खगोलशास्त्रीय सटरफटर

Submitted by aschig on 9 July, 2010 - 00:50

फार खोलात न शिरता इथे खगोलशात्राशी संबंधीत काही त्रोटक factoids (सद्य आकलनानुसार) नियमीतपणे टाकायचा विचार आहे.

(१) विश्वाच्या मालमत्तेपासुन सुरुवात करु या: विश्वात पसरलेल्या दिर्घीका, त्यांचा व्याप व विश्वावे आकारमान वाढण्याचा वेग पहाता असे लक्षात येते की ५% पेक्षा कमी मालमत्ता दृष्य वस्तुमानात आहे (म्हणजे तुम्ही-आम्ही, ग्रह, तारे ई. थोडक्यात बॅरीऑन या प्रकारात मोडणारे कण - Baryonic matter). त्याच्या ५ पट वस्तुमान अदृष्य स्वरुपात (dark matter) असते, तर तब्बल 3/4 पसारा अदृष्य उर्जेच्या स्वरुपात असतो (dark energy). [८ जुलै २०१०]

(२) विश्वात किती अणु आहेत ते पाहुया: ज्ञात विश्वात ~१०^११ दिर्घीका आहेत (galaxies). प्रत्येक दिर्घीकेत ~१०^११ तारे आहेत. प्रत्येक तार्याचे सरासरी वजन १०^३१ किलोग्राम आहे. सुर्यमालेतील बहुतांश वजन तार्यात असतं. तारे (किंवा पुर्ण विश्वच) मुख्यतः हायड्रोजन चे बनले आहे (आणि हिलीयम, पण आपल्या या गणिताकरता त्यांच्यात फार फरक नाही). एक ग्रॅम हायड्रोजन मध्ये १०^२४ अणु असतात (अव्होगॅड्रो नंबर). विश्वातील एकुण अणु:
१०^११ * १०^११ * १०^३१ * १०^३ * १०^२४ = १०^८० (फक्त!?) [१० जुलै २०१०]

(३) साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते. पण वस्तुमानाची मर्यादा मात्र नसते. उदा. दिर्घिकांच्या मध्यभागी असलेली कृष्णविवरे ही सुर्याच्या वस्तुमानाच्या १०^५, १०^६ वगैरे पटींची देखील असु शकतात. हळुहळु इतर वस्तु(मान) गिळंकृत करुन ती वाढत जातात. त्याउलट क्वांटम कृष्णविवरे इतकी छोटी असतात की आपल्या शरीराच्या आरपार जातील पण आपल्याला जाणवणार देखील नाही. त्यांचे बाष्पीभवन होऊन ती नष्ट देखील होऊ शकतात. [१२ जुलै २०१०]

(४) विश्वात ४ शक्ती/बल (forces) कार्यरत असतात. (अ) weak force - याचा अवाका केवळ १०^-१८ मि. येवढा. नावाप्रमाणे तसा दुर्बळ. किरणोत्साराला हा कारणीभूत असतो. (ब) strong force - याच्यामुळे अणुंगर्भामधील कण बनु शकतात. अवाका १०^-१५ (क) विद्युतचुंबकीय - जर विद्युतभारीत वस्तु असेल तर हे बल जाणवते - कितीही अंतरापर्यंत (अर्थात अंतर वाढते तसे बल कमी जाणवते) (ड) गुरुत्वाकर्षण - तसा हा सर्वात कुचकामी, पण कितीही अंतरापर्यंत कार्यरत असतो. आणि केवळ वस्तुमानावर अवलंबुन असल्याने, जसएजसे वस्तुमान वाढते (उदा. दिर्घीका) तसा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. [१६ जुलै २०१०]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्ही वाय कॅनिस मेजॉरिस हा आकाराने मोठा आहे (त्याची त्रिज्जा सुर्याच्या १८००-२१०० पट जास्त आहे - R136a1 ची ४० पट).

R136a1 याचे वस्तुमान सुर्याच्या २६०-३२० पट आहे (VYCM चे ४० पट)

थोडक्यात, VYCM फोफसा आहे.

वस्तुमानाने मोठे तारे त्यांचे आयुष्य पटापटा संपवतात म्हणुन तसे तारे सापडायची शक्यता कमी. एक लेखात HR diagram बद्दल लिहिले होते. त्यात तार्‍यांच्या आयुष्याबद्दल पण होते थोडे.

