सांस्कृतिक कार्यक्रम - ववि २०१०

Submitted by ववि_संयोजक on 12 July, 2010 - 00:20

सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम हे दरवर्षीच्या वर्षाविहाराचं एक प्रमुख आकर्षण असतं. वविच्या ठिकाणी पावसात, पाण्यात हुंदडून आणि नंतर भरपेट जेवून मंडळी थोडी सुस्तावलेली असतात. अशा वेळेला सर्वांना निवांत, हलकंफुलकं मनोरंजन मिळावं आणि त्याचबरोबर एक ‘मायबोली-स्पिरीट’ निर्माण व्हावं हाच त्यामागचा मुख्य उद्देश.
यंदाही त्यासाठी सांस्कृतिक समितीनं जोरदार तयारी केलेली आहे. मात्र त्यादिवशी आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती हे सर्व सध्यातरी आम्ही गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो. उत्सुकतेतून खुमारी वाढवण्याचा हा एक सोपा उपाय, नाही का?

फक्त एकच गोष्ट आधी नमूद करायची आहे -

समस्त वविकरांच्या ‘ओळख-परेड’चा कार्यक्रम यंदा थोडा अभिनव पध्दतीनं होणार आहे.
प्रत्येकानं आपली ओळख ही उखाण्यातून करून द्यायची आहे. खुसखुशीत, मजेदार, विनोदी दोनोळ्या किंवा चारोळ्यांच्या रुपातले उखाणे. त्या उखाण्यांद्वारेच सर्वजण आपलं नाव, मायबोली आय-डी आणि इतर माहिती (उदा. : राहण्याचं ठिकाण, माबोवरचा वावर, कुठल्या बाफवर जास्त उपस्थिती असते, एखाद्या माबोकराचा नातेवाईक म्हणून आलेले असल्यास त्या नात्याचा उल्लेख इ.) इतरांना सांगतील.

हे वाचल्या वाचल्या कदाचित निम्मेजण ही कल्पना झिडकारून टाकतील, उखाणा तयार करण्याच्या विचाराने उरलेल्यांच्या पोटात कदाचित गोळा येईल. पण ही झाली ‘फर्स्ट रिऍक्शन’! त्यानंतर जर याबद्दल थोऽडा विचार केलात तर त्याद्वारे येणार्‍या धमालमस्तीची तुम्हालाही कल्पना येईल आणि पटकन एखादा खल्लास उखाणा तुम्हाला सुचूनही जाईल.
अर्थात, उखाण्याची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. असं जरी असलं तरी सर्वजण खिलाडूवृत्ती दाखवतील आणि या अभिनव ओळख-परेडीला यशस्वी करतील अशी आशा सांस्कृतिक समिती बाळगून आहे.

--------------------------------------------------------------------

चला तर, आमच्यातर्फे एक उखाणा...

घेऊन टाका उखाणा, मीटरमधे बसो वा न बसो
ववि_संयोजकांना तुमचे पूर्ण सहकार्य असो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बाकी काही म्हणा (काय फरक पडतो?), पण मला रेडीमेड उखाणा मिळालाय हे निर्विवाद सत्य आहे!
उखाण्यातलं नाव बदलायला विसरु नकोस म्हंजे मिळवलं... Light 1

.

घे फद्या.....

सचिन माझे नाव, पण मी तेन्डल्या नाही
दीक्षित माझे आडनाव, पण मी "विक्षिप्त / बुभुक्षित" नाही

मी घेतलेला उखाणा
कट्टा गजाली गपापागोष्टी वर असतो माझा वावर
भुकेलेले जीव म्हणतात तुझे खादय फोटो आवर
तरीही सकाळचा नाष्टा दुपारचं लंच अस्तो माझ्या तर्फे फ्री
मायबोलीवरील आयडी माझा वैभव आयरे वन टु थ्री

लिम्बू धोधो टिमने कशी बाजी मारली ... बाजिगर झाले कि नाही शेवटी खजिना मिळवून Proud Rofl तुम्ही एका एका मार्कासाठी स्पिरीट घालवलं. अन आम्ही सगळ्या स्पिरीटचा स्फोट खजिना फेरीत घडवून आणाला. Proud ह्यावर्षीचा ववि करंडक धोधो टिमच्या खिशात.

