ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.

Submitted by शिवंजय on 19 August, 2010 - 12:55

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र.
डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .
M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E.ज्योतिषशास्त्र वर पाश्चात्यांनी संशोधन सुरु केलेले आहे. मिशेल गौकालीन
drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे. ऋषी पराशर हे या शास्त्राचे जनक होत.ज्योतिष शास्त्र हे "ज्योती" म्हणजे "प्रकाश"अथवा "दिशा"(मार्ग) दाखवणारे शास्त्र होय
गम्मत म्हणजे.या शास्त्रास स्वातंत्रपूर्व काळात अमाप राजाश्रय लाभला होता. तरं पाश्चिमात्य जगात ते एक थोतांड व फसवे शास्त्र म्हणून नाकारले जात होते पण १९५० नन्तर चित्र अगदी उलट झाले .पाश्चिमात्य जगात या शास्त्राचे संशोधन सुरु झाले,तरं भारतात बुद्धी वाद्यांचा ,शास्त्रज्ञांचा यांचा या शास्त्राला विरोध सुरु झालायात अंधश्रधा निर्मूलन वाल्यांची गरळ चालू झाली , पहानाf, फ्युचरोलोजी (Futurology ) ज्याला भविष्य शास्त्र म्हणतात आणि ज्यात मागील घडलेल्या घटनाक्रमावर आधारित भविष्यात शकणाऱ्या घटनांचा वेधअथवा अंदाजच घेतला जातो त्याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. खरेतर ते एक अंदाज शास्त्र आहे. पण खागोलशात्रीय घटना व बाबींवर आधारित भविष्य सांगणारे ज्योतिष हे शास्त्रच नाही,व ते एक फसवे शास्त्र आहे असे म्हणणे म्हणजे केवढा विरोधाभास .असे म्हणणारे सांगतात शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. तसेच सूर्य ,राहू,केतू हे ग्रह नाहीतच म्हणून त्यांचा ग्रह म्हणून विचारच करणे चुकीचे आहे. ज्योतिष अथवा शास्त्र हे सामाजिक घटनांवर भाष्य करत नाही किंवा सार्वत्रिक घडामोडींवर व घटनांचे भविष्य वर्तवत नाही असा आक्षेप घेतला जातो.हर्शल नेपच्यून,प्ल्युटो,हे गेले ग्रह आधुनिक काळात शोधले गेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार या शास्त्रात केला जात नाही. त्यात आता हल्लीच अस्त्रोनोमिकाल सोसायटीने तेरावी रास "भुजंग धारी " शोधून काढली आहे .या सर्व बाबींमुळे ज्योतिष शास्त्र निकालातच
काढले जाते.
शास्त्रज्ञांच्या मते ज्योतिष शास्त्र हे नैसर्गिक शास्त्राच्या कसोट्यांवर खरे उतरत नाही म्हणून ते फसवे शास्त्र आहे. पण हे म्हणणे चुकीचे आहे .कारण एका शास्त्राच्या कसोटीवर दुसऱ्या शास्त्राचे मोजमाप करणे किती योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होईल. नैसर्गिक शास्त्राच्या कसोटीवर मानस शास्त्र व इतर सामाजिक शास्त्रे पण फसवी ठरतील. खरेतर ती तशी ठरवली गेलीच होती. गेल्या शतकाच्या उत्तरार्द्धापर्यंत मानस शास्त्र हे शास्त्र म्हणून मान्यता पावले न्हवते.कारण मन ही सज्ञाच शास्र ,मुख्यत्वे पाश्चात्य शास्त्रज्ञ , मान्य करीत न्हवते . मन ही भौक्तिक वा दृश्य वस्तू म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही जसा मेंदू ,हृदय इ.अशी त्यांची धारणा होती ,व शास्त्र निरीक्षणात्मक व दृश्य वास्तुमानाचाच विचार करतंआणि आज फक्त विलाज नाही म्हणूनच ,कारण ते शास्त्र नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि त्याच अतीत्वा नाकारता येत नाही अशीं सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था झल्याने, आज त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात शास्त्राचा आवाकाच थिटा आहे .त्याच्या थिटे पणात ज्योतिष शास्त्रच काय इतर अनेक गोष्टी अथवा विद्या जसे अष्ट सिद्धी /विद्या व योगिक शक्ती ज्याला भारतीय परंपरेत शास्राचाच दर्जा आहे बसत नाहीत.
तसेच सूर्य ,राहू,केतू, यांना ग्रह मानाने ही एक सोय आहे. त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव व त्याचा अभ्यास महत्वाचा .जसं अर्थाश्स्त्रात नफा हा व्याजाचाच घटक अथवा जमीन (land) ह्या संकल्पनेत .सर्व निसर्ग संपत्ती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे कुणी अर्थशास्त्र निकालात काढत नाही,,तसेच ज्योतिशास्त्र एक सोय म्हणूनच ग्रह,तारे ,छायाग्रह यांना सोयीस्कर रित्या ग्रह म्हणून संबोधले जाते. त्याला या मुद्द्यावरून नाकारणे म्हणजे अर्थश्स्त्र पण खोटे आहे ,फसवे आहे असे म्हणावे लागेल.
हर्शल,नेपच्यून ,प्लुटो ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले तरी ते त्याआधीही होते व त्यांचा अस्तित्वाचा उल्लेख आढळतो .महाभारतात त्यांचा उल्लेख श्यामल वरुण,आणि ,प्रजापती असा उल्लेख आढळतो .त्यांची आजही नाव ग्रहांबरोबर ,विशेषता वरुणाची ,पूजा होते व ते अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्फोटके ,अणु परमाणु(हर्शल),अंतर्मन(नेपच्यून) ,व सामाजिक घटना (प्रजापती) दर्शवतात. थोडक्यात ज्योतिष शास्त्राला फसवे ठरवण्याही. साठी घेतले जाणारे सारे आक्षेपच " फसवे " ठरतात.
