वेदकालीन संस्कृती भाग १

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

संस्कृती म्हणजे काय?

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.
रानटी समाज जाऊन प्रगत समजाव्यवस्था तयार व्हायला काही हजार शतके लागली असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, पण आपला इतिहास जेवढा जुना आहे तेवढा आज तरी माहित असलेल्या जगात तेवढा जुना इतिहास आपल्या संस्कृतीशिवाय आणखी एक दोन संकृतींचाच आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती : माणूस व्यक्तिशः व समुदायशः जी जीवनपद्धती निर्माण करुन अंगिकारतो, आणि स्वतःवर व बाह्य विश्वावर (जनसमुदाय, निसर्ग ) संस्कार करुन जे अविष्कार निर्माण करतो ते करण्याची पद्धत व तो अविष्कार म्हणजेच त्या समुदायाची संस्कृती होय. थोडक्यात निसर्गावर विजय मिळविन्याचा क्रम म्हणजे संस्कृती. आधिभौतिक व आध्यात्मिक असे संस्कृतीचे दोन भाग आहेत. साधारण आपण असे म्हणू शकतो की ज्या क्रियेने बाह्य विश्वावर बदल घडून येतो ती भौतिक संस्कृती व ज्याने माणसात, त्याचा अंतर्मनावर संस्कार / बदल घडून येतो ती आध्यात्मिक संस्कृती.

माणूस शहाणा झाल्यापासून तो निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, निसर्गावर विजय मिळविण्यास तो प्रगतिशील आहे. निसर्गाच्या जडणघडणीला कोण जबाबदार आहे? देव नावाची गोष्ट असावी काय? असल्या्स तिचे ऊद्दीष्ट काय? हे प्रश्न माणसाला तो शहाणा झाल्यापासून पडत आहेत. माणसाचा भौतिक गरजा भागल्या की त्याला वेध लागतात, ह्या विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचे, तो मग ह्या विश्वकर्त्याच्या शोधास निघतो व त्यातून त्याला कळेल ते तत्वज्ञान निर्माण व्हायला सुरू होते आणी हिच आध्यात्मिक प्रगती होण्याची नांदी होय. संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात धर्म, निती, कायदा, कला, साहित्य, मानवी सदगुण आणि शिष्टाचार ह्यांचा अतंर्भाव होतो.

ह्या जडणघडणीत मानवाने विवाहसंस्था, आर्थिक संस्था, सामाजिक जीवन इ. नियम निर्माण केले. माणसामाणसामधील संबंध, एका समुहाचे दुसर्‍या समुहाशी संबंध हे प्रस्थापित झाले. प्रत्येक संस्कृतीत परिवर्तन निर्माण होत असते, त्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, जसे युद्धकाल, शांतीकाल,जेते व जीत ह्यांची एकमेकांशी वागणूक इ इ. शिवाय कोणत्याही संस्कृतीच्या प्रगतीच्या कालखंडात जे काही असते त्याचे मूल्य त्या कालखंडापुरते मर्यादित असते. असायला पाहिजे. युग बदलले की मुल्ये बदलतात. म्हणजे संस्कृतीची जडणघडण ही कायम होत असते. एकदा चांगली असलेली संस्कृती एखाद्या रानटी समुहा बरोबरीच्या युद्धात जर हारली तर त्यात होणारे बदल हे त्या संस्कृतीला त्याकाळाच्या मागे नेणारे ठरतात तर प्रगत समुहाबरोबर युद्धात हारली तर पुढे नेणारे ठरतात.

भारताची संस्कृती म्हणजे काय? ती ह्या जडणघडणीतून मुक्त असेल काय? उत्तर साहजिकच नाही असे येते. ज्ञात कालापासून ते आजपर्यंत आपली संस्कृती बदलत गेली आहे, कारण मुल्ये ही त्या युगापुरती असतात हे आपण आधीच मांडले आहे, तसाच परकीय आक्रमणाचा देखील आपल्या संस्कृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
वैदिक कालखंड जर शून्य असे पकडले तर त्यानंतर जैन धर्म स्थापना, बौद्ध धर्म स्थापना हे वैचारिक बदल तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमणे आपल्या संस्कृतीने पचविली आहेत. त्यातिल पहिले दोन बद्ल हे वैचारिक होत, मानसिक उन्नती साठी झालेले हे बदल आहेत, ही प्रगती आध्यात्मिक तत्वज्ञान मांडणारी व संस्कृतीच्या आध्यात्मिक बाजूला उन्नत करणारी होती तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमने तत्कालिन भारतीय संस्कृतीपेक्षा हीन दर्जाच्या संस्कृती होत्या, रानटी अवस्थेतून त्या बाहेर पडून त्यांनी भौतिक प्रगतीची द्वारे खुली केली होती. भौतिक प्रगती पूर्ण झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती सुरु होणे ही गरजेच्या तत्वात तेवढे चपखल बसत नाही, त्यामुळे ह्या हीन संस्कृतीचा संकर इ स पूर्व कालात व्हायला सुरु झाला होता.