रोज मायबोली उघडल्यावर
कळत नाही कुठे कुठे थाम्बु (तत्कालिक स्वगतः तस तर लिहिणे थाम्बवायचे कूठे ते सुद्धा कळत नाही - मागुन सहमतीच्या तिरकस हास्याचा एक किनरा आवाज Proud )
सगळ्याच बाफवर मग
घरन्गळतो हा लिम्बुटिम्बू

(हा मी बनवलेला नसुन मला बनवुन मिळाला)

एक उत्कृष्ट ववि आयोजित केल्याबद्दल सर्व संयोजकांचे आणि सांस्कृतिक समितीचे विशेष आभार... Happy

मनोरंजनाच्या जोडीला दिव्यांची झालर
मायबोली म्हंजी संस्कृतीची कदर
इंद्रनुष्य या IDने असतो मी हजर
मुलुंड असो वा कट्टा सदैव तत्पर

लाजो, तरी बरं, एकन्दरीत जमाव बघता मी
"दहावीस अन्जू, पाचपन्चवीस मन्जू
पार्ल्यात विचारतात, कणीक कशी तिम्बू"
अस्ले उखाणे ब्यागेतून बाहेर काढलेच नाहीत! Proud

मस्त संयोजन, मस्त स्पॉट, धमाल गेम्स ,एकंदरीत मस्त संयोजन, थ्री चियर्स टु सं, सां, समिती
उखाण्याची आयडीया भारी, पण लली ने कल्हई न केल्याने मी ओळ्खच दिली नाही माझी
लिंबु भारीच मी मदत घेतली असती तुझी,

अग स्मिता, मला तरी काय माहित?
मला वाटल की आपल नेहेमीप्रमाणे सान्स्कृतिक "शिस्तपालन" समिती उखाण्यान्च्या नुस्त्याच पोकळ धमक्या देते आहे! Proud शम्भरएक जणान्चे उखाणे घ्यायला वेळ कुठला मिळणार, अन ऐकणारही कोण?
अन्दाज चूकलाच माझा!
नैतर आमच्या लग्नाच्या वेळची माझी अन लिम्बीची वहीच घेऊन आलो अस्तो... जरा इकडे तिकडे फेरफार केला की उखाणा तय्यार! असो.

गेली चार वर्षे करतोय मी मायबोलीचे टीशर्ट कूल कूल..
कधी असतो गारेगार तर कधी हिम्सकूल..

हा उखाणा विश्वेशचा (सकाळीच माझी भरत भेट घेतलेल्या माझ्या मैत्रिणींना हा उखाणा ओळखीचा वाटू शकेल पण तो आणीबाणीच्या काळी नारायणाला त्याच्या लक्ष्मीने उदार मनाने फेरफार करुन वापरु दिलाय हे त्या समजून घेतील आणि त्यावर जास्त प्रश्न विचारुन मला हैराण करणार नाहीत अशी अपेक्षा Wink )

वड नाही पुजत कविता
तरी म्हणे नवरा हवा हाच
कारण विश्वेश शिवाय कविता
करेल कुणाचा जाच Proud

हा माझा :

गुलमोहरात सापडेल तुम्हाला
माझ्या भारंभार लिखाणाची जंत्री
मी कट्ट्यावरची ललिता-प्रीति
आणि मीच ती फाटकी छत्री

(संयोजकांपैकी कुणीच उखाणे घेतले नाहीत तो भाग वेगळा :फिदी:)

(संयोजकांपैकी कुणीच उखाणे घेतले नाहीत तो भाग वेगळा>>>>> म्हणून तर मला उखाणा पास ऑन करता आला विश्वेशला Proud

ह्यो माझा ......

नको गड नको वाडा गड्या गजाली नी कट्टा बरा
आशुतोष नावासोबत आहे माझा बिल्ला नंबर सातशे अकरा

सान्स्कृतिक कार्यक्रमाअन्तर्गत जे खेळ घेतले जातात, त्याविषयीची माहिती (खेळाचे स्वरुप व नियम) पुढील वर्षी वविच्या आधीच इथे मान्डली तर प्रत्यक्ष स्पर्धान्च्या वेळी अधिक रन्गत येईल असे वाटते Happy

LT खेळायच हो बिंधास्त तयारी बियारी न करता. हरलो काय जिंकलो काय. सगळ्यांनी भाग घेऊन धम्माल करण महत्वाच Happy

ए आता माझा उखाणा हं..

लहानपणीच्या नसत्या उद्योगांना
मिळवुन दिली जागा हक्काची,
यो म्हणा किंवा योगमहे
मी पीआरओ कट्ट्याची Happy

Pages