या उलट ज्योतिष शास्त्रावरील विश्वासाची अतालता जगात कोठेही नाकारता येत नाही. . उदा. या एप्रिल महिन्यात आपल्या एका ( हाय मर जावां ) चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी E .T .C .या चानलवर मान्य केले कि तिच्या विवाहाचे भविष्य बद्री उझ्मान या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नटाने सांगितल्या प्रमाणे तंतोतंत खरे झाल्याचे सांगितले. येव्ध्येच न्हावे तरं बडे बडे लोक जे जाहीरपणे ज्योतिष व देवाला रिटायर करा असे सांगतात ते लपून छपून आपल्या समस्यांचं समाधान ज्योतिषाकडे करतात. हा इतर व्यवसायांप्रमाणे येथेही दांभिकता आहे,अर्धवट ज्ञान असलेले लोक आहेत पण त्यामुळे शास्त्र खोटे ठरत नाही .
राशी भविष्य हे सर्व साधारण भविष्य असते एखादा पोपट वाला ज्योतिषी किंवा सुशिक्षित सज्जन ज्योतिषी पण चूक करू शकतो पण त्यामुळे शास्त्रच निकालात काढणे म्हणजे एखाद्या डॉक्टरच निदान चुकलं म्हणून वैद्यक शास्त्रच अवैध ठरव्ण्या सारख आहे .जेवढ एखाद्याच्या ज्ञानाचं कुंपण तेवढी त्या व्यक्तीची झेप. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा औपचारिक अभ्यास होणे महत्वाच व अती आवश्यकच आहे. औपचारिक अभ्यास सुरु केल्यानंतर सुशिक्षित व जबाबदार ज्योतिषी तयार होतील.त्यांची बार कौन्सिल वा मेडिकल कौन्सिल सारखी regulatory authority स्थापन होऊ शकेल त्यामुळे शास्त्राची औपचारिक विश्वासाहर्ता वाढेल .थोडक्यात या शास्त्राचा अभ्यास होणे महत्वाचे होय. या संदर्भात न्यूटनने एडमंड ह्यले याला दिलेले उत्तर समर्पक आहे.न्यूटनचा ज्योतिष शास्त्रावर गाढ विश्वास होता. ह्यालेने त्यांना आपला ज्योतीशास्त्रावर एवढा विश्वास कसा काय? असा प्रश्न केला तेंव्हा "मी वस्तू विषयाचा अभ्यास केला आहे तू तो केलेला नाहीस म्हणून माझा विश्वास आहे तुझा नाही." असे उत्तर दिले
या मुळेच कदाचित विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants commission) ,जी भारतीय उच्य शिक्षणाची शिखर संस्था आहे, ज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या मुले सुशिक्षित ज्योतिषी तयार होतील वा या शास्त्राचा औपचारिक अभ्यास होईलआणि ढोंगीपणावर ताबा ठेवता येईल. ही शिफारस २००१ साली वा ती स्वीकारली गेली असती तरं एव्हांना दोन तुकड्या तयार झाल्या असत्या .पण ते भाग्य या शास्त्राच्या वाट्यास यावयास अजून अवकाश होता.कारण त्या शिफारशीच्या विरुद्ध आव्हाहन दिले गेले हे आव्हाहन श्री भार्गव नावाच्या व्यक्तीने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात दिले गेले परंतु ते आव्हाहन उच्च न्यायालयाने फेटाळून लावले .पण याने समाधान होईल ते बुद्धिवादी कसले?
यासाठी जनहित मंच नावाची संस्था कामाला लागली. व या मंचच्या वतीने श्री भगवान रैयानी यांनी याचिका दाखल केली .ड्रग व मेजिक कायदा (Drug and Magic Act )१९५४ या खाली त्यांनी ज्योतिष ,वास्तू शास्त्र (भारतीय वस्तू विज्ञान महती ऐकून अमेरिकन राष्ट्र अधक्ष्यांनी अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिरास याच सुमारास भेंट दिली होती हे लक्षात घेणे येथे महत्वाचे)व इतर संबधित शास्त्रांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या शास्त्रा वरबंदी घालण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली . पण ही ती याचीकापण एप्रिल २०१० च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे याच वर्षी रद्द केली गेली .यासंदर्भात ड्रग कंट्रोलर डॉक्टर पी. रामकृष्ण यांनी ज्योतिष शास्त्राचा बाजूने जनहितार्थ प्रतिज्ञापत्र सदर केले. या प्रतिज्ञापत्रात ते लिहतात "ज्योतीश्शात्र हे चार हजारहून अधिक जुने 'शास्त्र' असून त्यावर बंदी घालणे गैर व अनुचित आहे"
या पार्श्व भूमीवर "ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे"यावर केंद्र सरकारद्वारे शिक्कामोर्तबच झाला आहे .त्याचा आत्तातरी औपचारिक abhyas व संशोधन सुरु होणे आवश्यक आहे मंचाद्वारे मी हे अपील करीत आहेकि भारतीय ज्योतिषशास्त्र हे सूक्ष्म व योग्य , वैशिष्ट्यपूर्ण आहे . भारतात या बाबतीतपुढाकार घेतला जाने आपल्या दृष्टीने हितावह आहे .
या बरोबरच ज्योतीश्शात्राच्या भविष्य कथनाची परीक्षा घेणे आवश्यक आहे असेसर्वश्री जयंत नारळीकर,,कुंटे,घाटपांडे यांनी करंट सायन्स च्या ( "Current Science ")९६ व्या व्हॉल्यूम पान ६४१-४६ मार्फत सुचवले आहे पण याच बरोबर भविष्य सांगण्याची पद्धत , नैतिकता , कायदा , मानसिकता ,सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यावरही विचार विनिमय होणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने अभ्यासक्रम आखणे आवश्यक आहे. या पद्धतीनेच होमियोपथी या चिकित्सा पद्धतीने ने अलोपथी या पाश्चात्य चिकित्सा वा औषध पद्धतीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.ज्योतिष शास्त्रा चा चिकित्सा(dignosis )व औषधोपचार या साठी उपयोग केला जाउ शकतो .खरे तरं" औषध ज्योतिष "(Medical Astrology ) हा एक संपूर्ण विषयच आहे. म्हणजेच ज्योतिष शास्त्राचा साधारण (General ) व विशेष ( Special )(विवाह ज्योतिष,आरोग्य ज्योतिष, औषध ज्योतिष , रत्न ज्योतिष ,व्यवसाय ज्योतिष, गुन्हे ज्योतिष इ. ) आभ्यासक्रम तयार करता येउ शकतात .

