कुठल्या कंपनीचा इन्व्हर्टर विकत घ्यावा?

Submitted by नानबा on 10 August, 2010 - 09:52

ईलेक्ट्रिसिटी बॅकअप साठी इन्व्हर्टर विकत घ्यायचा आहे - कुठल्या कंपनीचा/किती कपॅसिटीचा घ्यावा?
हा इन्व्हर्टर एका छोट्या गावातल्या घरात बसवायचा आहे, जिथे उन्हाळ्यात मेजर लोड शेडिंग असतं..

ह्या विषयावर कुठलीही माहिती असेल तर प्लीज द्या!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा,

आमच्या सातारच्या घरासाठी आम्ही ४-५ महिन्यापुर्वी घेतला..... कंपनी आणि कपॅसिटीचे डिटेल्स लिहिन चेक करुन.... पण साधारण ६ खोल्यांतील दिवे, फॅन्स, टीव्ही/पीसी यासाठी सलग ६ तास बॅकअप देतो.... १५-१६ च्या आसपास पडले सगळे मिळुन!

इन्वर्टर्स गरजेप्रमाणे वेगवेगळ्या कपेसिटीचे मिळतात.
सध्या सु कॅम कंपनीचा प्रचलित आहे.
इ सकाळ इ पेपर पहा त्यात छोट्या जाहीरातीत दुकानाचा नंबर मिळेल त्यातुन अगदी नेमकी माहिती मिळु शकेल.
आम्ही पुण्यात ४ ट्युब ४ फॅन आणि एक काँप्युटर इतक्या साठी घेतला, मजुरीसकट २०,००० रु खर्च झाला.

माझा मामेभाऊ गेली दहा वर्षे इन्वर्टर डिझाईन व बसवून देण्याचा धंदा करतो. हवे असल्यास सांगा. त्याचा पत्ता व फोन नंबर कळवतो. पुण्यातच रहातो. नक्की कुठे माहित नाही, पण कर्वे रोडवरून सरळ जायचे नि मग नळ स्टॉपच्या आधी कुठेतरी घर आहे त्याचे. पैसे किती घेतो माहित नाही! पण तो पवई आय आय टी चा ग्रॅज्युएट आहे नि अनेक वर्षे नोकरी केलेला आहे. फारच हुषार!

झक्की, स्वरूप, मनस्मी
प्रतिसादाकरता धन्यवाद!

मनस्मी, किती तास चालतो ते सांगू शकाल का?
स्वरूप, प्लीज चेक करून सांग ना कंपनी बद्दल
झक्की, द्या ना फोन नंबर...

5 ट्युब 5 फॅन साठी इन्व्हर्टर बसवायचा आहे,
किती कपॅसिटीचा आणि कोणत्या कंपनीचा घ्यावा? जास्त वर्षे जाणारा टिकाऊ .....

पुण्यात

नानबा
मी २००७ सालापासून Su-Cam कंपनीचा इन्व्हर्टर वापरतोय, एकदा Battery बदललीय पण इन्व्हर्टर मध्ये काही खराबी नाही. ४ ट्यूब ४ फॅन, अगदी टी.व्ही. सुद्धा चालतो.

इन्वर्टर कोणताही घ्या पण बॅटर्‍या मात्र दोन साईडच्या घ्या. बरेच लोक एक्साईडचीच बॅटरी देतात त्यामुळे बॅलन्स राहत नाही.

सध्या सु-कॅमचा इन्वर्टर वापरत आहे, बिल्डरने दिलेला. यावर फक्त फॅन आणि ट्यूब्स चालतात, आणि एकाही पॉवर सॉकेटला इन्वर्टर जोडले नाही.

मला एखाद्या पॉवर सॉकेटला इन्वर्टर बॅकअपशी जोडायचे असेल तर काय करायचं? इन्वर्टर कंपनीच्या लोकांना बोलवावं की कुठलाही इलेक्ट्रिशिअन करून देईल?

