एक 'बेफिकीर' गुलमोहर

Submitted by सानी on 8 July, 2010 - 04:09

बेफिकीर आले माबोवर घेऊन
मीना, दिपू, साहू नी गट्टूच्या कथा
बेफिकीर असले टोपणनाव तरी
शब्दाशब्दात संवेदनक्षम व्यथा

मीनाने उघडले डोळे
दाखवला धाडसी मार्ग
शिकवले, असेल हिम्मत तर
नरकाचाही होऊ शकेल स्वर्ग

हाफ राईस दाल मारके
दिपू आला घेऊन
चविष्ट भावनांचा तडका
पण गेला शेवटी रडवून

साहूची कथा मात्र
काही केल्या पचली नाही
कटूसत्य रुचेल कसे
खरं सांगू झेपली नाही

गोड गट्टू बाळ घेऊन
आलाय आता श्री
त्याच्या बाळलीलांनी
माबोवर आनंदाच्या सरी

ओल्ड मंकच्या घोटासोबत
हॉस्टेल-लाईफचा चकणा
किशोरामनाचे अंतरंग
दिल्या, अश्क्या, आत्म्यासोबत जाणा*

मन दाद देत राहते:
अप्रतिम शैली, वेगवान लेखणी
प्रत्येक कथेत जाणवत राहते
बेफिकीरांची वेगळीच धाटणी

एका डोळ्यात येते हसू
तर दुसर्‍यातून आसू टपकत राहते
बेफि़कीर टच येतोच कायम
शेवटची पंचलाईन ठोका चुकवते

बेफिकीर, असेच लिहित रहा
अनेक शुभेच्छा तुम्हाला
वेगळेच जग तुमच्या डोळ्यांनी
पहायला आवडतेय आम्हाला... Happy

*"ओल्ड मंक..."चे कडवे दि. १३.१०.२०१० ला समाविष्ट केले आहे.

गुलमोहर: 

सुमेधा, धन्स :हं Happy

भुंग्या, तुला या कादंबर्‍या वाचाव्याशा वाटतायत, हे वाचून खरंच खुप आनंद झालाय... Happy
तुम्ही सगळे भेटणार आहात??? कधी ठरलं हे सगळं??? मला मी आत्ता भारतात नसल्याचे अतिशय दु:ख होतंय...मला फोटो दाखवा बरंका!! तुमचे गटग यशस्वी होवो ह्या माझ्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला Happy

समद्यांना गुंडाळलय. आमच्यावालं नाव काय दिसंना बाबा!
Sad
मजा आली बाकी वाचतांना.
Happy

किती छान,मस्तच....:)
मला पण खुप दिवसां पासुन वाचायची होती आज वाचली. मस्त गं सानी...
त्यांच्या प्रत्येक कादंबर्‍या, कथा वाचल्यात मी. खुप आवडतात ही अगदी मनापासुन...
बेफिकीरजींच्या लेखनाला शुभेच्छा....असेच लिहीत रहा.

प्रत्येक प्रतिसादाला इतकं लाडिकपणे धन्यवाद म्हणायची काय गरज ? असे खोटे फुगवलेले प्रतिसांदाचे आकडे पाहून स्वतःची तरी फसगत होतेय का ?
कविता म्हणजे सायकोफंसीचा नमुना आहे , दुसरं काही नाही .!

स्वत: लेखकमहाशयांनी मी जाणून बुजुन . सुमार लेखन करतोय म्हटलं तरी प्रशंसा चालूच.. Yuck!!

देशी Sad तुम्हाला का हो एवढा त्रास होतोय प्रतिसादाचे आकडे पाहून? आणि ते खोटे फुगवलेले आहेत म्हणजे काय? प्रतिसादाचे आकडे पाहून धागे वाचणार्‍यातली मी नाही... तुम्ही असाल तर माझा त्याला इलाज नाही...

बाकी, लेखक महाशय त्यांच्या लेखनाला काहीही म्हणोत, मला व्यक्तिशः त्यांचे लेखन अतिशय आवडते म्हणूनच मी ही कविता लिहिली. माझ्या लेखनाची प्रशंसा करणार्‍या सर्वांचे आभार मला मानावेसे वाटतात, यात तुम्हाला दु:ख व्हायचे, चीड यायचे काय कारण, ते मात्र मला समजत नाही.... Sad

वा वा! यातही वाद झाले! मस्त! आता कसं सकाळी सकाळी ओल्ड मंक लार्ज ऑन द रॉक्स घेतल्यासारखं वाटतंय!

सानीची कविता असूनही मी आपला उगीचच मधेमधे आभार मानून प्रतिसाद वाढवतोय.

-'बेफिकीर'!

प्रिय सानी....कौतुक
काय सान्गु केवळ निशब्द्....अप्रतिम..

खर तर कविता कधी वाचत नाही ईथे(कारण कादंबरीची सवय झालीय म्हणुन)....पण अचानक क्लिक केले नी टायटल बघीतले तर एक 'बेफिकीर' गुलमोहर
...नि..सानी..रहावलेच नाही....

बेफिकीर असले टोपणनाव तरी
शब्दाशब्दात संवेदनक्षम व्यथा....खरय ग...

बेफि़कीर टच येतोच कायम
शेवटची पंचलाईन ठोका चुकवते...
.......आणि हे खरय...

बेफिकीर, असेच लिहित रहा
अनेक शुभेच्छा तुम्हाला
वेगळेच जग तुमच्या डोळ्यांनी
पहायला आवडतेय आम्हाला.....

पाहीलस म्हणुन तर म्हण्ते ना मी..की तु गोड आहेस ते...कारण तु आजही आम्हा सगळ्यान्च्या मनातल अचुक टिपलस इथे.....पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद

सावरी

सानी,

अभिनन्दन...मला काय म्हणायचय ते कळल असेलच्...पर्सनली घेऊ नकोस ईथले काहिही...
बाकी वाट पाहतेय....तु लवकरच नवीन कही घेउन येशिल अशी आशा आहे.....

सावरी

सावरी Happy तुझा मनापासूनचा प्रतिसाद आणि धीर देणारे शब्द, दोन्हीने भारावून गेलेय .... मनापासून आभारी आहे Happy

नितीन, आवर्जून कविता वाचली आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्स Happy

सानी तुझे खरेच कौतुक!!छान आणि मनापासून लिहिलेस.
बेफिकीर जबराट षटकार मारतात.त्याचा अनुभव
मी घेतलाय. तू लिहिलेस छान तुझे कौतुक.मनापासून!!

सानी धन्यवाद कसले त्यात ? आभारच मानायचे तर बेफिकीर यांचे मान. त्यांच्यामु़ळेच ही कविता जन्माला आली.

हो खरंच आहे सानी तुझं. निदान ही कविता वर आल्याने कादंबरी लेखनाचं राहीलेलं काम पूर्ण करतील आता ते. Happy

Pages