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे पास्च्यात्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास व संशोधन सुरु केलेले आहे.मिशेल गौकालीन या नावाच्या संशोधकाने १९५५ साली मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला .त्याने अनेक अये एठलीटचा (मैदानी खेळाडूंचा )अभ्यास केला व त्यांचा मंगल बलवान असतो असा सिद्धांत मांडला व त्याला "मंगल परिणाम"="मार्स इफेक्ट "असे नामकरण केले.त्याचा हा मार्स इफेक्ट जगप्रसिद्धह आहे . (खरेतर खेळाडू ,पोलीस, मिलिटरी ,सर्जन ,इ चा मंगल बलवान असतो हे आपल्याकडे पूर्वापार सामान्यपणे माहित आहे. पण भाव मिशेल(पाश्चिमात्य संशोधक ) खावून जातो(जातात) हेही नवीन नाही .मिशेलच्या संशोधनानंतर तेहे ज्योतिष संस्था स्थापण्याचा व नियतकालिके निघण्याचा धपाटा सुरु झाला. तशी लाटच सुरु झाली. या पैकी एकूण दहा देशातील चौपन्न संशोधकांचे संशोधन "रिसेंट अडवान्सेस इन अष्ट्रोलोजी "=Recent Advances In Astrology "या नावे उपलब्द्ध आहे .तेथे चारशेच्यावर नियत्कालिक या विषयावर निघतात .पाश्चात्य विद्यापीठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन व मान्यता देतात. प्रतुत लेखाकांस संशोधनासाठी अशी परवानगी कोलंबस क्रेडीट गुनंकात भरपूर सूट देउन प्रोत्साहन दिले होते व श्री जमेस रीग्ग यांनी आनंदाने मार्गदर्शनाचे आव्हाहन स्वीकारत असल्याचे पत्र पाठविले होते. आज यामुळेच ज्योतिष शास्त्रास ४८ टक्के अमेरिकन्स ,व ४० टक्के जागतिक लोकसंखेचे पाठबळ आहे.
आज गरज आहे ती शास्त्रज्ञ ,व भारतीय बुद्धिवादी यांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची कारण भारतीय ज्योतिषशास्त्र हे जास्त व्यापक ,सूक्ष्म तरं आहेच पण त्याची उभारणी व मांडणी भक्कम सामाजिक ,धार्मिक व आध्यात्मिक पायांवर रचली गेली आहे. आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला गेला नाही तरं आज फक्त भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.

dr.sanjay honkalse.
drsanjayhonkalse@gmail .com

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

झक्की जी,

सरकारने ज्योतिषशास्त्र अभ्यासाकरता पैसे मानधन द्यावे असा आग्रह ज्योतिषसंशोधक करणार नाहीत किंवा करु नये. याला शास्त्र म्हणुन मान्यता मिळाल्यास Inter discipline संशोधनास लोक पुढे येतील.

ज्या गोष्टी मी लिहील्या आहेत त्या सत्य आहेत. उदा. सात पुड्यामधले औषध. व निरज क्लिनीक चे औषध. मायबोलीवर जर आयुर्वेदचा अभ्यास केलेले जर वैद्यराज असतील तर अफु हे मेंदुच्या विकृतीवरील मोठे प्रभावी औषध आहे हे जुन्या ग्रंथात लिहील्याचे सांगतील.

एखादी वनस्पती प्रमाणात घेतल्यास जालीम औषध असते. प्रमाणाबाहेर घेतल्यास मात्र विष होते हा नियम सर्वच पॅथीचे लोक मान्य करतील.

जी औषधे जगभरात बंदी घातलेली आहेत ती भारतात एफ्.डी. ए च्या परवानगीने विकली जात आहेत उदा. ब्रुफेन याबाबत कुणी काही म्हणेल का ?

एकनाड वर पुन्हा संशोधन करण्यास मी तयार आहे. या संशोधनास आवश्यक सहकार्य करण्यास मायबोलीकर व त्यांचे नातेवाईक किंवा अन्य मित्र यांच्याकडुन विवीध माहिती जमा करावी लागेल. मायबोलीने जर परवानगी दिली तर संशोधनाचे निष्कर्श मायबोलीवरुनच जाहीर करुयात.

सर्व माहीती प्रकट केली जाणार नाही फक्त निष्कर्श प्रकट केले जातील. चांगला पायंडा पाडुयात. पुन्हा पुन्हा संशोधन केल्याने चांगलेच निष्पन्न होईल.

या कामी कोणास मला मदत करावी असे वाटत असल्यास आपले स्वागत आहे.

उदयराव आपला स्वतःवर विश्वास आहे ना ? मायबोलीवर मी प्रत्येकाचा आदरपुर्वक उल्लेख करतो आहे. यावरुन आपल्या लक्षात आलेच असेल. माझ्या काही मतांशी माझी आई सहमत नाही. तुम्हाला किंवा मधुकरजींना आग्रह नाही. जे ज्योतिषावर विश्वास ठेवतात त्यांची हेटाळणी होऊ नये. भिती कशाची बाळगता आहात ? भारतात चार्वाकाला सुध्दा आचार्य म्हणले गेले आहे. त्यांच्या काही आक्षेपांना मोठमोठाले विद्वान उत्तर देऊ शकले नाहीत.