पॉवर सॉकेटला जोडण्याचं कारण वीजपुरवठा खंडित झाला तरी निदान मोबाइल/लॅपी चार्ज करता यावा.

गेले ५-६ दिवस रोज दुपारी २-३ तास तर रात्री ३-४ तास लाईट जाते. त्यामुळे नविन इन्व्हर्टर घेण्याचा विचार करत आहोत पण त्यातील काहीच माहिती नसल्यामुळे माबोवर शोधले पण इथे सुद्धा जास्त चर्चा नाहीये. रोज रात्री झोपेचे खोबरे होतेय, सकाळी उठुन कामावर जायचं असतं त्यामुळे शरीराला आराम मिळत नाहीये. दुपारी साबा, साबु आणि लेक घरी असतात तेही वैतागलेत.
तर ३ ट्युबलाईट, २ पंखे यासाठी कोणत्या कंपनीचा इन्व्हर्टर घेऊ जो दुपारी व रात्री दोन्हीवेळेस उपयोगी येईल. तसेच इन्व्हर्टर+बॅटरी असा कॉम्बोच येतो ना? साधारण किंमत, बॅकअप टाईम,सर्व्हिसिंग, किती व्हॉल्ट वैगरे व अजुन काही वापरायचे नियम/माहिती असेल तर प्लीज सांगा. अगदीच अडाणी प्रश्न आहेत पण नविन वापरकर्त्याला जी माहिती असायला हवी ती सांगा. आज किंवा उद्यापर्यंत निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे लवकर मदतीची अपेक्षा आहे Happy
आगावू धन्यवाद Happy

३ टयुब लाईट्स आणि २ पंखे म्हणजे साधारण २५० वॅटचे लोड आहे. (ट्युब लाईट्स साधे चोक वाले गृहीत घरुन. LED असतील तर लोड कमी.)
यासाठी तुम्हाला 500 VA (काही जण यालाच 500 Watts असे (चुकीचे) संबोधतात) चा इन्व्हर्टर पुरेसा आहे. यात एक टिव्ही पण चालू शकेल. 500 / 600 / 750 VA असे कंपन्यांप्रमाणे वेगळे रेटींग असेल ते तुम्हाला पुरेसे आहे.

Su-Kam, Microteck, Exide, Luminous अशा अनेक कंपन्या तसेच तुमच्या कडच्या लोकल कंपन्या असतील.
Inverter किंमत बॅटरी शिवाय ३ त ४ हजार आहे. बॅटरी वेगळी घ्याची लागेल, SMF न घेता, exide ची lead acid battery घ्या.
Battery चे रेटींग हे Ah (Ampere hour) मध्ये असते. प्रत्येक वेळी पूर्ण वेळ तुमचे तीन ट्युबलाईट्स आणि दोन पंखे आणि एक टिव्ही सुरु रहाणार नाही. तेव्हा लोड फॅक्टर धरुन बॅटरीचे current consumption साधारण 15 Amps च्या दरम्यान असेल. तेव्हा 60 Ah ची बॅटरी तुम्हाला 4 तास बॅक अप देईल. तिची किंमत ४ ते साडे चार हजार रुपये असेल. ती तुम्हाला पुरेशी आहे.
बॅटरीचे लाईफ तीन वर्ष. दर सहा महिन्यांनी त्यात डिस्टील्ड वॉटर टॉप अप करावे. तीन ते चार वर्षात बॅटरी बदलावी लागते.