कार्ल मार्क्स म्हणतो की आर्थिक प्रगती हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण आहे. आर्थिक प्रगती झाली असेल तर इतर गोष्टी जसे कला, धर्म, आध्यात्मिक प्रगती, ह्या संस्कृतीच्या दुसर्‍या भागाची प्रगती व्हायला सुरु होते.

थोडक्यात संस्कृती म्हणजे काय व तिची जडणघडण कश्याप्रकारे होऊ शकते ते आपण पाहिले.

इतिहासाची आपली ओळख होतेच मुळी हडप्पा व मोहजंदारो ह्या गावांच्या नाववरुन.

लहानपणी कधीतरी आपण हे दोन नावं ऐकतो व त्यावरुन ठरवतो भारत फार प्रगत होता. हे खरे असावे काय? त्यास प्रमाण काय? येथील लोकं खरेच प्रगत होते की इतर विद्वजन आरोप करतात तसे भारत कधीच प्रगत नव्हता हे आपण येत्या काही लेखात पाहू.

मोहजंदारो ह्या शब्दाचे दोन तीन अर्थ विद्वान लावतात. मोहन जं दारो म्हणजे हे गाव कृष्ण संबंधित असावे, मोहन हे कृष्णाचे नाव आहे. व माउंड ऑफ डेड म्हणजे जिथे अनेक लोकं एकाच वेळी गाडले गेले.
हडप्पा व मोहजंदारो येथील उत्खननात अनेक गोष्टी सापडल्या, जसे लोखंड धातू, पाण्याचे नियोजन, घरांचे नियोजन, रस्ते, विविध मुर्ती, आयुर्वेदाच्या दॄष्टिने निंब, शिंग, काही वनस्पती, इ इ त्यात सध्यापुरते जास्त खोलात न शिरता आणखी एक महत्वाची गोष्ट सापडली ते म्हणजे मृत शरीर. कार्बन डेटिंग करुन ती ४५०० ते ५००० वर्षांपूर्वीची असावित असे गृहित धरन्यात येत आहे तसेच मृतांचे कारण अतिपूर व युद्ध हे देखील कळत आहे. ह्या सापडलेल्या प्रेतांवरुन मानववंशासंबंधी काही अनुमान बांधता येतात, म्हणून ती जास्त महत्वाची. त्यातील काही प्रेते ही मंगोलाईड व काही द्रविड मानववंशाची होती असे निश्चित झाले आहे.

आता थोडक्यात आपण आर्य आक्रमणाकडे पाहू. म्हणजे आर्य आक्रमण झाले वा झाले नाही ह्यात अनेक मतभेद आठळून येतात. आपण तुर्तास झाले व नाही झाले ह्या दोन्ही बाजू पाहू.