टवाळा आवडे विनोद हे जरी खरे असेल तरी कोणतरी गांभिर्यपुर्वक मते मांडत असेल तर त्याचा आदर नका करु पण विनोद कशाला करावा ?

उदयराव आपला स्वतःवर विश्वास आहे ना ?
---- अगदीच... आणि म्हणुन ज्योतिषावर विश्वास नाही आहे.

मायबोलीवर मी प्रत्येकाचा आदरपुर्वक उल्लेख करतो आहे.
---- मी पण प्रत्येकाचा आदरपुर्वक उल्लेख करतो... माझ्या लिखाणात तुम्हाला अनादर दिसला कां? दाखवल्यास दुरुस्ती करेन.

जे ज्योतिषावर विश्वास ठेवतात त्यांची हेटाळणी होऊ नये.
---- मी हेटाळणी नाही, पण सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्योतिष हे कुठल्याही प्रकारचे शास्त्र नाही आहे यावर माझा विश्वास आहे.

भिती कशाची बाळगता आहात ?
---- अहो मी ते थट्टेने मधुकर रावांना लिहीले आहे. फार कमी वेळा त्यांच्याशी मते जुळण्याचा योग येतो, भले त्या मागची कारणे वेगळी असतील.

ह्या न्यायाने खरा ज्योतिषी मधुकरच , त्याने भुतकाळातली मंदिरं ही स्तुप असल्याचं भविष्य सांगितलयं >> श्री, मी ईतिहासकारांच्या पुस्तकांच्या संदर्भांवरुन ते लिहलय. ज्योतीषांची पुस्तक वाचुन वेळ घालविणे आपलं पिंड नाही.
क्युंकी ज्योतिष तो थोतांड है, एक रोजगार हमी योजन आहे ती!
Happy

ज्योतिष हे जर शास्त्र असेल तर एक पत्रिका पाहून सर्व ज्योतिषांनी वर्तवलेली भविष्ये सारखी असायला हवीत...बरोबर चूक पुढचे. जर हे सगळे गणिती सारणींमधे बसत असेल तर याला संगणकातही बांधता यायला हवे.
वैद्यकशास्त्रातले फरक हे पुन्हा त्या त्या डॉक्टर/वैद्याच्या स्वतःच्या पद्धती प्रमाणे पडतील्...एका उदाहरणाने अ‍ॅलोपथी मोडीत काधता येणार नाही. आणि या सर्वच क्षेत्रात संशोधन होतच आहे.
हवामानखात्याचा दाखला अप्रस्तुत : निसर्गाचे कोडे/गणित मानवाला पूर्ण उकललेले नाही आणि त्यातही बदल होतच राहतात. पुन्हा त्या आडाख्यांचा काही व्यावहारिक उपयोग आहे.
माझी एक शंका : क्षणभर मानू की ज्योतिषाने भविष्यात काय होईल ते आधी कळू शकते. मग पुढे? आधी कळल्यावर ते बदलण्यासाठी ग्रहांच्या विनवण्या करायच्या आणि मग ते आपले ऐकणार का? किंवा पुढे अमुक तमुक दिवशी माझे असे असे वाईट होणार आहे या सावटाखालीच जगायचे? भविष्य कळल्याने नक्की काय व्यावहारिक फायदा होतो?
आता पत्रिका जमवून लग्न जुळवण्याचे उदाहरण दिले जाईल्....की पत्रिका जुळवल्याने लग्न यशस्वी होईल.इ.इ. (यशस्वी लग्न म्हणजे फक्त टिकलेले लग्न नाही तर ज्यात पती पत्नी दोघेही सुखी समाधानी आहेत असे लग्न)...याचा संख्याशास्त्रीय पुरावा कसा मिळेल? एखाद्या सुमूहर्तावर सिझेरियनने बाळाचा जन्म घडवून आणून त्याला चक्रवर्ती राजाची कुंडली लागू करण्याचे पण प्रकार होतात. त्याचे पुढे काय होते?
जन्म राशींचा व्यक्तीच्या स्वभावगुणांवर होणारा परिणाम या विषयी मलाही कुतूहल आहे.

ज्योतिष शास्त्राच्या या विषयात आयुर्वेदाला ओढु नका.....कारण या शास्त्राच्या सत्यते बाबत कोणाचे दुमत नसेल (याच अर्थ सगळे नामांकित डॉक्टर्स काही कामाचे नाहीत असा गैर समज कृपया करुन घेऊ नये.पण आयुर्वेद शास्त्र जरी श्रेष्ठ असले तरी अज्ञानी वैद्यांपासुन सावध रहा)

ज्योतिष हे थोतांड आहे. मनगटात बळ, मनात हिम्मत कमी असली कि असले आधार लागतात. हे मी जुन्या पोपटाच्या बीबीवरही लिहीले होते. मधुकर यास अनुमोदन. आयुर्वेदाचा इथे काय संबंध आला?

हा विषय नेहमीच चर्चेत असतो. याला अंत नाही.
http://mr.upakram.org/node/1065 ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचा. काही मायबोलीकरांनी वाचला असेल.

मनगटात बळ, मनात हिम्मत कमी असली कि असले आधार लागतात.
--- मामीसाहेब पुर्ण सहमत. मी वर हेच मांडले आहे. दिवसंदिवस हे बळ कमी होत चालले आहे कां?

<<एकनाड वर पुन्हा संशोधन करण्यास मी तयार आहे >>
पुन्हा संशोधन म्हणजे आधी झाले आहे का ? असेल तर त्याचे निष्कर्ष उपलब्ध आहेत का ?
मी वर उल्लेख केल्याप्रमाणे अपंग संतति , संतति न होणे हेच दुष्परीणाम आहेत का ?
तुम्हाला संशोधनासाठी हवे असल्यास माझे सर्व डीटेल्स नक्की देईन.

