एक 'बेफिकीर' गुलमोहर

Submitted by सानी on 8 July, 2010 - 04:09

बेफिकीर आले माबोवर घेऊन
मीना, दिपू, साहू नी गट्टूच्या कथा
बेफिकीर असले टोपणनाव तरी
शब्दाशब्दात संवेदनक्षम व्यथा

मीनाने उघडले डोळे
दाखवला धाडसी मार्ग
शिकवले, असेल हिम्मत तर
नरकाचाही होऊ शकेल स्वर्ग

हाफ राईस दाल मारके
दिपू आला घेऊन
चविष्ट भावनांचा तडका
पण गेला शेवटी रडवून

साहूची कथा मात्र
काही केल्या पचली नाही
कटूसत्य रुचेल कसे
खरं सांगू झेपली नाही

गोड गट्टू बाळ घेऊन
आलाय आता श्री
त्याच्या बाळलीलांनी
माबोवर आनंदाच्या सरी

ओल्ड मंकच्या घोटासोबत
हॉस्टेल-लाईफचा चकणा
किशोरामनाचे अंतरंग
दिल्या, अश्क्या, आत्म्यासोबत जाणा*

मन दाद देत राहते:
अप्रतिम शैली, वेगवान लेखणी
प्रत्येक कथेत जाणवत राहते
बेफिकीरांची वेगळीच धाटणी

एका डोळ्यात येते हसू
तर दुसर्‍यातून आसू टपकत राहते
बेफि़कीर टच येतोच कायम
शेवटची पंचलाईन ठोका चुकवते

बेफिकीर, असेच लिहित रहा
अनेक शुभेच्छा तुम्हाला
वेगळेच जग तुमच्या डोळ्यांनी
पहायला आवडतेय आम्हाला... Happy

*"ओल्ड मंक..."चे कडवे दि. १३.१०.२०१० ला समाविष्ट केले आहे.

गुलमोहर: 

प्रविन, मोनाली धन्यवाद!
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. आता कवितेत अजून दोन कडवी जोडली आहेत. (शेवटच्या कडव्याआधी) Happy

प्रिय सानी व सर्व सहृदय मित्रांनो,

मी या अशा कौतुकाने सातव्या आभाळात पोहोचतो. खोटे बोलण्यात अर्थ नाही.

मी माझ्या सर्व सहृदय प्रतिसादकांच्या व प्रोत्साहकांच्या नावाने एक 'एक भागाची कादंबरी' समर्पीत करून मायबोलीवर प्रकाशीत करत आहे. (आजच)! ही कादंबरी लिहीत असल्याने मला 'बाप' ही कादंबरी लिहायला जरा उशीर झाला.

आभार मानण्याची क्षमता माझ्यात नाही.

-'बेफिकीर'!

मीरा आभारी आहे. Happy

बेफिकीर,
तुम्ही आम्हाला तुमच्या लेखनाच्या माध्यमातून बरेच दिवसांपासून खुप आनंद देत आहात. तोच आनंद माझ्याकडून ह्या रचनेच्या स्वरुपात व्यक्त झाला आहे. ह्या आनंदाच्या लहरी तुमच्यापर्यंत पोचल्या हे पाहून बरं वाटलं.
आम्हा रसिक वाचकांना तुम्ही ही एक भागाची कादंबरी समर्पित करत आहात हे वाचून तर अत्यानंद झालाय. उत्सुकता शिगेला पोचलीय. येऊ द्या ही कादंबरी लवकर...

बेफिकीरजी
धन्यवाद आणि शुभेच्छा.
गझलव्यतिरिक्त मी आपले लिखाण अजुन वाचले नसल्याने जास्त लिहीत नाही.

जुई, थँक्स गं Happy

आगावा, माझी कविता आणि उत्तर याबद्दल काहीच लिहिले नाहीस????? ते अजिबातच आवडलेले दिसत नाहीये तुला Sad

Lol Lol Lol Lol

कवितेतल्या भावनांशी सहमत.