सिंधुसंकृती हडप्पा, मोहजंदाडो ह्या तत्कालिन प्रगत संस्कॄती अचानक नाहीश्या का झाल्या असाव्यात ह्याचे कारणं स्टॅनली वोलपार्ट सारखे अमेरिकन इतिहासकार आर्य-अनार्य ह्या युद्धामुळे झाल्या असे म्हणतात. हडप्पा वगैरे प्रगत असल्या वर धातूंचे त्यांनी संशोधन केले असले तरी त्यांना घोडा हा प्राणी माहीत नव्हता व आर्यांकडे घोडा हा धावणारा प्राणी असल्याकारणाने युद्धात ते वरचढ ठरले. तत्कालिन आर्य समाज हा हडप्पा संस्कृतीपेक्षा अतिशय मागास पण युद्धात प्रविण होता. हडप्पा हे शहर पाण्याखाली आले, त्याचे कारण स्टॅनली असे देतात की आर्यांनी हडप्पावाल्यांच्या पाणी साठवून ठेवायच्या साधनांना फोडले व त्यामुळे पूर येऊन हडप्पा बुडाले व अनेक मृतदेह विचित्रावस्थेत त्यामूळेच सापडतात. आर्यदेव इंद्र ह्याने एक युद्ध केले होते, सतत २१ दिवस हे युद्ध चालले व पाण्यामुळे इंद्र जिंकला ह्याचे वर्णन पुराणात आहे, स्टॅनली ह्यांचामते हे युद्ध म्हणजेच आर्य व हडप्पा ह्यांचे युद्ध जे इंद्राने पाण्याचा वापर करुन जिंकले. ह्या युद्धवर्णनात इंद्र सोमयाग करतो असे वर्णन ही आहे. म्हणजे आर्यानी एकजात अनार्यांची कत्तल केली त्यामुळे माउंड ऑफ डेड निर्माण झाले. ही झाली एक बाजू, पण तर्क असा की सर्व जुन्या संस्कृती ह्या पाण्याच्या शेजारी वसत. नदिला अचानक पुर आल्यामुळे ह्या संस्कृती नष्ट झाल्या असाव्यात. त्यामुळे ही गावं नष्ट का झाली ह्याचे निश्चित कारण नाही. पण सिंधूसंस्कृती मधील ह्या दोन महत्वाचा संस्कृती, ज्या प्रगत होत्या. आर्य आले असले तरी त्यांनी त्यांचा वाहना (घोड्या) बरोबरच ह्या संस्कॄतीतील काही भौतीक बाबी आत्मसात केल्या असे वादासाठी गृहित धरायला हरकत नसावी.

१९३३ मध्ये डॉ गुह ह्यांचा संशोधनाखाली भारतातील मानववंशाची अधिकृत माहिती -
भारतात मुख्यतः सहा मुख्य भारतवासी वंश आहेत / होते ते म्हणजे.
१. नेग्निटो
२ प्रोटो ऑस्ट्र्लॉईड
३ मोंगोंलॉईड
४ भुमध्यसमुद्रीय
५ पश्चिमी पृथकपाली
६. नॉर्डिक

सध्या नेग्निटो हा वंश केवळ अंदमान निकोबार मध्ये आहे. मोंगोंलॉईड हे भारताचा पूर्व भागात (मेघालय, आसाम, मनिपुर,नागालँड इ ) आजही आहेत. भुमध्यसमुद्रीय वंशाचे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतीय किंवा द्रविडी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर नॉर्डिक हे लोक युरोपमधून टोळ्यांनी आले व त्यांनी आपली संस्कृत भाषा सोबत आणली व इ स पूर्व २००० ते १२०० ह्या दरम्यान ते कधीतरी किंवा समुहाने येत राहिले पंजाब, राजस्थान, गंगेचा दुआब, महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण ह्या लोकांमध्ये नॉर्डिक अंश विशेष प्रमाणात दिसतो. असा एक मतप्रवाह आहे.
ऑस्ट्रलॉईड वंशाने कृषिपद्धती शोधली असे माणले जाते, पण त्याचवेळेस मोहजंदारो व हडप्पा येथेही कृषीपद्धत विकसीत झाली होती ह्याकडे कधी कधी दुर्लक्ष होते. विद्वजनांमध्ये अनेक मुख्य व उपमुख्य मतप्रवाह आढळून येतात. हळद कुंकू, नौकानयन, अवजारे, बूमरॅंग, सुपारी, उसाची साखर काढने, कापसाचे कापड तयार करने, मानवास उपयुक्त प्राणी पाळणे, नारळ,सुपारी ह्यांचा पुजेची साधने म्हणून वापर करने, मरणोत्तर जीवनावर भाष्य, पुनर्जन्माची कल्पना इ इ गोष्टी ह्या ऑस्ट्रलॊईड लोकांच्या देणग्या होत असे माणले जाते.

हडप्पा व मोहजंदारो येथील नमरचनाकार लोकांची भाषा द्रविडी होती का? ह्याचा निश्चित पुरावा नसला तरी तेथे नॉर्डिक प्रेत अजूनही सापडले गेले नाहीत (शेवटचे उत्खनन १९६४) त्यामूळे हडप्पा संस्कृती आर्य नव्हती हे मात्र निश्चित आहे.