अर्थात , एकनाडी बाबतचे प्रकाश यांच्या लेखातील विवेचन पटण्याजोगे आहे.

प्रकाश पूर्वी इथे चर्चा झालेली आहे कि नाही? तुम्हीही लिहिले होतेत. तुमच्या ब्लॉग वर ही आहे माहिती.

प्रिय सर,
तुमचा ज्योतिष शास्त्रावरचा लेख वाचला. चांगला आहे. positive विचार करायला हवा. नक्कीच हे शास्त्र आहे. परंतु जो खरा अभ्यास करतो , त्यातील बारकावे अभ्यासून पाहतो त्यालाच ते knowledge प्राप्त होत असावे. थातूर मातुर अभ्यास करण्यात अर्थ नाही . तुम्ही पण चांगले ज्योतिषी आहात न !

माझा एवढा विश्वास नव्हता. कारण मी १४ वर्षाची होते. आणि आमच्या घरी एक ज्योतिषी आला होता व माझ्या mother चा हात बघून सांगितले सगळे चांगले आहे, भरपूर आयुष्य वगैरे... आणि १ महिन्यांनी आई वारली .... आजारी होती तेव्हा वाटले होते ज्योतिष्यांनी सांगितले म्हणजे आई ला काही होणार नाही परंतु ... काही कटू अनुभव असतात. मी आणि माझी मैत्रीण शाळेत असताना एका ज्योतिषाकडे गेलो होतो तेव्हा माझ्या आणि मैत्रिणीच्या हातावर पावडर टाकली आणि बावळट चोळत बसला (तो बावळट नव्हता आम्ही बावळट होतो) रेषा स्पष्ट दिसतात असे तो म्हणाला .....आणि दरवाजा लावून घेतला... मला काही इतके समजत नव्हते , मैत्रीण म्हणाली रेखा... उठ चल दार ढकल आपण जावू या....आणि आम्ही पळालो . त्याला जर हात बघायचा होता तर पावडर का टाकली ? आणि दरवाजा का लावला? न सुटणारे प्रश्न?.....त्यामुळे ज्योतिषी म्हटले कि तो चावट असतो असा समज होता ..

ज्योतिष्य शास्त्र खरे आहे यात शंका नाही परंतु त्याला deep knowledge पाहिजे... जसे माझे संजय सर.. ग्रह तारे याचा आपल्या आयुष्यावर परिणाम कसा होतो ? तुमच्या लेखाने माझी विचार करायची दिशा बदलली. माहिती सुद्धा मिळाली . इतर शास्त्राप्रमाणे त्याची colleges निघाली पाहिजेत , त्याला scope पाहिजे, income source म्हणून सुद्धा सर्व सामान्यांना job मिळाला पाहिजे. आता कसे फक्त ठराविक लोकच शिकतात तसे न राहता एखाद्या मुलाला १२ वी नंतर ज्योतिष शास्त्रात पदवी घेवून पुढे एखाद्या स्पोर्ट्स club किवा business family मध्ये guide line देण्यासाठी appoint करता आले तर ? मी हा लेख वाचला आणि माझे विचार बदलले... तुम्च "महा अव्रतार बाबाजीन्वर" लिहिलेले पुस्तक वाचले थोडे विचार बदलले.. चांगला बदल होतोय माझ्यात असे वाटते.

सध्या पण माझे एक मत आहे भविष्यात खूप शिक्षण आहे म्हणून अभ्यासच केला नाही तर कसे होईल ?
पुर्वा कुळ्कर्णी

प्रिय सर,
तुमचा ज्योतिष शास्त्रावरचा लेख वाचला. चांगला आहे. positive विचार करायला हवा. नक्कीच हे शास्त्र आहे. परंतु जो खरा अभ्यास करतो , त्यातील बारकावे अभ्यासून पाहतो त्यालाच ते knowledge प्राप्त होत असावे. थातूर मातुर अभ्यास करण्यात अर्थ नाही . तुम्ही पण चांगले ज्योतिषी आहात न !

माझा एवढा विश्वास नव्हता. कारण मी १४ वर्षाची होते. आणि आमच्या घरी एक ज्योतिषी आला होता व माझ्या mother चा हात बघून सांगितले सगळे चांगले आहे, भरपूर आयुष्य वगैरे... आणि १ महिन्यांनी आई वारली .... आजारी होती तेव्हा वाटले होते ज्योतिष्यांनी सांगितले म्हणजे आई ला काही होणार नाही परंतु ... काही कटू अनुभव असतात. मी आणि माझी मैत्रीण शाळेत असताना एका ज्योतिषाकडे गेलो होतो तेव्हा माझ्या आणि मैत्रिणीच्या हातावर पावडर टाकली आणि बावळट चोळत बसला (तो बावळट नव्हता आम्ही बावळट होतो) रेषा स्पष्ट दिसतात असे तो म्हणाला .....आणि दरवाजा लावून घेतला... मला काही इतके समजत नव्हते , मैत्रीण म्हणाली रेखा... उठ चल दार ढकल आपण जावू या....आणि आम्ही पळालो . त्याला जर हात बघायचा होता तर पावडर का टाकली ? आणि दरवाजा का लावला? न सुटणारे प्रश्न?.....त्यामुळे ज्योतिषी म्हटले कि तो चावट असतो असा समज होता ..

