तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.
सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.
हिंदुस्थानच्या किनार्याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.
काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.
रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.
पहाट होत होती, पहार्यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.
बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.
त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्याकडे जाऊ लागले.
बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.
आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.
ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्यालाच कुणी जाळू शकेल काय...
तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “
या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”
यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्याबरोबर हात बांधूनच.
अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्यात
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
ह्म.. हॅटस ऑफ टू हिज करेज!
ह्म.. हॅटस ऑफ टू हिज करेज!
समयोचित लिहीलय ही एक लिन्क
समयोचित लिहीलय
ही एक लिन्क पण असुद्यात इथेच! आजच्या लोकसत्तामधिल लेख
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=839...
स्वातंत्र्यवीर सावरकरकी
स्वातंत्र्यवीर सावरकरकी जय!!!
खूप छान लेख!!
खूपच छान लेख! एका महान
खूपच छान लेख! एका महान स्वातंत्र्ययोद्ध्याची खूपच सुंदर आठवण लिहिली आहे तुम्ही.
अॅडमिनना विनंती करून हा लेख मायबोलीच्या पहिल्या पानावर हलविता येईल.
खुप चांगलं होइल मास्तुरे.. पण
खुप चांगलं होइल मास्तुरे.. पण मला माहीत नाय ते कसं करायचं.. मी नवीन हाय ना हिकडं.. पण माझा मागचा प्राचार्यांवरचा लेख आत्ता पहिल्या पानावर दिसतो आहे.. आजच्या दिवसाच औचित्य साधुन हा तिथे लागला तर खुप बरं होइल..
अर्धवट, छान लेख.. फक्त कृपया
अर्धवट,
छान लेख..
फक्त कृपया एक सुधारणा कराल का?. ते 'मार्सेलीस' नसून उच्चार 'मार्सेय' असा आहे.
जबरदस्त लिहीले आहे! आवडले
जबरदस्त लिहीले आहे! आवडले एकदम.
छान लेख आहे. या निमित्ताने
छान लेख आहे. या निमित्ताने फ्रांसमधे एक समारंभ व्हायचा होता, पण एका क्षुल्लक कारणासाठी तो रद्द झाला. (असे माझ्या एका जेष्ठ मित्रांकडून कळले. ते खास या दिवसासाठी फ्रांसला गेले होते.)
भारी रे ! खुद्द सावरकर पुढे
भारी रे !
खुद्द सावरकर पुढे रत्नागिरीला म्हणतात, "त्या उडीला जेवढे महत्व इंग्रजांनी दिले तेवढे मी देत नाही. किनार्याला लागलेल्या बोटीतून मी उडी मारली पण त्यामुळे हे इंग्रज घाबरुन गेले हे ही नसे थोडके "
अर्धवटराव भारी लिहिलय,
अर्धवटराव भारी लिहिलय, आवडल!!!
लिखाण पहिल्या पानावर हलवायला ईकड लिहुन बघ,
http://www.maayboli.com/user/3/guestbook
छान लिहिलय.
छान लिहिलय.
http://loksatta.com/index.php
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84130:2...
अर्धवट लेख सुंदर .....
अर्धवट लेख सुंदर ..... द्रष्टा क्रांतिकरक, जर योग्य वेळी हिंदुस्तानात आले असते तर कदाचित गांधीपर्वाचे वेगळे चित्र दिसले असते.
त्या तेजास प्रणाम. त्या विजिगिषु व्रुत्तीस प्रणाम, ज्या माँभारतीच्या कुशीत अशी नररत्ने जन्मली तिलाही प्रणाम. जयोस्तुते !!! जयोस्तुते!!!!!
समयोचित. त्यांचं धैर्य,
समयोचित. त्यांचं धैर्य, निष्ठा, त्याग, कष्ट, प्रतिभा - सगळंच थक्क करणारं, कल्पनातीत वाटतं.
सावरकर माझे दैवत आहे...
सावरकर माझे दैवत आहे...
