म्हणजे probability बघीतली जाते. १०० पै़की ६०- ७० जातकाला जेव्हा साधारण अशीच फले मिळतात तेव्हा ते फल असे मिळते असा नियम तयार होतो. याला अपवाद ही तयार होतात.

उदा. जातकाच्या दहाव्या स्थानावरुन नोकरी किंवा व्यवसायाबाबत फल वर्तवीता येते. जर दहाव्या स्थानात शुक्र असेल तर एखाद्या व्यक्तीला सहज नोकरी प्राप्त होते. नोकरीतली बढती सुध्दा सहजच मिळते. या उलट मंगळ असता सहज बढती मिळत नाही.

हा व अश्या प्रकारचे हजारो नियम आज अस्तित्वात आहेत. या नियमला काही उपनियम जोडले आहेत. हा अभ्यास इतका किष्ट आहे की अनेक वर्षात लौकीकास पात्र होणारे फार कमी ज्योतिषी तयार होतात.

हा अभ्यास करताना अनेकदा अंदाज चुकतो. जसा पावसाचा अंदाज चुकतो. म्हणजे पावसाच मॉडेल हे मॉडेलच नाही अस म्हणायच का ?

रांगा लाऊन भविष्य विचारणार्‍यांना त्यात डॉक्टर्स शास्त्रज्ञ मंडळीही अपवाद नाहीत, सगळ्यांनाच मुर्ख ठरवायचे का ?

समजा आपल्या सारखा हुशार परंतु पुर्वग्रह दुषीत व्यक्ती जर स्वतः चे ज्योतिष तपासायला गेला आणि प्रत्येक गोष्टीला चुक म्हणु लागला तर चुक काय आणि बरोबर काय कसे ठरवायचे ?

या करीता महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने एक तोडगा सुचवला होता की सुरवातीला एकच नियम तपासायचा. एखादी व्यक्ती सध्या जिवंत आहे का मृत हे पत्रिकेवरून ज्योतिषी सांगतील. ह्या व्यक्ती खरोखरच अस्तीत्वात होत्या किंवा नाही आणि असल्यास त्यांची जन्मवेळ, जन्मतारीख खरी कशावरुन हे कोण तपासणार ?

या करीता काही मान्यवर जे सर्वांना मान्य असतील ते निवडावे आणि आव्हान स्विकारावे. अद्याप ज्योतिषाला शात्र म्हणणे जाहीर पणे मान्य नसणार्‍या सर्वच मान्यवरांनी या तोडग्याला मान्यता दिलेली नाही.

थोडक्यात एखादा ज्योतिषी चुकु शकतो, एखादा नियम चुकीचा ठरु शकतो. ( नोबेल मिळालेल्या शास्त्रज्ञांच्या नियमाला अपवाद निघाले आहेत ) पण probability सुध्दा मान्य करायची नाही असे ठरवल्यावर मग चर्चा न करणे उत्तम.

ज्यांना भविष्याची जिज्ञासा आहे ते जातील आणि पहातील. ज्याचा अभ्यास जास्त तो यशस्वी होईल. कायद्याने त्याला हा व्यवसाय करण्यास मुभा आहे. जर चुकले तर तो फसवले गेलो असे मानत नाही. मग कशाकरता ही व्यर्थ उठाठेव ?

ज्योतिष शास्त्र आहे??\\\\\ज्योतिष शास्त्र नाही???
06-26-octopus-paul_full_600-300x220.jpg
विठ्ठला, कोणता मी झेंडा घेऊ हाती???

जर्मनी टिमबद्दल पॉलने दिलेले फुटबॉल चे रिजल्ट्स ::
Results.jpg
फक्त दोन रिजल्ट्स चुकले... तरीही वेदर फोरकास्ट पेक्षा चांगला परफॉरमन्स

तसे वैद्यकीय शास्त्र हि शास्त्रच आहे, पण कुणालाहि वैद्य बनता येत नाही. त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, परवाना लागतो, त्यांच्या धंद्यावर सरकारचे, इतर धंदेवाईक वैद्यांचे लक्ष असते. फसवा फसवी केली तर जबरदस्त शिक्षा होऊ शकते.