हे दोन्ही तारे एखाद्वेळेस एकेकटे नसुन त्यांना जोडीदार असु शकतील असे कयास होते, काहिंचे अजुनही आहेत.

ओके, आता लक्षात आले. पण तारे हे नुसते वायुचे गोळे (+ थोडेफार घनरुप कोअर) असतात तर त्यांचे एकुण वस्तुमान कसे ठरवतात?

जर आंबे खराब झाले तर ते कचरापेटीत दिसताहेत का? >> ते गुरांना खायला घातले असू शकतात.
कुणाच्या ढेकरींना आंब्याचा वास आहे का? >> आंबे खाल्लेल्या माणसाने लसूण चटणी खाल्ली असू शकते.

म्हणजे जी वस्तुस्थीती मी अनुभवू शकत नाही त्याबद्दल मी फक्त तर्क करू शकतो.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मान्य केल्यास, तार्‍यांच्या परीक्रमा दिसतात तशा असण्याकरता मोठे वस्तुमान आवश्यक असेल >> इथे विज्ञान गृहित धरतय की परीक्रमा तशा असण्याकरता गुरुत्वाकर्षण आणि पर्यायाने त्या मागचे वस्तुमानच कारणीभूत आहे. हा केवळ तर्क झाला.

गौतम, चांगला प्रश्न आहे.

तसे पाह्ता केवळ जोडीने असलेल्या तार्‍यांचे वस्तुमान सरळ सरळ मिळवता येते. त्यातही दृष्य जोड्या (म्हणजे ज्या केवळ प्रोजेक्शन मुळे जोड्या भासतात) त्या काही कामाच्या नाहीत. एकएकट्या तार्‍यांचे वर्णपट पाह्यल्यास त्यात त्यातील घटकांच्या खुणा दिसतात. जर ती जोडी असेल तर मात्र ते तारे एकमेकांभोवती फिरत असतात व डॉपलर शिफ्ट मुळे वेगवेगळ्या वेळी मिळवलेल्या वर्णपटांमध्ये त्यांच्यातील वर्णरेखा पुढे मागे झालेल्या दिसतात. (हे आपल्याकडे येणार्‍या किंवा दूर जाणार्‍या गाडीच्या शिट्टीसारखे आहे). यावरुन त्यांचा फिरण्याचा वेग कळतो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरुन मग त्यांचे वस्तुमान काढता येते. त्या तार्‍यांची कक्षा आपल्या सापेक्ष एका पातळीत नसल्याने हे गणीत थोडे चुकणार. पण कधी कधी अश्या जोड्या सापडतात की एकामुळे दुसर्‍याला ग्रहण लागत असल्याचे कळते - म्हणजेच ते तारे आपल्या सापेक्ष एकाच पातळीत आहेत. अशा भरपुर जोड्या सापडल्यावर वर्णपट, वस्तुमानाचा संबंध लावता येतो. यावरुन जोडीत नसलेल्या तार्‍यांची पण माहिती मिळवता येते - पुन्हा HR diagram मदतीला. (याचप्रमाणे तेजस्वितेवरुनही वस्तुमान समजायला मदत होते).

आणि तारे जरी उष्ण वायुचे गोळे असले तरी त्यांच्यातही जास्त वजनदार धातु असु शकतात (खगोल्शास्त्रात हायड्रोजन व हिलियम सोडुन सगळ्या elements ना धातु असे संबोधल्या जाते). आणि श्वेतबटु, न्युट्रॉन तारे तर सघन असतातच.

माधव तुम्हाला वैज्ञानीक दृष्टीकोन आत्मसात झालेला आहे!
असेच सर्व तर्क करायचे, जे खोडुन काढता येतील ते टाकुन द्यायचे. बाकी सर्व खरे असु शकतात. फक्त एकच लक्षात ठेवायचे: उगीचच जास्त गृहितके गोळा करायची नाहीत (उदा. तुम्हाला भाऊ आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण कदाचीत तुम्ही पाळण्यात असतांना बिछडला असाल आणि त्याने परत येऊन आंबे खाल्ले ... अशक्य नाही, पण शक्यता नक्कीच नगण्य).