भाषा संस्कृती : ह्यावर खूप मोठे संशोधन केले जात आहे. संस्कृत, पाली, अर्धमागधी, अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री इ भाषा बोलल्या जात असत. ऋग्वेदात दास व दस्यु या नावांचे अनार्य पण आर्यांशी स्पर्धा करणारे मानवगण आढळतात, तसेच दास व दस्यु इराणातही होते. त्या भाषेत दास चे दहए व दस्यु चे दंह्यु वा द्क्यु असे रुपांतर आढळते. दंह्यु म्हणजे शत्रुदेश. देशनामे व जननामे (म्हणजे पांचाल, कुरु, काशी, कोशल, विदेह, मत्स इ इ) ही एकच असल्यामुळे त्या त्या मानवसमुहाला ती ती नावे प्राप्त झाली. आर्यसत्ता सगळीकडे स्थापन झाल्यावर दह्यु ला दास हे नाम प्राप्त झाले. दास म्हणजे गुलाम. शमर, शुष्ण, चिमुरि, धुनि इत्यादिंना इंद्राने जिंकले असे ऋग्वेदात म्हणलेले आहे. व त्यांना ऋग्वेदात दस्यु हे विशेषन देखील लावले आहे. पराभूत जनता आर्यावर हल्ले करत म्हणून नंतर दस्युंना चोर ही सज्ञाही प्राप्त झाली. वरिल पराभूत जमाती ह्या रानात पळून गेल्या.

ऋग्वेद कोणाची देन?
- संस्कृत भाषा व संकर भारताबाहेरील पश्चिमेकडील (म्हणजे युरोप ) भाषात ट, ठ, ड, ढ, ण, ळ हे वर्ण नाहीत पण वेदात हे वर्ण आहेत. ह्याचे कारण निट समजू शकले नाही पण हे द्राविडांच्या संकरामुळे हे वर्ण आले असावेत व आधीच्या लढायांनंतर हे दोन्ही समाज एकत्र निवास करु लागले असावेत असा तर्क आहे. ऋग्वेदाची भाषा हा संकर निर्माण झाल्यावरची आहे. ऋग्वेद ऋचा संस्कृत भाषेवर अनेक संस्कार निर्माण झाल्यावर तयार करण्यात आल्या आहेत. म्हणूनच वेद हे फक्त आर्यांची देण आहेत हा समज खोटा ठरतो.

टीप :
१.हा लेख मुख्यतः स्वअभ्यासाने मांडला आहे. वॉलपार्टचे तसेच अनेकांची ह्या विषयावरील अनेक पुस्तकं वाचली आहेत पण हा लेख लिहीताना ती पुस्तकं समोर नाहीत, तर जमा केलेली माहिती परिक्षेत पेपर लिहताना आपण जशी लिहतो तशी सहज लिहली आहे, जो प्लो आहे तो परत संदर्भासाठी डिस्टर्ब न करता मनात जसे आले ते उतरवले आहे, पण ह्यातील प्रत्येक वाक्याला माझ्याकडे आधार आहे.
२.भाषा, मानववंश व संस्कृती म्हणजे काय हे लिखाण तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ह्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास ह्या पुस्तकातून मला आकलन झाले त्याप्रमाणे घेतला आहे.

वरील दोन्ही कारणांमूळे काही त्रुटी राहण्याची शक्यता जास्त आहे पण ह्या लेखमालेचा उद्देश अभ्यास ग्रंथ म्हणून माहिती मांडणे हा नसून ह्या विषयाची तोंडओळख व्हावी हा आहे. हा विषय खोलात जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी ह्यावर स्वतःचा असा अभ्यास करणे आवश्यक आहे. चूक निदर्शनास आणून दिली तर मी जरुर ते बदल अवश्य करेन.
विचार मांडणे हा उद्देश असल्यामुळे व जात्याच शुद्धलेखनाचा अभाव असल्याने शुद्धलेखनाच्या य चुका आहेत ह्याची मला खात्री आहे, त्या सांगितल्या तर ते शुद्धरुपात प्रसिद्ध करता येईल.