पैसे गुंतवणुकीबद्दल सल्ला देणार्‍या लोकांना पण अभ्यास करावा लागतो, परवाना लागतो, त्यांच्यावरहि सरकारचे इ. लक्ष असते. त्यांनी कुणाला फसवले तर जबरदस्त शिक्षा होऊ शकते.

ज्या काही शास्त्रावर ज्योतिष आधारित आहे असे म्हणतात, त्याचा खरा अभ्यास कुणि केला आहे? कुणि त्यांची परीक्षा घेतली? काय नियम? कोण त्यांच्या धंद्यावर लक्ष ठेवणार?

माझ्या मते, अज्ञाना मुळे ज्योतिषीच नव्हे तर कुणीहि लहान गावातील जनतेला फसवू शकतात. कुठले कुठले कायदे करणार? कोण त्यांची अंमलबजावणी करणार? कशी?

डॉक्टरांनी, गुंतवणुकीचे सल्ले देणार्‍यांनी कमी लोकांना फसवले आहे का? सगळ्यांनाच शिक्षा होत नाहीच. अज्ञानाचा फायदा घेऊन लोक एकमेकाला लुबाडतात, कायद्याचा काही उपयोग नाही.

हुंडा बंदी, स्त्रियांचे मानवी हक्क याबद्दल अनेक कायदे झाले आहेत. कितपत उपयोग होतो त्याचा?

हे कायदा वगैरे फार फार थोड्या लोकांचे खेळ आहेत. उग्गाच वेळ नि पैसा वाया घालवायचा.

माझे ठीक आहे. मला इथे लिहायला खर्च येत नाही, नि वेळहि भरपूर आहे. पण इतरांना कामे असतील ना? असावीत!

माननीय झक्कीजी,

वैद्यकिय शात्राची पदवी घेऊन माझ्या आईला पित्ताशयात खडे झाले आहेत व त्याचे ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही असे एका नामांकित डॉक्टरसाहेबांचे मत होते. पर्याय म्हणुन हाच रिपोर्ट घेऊन मी एका वैद्यांकडे गेलो ज्यांना अनुभव होता पण कोणतीही डीग्री नव्हती. आईला न तपासता त्यांनी मला सात पुड्या दिल्या व आईला दह्यातुन जेवणा आधी घ्यायला सांगीतल्या. सातच दिवसात आधीचा त्रास संपला. माझ्या ओळखीमुळे त्यांनी पैसेही घेतले नाहीत. मी विचारल्यावर म्हणाले एक आणा इतक्या किंमतीच्या औषध आहे. तुझा माझ्यावर आणि आयुर्वेदावर विश्वास असेल तर त्याचीच किंमत खुप जास्त आहे.

मी याचा अर्थ असा काढला नाही की डिग्रीवाले डॉक्टर काही कामाचे नाहीत. शरीराच्या अनेक भागांचे नेमके कार्य आजच्या मॉडर्न सायन्सला माहित नाही. सोनोग्राफीत नेमके निदान करता येत नाही. केल्यास सर्वच पॅथीमध्ये उत्तम औषधे सर्वच रोगांसाठी नाहीत. असल्यास ही औषधे खात्रीने लागु पडतीलच असे ही नाही.

आपले नशीब थोर असेल तर योग्य वेळी योग्य सल्ला मिळतो. अन्यथा किरकोळ निदान सुध्दा जाणकारांकडुन होत नाही. नको असतानाच्या शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागते आणि त्रास संपत नाही.