ईन्व्हरर्टर हा मेन्स पॉवर असताना, ती आहे तशी सप्लाय करतो, आणि बॅटरी चार्ज करत रहातो. त्याचं इन्व्हर्टर सर्कीट तेव्हा बंद असतं.
मेन्स पॉवर गेली की मग इन्व्हर्टर सर्कीट सुरु होतं. ते बॅटरीचा डीसी सप्लाय एसी मध्ये कन्व्हर्ट करुन सप्लाय करतं. या चेंज ओव्हरला साधारण अर्धा वेळ लागतो, म्हणजे अर्धा सेकंदा करता उपकरणाचा वी़ज पुरवठा खंडीत होतो. घरी याचा

संगणक आणि ऑफिस / कारखान्यातील अनेक उपकरणांना अर्धा सेकंदही वीज खंडीत झालेली चालत नाही. डेटा लॉस, रिबुटींग वगैरे होते.

युपीएस: मेन्स एसी पॉवरचे डीसी मध्ये रुपांतर करतो . या डीसीचे इन्वर्टरने परत एसी मध्ये रुपांतर करतो. डीसी बसला बॅटरी जोडली असते.
म्हणजे मेन्स पॉवर असतानाही तो इन्वर्टर सर्कीट सुरु ठेवून, त्यातूनच एसी पॉवर सप्लाय करत असतो. डीसी बसला बॅटरी समांतर सदैव जोडली असते. त्यामुळे मेन्स पॉवर गेली तरी बॅटरीपासून डीसी सप्लाय घेउन इनव्हर्टर सर्कीट सुरुच रहाते, पुरवठा अखंडीत ठेउन.
याव्यतिरीक्त फरक म्हणजे युपीएसमध्ये इन्व्हर्टर सर्कीटची क्वालीटी, ज्यामुळे एसी आउटपुटची क्वालिटी चांगली असते, साईन व्हेव चांगल्या पैकी सिम्युलेट केली असते. बर्‍याच इन्व्हर्टरमध्ये तुम्हाला जाणवेल की मेन्स पॉवर गेली आणि इन्व्हर्टर वर फॅन सुरु असेल तर त्याचा आवाज बदलतो, वाढतो. युपीएस असेल तर हा फरक नगण्य असतो.

बरं झालं हा धागा योग्य वेळी वर आलाय. बराच सर्वे करून मी काही वर्षांपूर्वी सु-कॅम कंपनीचा इन्व्हर्टर/यूपीएस घेतला (त्याला पाठीमागे बटन आहे इन्व्हर्टर/यूपीएस मोड स्विच करणारे).

नंतरच्या काळात प्रत्येक महिन्याला विजेचे बिल प्रचंड येत आहे. इन्व्हर्टर नसताना जितके येत होते त्याच्या दीडपट ते दुप्पट. कधीकधी तर त्याहून जास्त. नेट वर शोध घेतला असता इन्व्हर्टर मुळे बिल थोडेसे वाढते असे वाचले होते. पण दुप्पट?

मला माझ्या वीज मीटर किंवा घरातील वायरिंगचा संशय आल्याने मीटर व वायरिंग दोन्ही चेक करून घेतलं पण तिथे कुठे दोष आढळला नाही. बाकी घरात इतका प्रचंड वीज वापर करणारे कोणतेही उपकरण नाही.

त्यामुळे सध्या इन्व्हर्टर न वापरता किती बिल येते हे पाहायचे सुरू आहे. पण या सगळ्यात फार वेळ आणि श्रम खर्च होत आहेत Sad

@मानव किंवा अन्य कोणी सांगू शकेल का की इन्व्हर्टर मुळे इतके बिल येऊ शकते का? जर दोष असेल तर इन्व्हर्टर मध्ये असेल की बॅटरीमध्ये? दोन्ही चांगल्या ब्रॅण्डचे आहेत.
इन्व्हर्टर स्यू-कॅम आणि सध्याची बॅटरी अमॅरॉन ची (यापूर्वी एक्साइड होती).
याबाबत गुगलून पाहिलं पण ठोस माहिती मिळत नाही. जवळच्या इलेक्ट्रिशियनला विचारले तर 'इन्व्हर्टर आणून द्या. चेक करून बघतो, फॉल्टी असल्यास नवीन घ्यावा लागेल" असे सरधोपट उत्तर मिळाले.

