अवघी विठाई माझी (७) - फेनेल बल्ब

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

fenel.jpg

शाळेच्या मधल्या सुट्टीतला आवडता खाऊ म्हणजे ओली बडीशेप. आणि
हॉटेलमधले जेवण झाल्यावर पुढ्यात आलेली बडीशेप म्हणजे, लहानपणी
बोनसच वाटायचा.
पण तरी फेनेल बल्ब आपल्याकडे फ़ारसा खाल्ला जात नाही. फ़नेल म्हणजे
बडीशेपेचा कांदा. पण हा कांदा जमिनीच्यावरच वाढतो.

fc.jpg

गुजराथ, राजस्थान पासून काश्मिर पर्यंत सगळीकडे याचे उत्पादन होते, पण
त्यांच्याकडेही जेवणात याचा वापर केलेला दिसत नाही.
या कांद्याचे आतले रुपडेही जवळ जवळ कांद्यासारखेच असते. पण कांद्यासारखा
हा रडवत नाही. याला ओल्या बडीशेपेचाच स्वाद असतो. पानांनाही हाच गंध
असतो.
हा सलादमधे कच्चाच वापरता येतो. कांद्याच्या जोडीनेही वापरता येतो.
उकडून, वा तेलात परतूनही वापरता येतो, पण जास्त शिजवला तर याचा
स्वाद खुपच कमी होतो. त्यामूळे जर शिजवायचा असेल तर अगदी थोडा वेळ
शिजवावा, आणि तेलात परतायचा असेल, तर बाकिचे जिन्नस परतून मग शेवटी
ह्याचे काप टाकावेत.

fd.jpg

शिजवून मग ब्रेडच्या चूर्‍यात हा बेक केला तर छान स्वाद येतो. मी याचा वापर
करुन मोरोक्कन पिझ्झा केला होता.

fb.jpg

याची कृति मी आधी लिहिली आहेच. हा पिझ्झा करताना, याचे सारण आतमधेच
घातलेले असते. कणकेत यीष्ट घालून ती फ़ूगल्यावर, फ़नेल, नट्स, मिरची, मनुका
यांचे परतून घेतलेले मिश्रण घालायचे. आवडीचे चीज किसून त्यात मिसळायचे,
आणि परत फ़ुगून आले, कि १५ ते २० मिनिटे बेक करायचे. तव्यातही हा प्रकार
सहज होतो.

या फेनेलचा उगम भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर झाला असे मानतात. पण आता
जगभर हे आढळून येते. रेताड जमिनीत, समुद्र किनार्‍याजवळ याचे पिक चांगले
येते. आपल्याकडेही बडीशेप सहज उगवून येते (पानपट्टीच्या दुकानाजवळ अनेकदा
याची रोपे दिसतात.)
युरप आणि भूमध्यसमुद्राच्या परिसरात ही भाजी चांगलीच लोकप्रिय आहे. याची पानेही
जेवणात वापरता येतात. (पाने साधारण शेपूसारखीच दिसतात, पण त्यापेक्षा नाजूक
असतात.) माश्यांबरोबर याचा संयोग चांगला लागतो. मासे ग्रील करताना, ही पाने
व कांदेही वापरता येतात. ऑमलेट्मधेही हा कांदा व पाने वापरता येतात.
याचे शास्त्रीय नाव, वेनेकुलम वेल्गरे. यामधे अनेक खनिजे सुक्ष्म रुपात असतात.
याचा स्वाद भारतीय जीभेला सहज रुचण्यासारखा आहे.

विषय: 
प्रकार: 

ओ तुमच्याकडे जेवायला यायचंय.
काहीतरी प्रेजेंट घेऊन यीन..
कधी यउ?

↑ हे सगळ्या "विठायांसाठी" एकत्र आहे. Happy

रच्याक. आमच्या कोल्हापुरात उभा मारुती चौकात (शिवाजी पेठेत) एक हॉटेल आहे. त्याचं नाव विठाई. तिथुन जाताना मी म्हणायचो, मालक येडा आहे का? "मिठाई" ठेवायचं होतं, ते चुकुन "विठाई" ठेवलं वाटतं...
(तेव्हा मी दुसरीत होतो... )

एकदा कोणीतरी "उभा मारुती" चौकाला "उमा भारती चौक" म्हटलेलं ही तुमच्या "माझी विठाई" वरुन आठवलं. जरा जास्तीच रच्याक. असो...

Pages