लेख खुप छान आहे, स्मरण करुन दिल्याबद्दल तुमचे लाख धन्यवाद.
आजच्या दिवसाच औचित्य साधुन हा
आजच्या दिवसाच औचित्य साधुन हा तिथे लागला तर खुप बरं होइल..
अगदीच.
----
छान लिहिलय !!!!
छान लिहिलय !!!!
कालच्या लोकसत्तामधे मार्सेलिस
कालच्या लोकसत्तामधे मार्सेलिस : दूरगामी परिणाम करणारी अपेशी उडी हा लेख वाचला.(वर लिंक दिली आहे) त्यातल्या आणि या लेखातल्या तपशीलात खूप फरक आहे.
"गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्याकडे जाऊ लागले.
आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले" ...हे आणि अन्य तपशील अन्यत्र कुठे वाचल्याचे स्मरत नाही. माझी जनमठेप बर्याच वर्षांपूर्वी वाचले होते. कुणाच्या संग्रही असल्यास त्यातील या प्रसंगाच्या वर्णानाशी ताडून घ्यावे. तसेच अर्धवट यांनी हा तपशील लिहिताना कोणता आधार घेतला हे स्पष्ट केल्यास बरे होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची ऐतिहासिक उडी यांबद्दल पूर्ण आदर ठेवूनच मी हे लिहित आहे याची कृपया नोंद घ्यावी.
खूपच छान लिहीले आहे.
खूपच छान लिहीले आहे.
काल सकाळ मधला लेख वाचला..
काल सकाळ मधला लेख वाचला.. "माझी उडी तुम्ही विसरला असाल कदाचित पण, त्यामागचा उद्देश चिरकाल जिंवत राहील तुमच्या मनात" असे सावरकर म्हणाले होते. हो आजही लक्षात आहे ती उडी फक्त १०० वर्षे झाली म्हणून शताब्दी वर्ष साजरे करायला
.. स्वातंत्र्यवीर सावरकर आजही हयातीत असायला हवे होते असेच वाटते. त्यांचे ते ज्वलंत विचार, देशहितासाठी घेतलेल तडकाफडकी निर्णय खरोखर आजही हवे आहेत. प्रत्येक तरूणांनी स्वा.वीर सावरकरांचा इतिहास एकदातरी अगदी तल्लीन होऊन वाचावा हिच इच्छा.
भरतशेठ.. मी लिहिलेल्या घटनाचे
भरतशेठ..
मी लिहिलेल्या घटनाचे संदर्भ बहुतांशी तात्यारावांच्या लेखनातुन आणि त्यांच्या इतर काही चरित्रकारांच्या लेखानातुन घेतले आहेत, बहुतेक सर्व संदर्भ सन १९२४ नंतरचे आहेत. (अंदमानाहून सुटकेनंतरचे)
मलाही तुम्ही म्हणता तसा फरक जाणवला, परंतु. लोकसत्तेतील लेख तत्कालीन न्यायलयापुढे आलेल्या माहीतीच्या आधाराने लिहिला आहे असा उल्लेख आहे. तेथे ह्या प्रकरणाची एक गुन्हेगारी खटला म्हणुन नोंद असल्याने, सदर माहीती तत्कालीन परिस्थीती पाहता तात्यारावांच्या बॅरीस्टरी चातुर्याने दिलेली असण्याची शक्यता आहे.
मी घेतलेले संदर्भ असे -
समग्र सावरकर वाङ्मय - खंड १ ते ९
सावरकरांचे संक्षीप्त चरीत्र - सदाशिव रानडे - सन १९२४
सावरकर दर्शन - वि. स. वाळिंबे
सावरकरांचे रत्नागिरीचे स्विय सहाय्यक श्री. गोडसे यांच्याशी काही वर्षापुर्वी झालेले संभाषण
लेख वाचला,परत वाचेनच, पुर्ती
लेख वाचला,परत वाचेनच,
पुर्ती हा शब्द पूर्ती असा असावा असे वाटते,तेवढी सुधारणा व्हावी! मुख्यपृष्ठावरच शिर्षक दिसत आहे म्हणून सांगितले!
