गीसेईगो, गिताइगो - पुनरुच्चारित शब्द

Submitted by सावली on 21 July, 2010 - 02:23

खरतर इथे आधीच मज्जापान आहे भाषेमधल्या गंमती सांगायला.
पण अजून काही विशिष्ठ गंमती आहेत या आणि मराठी भाषेमध्ये.
जस मराठीमध्ये दोन सारखे शब्द जोडून शब्द बनतात तस जपानीमध्येहि बनतात. महेशने सांगितल्या प्रमाणे त्याला गीसेईगो किंवा गीताईगो म्हणतात.
म्हणजे मटामटा, घटाघटा इ. असे अनेक शब्द आहेत. तर इथे अशा मजेदार पुनरुच्चार होणारे शब्द टाकूयात.
इंग्रजी मध्ये बहुधा याला onomatope अस म्हणतात.
मराठीमध्ये "पुनरुच्चारित शब्द" म्हणता येईल का? कि अजून काही शब्द आहे?

हे मला माहीत असलेले शब्द

काहि आवाज

गोकुगोकु - घटघट आवाज (पाणी पिणे)
मोगुमोगु - मटामटा / तोबरा भरुन खाणे, किंवा दात नसताना खाणे
बिरिबिरि - टराटरा (फाडण्याचा आवाज. कागद टरटर फाडणे)
पारापारा - टपटप पावसाचा आवाज
पोत्सुपोत्सु - थेंबथेंब पाउस
झा झा - धोधो पाउस
गातान् गातान् - धडाम् धडाम् (ट्रेन चा आवाज )
तोन तोन - थप थप, ढम ढम
साकु साकु - कुरकुरीत
च्योकी च्योकी - कचाकचा (कापणे)

इतर
प्योन प्योन - टूणटूण
फुराफुरा - गरगरणे
बाराबारा - इकडेतिकडे. वेगवेगळं होणं (माणसं) किंवा विस्कळीत होणं (पुस्तकाची पानं)
बेताबेता - सगळीभर थापणे किंवा चिकट होणे
गुचागुचा - अस्त्याव्यस्त. विस्कटलेले.
फुसाफुसा - हलके फुलके (केसांबद्द्ल बोलताना वापरतात. म्हणजे फुललेले, हलके, चालताना rhythmic हलणारे केस.)
हिराहिरा - भिरभिरत (पान वार्याने भिरभिरतात)
बुsबुs - कटकट / कटकट वाटणारे बोलणे
इराइरा - चीडचीड (इरिटेट)
पिका पिका - चकमक / झगमगीत (स्वच्छ या अर्थी पण वापरतात)
किराकीरा - चमचम (चांदणी, खडा, सोन इ.)
गिरा गिरा - झगमगाट
फुवाफुवा - हलकेफुलके (केक ब्रेड, स्पंज इ सारखे )
गोरो गोरो - गडाबडा
कासा कासा - खडखडीत (कोरडे)
कुरु कुरु / गुरु गुरु - गोलगोल
युरा युरा - झुलणे / हलणे
सुबे सुबे - गुळगुळीत
पोरो पोरो - घळा घळा (अश्रू)
पेरा पेरा - अस्खलित (भाषा)
गुऊ गुऊ - ढाराढूर
दोकी दोकी - धडधडणे

प्राणी / पक्षाचे आवाज
गाs गाs - क्वाकक्वाक (बदकाचा आवाज)
काsकाs - कावकाव
च्युनच्युन - चिवचिव
वान वान - भोभो
न्याs न्याs - म्यावम्याव
मेsमेs - बेंबें (बकरीचा आवाज)
मो मो - हम्माs हम्माs (गायीचा आवाज)
केरो केरो/ गेरो गेरो - डराव डराव (बेडकाचा आवाज)
बु बु - डुकराचा आवाज
हो हो - घुं घुं ( घुबडाचा घुत्कार)
च्यु च्यु - ची ची (उंदराचा आवाज)
जी जी - कीरकीर (रातकिड्याचा आवाज)
कोन कोन - कुईकुई (कोल्ह्याचा आवाज)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला सगळ्यांना केवढे शब्द माहित आहेत. मजा येते आहे वाचायला. तिथे असताना माहित असते तर खुपछान झाले असते. टाकत रहा. Happy

कोतोकोतो....खतखत/खळखळ उकळणे या अर्थी
पासापासा......ड्राय..कामीगा पासापासा शिते इमास.
वाइवाइ........याचा अर्थ सांगणे अवघड आहे..वाइवाइ आसोबु वगैरे..
वाकुवाकु....excitement/eagerness
बिशोबिशो.....damp/dripping आमे दे बिशोबिशो नी नुरेता

वा छान नविन शब्दांची भर पड्लिय.
एम्बी धन्यवाद उत्तराबद्दल. Happy
चिकुचिकु ला जळजळ म्हणता येईल का?
आणि बिशोबिशो ला चिंब हा शब्द चांगला होइल ना?