एकंदर हे इन्व्हर्टर प्रकरण फारच त्रासदायक व महागात पडलंय मला Sad

इन्व्हर्टर लावल्याने विजेचे बिल वाढते का?
समजा तुमच्याकडे वीज फारशी जात नाही. क्वचित कधीतरीच जाते तीही अगदी काही मिनिटे पण तेवढा वेळही तुटवडा नको म्हणुन तुम्ही इन्व्हर्टर बसवला. तर तुम्हाला विजेच्या बिलात विशेष फरक दिसणार नाही.

पण समजा तुमच्या कडे रोज एक,दोन किंवा जास्त तास वीज जाते. आणि तुम्ही इन्व्हर्टर बसवला. तर इन्व्हर्टर बसवण्यापूर्वी तुम्ही वीज गेल्यावर वीज वापरतच नव्हतात. तेव्हा समजा महिन्याला 300 युनिट्स जळत होते.
पण आता इन्व्हर्टर लावल्यावर तुम्ही वीज गेलेल्या वेळेत सुद्धा इन्व्हर्टरच्या बॅटरीमधुन वीज वापरता. ती समजा महिन्याला 50 युनिट्स आहे. (विज परत आल्यावर ही बॅटरीतून वापरलेली वीज त्यात परत चार्ज करावी लागते.)
म्हणजे तुमचे आता 350 युनिट्स होतात. तेवढे बिल वाढणारच. आता इन्व्हर्टर -बॅटरी मध्ये काही लॉस होत असतो, पण तो फार कमी असतो, तो हिशेबात धरत नाहीय.

बॅटरी जुनी होत गेली की तिची इफिशीयन्सी कमी होत जाते, चार्जिंगला जास्त वीज घेतल्या जाते/पूर्ण चार्ज होत नाही थोडा चार्जिंग करंट सतत घेत रहाते. अशावेळी बिल वाढते. माझ्या अनुभवानुसार 120 AH च्या जुन्या बॅटरीमुळे बिल 100-150 ₹ जास्त येत होते माझ्या जुन्या फ्लॅट मध्ये लॉकडाऊन काळात.
बॅटरी मध्ये डिस्टिल्ड वॉटर वेळोवेळी टाकल्याने असे होत नाही, एवढा फरक येत नाही. बॅटरी जुनी होतेय याचे इंडिकेशन म्हणजे वीज गेली असताना इन्व्हर्टरवर पंख्याचा वेग नेहमी पेक्षा मंदावणे, बॅक अप टाइम कमी होणे.

तेव्हा इन्व्हर्टर वापरामुळे कुणाची बिल किती वाढेल हे किती तास वीज जाते आणि त्यावेळेत किती यनिट्स वापरल्या जातात यावर अवलंबून आहे. तसेच बॅटरी मेंटेन केली नसली (डिस्टील्ड वॉटर टॉप अप करणे एवढेच मेंटेनन्स) तर अजून थोडे जास्त बिल येऊ शकते.

जर वीजेचे बिल वरील सांगितले त्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त येत असेल आणि इतर कुठे काही दोष नसेल तर माझा पहिला संशय बॅटरीवर असेल. इन्व्हर्टर खराब झाला म्हणजे एवढी वीज तो खात असेल तर चांगलाच तापेल. त्यात थर्मल ट्रिप वगैरे असेल, ट्रिप झाला असता, एरर दिली असती, वीज गेली असताना LED, dim झाले असते, पंखा खूप स्लो फिरला असता.

बॅटरी मध्ये पाण्याची लेव्हल आधी चेक करा. वर्ष होऊन गेलंय कधीच टॉप अप केले नसेल तर आधी पाच लिटर डीस्टील्ड वॉटरचा कॅन आणुन (बॅटरीच्या दुकानात/पेट्रोल पंपावर मिळतो) त्यात टॉप अप करा. किंवा बॅटरीवाल्याला बोलावून बॅटरी चेक करून घ्या.

