मासे १०) मोदकं (भिळजे)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2010 - 06:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे मासे १ इंचाच्या आसपास असतात. दिसायला अगदी मोत्यासारखे चकचकीत असतात. पण ह्यांना खवल असतात. ही खवले काठायची व डोके आणि शेपुट काढायचे. निवडायचा थोडा त्रास असतो.

१ वाटा भिळजे
८-१० लसूण पाकळ्या
हिंग, हळद,
१ चमचा मसाला
थोडा चिंचेचा कोळ
थोडि चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेलावर लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला, घालून परतुन भिळजे घालावे. लगेच हलक्या हाताने परतायचे मग चिंचेचा कोळ टाकायचा, मिठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची. ह्याला गॅस मंद ठेवायचा नाहीतर भिळजे मासे भांड्याला चिकटून तुटतात. उकळी येउन २-३ मिनिटे झाली की गॅस बंद करायचा.

हेच मासे मिठ, मसाला, हिंग, हळद, लाउन तळताही येतात.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

हे मासे छोटे असतात पण खुप चविष्ट असतात. ह्याच्या मध्ये मधला काटाही असतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणी माणसे मासे खाणार नाही तर काय खाणार?? नुस्ती पेज आणि सोबत सुका बांगडा मिळाला तरी त्यांना स्वर्गप्राप्तीचा आनंद मिळतो.

अगदी, अगदी!!! Happy पण तो बांगडा चुलीतच भाजायचा णि त्यावर खोबरेल तेल लावायचं.
सुका बांगडा भाजुन कुस्करायचा, त्यात ओलं खोबरं, लाल तिखट, मीठ घालायचं, थोड तेल टाकयचं. गरम चपातीबरोबर... तोंपासु. -)

सुका बांगडा भाजुन कुस्करायचा, त्यात ओलं खोबरं, लाल तिखट, मीठ घालायचं, थोड तेल टाकयचं. गरम चपातीबरोबर... तोंपासु. -)

असले अत्याचार करु नका हो आमच्यावर.. माझ्याकडचे बांगडे संपलेत. उद्या आणायला हवेत आणि रात्री किसमुर.. Happy मी एकटीच एका अख्ख्या बांगड्याचा किसमुर खाते. :अत्याधिक आनंदी बाहुली: घरात कोणी नाही खाणारे दुसरे...

साधना अग अख्खा सुका बांगडा कसा खातेस ? आम्ही घरी सुका बांगडा भाजला की एका बांगड्याचे ४-५ तुकडे करुन एक एक घेतो कारण हा खुप खारट असतो. किसमुर केल्यावर कमी खारट होतो म्हणा.

आर्या धन्स ग.
किसमुर हा सुक्या बांगड्याचा करतात. अग वर भ्रमर ने लिहीलेय बघ किसमुरची रेसिपी.

मोदकांच कालवण खूप मस्त लागतात. साफ करणे कटकट असते. आई बाईकडून साफ करायची ती पैसे देवूनही इतकी कटकट साफ करायची. तळलेली तर मस्तच! चिवडा खावा तसा तोंडात टाकतो आम्ही. Happy

तळलेली तर मस्तच! चिवडा खावा तसा तोंडात टाकतो आम्ही.
मग दिवाळीला चिवड्याच्या ऐवजी मोदकच तळ. लगेच फस्त होतील.
मनस्विनी सगळ टाकेन ग हळु हळू.

सुका बांगडा भाजुन कुस्करायचा, त्यात ओलं खोबरं, लाल तिखट, मीठ घालायचं, थोड तेल टाकयचं. गरम चपातीबरोबर... तोंपासु. -) - खात्री आहे, तोंपासु असेल याची.. Happy

मोदकं कळपुटी

सहित्यः २ वाटे मोदकं ,२ मोठ कान्दे,३ हिरव्या मिरच्या, थोडे आले, ओले खोबरे, कोथिम्बिर,२-३ कोकमे

क्रमवार पाककृती: मोदकन्ना (आम्ही वेरल्या म्हणतो) मीठ् + हळद लावावे. मिरचीपूड २चमच्रे घालणे.
तेलावर बारीक चिरलेला कान्दा,बारीक चिरलेले आले,हिरव्या मिरच्यान्चे तुकडे टाकुन शिजविणे.त्यात
मोदकं टाकून झाकण लावून प्ण पाणी न घालता २ मिनिटे शिजवावे.त्यात ओले खोबरे, कोथिम्बिर चिरून घालावी.
अशीच कळपुटी पापलेटची पण करतात.

Pages