सांस्कृतिक कार्यक्रम - ववि २०१०

Submitted by ववि_संयोजक on 12 July, 2010 - 00:20

सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. वविच्या ठिकाणी पावसात, पाण्यात हुंदडून आणि नंतर भरपेट जेवून मंडळी थोडी सुस्तावलेली असतात. अशा वेळेला सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘मायबोली-स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.
यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का?

फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे -

समस्त वविकरांच्या ‘ओळख-परेड’चा कार्यक्रम यंदा थोडा अभिनव पध्दतीनं होणार आहे.
प्रत्येकानं आपली ओळख ही उखाण्यातून करून द्यायची आहे. खुसखुशीत, मजेदार, विनोदी दोनोळ्या किंवा चारोळ्यांच्या रुपातले उखाणे. त्या उखाण्यांद्वारेच सर्वजण आपलं नाव, मायबोली आय-डी आणि इतर माहिती (उदा. : राहण्याचं ठिकाण, माबोवरचा वावर, कुठल्या बाफवर जास्त उपस्थिती असते, एखाद्या माबोकराचा नातेवाईक म्हणून आलेले असल्यास त्या नात्याचा उल्लेख इ.) इतरांना सांगतील.

हे वाचल्या वाचल्या कदाचित निम्मेजण ही कल्पना झिडकारून टाकतील, उखाणा तयार करण्याच्या विचाराने उरलेल्यांच्या पोटात कदाचित गोळा येईल. पण ही झाली ‘फर्स्ट रिऍक्शन’! त्यानंतर जर याबद्दल थोऽडा विचार केलात तर त्याद्वारे येणार्‍या धमालमस्तीची तुम्हालाही कल्पना येईल आणि पटकन एखादा खल्लास उखाणा तुम्हाला सुचूनही जाईल.
अर्थात, उखाण्याची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. असं जरी असलं तरी सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतील आणि या अभिनव ओळख-परेडीला यशस्वी करतील अशी आशा सांस्कृतिक समिती बाळगून आहे.

--------------------------------------------------------------------

चला तर, आमच्यातर्फे एक उखाणा...

घेऊन टाका उखाणा, मीटरमधे बसो वा न बसो
ववि_संयोजकांना तुमचे पूर्ण सहकार्य असो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका उखाणा कम चारोळीपाचोलीची सुरुवार
चारपाच अन्जू, दहावीस मन्जू...... अशी आहे!
पुढे जुगवतोय Proud
आता वविमधेच सान्गेन, इथे फोडणार नाही Wink

माझा उखाणा दणक्यात असणारे. तो मी माझ्या मोबाईलमधे सेव्हलाय Happy (आणि आयत्यावेळेस शब्द इकडचे तिकडे होऊ नयेत म्हणून मी तो मोबाईलमधूनच वाचून दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही :-P)

चारपाच अन्जू, दहावीस मन्जू...... >>> लिंब्या काय हे ! Biggrin पुढे काय सतराअठरा सन्जू?

नै नै, पुढे सन्जु नाहीत (सन्जु म्हणल की मला तो दत्तान्च्या सुनिलचा पिचपिच्या डोळ्यान्चा मेन्गळट सन्जुबाबा आठवतो, त्याला कशाला आणिन?)
पुढे की नै, त्यान्ना पार्ल्यात पाठवतोय Happy
[बायदिवे, वविला किती येणारेत? म्हणजे त्यानुसार ठरवतो हा उखाणा घ्यायचा की नै ते Proud ]

बाकी मोबाईलमधे सेव्ह करायचि आयडीया एकदम भारी बर का! करुन बघितल पाहिजे मलाही Happy

अहो ते व. वि. अमेरिकेत करण्याचे काय झाले?
निदान २५ लाख रुपये तरी पाठवा, आम्ही गरीब लोक, कसे बसे भागवू त्यात नि इकडे करू व. वि.!

कुणाकुणाला उखाने हवेत सांगा. मी (आणि माझे कवी मित्र-मैत्रिणी) रग्गड पाडतो. मात्र पार्टी द्यावी लागेल. Wink

एक उदा:

"मी 'मनु' सन्तिन, माझ्या मागे दोन-तीन" इथे कुणी 'मनु' नावाची आय्.डी. असेल तर क्षमस्व!!

उखाण्यांची स्पर्धा घेतली तर कसे? Light 1

अरेरे बोवाजी, तुम्ची अन तुम्च्या बाराकरान्ची येवढी "शून्यवत" अवस्था झाली हे का?/
बर, आता एक करा
तुमच्याकडच्या त्या शून्यवत बाराकरान्ची पाच शून्ये आम्ही पाठवित असलेल्या आख्ख्या पन्चविस रुपयान्ना उजवीकडून जोडा! मिळून जातिल तुम्हाला पन्चविस लाख! त्यात हाय काय अन नाय काय! Proud

वॉटरप्रूफ मोबाईल आणायचा
>>
अश्वे, ह्याच्याकडेच दे तु मोबाईल सांभाळायला तुझा.. Wink

मी उतरणारच नाहिये स्विमिंगपुलात. ते रेनडान्स का काय आहे तिथे शॉवर्स खाली जाऊन ढिम्म उभी रहाणार फक्त.

बरं, यन्दा सान्स्कृतिक"शिस्त"पालन कोण, कशाप्रकारे करुन घेणारेत? काही आयडीया? Proud
(त्यावरुन मी अन्दाज बान्धेन.... ठरवेन.... की "आमच्या वेळेस अस्ल नौत बै कै" अस कधी, कुणी अन कस म्हणायच ते! Proud )

मी पण घेतो उखाणा ...

माबोवर कट्टा चालू करायचे होते अंगात किडे, Proud
म्हणतात आम्हाला मालक मालकिण ,पण नाव मधुरा आणि विनय भिडे

वावावा मालक Happy लई खास
हे अस बघा करुन आवडल तर.....

माबोवर कट्टा चालू करायचे (पॉझ), अंगात होते किडे,
आम्हीच त्याचे मालक मालकिण (पॉझ), श्री व सौ. मधुरा विनय भिडे

विनय, आता वविदिवशी हाच उखाणा नाय हा चालणार... दुसरा घ्यावा लागेल. >>>>
लले , मला दुसरा ऑप्शनच नाहिये . मधुरा व्यतिरिक्त्...:फिदी:

मल्ली तुझ्या नावावर काय वाट्टेल ते खपवल जाईल...

विन्या हा उखाणा गेल्यावर्षीचा आहे बसमधे ऐकलाय एकदा सोडून दोन वेळा >>>
मग तस तर उखाण्याचा कन्सेप्ट पण गेल्यावर्षीचाच आहे की...:फिदी:

मधुरा व्यतिरिक्त्...>>>> Rofl

मंजुने सांगितलेल्या सिक्वेन्स माझ्याही डोक्यात आला पण म्हटलं जाऊदे होतं असं कधीकधी घाबरल्याने Biggrin

सिक्वेन्स माझ्याही डोक्यात आला पण म्हटलं जाऊदे होतं असं कधीकधी घाबरल्याने >>>
कसला सिक्वेन्स ?? आणि महत्वाच म्हणजे कसल डोक ??? Proud

Pages