माझी ऑफीसची डायरी - ७ ( अंतिम )

Submitted by भूत on 17 June, 2010 - 08:00

माझी ऑफीसची डायरी - १ - ५ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/16803
माझी ऑफीसची डायरी - २ - ७ जुन २०१० सोमवार http://www.maayboli.com/node/16841
माझी ऑफीसची डायरी - ३ - ८ जुन २०१० मंगळवार http://www.maayboli.com/node/16868
माझी ऑफीसची डायरी - ४ - ११ जुन २०१० शुक्रवार http://www.maayboli.com/node/16974
माझी ऑफीसची डायरी - ५ - १२ जुन २०१० शनिवार http://www.maayboli.com/node/17010
माझी ऑफीसची डायरी - ६ - १३ जुन २०१० रविवार http://www.maayboli.com/node/17041

मी शांत पणे उठुन बाहेर गेलो चिंटुला कडेवर घेतले , अन आत यायला लागलो ...सीसीडीच्या त्या काचेच्या दरवाज्या मागुन माझे लक्ष आमच्या टेबल वर गेले
" रीमा , निशा , सई .... "
" रीमा डोळे पुसत होती , निशा बोलत होती , अन सई .... सई गोखले ...जी एम ... १० वर्षांपुर्वीची माझी प्रेयसी ... आताची माझी बॉस ....ते सारं शांतपणे ऐकत होती !!!

मी चिंटुला घेवुन आत टेबलपाशी आलो , सईने माझ्या कडे वळुन पाहिले , रीमा निशा दोघींचेही डोळे पाणावले होते ... सई उठुन उभी राहीली अन अचानक तिने मला घट्ट मिठी मारली ..... " ओह्ह प्रसाद , आय ऑलवेज लव्ह यु ...ऑलवेज ...तु कसा ही असलास तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे ...निरपेक्ष ...निर्व्याज्य ...अगदी तु म्हणतोस तसच ....आनंद ....केवळ आनंद !!"

रीमा ,निशा , 'येवढं सगळं कळुनही ही कशी काय प्रेम करते याच्यावर' ह्या विचारत गुंगुन गेल्या होत्या ... हेच का ते खरं प्रेम ...प्रसाद म्हणतो ते .... आनंद... केवळ आनंद... हाच का तो ? निशाच्या चेहर्‍यावर अनेक प्रश्नांची दाटी झाली होती .....रीमा तर जणु पुर्ण हरवुनच गेली होती कदाचित काल मी जे काही सांगितलं ते प्रेम हेच की काय याचा विचार करत होती .

त्या सार्‍या शांततेचा भंग करुन मी म्हणालो ...
" रीमा , निशा , ओळख करुन देतो ... ही माझी "ही" ................. Mrs. प्रसाद !!!

*****************************************************************************************************************

२३:५५
डायरी लिहुन झाली तेव्हा बराच उशीर झाला होता , ही अन चिंटु प्रवासाने थकल्याने कधीच झोपले होते ...

मी बाहेर ग्यॅलरीत आलो...पाउस नुकताच थांबला होता ...मंद वारा वाहत होता ... नेहमी प्रमाणे एक मार्लबोरो शिलगावली अन माझ्या आय पॉड वरची जुनी क्लासिकल मराठी अगदी मंद आवाजात लावुन ऐकत शांत उभा होतो ........

" सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
.
.
रासक्रिडा करी सावनमाळी हो...
रासक्रिडा करी सावनमाळी हो.SSSSSSSS
.
सखे होतो आम्ही विषय विकारी ...होतो आम्ही विषय विकारी .
टाकुन गेला तो गिरिधारी ...टाकुन गेला तो गिरीधारी
.
.
कुठे गुंतुन बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?

संपुर्ण .