मनुष्याला अनेक जिज्ञासा असतात त्याचे उत्तर जेव्हा मॉडर्न सायन्सला देता येत नाही काही वेळा ज्योतिषाने अचुक देता येते. अल्प दक्षिणा देऊन. ( कोणीही त्यासाठीच्या पुजा, ग्रहांचे खडे याबाबत विचारपुर्वक निर्णय घ्यावेत. )

फसवायला तर सगळेच बसलेत. मग चुकले तरी एकाला शास्त्र म्हणायचे आणि अनेक वर्ष अभ्यास करुन चुकले कि कुडमुड्या म्हणायचे हे कोणत्याच तत्वाला धरुन नाही असे वाटते.

आपल्या माहितीसाठी. महाराष्ट्र ज्योतिष परिषेदेने यात सुसुत्रता आणुन अभ्यासक्रम - परिक्षा इ ज्योतिष शात्री हा अभ्यासक्रम निर्माण केला आहे. माझ्या बरोबर १९९६ साली पुण्यातुन दोन एम. बी. बी. एस डॉक्टर्स या परिक्षांना बसले. एक बी. एच. एम. एस. डॉ़क्टर बसले आणि पास झाले.

डॉ. भा. नी. पुरंदरे या जगविख्यात गायनोकोलोजिस्ट यांनी आपल्या शल्यकौशल्य या आत्मचरित्रात पान क्र. १८९ ते १९४ अशी पाच पाने ज्योतिष विषयाला वाहिली आहेत. हे वाचुनच मी ज्योतिषाचा अभ्यास केला होता.

माहितीबद्दल धन्यवाद.
थोडक्यात् इतर शास्त्रांना जशी परीक्षा असते तशी ज्योतिषशास्त्रालाहि आता परीक्षा आहे.
आनंद आहे. आता संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांसारखे ज्योतिष शास्त्रातले विद्यार्थी पण परदेशात जाऊ शकतील. आताशा भारतापेक्षा जास्त परदेशी लोक ज्योतिषावर विश्वास ठेवतात म्हणे. रेगन सारखा राष्ट्राध्यक्ष सुद्धा ज्योतिषाला विचारून निर्णय घेत असे, असे म्हणतात.
योग शिकवणार्‍या लोकांनाहि इथे भरपूर पैसे मिळू शकतात. जरा प्रसिद्धी करावी लागते.

<माझ्या ओळखीमुळे त्यांनी पैसेही घेतले नाहीत. मी विचारल्यावर म्हणाले एक आणा इतक्या किंमतीच्या औषध आहे. तुझा माझ्यावर आणि आयुर्वेदावर विश्वास असेल तर त्याचीच किंमत खुप जास्त आहे.>

हे फार महत्वाचे. जोपर्यंत पैशाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत फसवाफसवी होत नाही तोपर्यंत काहीहि चालते.

तसेहि विश्वास असेल तर कुणिहि काहीहि सांगितले तरी पटते. त्याला ज्योतिष शास्त्रच कशाला पाहिजे.

>>तसेहि विश्वास असेल तर कुणिहि काहीहि सांगितले तरी पटते. त्याला ज्योतिष शास्त्रच कशाला पाहिजे.
१००%.

माननीय झक्कीजी,

अभ्यासाची एखादी शाखा शास्त्र म्हणुन मान्यता पावली म्हणजे आणखी मुलभुत संशोधन होते. माझ्या संग्रही एक पुस्तक आहे. याचे लेखक एक डॉक्टर आहेत. त्यांनी विवीध रोग व पत्रिकेतले ग्रहयोग यावर मुलभुत संशोधन केल आहे. समजा त्यांना यावर डॉक्टरेट करण्याची इच्छा झाली तर तो कोणत्याही युनीव्हर्सीटीचा मान्यता मिळत नाही कारण मुळात ज्योतिष हे शास्त्र नाही असा युक्तीवाद केला जातो.