वेदकालीन संस्कृती भाग २

प्रकार: 

केदार,
लेखमालेची कल्पना छान! पण मला वाटतं थोडं थांबावं.. यासाठी की हिंदू बा.फ. वर या संदर्भातील बरेच मुद्दे अन काही चांगले प्रश्ण्/प्रतिक्रीया येवून गेल्या आहेत्/येत आहेत. माझ्या मते त्यातून काही नाही तरी किमान एक चांगले संकलन निश्चीत करता येईळ जे या लेखमालेत देता येईल. (हवं तर तुला मदत म्हणून याची रूपरेषा मी तयार करतो)
असो. शेवटी निर्णय तुझाच आहे.
आभारी.
योग

लेख आवडला. या संदर्भात डॉ. चिं. ग. काशीकर यांचे वैदिक संस्कृतीचे पैलू हे पुस्तक वाचनीय आहे.

चांगले लिहिले आहेस केदार.. उरलेल्या भागांकरिता तुला शुभेच्छा. तू पुस्तकातून पाहून पाहून न लिहिता अभ्यास करुन मग मनानी लिहितो आहे त्यामुळे लेख आणखीन आवडला. तू चित्रांचा पण वापर करू शकतोस असे मला वाटते.

ऑस्ट्रलॉईड वंशाने कृषिपद्धती शोधली असे माणले जाते, पण त्याचवेळेस मोह़जोदार व हडप्पा येथेही कृषीपद्धत विकसीत झाली होती ह्याकडे कधी कधी दुर्लक्ष होते. >> हे दोन्ही वंश आज भारतातल्या कुठल्या प्रदेशात आहेत?

वाचतोय..इंटरेस्टींग आहे माहिती. पु.ले.शु. Happy
वॉलपार्टचे व अनेकांचे ह्या विषयावरील अनेक पुस्तकं वाचली आहेत >>>> त्या पुस्तकांचे रेफरंस देता आलेत तर उत्तम होइल असे वाटते.

केदार. छान सुरवात. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता लिहिले आहे, ती एक महत्वाची बाब.
शुद्धलेखनासाठी माझ्यासकट इथे अनेक जण मदत करतील. हे लेखन कायम राहणारे असल्याने, ते शुद्ध असावे, असे वाटते.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

योग - हो थांबलेले बरे नाहीतर येथील मुद्दे घेऊन तिथे सुरु होणारे कमी नाहीत.
दिनेश बरोबर आहे म्हणूनच तो मुद्दा मी उपस्थित केला.
नंद्या - शुद्धलेखनाबद्दल पेशल धन्यवाद.

माधाव कालौघात हे दोन्ही वंश आता नामशेष झाले आहेत असे अभ्यासकांचे म्हणने आहे. ह्यावर मी अजून माहिती मिळाली तर टाकतो. Happy

आर्बिट ही ती पुस्तकं.
वैदिक संस्कृतीचा इतिहास - लक्ष्मणशास्त्री जोशी
A New History of India - Stanley Wolpert
Cambridge History of India
प्राचिन भारताचा इतिहास - राजवंचीकर
माझ्याकडिल उपनिषदे व वेळोवेळी वाचलेले अनेक संदर्भ ग्रंथ व पुराणे ज्यात मिळणारी भारतीय राजे व समाजजीवना बद्दलची माहिती.
काशीकरांच्या पुस्तकाचा उल्लेख वाचला आहे, पुस्तक नाही. मिळवून नक्की वाचेन.

खरे तर यातल्या, प्रत्येक मुद्यावर स्वतंत्र लेखन करता येईल. उदा आर्याना पाण्यांची साठवण करणे, (उदा बांधारा ) मान्य नव्हते, म्हणून इंद्र धरणे फोडत असे. याचा संबंध मी गोवर्धन उचलण्याच्या कथेशी पण लावलेला वाचला होता.
नारळ वाढवणे, याचा संबंध नरबळीशी जोडलेला वाचला होता. या लेखनावर मोकळ्या मनाने चर्चा होईल, अशी आशा करतो.

दिनेश अगदी मनमोकळे पणाने, मग ह्यात ब्राह्मण दोषी असो वा इतर कोणी. पण चर्चा करताना लेखकाने (पोस्टच्या) हे भान ठेवावे की कर्मकांड व अंधश्रद्धा ही नंतर निर्मान झाली असण्याची शक्यता आहे. प्रत्येक संकरानंतर संस्कृती वेगळे वळन घेते.

