खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रॅव्हिटी प्रोब बी चा निर्वाळा: ५० वर्षांपुर्वी ज्या कल्पनेचा जन्म झाला त्याचा साक्षात्कार शेवटी मागच्या महिन्यात झाला: (१) पृथ्वी आणि पर्यायाने सर्व वस्तु, खरोखरच spacetime ला वक्र बनवतात, व (२) स्वतःभोवती spacetime ला लपेटुन ओढतात सुद्धा. Gyroscopes मधे होणार्या स्थित्यंतरावरुन हे मोजमाप केल्या जाऊ शकले. इतकी वर्षे लागयचे कारण म्हणजे हे बदल अतिशय सुक्ष्म असतात.
सुर्य जर माध्यानी स्थीर असेल तर चंद्राला त्याला पुर्णपणे ग्रासायला २ मिनिटे लागतात (पृथ्वीच्या फिरण्यामुळे). त्याचा दोनशे चाळीसाव्वा भाग ग्रासायला केवळ अर्धा सेकंद लागेल. तर, अर्ध्या सेकंदात चंद्र जितका सरकतो असे आपणास दिसते तितका फरक या gyroscope मधे व्हायला एक वर्ष लागते. ते बिनचुक मोजता यायला हवे. येवढेच नाही तर दूसर्या (लंब) दिशेला, त्याच्याही दिडशेव्वा अंश इतकाच बदल घडतो, तो ही अचुक मोजता यायला हवा. २००५ व २००६ मधे मिळवलेल्या डेटाचे पृथःकरण व्हायला ५ वर्षे लागली. आईनस्टाईनच्या सिद्धांताची वर दिलेली दोन्ही भाकीते खरी ठरली!

जास्त खोलात शिरायचे असल्यासः
http://physics.aps.org/articles/v4/43

आशिष, अवकाश आणि काल यांच्या वक्रतेचे नेहमीच्या जीवनात काय परिणाम होतात? (खूप पूर्वी अवकाशाला पीळ पाडून वस्तू नाहिशी करता येते या संकल्पनेवर एक विज्ञानकथा वाचली होती पण शेवटी ती कथाच Happy )

अवकाश व काळ यांच्या बद्दल असे वेगवेगळे बोलणे बरोबर नाही - ते एकत्रच असतात. दोन बिंदुना जर अवकाशकालाची वक्रता वेगळी असेल तर आपला वृद्धत्वाकडे सरकण्याचा दर पण वेगळा असतो. पण वर लिहिल्याप्रमाणे हा फरक खूपच सुक्ष्म आहे.

कार्ल सेगनचे काँटॅक्ट पुस्तक नुकतेच चौथ्यांदा का पचव्यांदा वाचून संपवले. त्यावरून एक प्रश्नः
स्पेस स्टेशनमधे रेडिओ टेलेस्कोप आहे का? त्याचा काही जास्त उपयोग होईल का?
बाळबोध प्रश्नः
तार्यांशी बांधिलकी नसलेले मुसाफीर ग्रह हे मुसाफिर ग्रह कुणाभोवती फेर्‍या मारतात का? की लहान मुसाफिर गुरुत्वाकर्षणाने इतर मोठ्या मुसाफिर ग्रहाभोवती फिरतात?
का मी जसा काही न करता स्वस्थ बसतो तसे ते जागच्या जागी स्वस्थ बसून इतरांची मजा बघत बसतात?
'अरे तो बघा धूमकेतू, यडपटासारखा गरगर फिरतो आहे. ती बघा पृथ्वी, उगाचच स्वतःभोवती गरगर फिरते आहे, नि बरोबर चंद्राला पण फरफटत नेते आहे!'

बाळबोध प्रश्नः
तार्यांशी बांधिलकी नसलेले मुसाफीर ग्रह हे मुसाफिर ग्रह कुणाभोवती फेर्‍या मारतात का? की लहान मुसाफिर गुरुत्वाकर्षणाने इतर मोठ्या मुसाफिर ग्रहाभोवती फिरतात?
>>>> झक्की, हाच बाळबोध प्रश्न मीही दुसर्‍या वाहत्या बाफवर वेगळ्या शब्दात विचारला होता. फक्त मुसाफिर ग्रहच नाही, तर अंतराळातला कचराही फिरतो की नुसता तरंगत रहातो की खेचला जातो? असं काहीसं मी विचारलं होतं.

चंद्र ग्रहण पाहिले. नेहमीचा हसरा चांदोमामा दारू पिउन दूर जाऊन बसला आहे डोळे तांबडे करून असे वाटले.

२५-५० फुटी लघुग्रह पृथ्वीच्या बाजुने काही तासांनी जाणार आहे:

http://www.skyandtelescope.com/observing/highlights/124430479.html

त्या लेखात उल्लेख केल्या गेलेला २००८ सालचा पृथ्वीवर आदळलेला लघुग्रह आमच्या सर्वेनी शोधला होता. (माऊंट लेमन वरील)

http://www.bbc.co.uk/news/science-environment-13949956

अंतराळात भटकत असलेला कचरा (भंगार, खरे तर) ईंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासुन केवळ ३५ मिटर्स वरुन गेला. अ‍ॅस्ट्रॉनॉट्सनी पलायनाची तयारी ठेवली होती.

Asteroid 2010 TK7 is confirmed as the first Earth trojan asteroid discovered.
हा ३०० मी व्यासाचा लघुग्रह पृथ्वीच्या मार्गावर पण तिच्या पुढे-पुढे फिरतो!

रेण्वीय प्राणवायु पहिल्यांदाच दूर अवकाशात सापडला आहे. खालील दुव्यावरील पहिले चित्र सनसनीखेज पत्रकारीतेचे उदाहरण आहे. त्यात दाखवल्याप्रमाणे रेणु न दिसता दूसर्या चित्रात दाखविल्याप्रमाणे स्पेक्ट्रमद्वारे लक्षात येते.

http://www.space.com/12494-oxygen-molecules-space-herschel.html

आशिष, प्रकाशाचा वेग हा सृष्टीतला महत्तम वेग नाही असा दावा केला जातोय. त्याचा कसा परीणाम होणार आहे बाकीच्या सिध्दांतांवर?

प्रकाशाचा वेग हा सृष्टीतला महत्तम वेग नाही असा दावा केला जातोय.>> म्हणजे..?? मग त्याहुन गतीवान वस्तु सृष्टीत कोणत्या/ती आहे..?

जसे वाळवंटात वाळुच्या टेकड्या ओघवत्या दिसतात्...त्या प्रमाणेच मंगळावरील त्या टकड्या दिसत आहेत....

अजुन ते न्युट्रीनो जास्त वेगानी जाताहेत हे सिद्ध झालेले नाही. सिद्ध झाल्यास सापेक्षतावादाच्या सिद्धांतात बदल करावे लागतील (आणि बरेच काही)

Pages