एक 'बेफिकीर' गुलमोहर

Submitted by सानी on 8 July, 2010 - 04:09

बेफिकीर आले माबोवर घेऊन
मीना, दिपू, साहू नी गट्टूच्या कथा
बेफिकीर असले टोपणनाव तरी
शब्दाशब्दात संवेदनक्षम व्यथा

मीनाने उघडले डोळे
दाखवला धाडसी मार्ग
शिकवले, असेल हिम्मत तर
नरकाचाही होऊ शकेल स्वर्ग

हाफ राईस दाल मारके
दिपू आला घेऊन
चविष्ट भावनांचा तडका
पण गेला शेवटी रडवून

साहूची कथा मात्र
काही केल्या पचली नाही
कटूसत्य रुचेल कसे
खरं सांगू झेपली नाही

गोड गट्टू बाळ घेऊन
आलाय आता श्री
त्याच्या बाळलीलांनी
माबोवर आनंदाच्या सरी

ओल्ड मंकच्या घोटासोबत
हॉस्टेल-लाईफचा चकणा
किशोरामनाचे अंतरंग
दिल्या, अश्क्या, आत्म्यासोबत जाणा*

मन दाद देत राहते:
अप्रतिम शैली, वेगवान लेखणी
प्रत्येक कथेत जाणवत राहते
बेफिकीरांची वेगळीच धाटणी

एका डोळ्यात येते हसू
तर दुसर्‍यातून आसू टपकत राहते
बेफि़कीर टच येतोच कायम
शेवटची पंचलाईन ठोका चुकवते

बेफिकीर, असेच लिहित रहा
अनेक शुभेच्छा तुम्हाला
वेगळेच जग तुमच्या डोळ्यांनी
पहायला आवडतेय आम्हाला... Happy

*"ओल्ड मंक..."चे कडवे दि. १३.१०.२०१० ला समाविष्ट केले आहे.

गुलमोहर: 

छानच सानी. आवडली कविता.मलाही बेफिकीरजींचे लिखाण आवडते.
पण मला त्यांची वाचक वर्गासाठी लिहीलेली एका भागाची कादंबरी का
दिसत नाही?

Pages