यू कान्ट हाईड अ‍ॅन्ड यु कान्ट रनअवे फ्रॉम युवर पास्ट!! अन्यथा ती स्वतःची फसवणूक ठरेल. आणि गंमत अशी आहे की ९९ टक्के भारतीयांना आपला पास्ट कसा होता हेच माहित नाही, फक्त विमानाची गोष्ट निघाली की हेच आत्ता ओरडणारे भारतीय आम्ही विमान डेव्हलप केलं होतं हे छाती ठोकून सांगतात. पण संस्कृती मध्ये जातियता / वर्णभेद नव्हते, सर्वांना समान संधी काही शतकांपुरत्या का होईना होत्या हे मात्र विसरले जाते. मग आहेच मी ब्राह्मण, मी ९६ कुळी अन तुम्ही हिंदू.

>पण संस्कृती मध्ये जातियता / वर्णभेद नव्हते, सर्वांना समान संधी काही शतकांपुरत्या का होईना होत्या हे मात्र विसरले जाते. मग आहेच मी ब्राह्मण, मी ९६ कुळी अन तुम्ही हिंदू.
अगदी बरोबर... भागवत पुराणातही याचा उल्लेख आहे की एकच वर्ण एकच धर्म एकच देव अन सर्वांना समान अधिकार.

सगळी नविनच माहिती आहे, वाचतोय. भाग असे आटोपशीरच ठेवले तर फार बरं होइल. आणखीन लांबी वाढली तर वाचायचे राहुन जातात.

केदार.. काय करणार इतिहासाची पुस्तकच मुळात विचारपूर्वक सर्व समावेशक बनविली होती.. स्वतः त्या इतिहासकारांनी सुद्धा हे मान्य केले आहे कि जसे च्या तसे इतिहास न सांगता 'काही निवडक' गोष्टी वेचून पुस्तक बनविली आहेत..त्यात बाकी पुस्तक म्हणाल तर मुळात गोर्यांनी कालवण करून लिहिलेला इतिहास जास्त. बाकी मग अशी ऐकीव वाचीव माहिती . त्याच्या जोरावर.. किती छाती ठोकणार..

हो प्रित आणि म्हणूनच शालेय इतिहासाच्या परे जाउन जे शोध घेतात ते पाहायला पाहिजे, त्यातही मग जदुनाथ सरकार सारखा इंग्रजांना विकलेला इतिहासकार निघतोच. मी ह्यापूर्वीही मराठा इतिहासावर थोड लिहलं आहे, बर्‍याच लोकांनी मला असे सांगीतले की अरे ही माहिती खरी आहे का? मी पहिलेंदाच ऐकतोय वगैरे. कारण शाळेत शिकलेला इतिहासात ते नाही. तुम्ही म्हणता तसा फोर्जड इतिहास ! हे चालायचेच. सगळे इतिहासकार मात्र खराब नसतात, १० पण ७ जनांना जे मत मान्य ते आपण मान्य करावे, मग ते आपल्या मताच्या विरुद्ध असले तरी. फक्त चिकाटीने त्या १० मताची त्याच विषयावरील पुस्तके मात्र वाचावी लागतात, अन्यथा शिवाजी लुटारु होता, त्याने सुरत दोनदा लुटली हे लगेच पटायला वेळ लागत नाही.

आर्यांचे भारतावरील आक्रमण - ही आपल्या डोक्यात पक्की बसलेली कल्पना! हा तसे अधूनमधून इमेलवरून काहीबाही यायचे ही कल्पना चूकीची असल्याबद्दल! पण स्वैर भटकणारी एमेल ती त्याला कितीसे महत्त्व द्यायचे असे म्हणून 'आक्र्मणेव सत्यं एमेल मिथ्या' असेच व्हायचे माझे - अगदी आत्ता आत्तापर्यंत! पण काही कारणाने या विषयाची माहिती काढावी लागली आणि इतिहास कसा फिरवला जातो याची कल्पना अली.

संस्कृत भाषेत आर्य शब्दाचा अर्थ 'सुसंस्कृत व्यक्ति'. आर्य ही एक जमात्/वंश होता हा सिद्धांत मांडाण्यात आघाडीवर होता जर्मन विचारवंत मॅक्स्मुल्लर! ठीक आहे! एका शब्दाचे कधी कधी एकाहून जास्त अर्थ निघू शकतात. असेलही आर्य नावाचा वंश. पण मग ज्या आर्यांनी इतके श्रेष्ठ साहित्य्/इतिहास लिहिला त्यात ह्या स्थलांतराचे वर्णन कुठेच सापडत नाही. मध्य युरेशिया ते भारत हा नक्कीच लक्षणीय प्रवास होता मग इतके लिखाण करणार्‍या आर्यांनी त्या प्रवासाचे अनुभव कसे नाही लिहिले?