एका ठिकाणी केलेल्या तर्कामुळे दुसरीकडचे प्रश्न सोडवता येत असतील तर त्या तर्काची महती वाढते. त्यानंतर जर तुम्ही त्यावर आधारीत एखादे भाकीत केले व त्यावर आधारीत मोजमाप योग्य निघाले (आणि निघत राहिली) तर त्या तर्काला सिद्धांताचे स्वरुप प्राप्त होते. नेमके तेच गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत आहे. आपण बिनधोक पणे मानवाल चंद्रावर पाठवु शकलो ते त्यामुळेच. हे तुम्ही वाचता आहात ते कोणत्यातरी उपग्रहाच्या मदतिने तुमच्यापर्यंत पोचले. आपल्याला गुरुत्वाकर्षण समजले नसते तर तो उपग्रह अवकाशात सोडताच आला नसता. लांब पल्ल्याचे सर्व व्यवहार आपण त्या एकाच बलाच्या आधारे समजु शकतो. अजुन काही नसेलच असे नाही, पण असल्यास त्या बलाचा इतर ठिकाणी काय कार्यभाग आहे ते ही सांगावे लागेल.

धन्यवाद आशिष!!!

आपण या तार्‍यांचे पृथ्वीपासुनचे अंतर त्यांचा प्रकाश ईकडे पोचायला किती वेळ लागतो (+ पॅरॅलॅक्स किंवा तत्सम तंत्रज्ञान) यानुसार ठरवतो. त्यानुसार अशी काही तंत्रज्ञान नाही का कि जेणेकरुन आपलाही प्रकाश तिथवर पोचेल (उदा. प्रोजेक्टर वगैरे वापरुन मानवी आकृती, एखादा वस्तुचा आकार पाठवणे.)

अर्थात तार्‍यावर पाठवुन फायदा नसावा कारण तिथे जीवसृष्टी नसलच, पण एखादा ग्रह वगैरे वर पाठवला आणि तिकडे तो समजला तर...

फारच बेसिक व धाग्याशी विसंगत प्रश्न असला तर माफ करा:-)

आशिष, सगळेच नाही पण बरेचसे पटले. खरे तर माझा प्रश्ण मलाच पूर्णपणे मांडता आला नव्हता. पण जितका मांडू शकलो तितक्याला तू इतक्या सोप्या भाषेत उत्तर दिलेस त्याबद्दल धन्यवाद.

थोडासा अजून मांडतो. मला सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्ण पडला होता तो e=mc2 हे शिकताना. यात c च का आहे? म्हणजे अजूनही आपल्याला वस्तुमानाचे उर्जेत रुपांतर करता आले नाहिये मग कशाच्या आधारावर त्या समीकरणात c वापरला आहे? आवाजाचा वेग का नाही? शाळेत जेंव्हा हे समीकरण शिकलो तेंव्हा c हा स्थिरांक (constant) आहे असे शिकलो होतो. म्हणजे पदार्थ आणि उर्जा यांचा 'विशिष्ठ' असा संबंध आहे. पण पुढे प्रकाशाचा वेगही वस्तुमानाने बदलतो असे वाचले. मग त्यानुसार त्या समिकरणातले तिन्ही चल (variable) ठरतात. मग त्या समिकरणाचा अर्थ कसा बदलायचा की ते समिकरणच बाद ठरवायचे ?

बर अजून एक (तुझ्यासाठी) सोपा प्रश्ण - कृष्णविवरांमुळे काळालाही बाक येतो असे काहिसे वाचले होते. वस्तुमान आणि काळ यांच्या संबंधाबद्दल सोप्या भाषेत कुठे वाचायला मिळेल?

गौतम, प्रकाश खूप अंतरापर्यंत फोकस्ड ठेवणे अतिशय कठीण. त्यामुळे जितका तो दूर जाणार तितकी त्याची एका ठीकाणी पोचणारी उर्जा (strength) कमी होणार. उदा. प्रकाशाचा स्त्रोत पुर्णपणे अनफोकस्ड (isotropial) असेल तर जेंव्हा तो एका विशिष्ट अंतरापर्यंत पोचेल तेंव्हा तितके अंतर इतकी त्रिज्जा असलेल्या घनगोलाच्या प्रत्येक बिंदुपर्यन्त तो प्रकाश विभागुन पोचला असणार. उदा. सुर्याचा प्रकाश आपल्या पर्यंत पोचतो तेंव्हाच (आणि तितकाच) सुर्यापासुन ज्या ज्या बिंदुचे अंतर पृथ्वीइतके आहे तिथपर्यंत पोचतो. म्हणजेच सुर्यापासुन निघालेल्या एकुण प्रकाशाचा अतिशय छोटा भाग आपल्यापर्यंत पोचतो (surface area of earth divided by surface area of the sphere whose radius is the distance between earth and sun).