बेफिकीर आमचे जुने मित्र. त्यांचा लेखनप्रवास (मुख्यतः गझल) मी जवळून पाहिला आहे. त्यांची नवनवोन्मेषशालिनी (शब्द बरोबर आहे नं?) प्रतिभा अशीच बहरत राहो, ही शुभेच्छा.

पुढच्या पुणेवारीत 'बेफिकीर' यांच्याकडून या धाग्याबद्दल पार्टी उकळणार, हे निश्चित. Happy

(बेफिकीर यांचा गझल-सहयोगी)
--ज्ञानेश

ज्ञानेश, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बेफिकीर तुमचे मित्र आहेत हे वाचून आनंद वाटला. Happy

पुढच्या पुणेवारीत 'बेफिकीर' यांच्याकडून या धाग्याबद्दल पार्टी उकळणार, हे निश्चित. >>>> नक्की उकळा Lol

मला गझलींमधलं फारसं कळत नाही. त्यामुळे मी त्यांच्या गझली फारशा वाचलेल्याही नाहीयेत...त्यामुळेच की काय, माझ्या ह्या रचनेत लयबद्धता जरा(?) कमीच पडलीये Wink Lol

आगावा, माझी कविता आणि उत्तर याबद्दल काहीच लिहिले नाहीस????? ते अजिबातच आवडलेले दिसत नाहीये तुला
अगं यालाच माबोवर 'अनुल्लेख' असं म्हणतात Wink Light 1

हसरी, माझ्या चेहर्‍यावर हसू आणल्याबद्दल धन्यवाद Happy

आगाऊ माणसा, तुझ्या लेखांना मी दिलेल्या प्रतिसादांची चांगली परतफेड केलीस रे s s s s Angry

Lol

अनिल, धन्यवाद! Happy
ही कविता बेफिकीर यांनी माबोवर लिहिलेल्या कादंबर्‍यावर आधारीत आहे.
मीना, दिपू, साहू आणि गट्टू त्यांच्या कादंबर्‍यांमधली पात्रे आहेत. फार सुरस कथा आहेत. जमेल तेव्हा वाचा.
पटकन सापडाव्या म्हणून इथे त्यांचे दुवे देतेय.

सोलापूर सेक्स स्कँडल :
मीनाची कथा
http://www.maayboli.com/node/15409

हाफ राईस दाल मारके : दिपूची कथा
http://www.maayboli.com/node/15727

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ : साहूची कथा
http://www.maayboli.com/node/17082

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप : गट्टू आणि त्याचे वडील श्री यांची कथा.
http://www.maayboli.com/gulmohar/marathi_katha (आत्तापर्यंत ९ भाग झाले आहेत. ते ह्या दुव्यावर सापडतील.)

आणि ही त्यांनी त्यांच्या सर्व वाचक वर्गाला समर्पित केलेली एका भागाची कादंबरी-
सौ. वनिता रानडे - एक असहाय्य स्त्री - एक भागाची कादंबरी
http://www.maayboli.com/node/17661

सानी... तुमच्या भावना फार उदात्त आहेत.....
बेफिकिरजींनी त्यांच्या '' गझल सहयोग'' च्या मुशायर्‍यात नवोदित गझलका र म्हणून गझला सादर करण्याची संधी दिलि होती.. अन त्यामुळे त्यांचा परिचय झाला..... माबो वरिल त्यांच्या गद्य-पद्य लेखनाने हा परिचय दृढ झाला....

आपण लिहिलेल्या भावनेशी अक्षरशा: सहमत.

वाचनवेडा - मनापासून आभार!

डॉ. कैलास - नवोदीत हा शिक्का आता गेलेला आहे तुमच्या नावावरून! तुमच्या गझला आता शुद्ध असतातच पण त्यात आता तुम्ही नवीन नवीन संकल्पना असलेले विचार आणत आहात जसे 'धर्म' मधील काही शेर! 'संधी देण्या' इतका मी मोठा नाही. तो एक उपक्रम आहे. आपण पार नेरुळहून पुण्यात आलात हे आपले प्रेमळ सहकार्य होते. याच साईटवरील डॉ. ज्ञानेश पाटील, श्री. मिलिंद छत्रे, श्री. आनंदयात्री, श्री. शरद, श्री.ह.बा.शिंदे हे सर्वही प्रेमाने आलेले आहेत त्या उपक्रमाची साथ देण्यासाठी! मी व श्री. अजय जोशी व आता श्री. मिलिंद आता पुढील मुशायरा लवकरच घेऊ. जोशी परदेशी गेल्यास मी व मिलिंद! या निमित्ताने पुन्हा सर्व गझलकारांचे मी आभार मानतो. डॉ. ज्ञानेशही पार जळगावहून आलेले होते. केवळ प्रेमाखातर!

