सांस्कृतिक कार्यक्रम - ववि २०१०

Submitted by ववि_संयोजक on 12 July, 2010 - 00:20

सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. वविच्या ठिकाणी पावसात, पाण्यात हुंदडून आणि नंतर भरपेट जेवून मंडळी थोडी सुस्तावलेली असतात. अशा वेळेला सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘मायबोली-स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.
यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का?

फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे -

समस्त वविकरांच्या ‘ओळख-परेड’चा कार्यक्रम यंदा थोडा अभिनव पध्दतीनं होणार आहे.
प्रत्येकानं आपली ओळख ही उखाण्यातून करून द्यायची आहे. खुसखुशीत, मजेदार, विनोदी दोनोळ्या किंवा चारोळ्यांच्या रुपातले उखाणे. त्या उखाण्यांद्वारेच सर्वजण आपलं नाव, मायबोली आय-डी आणि इतर माहिती (उदा. : राहण्याचं ठिकाण, माबोवरचा वावर, कुठल्या बाफवर जास्त उपस्थिती असते, एखाद्या माबोकराचा नातेवाईक म्हणून आलेले असल्यास त्या नात्याचा उल्लेख इ.) इतरांना सांगतील.

हे वाचल्या वाचल्या कदाचित निम्मेजण ही कल्पना झिडकारून टाकतील, उखाणा तयार करण्याच्या विचाराने उरलेल्यांच्या पोटात कदाचित गोळा येईल. पण ही झाली ‘फर्स्ट रिऍक्शन’! त्यानंतर जर याबद्दल थोऽडा विचार केलात तर त्याद्वारे येणार्‍या धमालमस्तीची तुम्हालाही कल्पना येईल आणि पटकन एखादा खल्लास उखाणा तुम्हाला सुचूनही जाईल.
अर्थात, उखाण्याची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. असं जरी असलं तरी सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतील आणि या अभिनव ओळख-परेडीला यशस्वी करतील अशी आशा सांस्कृतिक समिती बाळगून आहे.

--------------------------------------------------------------------

चला तर, आमच्यातर्फे एक उखाणा...

घेऊन टाका उखाणा, मीटरमधे बसो वा न बसो
ववि_संयोजकांना तुमचे पूर्ण सहकार्य असो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता माझा नंबर.. Proud

भर बाजारी करशी खाणाखुणा.. भर बाजारी करशी खाणाखुणा..
पायात माझ्या कोल्हापूरी जोडा, माझा आयडी दक्षिणा...

पायात माझ्या कोल्हापूरी जोडा ??? अगं वहाणा असा शब्द म्हटला होतास ना, दक्षे? Uhoh

आता माझा ऐका हं Happy

काहीच्या काही कविता पाडण्यात
आहे माझा हातखंडा
आंबट-चिंबट खायला आवडे
नाव माझे निंबुडा
आनंद घ्या, आनंद द्या
हाच माझ्या लाईफचा फंडा

मी न घेतलेला उखाणा...

संधीच्या शोधात असतो म्हणून दरोडेखोर समजू नका,
रात्री अपरात्री हिंडत असतो म्हणून चोर समजू नका,
मी आहे सुर्यकिरण, दिसायला जरी बारीक असलो तरी,
मायबोलीवर मला कोणी कमजोर समजू नका Happy

कविता,लिंब्या म्हणतोय ते बरोबर आहे असं मला वाटतं..सा.सने थोडीतरी जाहिरात आधी करावी गेम्स्ची असं माझं मत.. लोकांच्या पूर्वतयारीसाठी नव्हे तर नविन लोकांना वविचे आकर्षण वाटण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो.. कारण ते गोंधळात असतात की मी इथे नविन आहे, वविला जाऊन मी एंजॉय करू शकेन का?वविला लोक नक्की करतात काय? तेव्हा सा.संने आपल्या खेळांची सविस्तर माहिती न देता फक्त जाहिरात जरी केली ना तरी या लोकांना विश्वास वाटु शकतो की वविला जाऊन आपण एंजॉय करू शकु.. काही खेळांची जाहिरात आणि काही सरप्राईझिंग गेम्स असं काँबिनेशन ठेवलं तर जास्त उत्तम.. Happy

मयुरेश, अनुमोदन!
माझ्या दृष्टीने जिन्कणे-हरणे यास महत्व नसून, माझ्या मोदी रिसॉर्ट येथिल पूर्वानूभवाप्रमाणे, माझ्या सारख्या प्रथमच आलेल्या "शाय" व्यक्तिस, आता "पुढे काय वाढून ठेवलय - जमणारे का मला?" याची काळजी करायला लागणार नाही व आधीच पूर्वकल्पना अस्ल्याने मानसिक तयारी झालेली असेल! यामुळे गोन्धळल्यासारखे होणार नाहीच, पण मागे मागे रहाण्याचही- अन्ग काढून घेण्याची वृत्तीही बळावणार नाहि असे वाटते. सगळेच जण अशा तयारीने आल्यास रन्गत अजुनच वाढेल याची निश्चिन्ती! Happy

हा माझा उखाणा Happy
प्रकाशचित्र विभागात फिरत असतो नेहमी माझा गाडा,
प्रकाशचित्र विभागात फिरत असतो नेहमी माझा गाडा
आणि खाद्ययात्रेचे फोटो पाहिल्यावर सगळे म्हणतात
योगेश२४ ला बुकलुन काढा Sad

योगेश२४ ला बुकलुन काढा ...>>> अरे योगेश, पण हा उखाणा प्रत्यक्ष घेताना इतका वाईट चेहरा नव्हता रे केलास तू .. Happy

>>इतका वाईट चेहरा नव्हता रे केलास तू .. >> उखाणा घेताना चेहरा वाईट करायची प्रॅक्टीस करायला विसरला असेल Proud

अरे योगेश, पण हा उखाणा प्रत्यक्ष घेताना इतका वाईट चेहरा नव्हता रे केलास तू .. >>>>मयुरेश, अरे त्यावेळी आपल्या टिमसाठी जास्त मार्क गोळा करायचे होते ना त्यामुळे राहुन गेले असेल Wink

मी पण मी पण Happy Happy Happy
पाऊस कधी पडेल याचा नाही नेम
मी नन्या१०
माझे मायबोलीवर खूप खूप प्रेम Lol Lol
(घारु अण्णांनी एनवेळीस तयार करुन दिलेला) Light 1

Pages