मॅक्स्मुल्लरने आर्य भारतात येण्याचा काळ इ.स.पूर्व १५०० सांगितला आहे. आणि संस्कृत ही आर्यांची भाषा आहे ह्यावर तो ठाम आहे. पण वैदीक साहित्यात, जे संस्कृतमध्ये लिहिले आहे (आणि ते आर्यांचेच आहे हे मॅक्स्मुल्लरला मान्य आहे), आढळणारी भौगोलीक परिस्थीती त्या कालात भारतात अस्तित्त्वात नव्हती. ह्या मुद्द्यावरून काही संशोधकांनी वेदांचा उगमही भारताबाहेर झाला असे मत मांडले. त्यांच्या म्हाणण्याप्रमाणे वैदिक साहित्यात ज्या दोन पश्चिमवाहिनी नद्यांचा संदर्भ येतो (सरस्वती आणि सिंधू) तशा नद्या भारतात अस्तित्वात नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रदेश आमु दर्या ह्या रशियात असलेल्या नदिच्या काठावर होता. म्हणजे ते आर्यांचे मूळस्थान आणि वेदांचा उगमही तिथलाच. ३-४ वर्षांपुर्वी मटामध्ये या आशयाचा लेखही आला होता आणि मी त्या लेखकाच्या विद्वत्तेने प्रभावित पण झालो होतो. Happy पण हल्लीच सॅटेलाईटने काढलेल्या फोटोवरून सरस्वती नदीचे पात्र (आता ते कोरडे आहे) भारतात आहे हे सिद्ध झाले आहे. म्हणजे वेद हे भारतातच निर्माण झाले. आणि ते पण इ.स.पूर्व १५०० च्या बर्‍याच आधी. म्हणजे मॅक्स्मुल्लरचे म्हणणे चूकीचे ठरते.

पुढच्या वेळेस सरस्वतीबद्दल लिहीन. केदार तुझ्या पानावर हे लिहिल्याबद्दल दिलगीर आहे.

माधव दिलगीरी काय त्यात.

हो लुप्त सरस्वती सापडली आहे.
ह्या विषयात कालपरवा पार्लेबाफवर मी उषा सुक्ताबद्दल लिहले. उषा सुक्त म्हणजे सुर्योदयाचा आधी पॄथ्वीचा सुर्याबरोबर चाललेला खेळ. हे वर्णन अरोरांचे ( Borealis) आहे. गुगलवर ह्याचे कित्येक फोटो दिसतील. भारतात अरोरा दिसत नाहीत (नॉर्थ पोलवर दिसतात) त्यामुळे अगदी लोकमान्य टिळक पण ही भुमिका घेतात की आर्य भारताबाहेरचे.
बरं आता पोल शिफ्ट झाले असावेत असेही शास्त्रज्ञ माणत आहेत, त्यावर एक पेपर मी वाचला होता. हे खरे असले तर मुळालाच धक्का बसेल.
दुसरी गोष्ट अशीकी त्यासुक्तातही वरिल वर्ण ट, थ, द, ण, ळ हे आहेतच. आणि ते वर्ण युरोपियन भाषेत नाहीत ! थोडक्यात लोकमान्यांना जे खरे वाटले, वा इतर इंग्रजी अभ्यासकांना ते खरे वाटले ते खरे असेलच असे नाही. कारण भाषेसंबंधी रिसर्च अजूनही चालूच आहे.

शिवाय तू म्हणल्याप्रमाणे प्रवास वर्णन कुठेही नाही, एवढेच नाही तर इतर देशात संस्कृत भाषा तोडक्या मोडक्या स्वरुपातही नाही. अन्यथा ह्या वर्णाशिवाय मिळती जुळती भाषा दिसली असती.
इंग्रजी विद्वानांनी गुलाम भारतीय एवढे प्रगत नसावेत त्यामुळे हे ठोकून दिले आहे असे वाटते. नॉर्डिक लोक आले हे सत्य असले तरी त्यांचाकडे लिखत भाषा असावी असे मला वाटत नाही, उलट त्यांनी आधिच्या काही लढायांनंतर येथील मुळ रहिवश्यांशी जुळवून घेतले व त्या संकरातून अनेकविध गोष्टी निर्माण झाल्या हे माणन्यस बराच वाव आहे.