पुण्यातील मा. व.दा. भट यांनी या विषयावर प्रार्थमिक अभ्यासाची पुस्तके लिहली आहेत. पंचम स्थान, सप्तम स्थान, मेषेचा बुध यावर इतके मौलीक संशोधन केले आहे की त्यांना डॉक्टरेट दिली जावी. संबंध आयुष्य या लोकांनी केवळ या व्यासंगाकरता खर्च केले आहे. सरकारी दरबारी याची किंमत शुन्य आहे.

थोडस विषयांतर करुन आणखी एक धक्कादायक पण खात्रीलायक माहिती देतो. मेषेचा बुध यावर संशोधन करताना मा. व. दा. भट यांनी फिट्स ( मिरगी ) होण्याचे कुयोग यावर प्रकाश टाकला आहे.

ज्यांना फिटस येतात त्यांना एका परदेशी कंपनीचे औषध आयुष्यभर घ्यावे लागते. उत्तरांचल मधे एक आयुर्वेदिक डॉक्टर ( निरज क्लिनीक) असे औषध द्यायचे की पुढे अ‍ॅलोपाथी गोळ्या घ्यायची गरज संपायची. माझ्या एका सहकार्‍याच्या पत्नीला याचा फायदा झाला. बारा वर्षे स्कुटरवर भितीपोटी न बसणार्‍या या स्त्रीला मागे बसुन फिरण्याचे धाडस या औषधाने प्राप्त झाले.

एक दिवस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कारण या औषधात अफु आहे. त्यांची चुक इतकीच की ते एफ. डी. ए मान्यताप्राप्त औषध नव्हते. त्यांना साधासुधा नव्हे तर नॉर्केटीक्स च्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन हे औषध बंद पाडण्यात आले.

कशावरही लेबल चिकटवण्याआधी त्याच्या खोलात जाण्याची तसदी आपण सर्वांनी घेतली तर सरकारी दरबारी जाऊद्यात, पुढच्या पिढीकडे हे ज्ञान हस्तांतर होईल.

कुतुहल म्हणुन भविष्य बघायला मला आवडते. राशीरंजनाचे सर्व भागही अनेकदा पाहिले आहेत. त्यावरुन उपाध्ये हे खुप ज्ञानी, भरवशाचे जोतिषी आहेत असे वाटते.मला त्यांचे कार्यक्रम फॉलो करायला खुप आवडायचेही. पण तरीही सध्या मी टीव्हीवर चाललेल्या त्यांच्या 'भविष्यावर बोलु काही' या कार्यक्रमात त्यानी एक ठोस विधान केले. ज्यामुळे माझी त्यांच्यावरचा विश्वास पुर्णपणे डळमळीत झाला. त्यांनी छाती ठोकपणे सांगितले की 'एकनाड असलेल्या जोडप्याला अपंगच मुले होतात'.
माझ्या स्वतःच्या माहितीत एकुण ५ एकनाड असलेली जोडपी आहेत. त्यापैकी एका जोडप्याची मुले ५० शी वरची आहेत. सगळ्यांचीच मुले अगदी निरोगी, अव्यंग आहेत.
तेव्हा हे असे विधान इतक्या ठामपणे टीव्हीवरुन करताना, जिथे हजारो लोक हा प्रोग्रम पाहत असतील , उपाध्यांसारख्या ज्येष्ठ जोतिषाने विचार करायला नको का ? ( बाकी काही नाही, तरी ज्याची एकनाड आहे व प्रेगनंट आहेत , अशा बायकांच्या मनावर हे ऐकुन थोडा तरी ताण येणारच ना. ) बरे यामागे काही स्टॅटीस्टीकल आधार/ संशोधन केले गेले आहे का ? झाले असेल तर असे होण्याची प्रॉबॅबीलिटी किती ? कीती एकनाड असलेल्या जोडप्यांची अपत्ये अपंग आहेत आणि कीती अपंग बालकांच्या आई वडीलांची एक नाड आहे ई.
माझ्या माहितीतल्या ५ जोडप्यांपैकी एकालाही प्रॉब्लेम नाही , ते सगळेच अपवाद की काय.

