ओझर्ड्याचा अजस्र धबधबा

Submitted by स्वानंद on 11 August, 2010 - 05:05

कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे.
१ ऑगस्टला इथे गेलो होतो.

इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे.

(धबधबा क्र. १)

(धबधबा क्र. 2)

उजव्या बाजूला पसरलेला 'शिवाजी सागर'...

वळणावळणाचा रस्ता मागे टाकत आपण मुख्य धबधब्याला पोचतो. याला 'पंचधारा' असेही म्हणतात. का ते खालच्या फोटोवरून समजेल. Happy

धबधब्याच्या डाव्याबाजूने एक वाट जाते, ती थेट त्याच्या तळाशी, जिथे वरून जोरदार पाणी पडत असते तिथे घेउन जाते.

वाटेवरून दिसणरे फेसाळते पाणी

पंधरा-वीस मिनीटे चालल्यावर आपण धबधब्याच्या तळाशी पोचतो. इथं पोचल्यावर जे काही वाटते त्याचे काय वर्णन करावे...पूर्ण वेळ धबधब्याचे पाणी वरून पडत असते, तुषार तर इतके असतात की वरून पडणारे पाणी पाहाताना डोळे उघडेच राहात नाहीत.

कितीही काळजी घेतली तरी सोबत आणलेले सगळे काही इथे भिजते... तेव्हा काळजी सोडावी आणि मनसोक्त भिजावे. Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोल्हापुरात गगनबावडा, कोयना क्षेत्रातलं नवजा म्हणजे अबब..! पावसाची ठिकाणे. यो-रॉक्स , सच्या, कधी जायचं ते बोला. मी तयार हय.

प्रसाद गोडबोले, एकदा आमच्या सातारला चला तुम्हाला ठोसेघरचा धबधबा दाखवतो >>>> अगदी...
योगेशकडे आहेत वाटत तिकडचे फोटो..... बघुया कधी टाकतो ते.... Happy

Pages