ज्योतिष्य शास्त्र खरे आहे यात शंका नाही परंतु त्याला deep knowledge पाहिजे... जसे माझे संजय सर.. ग्रह तारे याचा आपल्या आयुष्यावर परिणाम कसा होतो ? तुमच्या लेखाने माझी विचार करायची दिशा बदलली. माहिती सुद्धा मिळाली . इतर शास्त्राप्रमाणे त्याची colleges निघाली पाहिजेत , त्याला scope पाहिजे, income source म्हणून सुद्धा सर्व सामान्यांना job मिळाला पाहिजे. आता कसे फक्त ठराविक लोकच शिकतात तसे न राहता एखाद्या मुलाला १२ वी नंतर ज्योतिष शास्त्रात पदवी घेवून पुढे एखाद्या स्पोर्ट्स club किवा business family मध्ये guide line देण्यासाठी appoint करता आले तर ? मी हा लेख वाचला आणि माझे विचार बदलले... तुमच "महाअवतार बाबाजी" पुस्तक वाचले थोडे विचार बदलले.. चांगला बदल होतोय माझ्यात असे वाटते.

सध्या पण माझे एक मत आहे भविष्यात खूप शिक्षण आहे म्हणून अभ्यासच केला नाही तर कसे होईल ?
पूर्वा कुळ्कर्णी

डेलीयाजी धन्यवाद,

एकनाड बाबत मी पुन्हा संशोधन अशा साठी म्हणल की जुन्या ज्योतिषांची याबाबत ची मते ही काही अभ्यासावर आधारलेली आहेत. जुन्या पिढीतल्या ज्योतिषांनी अगदी प्रगत पध्दतीने अभ्यास केला नसावा. आपण तो पुन्हा करायला काय हरकत आहे ?

किमान एक हजार जोडप्यांनी या प्रकल्पा करता आपली मते नोंदवल्यास काही निष्कर्षा पर्यत जाता येईल.

मी काही उद्दीष्टे ठरवली आहेत.

१) बल्ड ग्रुप आणि एकनाड याचा काही संबंध आहे का ?
( मॉडर्न सायन्स प्रमाणे पत्नीचा निगेटीव्ह आणि पतीचा पॉजीटीव्ह असल्यास काही कॉम्पीकेशन्स होतात असे म्हणतात. )

इंटरनेट वर उपलब्ध माहिती खालील प्रमाणे.

Matching blood group before marriage is important. This is to prevent Rh incompatibility. Rh incompatibility can lead to erythroblastosis fetalis (Hemolytic disease of the newborn-HDN). Fetal RBC get destroyed & newborn may get severe anaemia, jaundice. This jaundice
is more severe than Physiological jaundice ( which is the most common and will usually resolve on its own).
In very severe form, fetus may die due to heart failure. This is mediated by antigen-antibodies reaction. Transfer of maternal antibodies across the placenta occurs.
This happens when Rh +ve man marries Rh-ve lady. So Rh +ve man should try to avoid marrying Rh-ve lady.
Newborn with erythroblastosis fetalis may need exchange transfusion.
Complete blood count, bilirubin levels are done. High levels of bilirubin may lead to kernicterus. Kernicterus means deposition of bilirubin in basal ganglia region & can cause severe brain damage (bilirubin encephalopathy). In kernicterus, baby will be lethargic,slowly responding when breast-feeding is tried. Bulging fontanelles may be seen
In 1st pregnancy problem is less severe but in subsequent pregnancies problem becomes more severe. Hemolytic disease of the newborn can be treated before birth by intrauterine transfusion.
Incompatibilities of ABO blood types do not cause erythroblastosis fetalis.
Erythroblastosis fetalis can be prevented by giving the mother Rh0(D) immune globulin at 28 wk gestation and within 72 h of pregnancy termination. Due to preventive treatments given to the mother, erythroblastosis fetalis is less common nowadays
Direct antiglobulin test (DAT, Direct Coomb's test ) is used to diagnose HDN.

२) एकनाड असताना मिस़कॅरेजेस होण्याचे प्रमाण जास्त असते का ?

३) एकनाड असताना आणखी काही जेनेटेक दोष असतात का ?

४) अन्य काही.

मला वाटत की या संशोधनाची इतकी उद्दीष्टे पुरेशी आहेत.

यासाठी दोन प्रकारे डाटा जमा करण्याची आवश्यकता आहे.

१) ज्या जोड्प्यांना माहीत आहे की त्यांची एकनाड आहे त्यांचे अनुभव.
२) ज्या जोडप्यांची संतती नॉर्मल नाही आणि एक नाड आहे किंवा नाही याची माहीती नाही त्यांच्या जन्मनक्षत्रांचा शोध घेणे व त्यातुन एकनाड जोडप्यांचे प्रमाण शोधणे.

या दोन्ही पध्दतीने डाटा जमा करून काही संशोधन शक्य होते का ते पहाणे.

प्रकाश घाटपांडे,
मी तुम्हाला काहि प्रश्न विचारले होते. त्याला आता किमान ६ महिने झाले असावेत.
तुम्ही आजुन उत्तर दिलेलं नाही. (सोयिस्कर रित्या टाळलात असा थेट आरोप आहे)
म्हणत असाल तर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला तयार आहे.
तेंव्हा तरी उत्तर देणार का ?

देऊ शकत नसाल तर मग उगीच ईथे ज्योतिषाची बाजु लावुन धरु नका.

<<देऊ शकत नसाल तर मग उगीच ईथे ज्योतिषाची बाजु लावुन धरु नका.>>
मधुकरराव वाचून मजा वाटली. अधिक भाष्य करणे टाळतो.
प्रत्येकाला वैयक्तिक उत्तरे देणे व्यावहारिक रित्या शक्य होत नाही. पण आपण ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्त्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचे प्रो जयंत नारळीकरांनी लिहिलेले परिक्षण इथे वाचावे. नंतर रुची वाटल्यास पुस्तक ही वाचावे.

वरिल सव्र मान्यवर मन्डलीचे प्रतिक्रिया वाचुन जसा हे शास्त्र आहे का नाहि असा प्रश्न नविन वाचकला
पडेल तसाच मला काहि वर्शा पुर्वि पड्ला होता.मग थरवल कि स्वतहा या शास्त्राचा अभ्यास करुन अनुभव घेउ.आनि पुर्वग्रह दुशटि न ठेवता अभ्यास सुरु करुन काहि महिनेच गेल्यावर माझ्या हे पुण्रपणे लशात आले कि हे शास्त्रच आहे.वर ज्यानी-ज्यानी हे शास्त्र नाही असे मत दिलेले आहे त्यानी या शास्त्रचा कितिसा असा अभ्यास केला आहे?