एक नाडीचे हे एक उदा. झाले , जे माझ्या जवळचे असल्याने मला ठळकपणे जाणवले. यावरुन अता मी तरी जोतिषाकडे फक्त मनोरंजन याच दृष्टीकोनातुन बघते.

ज्यांचा स्वत: वरचा विश्वास कमी असतो किंवा होत जातो त्यावेळेला ज्योतिषावरचा विश्वास वाढायला लागतो. आज माझा ज्योतिषावर शुन्य टक्के विश्वास आहे.

बारा वर्षे स्कुटरवर भितीपोटी न बसणार्‍या या स्त्रीला मागे बसुन फिरण्याचे धाडस या औषधाने प्राप्त झाले.
--- उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याने मनुष्य जे शुद्धीत असतांना करायचे धाडस करणार नाही (टाळेल) ते अफुच्या अमलात करु शकेल... असे नाही वाटत ?

There are three types of lies

1) lies
2) damn lies
3) STATISTICS .>>> Happy

आईला न तपासता त्यांनी मला सात पुड्या दिल्या व आईला दह्यातुन जेवणा आधी घ्यायला सांगीतल्या. सातच दिवसात आधीचा त्रास संपला.>>> नितीनराव, ऐरवी कस्ल भारी भारी लिवता राव तुमी... पण हे तुम्ही लिहाव हे काय पटत नाही....

एक दिवस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कारण या औषधात अफु आहे. त्यांची चुक इतकीच की ते एफ. डी. ए मान्यताप्राप्त औषध नव्हते. त्यांना साधासुधा नव्हे तर नॉर्केटीक्स च्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन हे औषध बंद पाडण्यात आले. >>>> आता खरोखर त्या औषधात अफु असेल तर ते देणे योग्य आहे का? बरेच असे लोक स्टेरोइड पण देतात... साइड इफेक्ट्चा विचार न करता....

( बाकी काही नाही, तरी ज्याची एकनाड आहे व प्रेगनंट आहेत , अशा बायकांच्या मनावर हे ऐकुन थोडा तरी ताण येणारच ना. ) >>> खरच त्यांना sue करयला पाहिजे... Happy

नितीनचिंचवड,, मला तुमचा रोख कळला नाही.
ज्योतिष हे शास्त्र आहे, किंवा नाही, याबद्दल मला जरा पण उत्सुकता नाही.

<अभ्यासाची एखादी शाखा शास्त्र म्हणुन मान्यता पावली म्हणजे आणखी मुलभुत संशोधन होते. >

म्हणजे सरकारकडून त्यासाठी पैशाची मदत मिळते हा मुद्दा आहे का? तसे असेल तर हा वाद का ते समजते. नाहीतर काही फरक पडत नाही.

ज्यांचा विश्वास होता त्यांनी पूर्वी पण बराच अभ्यास, संशोधन केले आहे.

ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाला, सरकारने पैसे दिले तर मला आनंदच होईल.

नाहीतरी सरकारचे कुठले पैसे? करदात्यांचे, म्हणजे जनतेचेच पैसे. सरकार काही उपकार करत नाही!

<<<<< मी त्याना त्यांच्या फिजच्या दुप्पट पैसे दयायला तयार झालो. पण माझे भविष्य सांगण्या ऐवजी माझा भुतकाळ सांगावा असा आग्रह धरला.
तर ज्योतिषानी म्हटलं. "ते तर तुम्हाला माहितच असतं. आम्हि का म्हणुन सांगु".
मी: अहो पण या मुळे तुम्ही सांगणार भविष्य कितपत खर असेल याची खात्री पटेल.
ज्यो: नाही बुवा, आम्ही भुतकाळ वगैर नाही सांगत. >>>>

ह्या न्यायाने खरा ज्योतिषी मधुकरच , त्याने भुतकाळातली मंदिरं ही स्तुप असल्याचं भविष्य सांगितलयं Proud

Pages