आपण प्रकाश पाठवला तर त्याचेही तसेच होणार (पण असेलच कोणी तर कधीतरी आपले रेडीओ ट्रान्समीशन ऐकायचा प्रयत्न करत असु शकतील ते). पण पायोनीअर मधुन आपण आपले स्थान घोषीत करणारी तबकडी मात्र पाठवली आहे. अर्थात ते यान कुणाच्या हाती पडायची शक्यता नगण्य.

समजा आपण इंग्रजीत लिहिलेले पत्र पाठवले तरीही ते पत्र परग्रह वासी उर्दु प्रमाणे उजविकडून डाविकडे वाचायचा प्रयत्न करतील का ?

> प्रकाशाचा वेगही वस्तुमानाने बदलतो असे वाचले.
हे बरोबर नाही. प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीत बदलत नाहीच.
त्या समिकरणातील m देखील वस्तुचे "rest-frame" वस्तुमान दर्शवतो आणि ते ही (आपसुक) बदलत नाही. वेगामुळे मात्र वस्तुमान बदलणार.

Landau चे What is the theory of relativity नामक एक छोटे पण खुप सुंदर, साध्या भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. त्यातुन बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

http://rcm.amazon.com/e/cm?lt1=_blank&bc1=000000&IS2=1&bg1=FFFFFF&fc1=00...

विजय, आपण जसा रोसेटा स्टोन वाचायचा प्रयत्न करु तसाच तेही करतील. एकच लिपी असेल तर अर्थात जास्त यत्न लागतील.

शनीची कडी नेमकी कशी बनली ते आपल्याला माहीत नाही. एका नवीन थेअरी प्रमाणे सुर्यमाला बनत असतांना एक मोठा चंद्र शनीच्या वातावरणात पडला व चक्राकृती गिरक्या घेऊन पृष्ठभागावर कोसळला. तसे होत असतांना कडी बनली असावीत.
http://www.australiangeographic.com.au/journal/cosmic-murder-created-sat...

धन्यवाद आशिष!

मानवनिर्मीत वस्तुंपैकी हेलियस-२ या यानाचा वेग आत्तापर्यंत सर्वात जास्त नोंदला गेला आहे. १७ एप्रिल १९७६. तर यानंतर या बाबतीत संशोधन झाले नाही का?

वेगाच्या विक्रमाबद्दल मला ठाऊक नाही, पण इतक्यातच मानवाचे एक यान अशा ठिकाणी (इत्क्या दूर) पोचले जिथे सौर्य् वारा जाणवत नाही. इतरत्र tail wind प्रमाणे त्यामुळे थोडी गती वाढते. सुर्यमालेच्या बाहेरील बाजुस मात्र आंतरतारका वार्‍याचा (intersellar wind) प्रभाव जास्त असतो.

http://www.jpl.nasa.gov/news/news.cfm?release=2010-415

STARDUST SPACECRAFT COMPLETES COMET FLYBY

Last night, mission controllers at JPL watched as data downlinked
from the Stardust spacecraft indicated it completed its closest
approach with comet Tempel 1. An hour after closest approach, the
spacecraft turned to point its large, high-gain antenna at Earth.
Images of the comet's nucleus collected during the flyby have been
received, and the JPL mission controllers have begun to analyze the
data and images.
Details: http://www.jpl.nasa.gov/news/news.cfm?release=2011-054

आयला... शेपटी कुठाय त्याची!! Wink
तिथे flyby चा 'आवाज' पण आहे?!! पण हवेशिवाय आवाज? का ती फक्त धुककेतूच्या बारीक कणांच्या टकरीने तयार झालेली कंपनं आहेत... अर्थातच हा 'आवाज' रेकॉर्ड करायला माईक वापरला नसणार!

केप्लरच्या सुरुवातीच्या डेटावरुन लक्षात येते आहे की आपल्याच दिर्घीकेत जीवनायोग्य ग्रह लाखानी असावेतः

(नुसते ग्रह कोट्यावधी)

http://news.discovery.com/space/milky-way-stuffed-with-50-billion-alien-...