इथेहि तेच - blind belief. असो.

ज्योतीष हे शास्त्र आहे कि नाहि हा वाद चालु राहु द्या.

गम्मत अशी आहे. की ज्योतीष हे शास्त्र मानणारे ते शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी असे दावे करतात की सर्व काहि ज्योतीष predict करु शकते. आणी ज्योतीष हे शास्त्र न मानणारे ते शास्त्र नाहि हे सिद्ध करण्यासाठी असे दावे करते की ज्योतीष काहिच predict करु शकत नाहि.

जल्लालुद्दिन नावचा फकीर होउन गेला. त्याच्याकडे एक माणुस आला. त्याने विचारले "नशिब कि कर्म? जर नशिब असणे हि गोष्ट खरी असेल तर मला जे मिळणार आहे ते मला मिळेलच. मी काहिहि करण्याची आवश्यकता नाहिये. पण कर्म असेल तर मी कर्म केल्यावर मला मिळालेच पाहिजे. पण तसेहि दिसत नाहि" तो माणुस जलाल्लुद्दिन समोर उभा होता. जलाल्लुद्दिन म्हणाला " तु तुझा एक पाय वर घेउन उभा रहा" तो माणुस एका पायावर उभा राहिला. जलाल्लुद्दिन म्हणाला " आता दुसरा पायहि वर घे" तो माणुस म्हणाला " हे तर शक्या नाही. दोन्हि पाय वर घेउन मी कसे काय उभे राहु ?" जलाल्लुद्दिन म्हणाला " हेच उत्तर आहे. काहि गोष्टी करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे. काहि गोष्टी तु बदलु शकत नाहिस"

दोन्हि गोष्टी एकमेकाला पुरक आहेत. त्यात कसलाही वाद नाहि. ज्योतीष हे शास्त्र न मानणारे अशा गोष्टींबद्दल आवाहन करतात की त्या उचललेल्या पायासारख्या आहेत. ज्योतीष हे शास्त्र मानणारे टेकलेल्या पायाबद्दल बोलतात.

मुळ मुद्दा जो आहे भविष्याबद्दल जाणुन घेण्याचा तो बाजुलाच राहुन फक्त वादावादि चालु रहाते.

पण आपल्याला तर फक्त दावे करायचे असतात. आपण जे मानतो तेच सत्य हे सिद्ध करणारे दावे. प्रत्यक्ष सत्य काय आहे हे थोडेच कोणाला हवे असते ?

मी अशा ज्योतिषाच्या शोधात आहे की जो सांगेल की "ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही ह्याचा निकाल काय लागेल?"

मी ज्योतिषाचा जरासा अभ्यास केला होता. तरीही माझा ज्योतिषावार अर्धवट विश्वास आहे.. आता अर्धवट म्हणजे काय आणी मी अर्धवट आहे का असे प्रश्न कॄपया विचारू नयेत Happy

भारतातच ५०,०००कोतिन्चि उलाढाल हा व्यवसाय एखादी पाश्चात्य संस्था बौद्धिक अधिकार (Intellectual Property Rights ) मिळून क्रेडीट व रोयाल्टी मिळवेलच पण हा आपलाच शोध असल्याचे सांगून ज्योतिष शास्त्राचे जनकत्व लाटेल .एवढेच न्हावे तरं भारतात संस्था उघडून आपलाच माल आपल्यालाच विकेल व श्रेय पण लाटेल.

एके दिवशी हे मात्र निश्चितच होईल.... Happy

ज्योतिष हे जर शास्त्र असेल तर एक पत्रिका पाहून सर्व ज्योतिषांनी वर्तवलेली भविष्ये सारखी असायला हवीत...बरोबर चूक पुढचे. जर हे सगळे गणिती सारणींमधे बसत असेल तर याला संगणकातही बांधता यायला हवे.
वैद्यकशास्त्रातले फरक हे पुन्हा त्या त्या डॉक्टर/वैद्याच्या स्वतःच्या पद्धती प्रमाणे पडतील्...एका उदाहरणाने अ‍ॅलोपथी मोडीत काधता येणार नाही. आणि या सर्वच क्षेत्रात संशोधन होतच आहे.

वैद्यकशास्त्रातही जर डॉक्टर/वैद्याच्या स्वतःच्या पद्धतीमुळे फरक पडत असेल तर मग ज्योतिषशास्त्रात मात्र सगळ्यांचे सारखेच यायला पाहिजे हा आग्रह का? वैद्यकशास्त्र आज अतिप्रगत आहे, तरी फरक पडताहेत. ज्योतिषशास्त्र काही शतकांपुर्वी अभ्यासले जात होते आणि गेल्या काही शतकात भारतात इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास जसा मागे पडला तसा ज्योतिषशास्त्राचाही मागे पडला. मग त्याची तुलना प्रगत शास्त्राशी करुन तसेच रिझल्ट्स मिळावेत ही अपेक्षा कितपत योग्य?

कोणे एके काळी आयुर्वेदही अतिप्रगत होते, शल्यचिकित्साही त्यात होत होती. पण गेल्या काही शतकात आयुर्वेदाचा अभ्यास खुंटला आणि आज त्यातली शल्यचिकित्सा जवळजवळ नाहिशीच झालीय. पण जेवढे ज्ञात आहे त्या जोरावर आयुर्वेदाला शास्त्र समजले जातेयच ना? कदाचित ज्योतिषशास्त्रात आधी जेवढे ज्ञात होते त्याच्या १०% ही आता शिल्लक नसेल. परकिय आक्रमणात ग्रंथालये, देवळे व. जाळली असे उल्लेख नेहमी येतात. आता रिकामी ग्रंथालये नक्कीच जाळली नसतील. त्यात काहितरी असेलच.