सानी - आपल्या या रचनेचे पुन्हा आभार! 'गोल होता छान वाटेतील पडलेला दगड' या माझ्या रचनेतील शेवटच्या ओळीचा अर्थ बहुधा आता आपल्या लक्षात आला असावा. आपण माझी पात्रतेपेक्षा अधिक स्तुती केलेली आहेत. माझे पाय जमीनीवर राहोत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सानी, तू सी ग्रेट हो .....
आणि ..... बेफिकीर आपणास ही माझ्या शुभेच्छा !!

सस्नेह !!
देवनिनाद

अचानक आलेल्या एवढ्या प्रतिसादांनी मी एकदम भारावून गेले आहे.

वाचनवेडा, हा धागा वर आणल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिसादाबद्द्ल खुप खुप आभारी आहे.

डॉ. कैलास, तुमच्या प्रतिसादाबद्दल सुद्धा अनेक आभार. ह्या निमित्ताने मला बेफिकीरजींचा अजून एक पैलू समजला...धन्यवाद Happy

बेफिकीरजी, मला खरंच असं वाटत नाही हो की मी तुमची प्रमाणाच्या बाहेर स्तुती करते आहे... Uhoh मीच काय, ज्यांनी ज्यांनी तुमच्या लेखन-प्रतिभेचा अनुभव घेतलाय, त्यातल्या कुणालाही असे वाटणार नाही... आणि म्हणूनच मी तुम्हाला "राजहंस" म्हणालेले...ते तुम्ही आहातच, याबाबत तीळमात्र शंका नव्हती आणि नाही...

निनाद मित्रा... तुझ्या ह्या शब्दांबद्द्ल धन्स रे Happy

आज फार प्रसन्न वाटते आहे. दिवसाची सुंदर सुरुवात करून दिल्याबद्दल सर्वांची परत एकदा खुप खुप आभारी आहे.... Happy

ही कविता कशी काय राहिलेली वाचायची माझी काय माहित...सानी...छानच झालीये..
बेफिकीरजी..तुमच्याबद्दल काय लिहु? शब्द संपलेत कधीच Happy
तुमच्या कुठल्याही कादंबरीचा एकही भाग आजतायगत मिस नाही केलाय आणि करणार नाही एवढंच म्हणेन.

सानी, ही कविता आता वर आली त्यामुळे वाचता तरी आली...... तुझ्या व्यक्तिमत्वाचा अजून एक कंगोरा....... तू "बेफिकिरजींच्या लिखाणाची" हार्ड्कोअर फॅन आहेस हे कळले होते पण तेंव्हा ही कविता नव्हती वाचली......... मस्तच लिहिलियेस.......
मला अजुनपर्यंत तरी स्क्रीन्वर ह्या कथा वाचता नाही आल्यात (आणि प्रिंटाऊट काही मी काढणार नाही, पुस्तक छापून आले तर अगदी रांगेत पहिला राहून विकत घेईन:फिदी:) त्यामुळे पात्र परिचय नाही, पण आता तुझी कविता वाचून मला ह्या कथा वाचाव्यात असे वाटू लागलेय...... Happy तशा "बेफिकिरजींच्या गझला" नियमित वाचतो, पण कथा काही वाचलेल्या नाहीत. आता वाचाव्याच लागतील....... Happy

(ता.क. येत्या शनिवारी डॉक च्या सहयोगाने छोटेखानी गटग ठरवले आहे, त्यात बेफिकिरजींना भेटण्याचा योग आहे....... बघुया कसे जमतेय, अजून ३ दिवस आहेत काहीही बदल होऊ शकतात... Proud )

Pages