'खगोलशास्त्रीय सटरफटर' असे शीर्षक आहे म्हणून लिहीलेले वरच्या 'विषयाशी संबंधित' नसले तरी चालेल, असे वाटले, म्हणून लिहीले.

साधारणपणे ४ सुर्यांइतके वस्तुमान असणार्या तार्याचे इधंन संपले की कृष्णविवर बनते.

आस्चिग, हे ४ सूर्यांऐवजी १.४ सूर्याइतके असे अनेक वर्षांपूर्वी वाचल्याचे स्मरते. (चंद्रशेखर मर्यादा). की याचा नि त्याचा काहि संबंधच नाही.

आणखी एकः
बर्‍याच गोष्टी आधी गणिताने शक्य आहेत असे कळते, पण त्याचा पुरावा नसतो. जसे कृष्णविवर ही कल्पना आईन्स्टाईनच्या १९०५ च्या कामावरून, शक्य आहे असे जाणवले. खुद्द आईनस्टाईनचा त्यावर विश्वास नव्हता, पण २५ - ३० वर्षांनी हबल दूरदर्शिका आल्यावर, त्याचा पुरावा मिळाला.

तसे गणिताप्रमाणे, क्वार्क बरोबर अँटि क्वार्क पण असतात आणि ते एकमेकांना 'भेटले' तर जग बुडेल. मग हे जग अजून कसे आहे, तर अँटि क्वार्क पेक्षा क्वार्क जास्त संख्येने असतात असेहि गणिताने दाखवले. आता स्टीव्हन हॉकिन्सच्या मते, जर गणिताने अँटि क्वार्क च जास्त आहेत असे दिसले असते तरी काही अडचण नाही. ज्याला आज अँटि क्वार्क म्हणतो, त्याचे नाव बदलून त्यालाच क्वार्क म्हणा, नि आज ज्याला क्वार्क म्हणतो, त्याला अँटि क्वार्क म्हणा. म्हणजे काही भानगड नाही.

बरं झालं हा धागा वर आला ते. मला बर्‍याच दिवसापासून एक प्रश्न विचारायचा होता. स्पेस टाईम कंटिन्युअम बद्दल आहे. ह्या बाफंच्या विषयाशी सुसंगत वाटत नसेल तर सांगा मी डिलीट करेन.
रेलेटिविटी विषयी वाचताना बर्‍याच वेळा "टाईम डायलेशन" बद्दल वाचायला मिळतं. ते ट्विन पॅरॅडॉक्सचं उदाहरण तर अगदी नेहमीच वापरलं जातं. मला काही ते ट्वीन पॅरॅडॉक्सचं उदाहरण पटत नाही. माझ्यामते आईनस्टाईनची ते उदाहरण म्हणून वापरल्यामुळे ते सतत आज पर्यंत वापरण्यात आलं आहे पण त्या उदाहरणामुळे "टाईम डायलेशन" बद्दल चुकीचा समज पसरवला जात आहेत. (हे मी माझ्यावरुन सांगतोय). मला शेवट पर्यंत टाईम डायलेट होतो कसा हे झेपेना. "टाईम डायलेट होतो असं वाटतं" हे विधान अधिक रास्त आहे असं मला वाटतं. अजुन १-२ मुद्दे आहेत ते जरा चर्चा झाली तर लिहीन.

मलाही जाणुन घ्यायचं आहे,
मी असं एकुन आहे क्रुष्ण विवरात गेलेल्या वस्तु पुन्हा परत येत नाहीत अणि त्या अद्रुष्य होतात.. यात किती सत्यता आहे...!