इन्व्हर्टर बाबत एखाद्या कंपनीचा चांगलाच किंवा वाईट असं सांगता येणार नाही खरंतर. माझ्या भावाने एक्साईड घेतला, उत्तम चालला अनेक वर्ष, तोच माझा दोन वर्षात बिघडला. सध्या माझ्याकडे Indus आहे, तो अनेक वर्ष चांगली सर्विस देतोय, मी त्यांच्याकडेच वर्षाचे contract करते. दोन वर्षापूर्वी contract असून कोणी आले नाही बरेच महिने, काही prblm झाला नाही. नंतर अर्थात त्यांनी सर्विस दिली. मागे कोरोनामुळे अनेक महिने कोणी येऊ शकलं नव्हतं, काही झालं नाही. त्यामुळे एखादा पीस लाभतो, एखादा नाही हा माझ्याबाबतीतला अनुभव.

मानव फार छान post.

मानव चांगलं लिहीत आहात. एक शंका आहे. जुन्या रिपेअर केलेल्या बॅटरी चांगल्या असतात का नवीन घेणे श्रेयस्कर ठरेल?

ंमाझ्याकडे वीज दिवसभर जात राह्ते पण अर्ध्या तासात परत येते. सुदैवाने ईन्वेर्टर लावल्यापासुन पुर्ण दिवस वीज नसायचा प्रसन्ग आला नाही. मे मधल्या व्वादळात आठ दिवस वीज नव्ह्ती पण तेव्हा ईन्वेर्टेर नव्ह्ता.

फिल्मी रिपेरर्ड बॅटरी कधी वापरल्या नाहीत.
बॅटरी मधले ऍक्टिव्ह मटेरियल इरोड/करोड होते. लीड चे ऑक्साईड आणि स्पंजी लीड वापरले असते. रिपेअर करणारे कोण, ऍक्टिव्ह मटेरियल पण बदलतात का, जुने कसे हँडल करतात, त्याची विल्हेवाट कशी लावतात (लीड पॉइझनिंग होते, पर्यावरणाचे) काही माहीत नाही.
ऍक्टिव्ह मटेरियल बदलले नाही तर जास्त काळ टिकणार नाही.
पूर्ण माहिती नसेल तर टाळलेले बरे.

>> मी गेले दोन महिने ईन्व्हर्टर वापरतेय. ल्यूमीनस ईको१०५०. बिलात काहीही फरक नाही.
>> Submitted by साधना on 27 July, 2021 - 16:27

धन्यवाद, मी नवीन घायचा ठरवला तर हा पर्याय नक्की ध्यानात ठेवेन. याचे रिव्ह्यूज पण चांगले दिसत आहेत.

@मानव, माहितीपूर्ण प्रतिसाद. खूप खूप धन्यवाद. माझ्या बाबत "वीज गेलेल्या वेळेत इन्व्हर्टर मधील वीज वापराचे आलेले बिल" हा मुद्दा नाही. कारण वीज गेली तर फार कमी वेळ जाते. तासनतास जात नाही.

१. इन्व्हर्टरमध्ये "बॅटरी पूर्ण चार्ज झाली कि चार्जिंग बंद करणारी" यंत्रणा असते. ती खराब झाली कि तो सतत चार्जिंग सुरूच ठेवतो व त्यामुळे बिल वाढते असे एक वाचनात आहे. पण माझ्या इलेक्ट्रिशियनला हे कळले नाही. तो म्हणाला, "त्या व्यक्तिरिक्त सुद्धा बरेच कॉम्पोनंट असतात आत. सरळ नवीन घेतलेला बरा"

२. जुनी बॅटरी समस्या असू शकते. पण नेहमीच बिल जास्त येत आहे इन्व्हर्टर आणल्यापासून. ते मागच्या दोन महिन्यात त्याहीपेक्षा जास्त आहे. आणि बॅटरीला तीन वर्षे झाली. डिस्टिल्ड वॉटर वेळोवेळी टाकतो. पण आता गंमत अशी झाली आहे कि डिस्टिल्ड वॉटर शिगोशिग भरूनही ते फ्लोटर इंडिकेटर वरती येत नाहीयेत (हि एक वेगळी व विचित्रच समस्या). म्हणजे बॅटरी दोन महिन्यापूर्वीच ठार मेली असावी?