पुढच्या लेखात ऋग्वेद अन त्या आजुबाजूचा कालखंड हे मांडेल. आणि सरस्वतीबद्दल विचार ऐकायला आवडतीलच हे सांगायला नको. Happy

शाळेत इतिहास आणि भूगोल हा जोड विषय असायचा पण त्याचा परस्पर संबंध कधी जोडलाच गेला नाही.
त्या काळात ज्या नद्या वाहत्या होत्या, त्याच्याच आजूबाजूला संस्कृति रुजल्या. आणि निसर्ग कोपल्यावर त्या लयाला गेल्या. हे अगदी मायन संस्कृति बाबतही खरे आहे.

साधे पक्ष्यांचे / किटकांचे स्थलांतर घ्या. ज्या काळात हिमयुग होते त्या काळात पक्षी व किटक इतका लांबचा प्रवास करत नसत. तो टप्प्याटप्प्याने वाढला. तसेच इथे जे लोक होते त्यांचाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती होती, म्हणुन त्यांचा विकास झाला आणि बाहेरुन आलेल्यांना ती नवीन होती. आणि जे बाहेरुन आले, त्यांच्या प्रदेशात इतकी विपुलता नव्हती. ( ती असती तर कशाला आले असते ते ? )

त्यामूळे या पैलूचा पण लेखनात विचार व्हावा.

आमच्या इथे एक अभ्यासक आहे जे या विषयावर अगदी झपाटल्या सारखे वाचतात.. त्यंच्या मते मक्स्मुलर हा xxxxxkhor आहे.. त्यांनी जेवढी आपल्या इतिहासाची हानी केली तेवढी कोणीच केली नाही ..असो तर ब्रीतीशांमध्ये सुद्धा दोन भाग होते.. एक अतिशय हुशार अभ्यासक वर्ग ज्यांना आपली संस्कृती जाणून घ्यायची होती ..( कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता कि .. आपण जे शोध लावतो आहे ते सगळे आधीच . साधा उदाहरण म्हणजे .. ब्रेन चे चार भाग आहेत .. हे मेदिकॅली एवढाच प्रुव करू शकले आहेत .. पण गौतम बुद्धांनी (प्रथम त्यांनी शोध लावला के ते अजून माहिती नाही) सांगितला आहे सात भाग नक्की आहेत आणि त्यात हि बरेच उपभाग आहेत) .. आणि दुसरा वर्ग होता जो स्कॉलर पण राजकीय होता.. ह्या दुसर्या वर्गाला अजिबात जगाला कळू द्यायचा नव्हता कि एशियन देशात अशी काही प्रगत संस्कृती आहे .. तर ह्यांनी जी पुस्तक लिहिली त्यात आर्य इकडून आले तिकडून आले असा लिहील आहे .. आणि खूप प्रयत्न केला कि पहिल्या भागातल्या अभ्यासकांची सगळी मत खंडून काढायची.. म्हणून त्यांनी तथाकथित गोष्टी लिहिल्या आहेत
तर हि पुस्तक दुर्मिळ आहेत .. त्या पुस्तकांची यादी मिळेल का मी बघेल आणि इथे टाकेल. त्यांना आम्ही सगळे जन ब्लोग लिहायला सांगतो आहे जेणे करून सगळ्यांपर्यंत हि माहितीपोहोचेल..

सगळे इतिहासकार मात्र खराब नसतात>>>खराब चा प्रश्नच नाही .. भारतात फाळणी नंतर इतके भयंकर प्रकार घडल्यावर आणि बुद्ध धर्म नव्याने पुनाराज्जीवन .. ह्यामुळे मोठा यक्ष प्रश्न होता..पाठ्य पुस्तके लिहावी कशी .. हे सगळा जाणीवपूर्वक केला आहे असा म्हंटल्या जातं.. सगळेच निर्णय चुकीचे आहेत किवा ते लोक वाईट आहे हे नाही म्हणू शकत आपण .. त्या वेळी ते योग्य असेल हि बहुदा.. असो इथे विषयांतर नको .. तुम्ही लिहित राहा ..

Pages