बुवा, मलाही ते अजून नीट कळलेलं नाहीये असंच वाटतं. वेळ प्रसरण पावते म्हणजे जैवशास्त्रीय वेळसुद्धा (biological time) प्रसरण पावते का? म्हणजे दोघंजण तितकेच म्हातारे होतील की कमीजास्त?
जाणून घ्यायला आवडेल. Happy

बायॉलॉजिकल टाईम! हा शब्द भारी आहे.
माझ्या डोक्याचा पार भुगा पडला ते ट्वीन पॅरॅडॉक्स त्यात बसवता बसवता. नंतर लक्षात आलं की बसवायची गरज नाही. ते उदाहरण म्हणून दिलं गेलय पण चुकीच्या पध्दतीनी वापरलं गेलय. मी तोच सेट अप वापरुन नवीन उदाहरण तयार केलं, बघ तुला पटतय का. (सगळ्याचे मराठी शब्द माहित नाही म्हणून इंग्रजी शब्द वापरत आहे)
समजा तु पृथ्वी वर एका यानात बसलास. त्या याना शेजारीच एक मोठ्ठं घड्याळ ठेवलेलं आहे. घड्याळ जमिनीवर "पाडलेलं" आहे, काटे असलेली बाजू आकाशाकडे आहे. तु यानात बसल्यावर तुझ्या हातातल्या घड्याळातली वेळ आणि जमिनीवरच्या घड्याळाची वेळ सारखीच आहे. नंतर ते यान पृथ्वी हुन उडतं. तु खिडकीतून ते घड्याळ पाहू शकतो. ते घड्याळ इतकं मोठं आहे की तू कितीही लांब गेलास तरी तुला त्या घड्याळाचे काटे स्पष्ट दिसतील. (काट्याचेच घड्याळ उपयोगी पडते ह्या उदाहरणात).
आता रेलेटिविटीच्या सिध्दांतानुसार, एकदा का ते यान प्रकाशाच्या वेगाच्या siginificantly जवळ जायला लागले की तुझ्या आणि खाली पृथ्वीवरच्या घड्याळाची वेळ जुळणार नाही. जुळणार नाही म्हणजे काय?
जमिनीवरचं घड्याळ तुझ्या हातातल्या घड्याळापेक्षा सावकाश सरकणार. इथे हळु सरकणार पेक्षा ते हळू सरकतय असं तुला "वाटणार". का? कारण की जमिनीवरच्या घड्याळाचा काटा एक सेकंदानी सरकला हे तुला तू खुप वेगात जात असल्यामुळे आणि ती क्रिया घडली हे डोळ्याला दाखवून देणार प्रकाशकिरण तुझ्या डोळ्यापर्यंत पोहोचायला नेहमी पेक्षा उशीर लागतोय. माहिती "डिलेड" आहे. ही माहिती, तुझा जितका वेग जास्त तितकी जास्त डिले होते आणि अर्थातच तुला पृथ्वी वरच्या घड्याळात "दिसणारा" "वेळ" आणखिन हळू हळू सरकू लागतो.
जसा जसा वेग कमी होईल तसा तुला तुझ्या घड्याळातला आणि जमिनीवरच्या घड्याळतला वेळ पण "मॅच" होईल. जितक्या जोरात वेग वाढला (अ‍ॅक्सलरेशन) तितक्याच जोरात जर कमी झाला तर जमिनीवरच्या घड्याळाचे काटे तुझ्या हातातल्या घड्याळाच्या काट्यांपेक्षा वेगात सरकून बरोबर "मॅचिंग" टाईम ला येतील. ट्वीन पॅरॅडॉक्स प्रमाणे यानातला माण्साचे वय कमी असेल किंवा यानातून परत खाली आल्यावर त्याचे घड्याळ पृथ्वीच्या घड्याळापेक्षा पुढे असेल असं मांडतो.
इथे घड्याळापासुन यानाचं अंतर हा ही एक फॅक्टर आहे पण फक्त उदाहरण सोपं ठेवण्यासाठी मी त्याचा उल्लेख केला नाहीये.

वैद्यबुवा, तसे नाही. घड्याळांचे वेग खरेच बदलतात कारण वेळ खरेच सापेक्ष असतो. तुम्ही जर थेट प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकलात तर वेळ तुमच्याकरता पुर्णपणे थांबेल. तुम्ही एका वेळेस सगळीकडे असु शकाल. म्हणुनच प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगाने जात असलेली कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकत नाही.

थोड्याफार अनाकलनीय नियमांपैकी हा एक आहे खरा. एक साधे उदाहरण घेऊ या: उपग्रह स्थीत घड्याळांना हा परीणाम जाणवतो व त्यांच्यात योग्य ते बदल केले जातात.
http://www.astronomy.ohio-state.edu/~pogge/Ast162/Unit5/gps.html

बाकी प्रश्नांची उत्तरे लवकरच.