मी ज्योतिषाचा जरासा अभ्यास केला होता. तरीही माझा ज्योतिषावार अर्धवट विश्वास आहे
मी शरद उपाधे यान्च्या कार्यक्रमात एकदा ऐकले होते कि ते म्हणत होते-"मी या शास्त्राचा गेली ३५ वर्ष अभ्यास करतोय,आत्ता कुठे मला या शास्त्राची खोली कळतेय"
यामध्ये आपला 'जरासा' शब्द कुठे बसतो?

जाऊद्या रावल साहेब ज्याचा विश्वास असेल तो विचारेल ज्योतिषाला आणि समाधान पावेल. उगच चर्चा कशाला. आक्षेपच घ्यायचे असतील तर काहिही घेता येतात.

>>>>> यामध्ये आपला 'जरासा' शब्द कुठे बसतो? <<<<<
लोणारच्या तळ्यात एक थेम्ब खोबरेल तेल टाकल्यावर त्याचा ज्या जाडीचा तवन्ग तळेभर पसरेल, तिथे "जरास्सा" हा शब्द बसेल (की तरन्गेल? Wink ) यावरुन समजावे की उपाध्येन्ना काय खोली ३५ वर्षानन्तर अभिप्रेत आहे! Happy
[नास्तिकान्च्या व हिन्दूद्वेष्ट्यान्च्या बाबतीत मात्र त्याच तेलाची वाफ होऊन हवेत उधळली जात असेल.... Proud ]

वैद्यक अर्थातच शास्त्र आहे. ते जीवशास्त्रावर आधारीत आहे जे की रसायनशास्त्रावर आधारीत आहे जे की भौतीक शास्त्रावर आधारीत आहे. ज्योतीष्याला मात्र असा कोणताही खंबीर आधार नाही - लोकांची जुन्यावरची श्रद्धा वगळता. श्रद्धेवर आधारलेले मनोरे बांधता येतात, त्यात रहाताही येते. किंमत मात्र इतरांना चुकवावी लागते.

ज्योतीष्याला मात्र असा कोणताही खंबीर आधार नाही
ज्योतिषशास्त्र हेच सर्वाना आधार आहे.आपले आयुर्वेद जुन्या लोकानी लिहले.पुर्वजानी पिर्यामिड बाधले ते आत्ताच्या technology ला सुधा शक्य नाही.ते जुने लोक काय मुर्ख होते?ज्या वेदाना आपण मानतो त्याच
वेदाचे ज्योतिष हे नेत्र आहेत.ज्योतिष हे त्यानीच लिहले.
समजा तुमच्या कडे एका ड्ब्यात कोळसा आहे व एका ड्ब्यात सोने तर तुम्ही तुमच्या मुलाना वारसा म्हणुन काय सभाळायला द्याल? .....अर्थातच सोने.
पुर्वजाकडुन आपल्याकडे हे शास्त्र आले आहे व एवढी वर्ष टिकुन आहे यातच काय सजायचे ते समजा.
परदेशातुन येवुन लोकानी हे शास्त्र शिकुन नाव कमावले उदा. जगविख्यात कीरो.
आणि आपण हे शास्त्रआहे कि नाही यावर वाद घालतो कुह्राडीचा दान्डा गोतास काळ दुसरे काय.

>>>>> लोणारच्या तळ्यात एक थेम्ब खोबरेल तेल टाकल्यावर त्याचा ज्या जाडीचा तवन्ग तळेभर पसरेल, तिथे "जरास्सा" हा शब्द बसेल<<<<<
आपण आपल्या अनुभवाला खोबरेल तेलाची उपमा दिली ते योग्य आहे.परन्तु ज्योतिष हे लोणारचे तळे नसुन महासागर आहे आणि तो थेम्ब वरच तरन्गत राहिल्याने त्याला आतिल मोत्याचे दर्शन कसे बरे होइल?

अहो रमेशजी, आमचे वा शरद उपाध्ये यान्चे "जरास्से" ज्योतिषविषयक ज्ञानाची "व्याप्ती" किती खोलवर आहे व मूळात या शास्त्राची खोली किती आहे हे समजावे म्हणून केवळ ती तेलाच्या तवन्गाची उपमा दिली, ज्योतिषशास्त्राला "लोणारच्या तळ्याची" उपमा नाही दिलेली!
(हव तर लोणारच्या तळ्या ऐवजी प्यासिफिक वा अशाच कोणत्या महासागराचे नाव घेतलेत तरी चालेल, नै का? )

ज्योतिष हे थोतांड आहे. ३००० पूर्वीचा भारत जो गणांनी [ गट ] युक्त होता तो महानराष्ट्र झाला आहे , याचा उल्लेख भविष्य सांगणाऱ्यांनी केला होता का ? त्यांना माहित होते का आजची लोकसंख्या १२५ कोटी होणार आहे. ढग दिसताच पाऊस पडेल असे सांगणे म्हणजे भविष्य का ?
वेदांचे डोळे भविष्य आहे,म्हणजे आशावादी समाज निर्मानकरून पोट भरणे. आज भविष्य सांगणारे ९९% लोक श्रीमंत झाले हे लोकांच्या कमकुवत मनाचा फायदा घेवूनच. आस्थेचा प्रश्न केला तर हे ज्योतिषी फुकट काही सांगत नाही . त्यांना भविष्याच्या जोरावर कधीही समाजाला शांती समाधान देता आले नाही. उलट हे लोक भविष्य पुरांनांच्या आधारावर समाजाला दैवावादाकडे वळवतात. ....
आता यांचेच भविष्य पुढे काय असणार आहे कोणास ठाऊक ? पुढची पिढी यांना मागासलेले म्हटल्याखेरीज राहणार नाही....

Pages