(डिस्क्लेमर :
१ ) ह्या लेखातील सर्व विचार लेखकाचे वैयक्तिक अनुभव नसुन केवळ कल्पनाविलास आहे .
२) ऑफीस मधील अनुभवांवर आधी एक लेख वाचला होता , त्याचा याच्याशी कण मात्र संबन्ध नाही ( तो ऑफीसमधल्या कामाला वैतागलेल्या एका कामचुकाराचा लेख होता , ही ऑफीस मधील वर्कोहोलीक मानसाची डायरी आहे .
३) कोणाला यालेखातील काही वर्णनांचे त्याच्या ऑफीसशी सार्धम्य वाटले तर तो एक निवाळ योगायोग असुन लेखातील वर्णनाच्या सार्वजनीनतेचा पुरावा असे म्हणता येइल !)

******************************************!!इतिश्रीकृष्णार्पणमस्तु !! ******************************************

गुलमोहर: 

<<<<मी स्वतः एका विवाहितेच्या एवढ्या जवळ गेले नसते.>>>>
सहाजिक आहे........!

जेव्हा जेव्हा आपल्या "अस्तित्वाचा" प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तेव्हा "अवतार" घेऊन देवानी धर्म अधर्माचा खेळ करत आपल्या पेक्षा वरचढ ठरु पाहणार्‍याला पद्धतशीर्पणे सम्पवले....मग तो बळीराजा असो, रावण असो किन्वा इतर कोणी......सारे काही घडले ते आपले "अस्तित्व" आणि "श्रेष्ठत्व" टिकवण्याकरताच. अर्जुनासाठी एकलव्य, कर्ण यान्चा बळी हा त्यातलाच एक भाग.......
एरवी इन्द्राच्या कथाही तश्याच्.......आधी लम्पट्पणा करायचा....ऋषीमुनिच्या बायकान्वर वाकडी नजर टाकायची, अप्सरान्बरोबर क्रिडामग्न राहायचे आणि आले सन्कट कि ब्रम्हा, विष्णु, महेश आहेतच हजर्.....अ‍ॅन्युअल कॉन्टॅक्टवर.......! असो या विषयाचा आवाका आणि जागा वेगळी आहे.....

जा.जु. मस्त चर्चा होईल यावर्...तुम्ही धागा काढताय कि काढु???


पश्या.....थोडे विशयान्तर.... चु.भु.द्या.घ्या.

जाईजुई Rofl तुमची राम आणि कृष्ण यांबद्दलची मते वाचून प्रचंड करमणूक झाली. अगदी हहपुवा. Biggrin

यानिमित्ताने मला यांविषयी अधिक सखोल अभ्यास आणि/किंवा वाचन करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल आपणांस धन्यवाद. रच्याकने, एकंदर आपला धर्म आणि संस्कॄती यांचेवर पुरेशा अभ्यासा/ज्ञाना अभावी टीका आणि/किंवा चेष्टा करण्याची फॅशनच आली आहे म्हणा.

एकंदर आपला धर्म आणि संस्कॄती यांचेवर पुरेशा अभ्यासा/ज्ञाना अभावी टीका आणि/किंवा चेष्टा करण्याची फॅशनच आली आहे म्हणा.>>>>

अगदी बरोबर !!!

बाकी काहींना कळुनही वळत नाही हे ही स्पष्ट दिसतय इथे , कृष्ण देव म्हणुन मान्य आहे पण तेच प्रसाद ने केलं की ते अमान्य ....टीपीकल ड्युअल स्टँडर्ड हिप्पोक्रसी .....

( असो खूप विषयांतर होतय ......त्यात थोडी अजुन भर

शक कर्ता शालिवाहन याविषयी कोणाकडे अधिक माहिती आहे काय ..??? माझ्या अल्पशा ऐकीव माहीतीवरुन , त्याला मध्यवर्ती क्यॅरॅक्टर ठेवुन एक काल्पनिक कथा रचतोय ... हेल्प )

मंद्या आणि प्रगो, मला कृष्ण किंवा राम हे देव म्हणून मान्य नाहीत (तसाही देव ह्या संकल्पनेवर कमी विश्वास आहे) आणि मी धर्मावर टिका केलेली नाहिये.. तर एखद्या व्यक्तीबद्दलचं माझं वैयक्तिक मत सांगितलयं.

