केक मेकिंग, बेकिंग आणि डेकोरेटिंग टिप्स आणि प्रश्नोत्तरे

Submitted by लाजो on 19 July, 2010 - 21:44

केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ Happy मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.

परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.

इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.

बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.

इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा Happy

हॅप्पी बेकिंग Happy

---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -

बर्‍याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्‍या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.

बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....

"बेकींग-इन-बॉम्बे"

या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयसिंग शुगरचे पाकिट मिळत बाजारात कोणाला माहित आहे का? या बाबतीत !
त्याचे आयसिंग कसे होते ते?

केक मध्ये ऑइल वापरायचे असते ते किती आणि कोणते वापरावे या बद्दल जरा प्रश्न पडलाय.
मी सध्या गिनी सनफ्लावर न्युट्री-V तेल वापरते, बटर ज्या प्रमाणात घालतो त्यापेक्षा थोड कमी घालते.
ते नक्की किती वापरावं???
मायबोलीवर वेजिटेबल ऑइल खूप वेळा वाचलं,
मी डी-मार्ट मध्ये वेजिटेबल ऑइल म्हणून १ तेल पाहिलं त्यात पाम+सोयाबिन तेल असं composition होत.
तेच असतं का त्यात? अणि ते केक मध्ये वापरता येइल का? वास येत नाही का त्याचा?

sea /mermaid थीम बर्थडे पार्टी. पार्टी डेकोरेशन/फुड सगळ घरी केल आहे.

पॉप्स

Ombre effect केक. (आमच्याइथे अतिशय जास्त ह्युमिड होत त्यामुळ आयसिंग वितळायला सुरुवात झाली फोटो घेवुपर्यंत.

पॉप्स आणि केक खूप सुंदर झालेत सीमा. मेणबत्ती डोनट किंवा जिलबीच्या तुकड्यासारखी दिस्तेय. Happy

मरमेडला बिलेटेड हॅपी बड्डे!

कपकेक (टॅग्ज सहित सगळे घरी बनवलय.)

आयसिंग काहींना आवडत नाही. म्हणून सिंपल जेल वापरुन ओरिओज.

लेमोनेड

टिशु पेपर पॉम

ब्रासलेट (लेस वापरुन घरी शिवले.)

अजुन बर्‍याच वस्तु केलेल्या. फोटो नंतर टाकेन.
केकशी संबधित नसलेले फोटो नंतर उडवेन. पार्टीचा एक बाफ होता. तो सापडत नाहीये म्हणून इथे टाकले फोटो. क्षमस्व.

हो लाजो. केक्स मी केले. आयसिंग सहित सगळे घरी केले. लोकल कॅफे मधले पॉप्स मुलीला हवे होते. मी घरी बनविले कारण विकतमध्ये शॉर्टनिंग होत.
सगळे टॅग्ज बहिणीने डिझाईन केलेले व pdf पाठविलेली. मी प्रिंट केले. टिशु पेपर पॉम पॉम वगैरे डॅडची मदत घेवून केले. Happy

सीमा ताई, ग्रेट..... फोटोतुनही पदार्थाचा नेटकेपणा कळतोय.... केक पॉप्स तर अगदी लग्गेच उचलून खावे असे... मस्तचं....

मरमेडला वाढदिवसाच्या शुभेच्छा.... !!

सीमा, कसलं भारी दिसतंय सगळं... मरमेड जाम खुश झाली असणार. तिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझ्या लेकाचा पण इतक्यातच वाढदिवस असेल ना?

सीमा, अप्रतिम सुबक केलंयस सगळं. कृपया, वेगळा बाफ उघडून या थीमच्या वर्णनासकट सगळे फोटो टाक.

मरमेडला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद! Happy

Pages