दारादारा -> स्लगिश

शाबू शाबू...चिकनचे नसते पोर्क किन्वा बीफ...मीट चा पातळ पापूद्रा हाशी(पक्षी: चॉपस्टीक्स) मधे पकडून सूप मधे अलगद हलवायचा आणि गोमा दारे मधे बुडवून खायचा.त्या हलवण्याच्या swish swish आवाजाला शाबू शाबू असे म्हणतात्.(हे प्रकरण थंडीमधे खायला फारच उच्च लागते.शाकाहार्‍यांचे काम नस्से)
शाकी शाकी......crisp करकरीत
ताबीताबी..........often /frequently नेहेमी
पिचीपिची.........lively,young एकदम कोवळा
झाबूझाबू(झबल्यातला झ)..........splash भरपूर पाण्यात खळबळून धुणे : झाबूझाबू आराउ

महेश Proud
अरुंधती गोंडुकले > हा शब्दच गोंडुकला आहे Happy

वाइवाइ चा मला मिळालेला अर्थ आहे (noisily, clamorously, many people making a din)
वाइवाइ असोबु वरुन गोंधळ घालुयात. (मस्ती मजा या अर्थि) असा असावा अस वाटत.

सुइसुइ (काताकाना ) - सुळसुळ पाण्यात पोहोणे

गारान गारान कीन्वा घाशानघाशान अस काहि आहे का? अजुन मला ते नीट ऐकु आल नाहिये
आणी "मोकळा मोकळा भात" अस सांगायला काय शब्द वापरता येईल.

मोकळा मोकळा भात..पारापारा गोहान असे कदाचित म्हणता येइल.
गारान गारान म्हणजे खणखण..बेल किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे रिकामा टिनचा कॅन घरंगळत जातानाचा आवाज,

हे पान वरती आणते आज Happy

१) झोपण्याचे प्रकार
सुयासुया नेरु : गाढ झोपणे (लहान बाळं)
गुऊगुऊ नेरु: ढाराढुर झोपणे (घोरत)
उतोउतो नेरु: डोळा लागणे

२) दुखण्याचे प्रकार
झुकीझुकी सुरु- ठसठसणे (जखम वगैरे)
हिरीहिरी सुरु - भाजल्यामुळे दुखणे
गानगान सुरु - ठणठण दुखणे/ ठणका लागणे
चिकुचिकु सुरु - टचकन लागणे, टोचल्यामुळे दुखणे
शिकुशिकु - पोटाला तडस लागुन दुखणे

खाण्याचे/पिण्याचे प्रकारः
१) गात्सुगात्सु ताबेरु: बकाबका खाणे
२) पाकुपाकु ताबेरु: खाताना तोंड उघडणे (वचावचा ? खाणे)
३) झुरुझुरु ताबेरु: खाताना सुरसुर आवाज करणे (रामेन खाताना होणारा आवाज)
४) चिबिचिबि नोमु : हळुहळु/घोटघोट पिणे (साके इ.)
५) गोकुगोकु नोमु: घटाघट पिणे (थंड पदार्थांसाठी वापरतात)

सद्ध्या वाचत्ये त्या कादंबरीत अजुन काही सापडले काल :

नामिनामि : काठोकाठ, पुर्ण भरुन
शिओशिओ: दु:खी, चेहरा पाडुन (余り元気のない状態)
पिकुपिकु (उगोकु) : हलणे, थरथरणे (शरीराचा एखादा अवयव. रडताना नाक, गाल थरथरणे.
किंवा माशाचं तडफडणं सुद्धा)
बुरुबुरु : कुडकुडणे (थंडीनी)
गोतागोता: अस्ताव्यस्त किंवा खचाखच भरलेलं
काराकारा (नी नारु) : कोरड पडणे (घशाला), कोरडं पडणे
गेरागेरा (वाराऊ) : जोरजोरात हसणे (खदाखदा??)

एक वाक्य होतं त्या पुस्तकात
後ではあの二人が遠慮(えんりょ)のない声(こえ)でげらげら、けらけら、からからと笑って(わらって)いた。
नंतर त्या दोघी हॅहॅ, हीही, हुहु करत बसल्या होत्या (? Wink )

केराकेरा आणि काराकारा हे मला वाराऊ साठी नाही सापडले डिक्शनरीत. जुन्या काळी वापरायचे.

でげらげら、けらけら、からからと笑って> हे सही आहे Happy
कुठली कादंबरी वाचते आहेस? अजुन मी लहान मुलांच्या हिरागाना पुस्तकांच्या पुढे गेलेच नाहीए !!

मी पण हे पान वरती आणते आज Happy

हेतोहेतो: दमलेला
कोनकोन : खोकल्याचा आवाज
बाताबाता : खूप कामात, गडबडीत धावपळीत असले की म्हणतात.(बाताबाता शिते इमासु. आणि जपान्यांचे हे सारखेच झालेले असते. आणि बर्‍याचदा त्या बाता असतात Happy )
उकीउकी : cheerful
च्योकोच्योको : rarely, sometimes
वाझावाझा : all the way, purposely,
कोत्सुकोत्सु : steadily
कुसुकुसु : giggle, chukkle
उरोउरो : To wander or stroll aimlessly

कुसुकुसु : giggle, chukkle >> आपल्या 'खुसुखुसू' ची आठवण झाली! Happy

Pages