कृष्णाच्या काळी बहुपत्नित्व ही संस्कृती होती; त्यामुळे त्याच्या आठ पत्नी असण्याबद्दल मी मत मांडलं नाहिये तर १६००० जणी किंवा राधा/गोपिका ह्यांबद्दल मांडलयं. कृष्णाने राधेवर प्रेम करून संस्कृतिरक्षण केलय का? की रामाने सीतेचा २ वेळा त्याग करून धर्मपालन केलयं?

भ्रमा, तू काढू शकतोस ह्यावर बाफ. तिथे येते मी Happy

किती लोक एकाच गोष्टीची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न करताहेत हे पाहून मला मोठी गम्मत वाटायला लागलीये..
माणसाला जगण्यासाठी एक फक्त प्रेम ह्या भावनेचीच गरज असते का ?
बाकीच्या विषयी काही बोलताना कोणी दिसतच नाही कुठे Happy

जाईजुई - तुमच्या कृष्णावरच्या मुद्द्यांमधला एक खोडावासा वाटला...
मूळ महाभारतात कृष्णाने येऊन द्रौपदीची लाज राखली असा कुठेही उल्लेख नाही. उलट नंतरच्या प्रसंगात क्रोधीत द्रौपदी म्हणते त्यावेळी कुणीही माझ्या बाजूने नव्हते आणि कृष्णा तूही नव्हतास.
त्यावर कृष्णाने ते मान्य केले आहे. तो म्हणतो मी जर तिथे असतो तर द्यूत होऊच दिला नसता आणि जर युधिष्ठीर सर्वांना पणाला लावायला निघाला असता तर त्याचा वध केला असता.
(होय महाभारतात असा उल्लेख आहे...कृपया ते डोळ्याखालून घालावेत. पर्व कोणते आणि अध्याय कोणचा हे आत्ता ठीकसे आठवत नाहीये, पण मिळताच तेही इथे टाकीन).
दुसरे असे की कर्ण कोण होता हे त्याला माहीती असले तरी त्यावेळी कुंतीची त्याचा स्विकार करण्याची परिस्थिती नव्हती. अर्थात स्वतंत्र इंद्रप्रस्थ स्थापल्यावर तिला कुणी विचारणारे नव्हते पण बहुदा त्यावेळी वेळ टळून गेली होती. आणि शेवटी अगदी जेव्हा आता भाऊच भावाला मारणार त्यावेळी ते टाळण्यासाठी म्हणून बहुदा ते रहस्य उघड करण्यात आले.
आदिवासी स्त्रियांना जाळून मारताना कुणीही कृष्णाचा सल्ला घेतलेला नव्हता. ही पांडवांची युक्ती होती.

बाकी काहींना कळुनही वळत नाही हे ही स्पष्ट दिसतय इथे , कृष्ण देव म्हणुन मान्य आहे पण तेच प्रसाद ने केलं की ते अमान्य ....टीपीकल ड्युअल स्टँडर्ड हिप्पोक्रसी .....

दादा, कृष्णाचे देवपण आपण एक वेळ बाजूला ठेऊ, पण त्याने राक्षसांना मारले, नव्याने द्वारका वसविली, पांडवांना युद्धात मदत केली, भगवद्गगीता सांगितली

यातले काहीच न करता फक्त रासलीला डोळ्यासमोर ठेऊन त्याने केले तर चालते तर प्रसादनी का नाही असा शेंबड्या मुलासारखा प्रश्न विचारणे किती हास्यास्पद आहे. तुलना कुणाची कुणाबरोबर करायची याला काही हिशोब का आपलं लिहीत सुटायचं आणि वर पुन्हा कृष्णार्पणमस्तु म्हणून मोकळे...

Pages