चातक, कृष्णविवरात एखादी गोष्ट पडल्यानंतर फक्त तीन गोष्टींची माहिती नष्ट होत नाही:
वस्तुमान, विद्युतभार व स्पीन. बाकी एक किलोची डिक्शनरी पडली की तितक्याच वजनाचे दूसरे पुस्तक याने फरक पडत नाही. ती वस्तु तशीच्या तशी बाहेर येणे शक्य नाही.

चंद्रशेखर लिमीट करता १.४ सौर्य वस्तुमान हे बरोबर आहे पण ते ईलेक्ट्रॉन डिजनरसी करता - त्यापुढे न्युट्रॉन्स त्या तार्याला कृष्णविवर बनण्यापासुन थांबवु शकतात. पुढचा आकडा नेमका माहीत नाही. सौर्य वस्तुमानाच्या ३ ते १० पट या दरम्यान आहे.

२-४ क्वार्क - अँटी क्वार्क एकत्र आल्याने खूप काही होणार नाही, पण भरमसाठ आले तर होईल. दूर कुठे तरी खूप अँटी क्वार्क असतीलही.

आस्चिग, सॅटलाईट्स जेव्हा पृथ्वी वर होते तेव्हा त्यात बसवलेल्या घड्याळांची आणि जमिनीवर असलेल्या घड्याळांची वेळ सारखी असते. फक्त एकदा सॅटालाईट फिरायला लागले की मग रेलेटिविटी लागू होते. थोड्क्यात मी वर लिहील्याप्रमाणे पृथ्वी वर घडत असलेल्या घटनेची वर फिरत असलेल्या सॅटलाईट इंन्स्टंटेनियसली नोंद घेत नाही. सॅटलाईट प्रकाशाच्या वेगापेक्षा बर्‍याच कमी वेगानी फिरत असतात त्यामुळे हा "इफेक्ट" नॅनोसेकंड्स मध्ये होतो. आता फक्त सॅटलाईट्चे घड्याळ पृथ्वीवरच्या घड्याळा पेक्षा वेगानी पुढे सरकतय असं सॅटलाईटला लोंबकळत असलेल्या माणसाला वाटतय/दिसतय म्हणजे खरच त्याचे वय कमी वाढतय का? नाही.
वर तुम्ही दिलेल्या लेखातुनच एक वाक्य घेतो.

Because an observer on the ground sees the satellites in motion relative to them, Special Relativity predicts that we should see their clocks ticking more slowly.

सॅटलाईट वेगात फिरत असल्यामुळे प्रकाशाचा वेग गृहित (consider ह्या अर्थानी) धरावा लागतो (स्पेशल थियरी) आणि फिरत असलेली स्पेस ही कर्व्ड आहे त्यामुळे आपल्याला पृथ्वी वरुन दिसतं त्या पेक्षा वेगळं (जास्त) अंतर कापलं (जनरल थियरी) जातय हे सुद्धा गृहित धरावं लागतं.

सॅटलाईट वर असलेली घड्याळं आणि पृथ्वी वरची घड्याळं एक मेकांच्या कंपॅरिजन मध्ये ऑफ आहेत. वेगात असल्यामुळे सॅटलाईटवरच्या घडळ्याच्या गियर्स किंवा काट्यांचे मुळ घटक(?) बदलतायत का?, नाही. काटे त्याच इंटरवल्स नी पुढे सरकतायत पण एक मेकांशी कंपेअर केलं तर वेगळ्या इंटरवल्स नी पुढे सरकतायत असं "वाटतं".

खरच अवघड आहे हे उदाहरण देऊन बोलायला.

नाही. इथे "वाटण्याचा" काही संबंध नाही.

समजा आतापर्यंत नेहमी बरोबर असलेल्या जुळ्याला तुम्ही ट्रेनवर बसवले व बाय म्हंटले.
ट्रेन सुटताच त्याचे घड्याळ हळु चालेल.

त्याच्यादृष्टीने तुम्ही मागे जाताहात व तुमचे घड्याळ हळु जाणार व दोघेही बरोबर असणार
घड्याळे एकत्र आणतांना जे अ‍ॅक्सलरेशन बदलावे लागते त्यामुळे जास्त गोंधळ होतात हा प्रकार समजण्यात.

हे पुस्तक वाचा: http://avyakta.caltech.edu:8080/amazon/relativity.html
सोपे आणि सुंदर.

Pages