स्वा. सावरकर म्हणजे
स्वा. सावरकर म्हणजे "निश्चयाचा महामेरू".
>>प्रत्येक तरूणांनी स्वा.वीर सावरकरांचा इतिहास एकदातरी अगदी तल्लीन होऊन वाचावा हिच इच्छा.
अगदी.
"निखार्यालाच कुणी जाळू शकेल
"निखार्यालाच कुणी जाळू शकेल काय..." महान...
सावरकर म्हणजे माझे दैवत.
सावरकर म्हणजे माझे दैवत. त्यांची प्रत्येक कविता ऐकतांना अंगावर रोमांच अभे रहातात आणि डोळ्यातुन घळाघळा अश्रु.
अर्धवटराव, स्वातंत्र्यवीर
अर्धवटराव,
स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना देखील जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानमध्ये डांबले होते. त्यांच्याविषयी फारशी माहिती छापली जात नाही. तसेच त्यांच्या धाकट्या बंधूंना देखील शिक्षा झाली होती असे कुठेतरी वाचले होते. त्यांच्या थोरल्या व धाकट्या बंधूंविषयी थोडी माहिती द्याल का?
माझ्या लहानपणी मला एक पुस्तक
माझ्या लहानपणी मला एक पुस्तक मिळाले होते. "चित्रमय सावरकर " यात स्वा. सावरकरांच्या जीवनातल्या सगळ्या प्रसंगावर चित्रे होती. बहुदा चित्रकार होते म.वी. सोवनी. त्यात ही बोटीतुन घेतलेली उडी, परदेशी कपड्यांची होळी सर्व प्रसंग उत्तम रेखाटले होते. सध्या हे पुस्तक उपलब्ध नाही.
एखाद्या देशाच्या स्वाभिमानी
एखाद्या देशाच्या स्वाभिमानी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य मिळताच जाब विचारला असता ह्या घटनेचा फ्रांस सरकारला. पण जिथे सुभाष बाबूंना मिळताक्षणी ब्रिटीश सरकारच्या हवाली करण्याची वचने आमच्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी दिली तिथे असल्या "भानगडी" कोण करणार?
स्वातंत्र्यसूर्य तात्यारावांना त्रिवार अभिवादन!
स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय! भारत माता कि जय!
सागरा प्राण तळमळला हे वर्जन
सागरा प्राण तळमळला हे वर्जन मला सर्वात प्रियः
एका महान कलाकाराने (स्व. बाबूजी) एका महान देशभक्ताला वाहिलेली जणू आदरांजली:
http://www.youtube.com/watch?v=8cA4BPFHi7M&feature=related
(स्वा. सावरकर मराठी चित्रपट कुठे डाऊन्लोड ऊपलब्ध आहे का?)
हेही छान आहे:
http://www.youtube.com/watch?v=J9HBjBrspPs&feature=related
"फुलबाग मला हाय पारखा झाला".......
या ओळींवर कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही?
सामुवै.. हे माहीतच नव्हतं हो
सामुवै.. हे माहीतच नव्हतं हो मला.. चीड आणणारं आहे हो हे..अधिक माहिती वाचायला आवडेल यावर..
स्वतंत्र भारताचे पहीले राष्ट्राध्यक्ष मी तरी सुभाषबाबुंनाच समजतो. आझाद हिंद सेनेच्या काळात अंदमान- निकोबार (चुभुद्याघ्या) बेटे आणि इतर काही प्रदेश जपानने सेनेच्या ताब्यात दिले होते आणि सुभाषबाबुंना या भारताच्या राष्ट्राध्यक्षांचा दर्जा दिला होता. त्याला इतर काही राष्ट्रांनी मान्यताही दिली होती. (इटली वगैरे.)
नीट संदर्भसाधने आत्ता हाताशी नाहीत, वेळ काढुन देतो दुवे.
Pages