३. माझ्या मशीन ला इन्व्हर्टर/यूपीएस असा स्वीच आहे. तो सतत यूपीएस असेल तर वीज बिल जास्त येते असे वाचनात आले. मी तो सध्या यूपीएस वर ठेवलाय तो इन्व्हर्टर वर आणून पाहतो (बॅटरी नवीन टाकली कि हे एक करून पाहतो)

बॅटरी (एवढी!) ओव्हरचार्ज होत असेल तर पाण्याची लेव्हल लौकर खूप खाली जाईल, बॅटरी गरम होईल, काही दिवसात बॅटरी बोंबलेल तीन वर्षे टिकणार नाही (बॅकअप टाइम दोन चार मिनिट राहिला असता, वीज गेली की लो बॅटरी इंडिकेशन सतत दिसत राहिले असते/इन्व्हर्टर वीज गेली की दोन चार मिनिटात ट्रिप झाला असता.)
असे काही निरीक्षण आहे का?

इन्व्हर्टर चार्जिंग सर्किट खराब, आणि त्याचे इतर प्रोटेक्शन्सही खराब त्यामुळे काही इंडिकेशन्स नाही, असे होणे दुर्मिळ असले तरी अशक्यही नाही.
असा इन्व्हर्टर ओव्हरचार्जिंग करतोय त्यामुळे बॅटरीही लौकर खराब होतेय असे होऊ शकते.

पण तरी दुप्पट बिल! ( आधी किमान 300 युनिट्स येत असावेत, त्याचे आता 600 होताहेत, म्हणजे किमान 300kWH यात जाताहेत, इन्व्हर्टर मध्ये काही इंडिकेशन्स नाही.) होऊ शकते.

@मानव: खूप छान मुद्दा. नाही असे काही निरीक्षण नाही. इन्व्हर्टर जर उन्हा/पावसाची तमा न करता ठेवला गेला असता तर हो बरेचसे आतले कॉम्पोनंट्स खराब होऊ शकतात. पण हा पूर्णपणे सुरक्षित व हवा खेळती राहील अशा ठिकाणी होता. तेंव्हा ती शक्यता वाटत नाही. (हे सगळे असूनही व्होल्टेज फ्लक्च्यूएशनसमुळे आतले पार्टस खराब होत नाहीत असे गृहीत धरतोय. तसे त्याचे डिजाईन असणे अपेक्षित आहे. एक्स्ट्रीम हाय/लो फ्लक्च्यूएशनस एकदोन प्रसंगी येऊन गेली होती आमच्या इकडे)

>> ३रा मुद्दा बरोबर आहे.
>> Submitted by dbkar007@gmail.com on 27 July, 2021 - 20:18

हो मला सुद्धा हिच शंका वाटतेय.

UPS मोड मुळे तुलनेत जास्त बिल येईल पण फार जास्त फरक पडेल असे मला वाटत नाही. दहा टक्के कदाचित.
येणारे सप्लाय व्होल्टेज, किती आणि किती वेळ पर्यन्त कमी जास्त होतेय त्यावरून ते कमी जास्त होईल.

तुमचे इन्व्हर्टर घेण्या आधी किती युनिट्स व्हायचे महिन्याला आणि नंतर किती होताहेत ते सांगा, जरा कल्पना येईल.
(आधी 50 युनिट्स यायचे आता 100 तर नो बिग डील Wink . टोकाचे उदाहरण.)

Pages