ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपु
कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.
२ नोव्हे ला शनि वृश्चिकेत जातो. म्हणजे धनु लोकांना साडेसातीची पहिली अडिचकी चालू होत आहे

मला एकांनी सांगीतलेय की ईच्छापुर्तीचा ग्रह माझ्या पत्रीकेत आलाय जो अडिच वर्षे तिथे असेल ़़़ ़़़ ़ अस खरेच असते का ? आणि त्याची काय फळ असतात ?

ओह.. धन्स प्रकाश काका..
मग जेव्हा शनि वृश्चिकेत येईल तेव्हा वृश्चिक राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जास्त जाणवतो का?

>>मग जेव्हा शनि वृश्चिकेत येईल तेव्हा वृश्चिक राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जास्त जाणवतो का?<<
या विषयी ज्योतिषांची वेगवेगळी मते आहेत. पण असे काही नाही.
साडेसातीविषयी यापुर्वी इथे चर्चा झालेली आहे पहा http://www.maayboli.com/node/39705

प्रश्नशास्त्र का आणि कसे भाग – 8

........
.........

हा श्रद्धेचा , विश्वासाचा मामला आहे, एरवी ज्योतिषाची टिंगल टवाळी करायची आणि मग आणिबाणीची वेळ आली की चोरुन मारुन ज्योतिषाचे उंबरठे झिजवायचे असे चालणार नाही

“हमको जो ताने देते है हम खोये हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में “

“नाही , म्हणजे आपला यावर अजिबात विश्वास नाही , थोतांड आहे हे सगळे, पण काय आहे माझ्या वडीलांचा फारच आग्रह पडला, त्यांचे मन दुखावता येणार नाही ….” असे म्हणत ‘अंनिस’चे फार मोठे कार्यकर्ते माझ्याकडे प्रश्न विचारायला येऊन गेले आहेत.

उत्तरें मिळतात म्हणून सतत आलतु फालतु कारणांसाठि या दैवी शक्तींना वेठीस धरल्यास,‘लांडगा आला रे आला’ या इसापच्या गोष्टी सारखी गत होते आणि मग जेव्हा जातकाला अत्यंत निकडीची गरज असते त्यावेळी या दैवी शक्तीं जातकाकडे पाठ फिरवतात.

....
....
...

कोणते प्रश्न योग्य?

हरवलेली / चोरीस गेलेली वस्तू सापडेल / परत मिळेल का
हरवलेली /घर सोडून निघून गेलेली व्यक्ती परत येईल का
जागा खरेदि विक्री
नोकरी मिळणे
नोकरी जाणे
नोकरीत बदल
बदली होणे/ बदली झालेली रद्द होणे,
पगारवाढ , पदोन्नती
व्हॉलंटरी रिटायमेंट घेणे लाभदायक ठरेल का
परदेश गमन
विवाह योग
घटस्फोट
परीक्षेतले यश
दोन वा अधिक पर्यायांतुन एकाची निवड करणे
नोकरी का व्यवसाय
शिक्षण क्षेत्राची निवड
जागा खरेदी विक्री
जागा भाड्याने देणे घेणे
कर्ज मिळेल का
कर्ज वसुली होईल का
येणे ,थकबाकी वसूल होईल का
नोकरी व्यवसायाचे क्षेत्र कोणते
ऐकलेली वार्ता (अफवा) खरी का खोटी
कोर्टात दावा दाखल करावा का
‘क्ष’व्यक्तीशी सौदा / भागीदारी करावी का
व्यवसायातले भागीदार मला फसवत तर नाहीत ना
अपेक्षित पत्र , निरोप, पार्सल कधी मिळेल
वाट पहात असलेली व्यक्ती / रेल्वे /बस कधी येईल/पोहोचेल
फंड, विम्याचे पैसे केव्हा हातात येतील
‘क्ष’या व्यक्तीशी केलेला विवाह लाभदायक ठरेल का
संतती योग

कोणत्या प्रश्नांची उत्तरें हमखास चुकतात

आत्ता पर्यतच्या माझ्या अनुभवानुसार :

सहज सुचले म्हणून, केवळ उत्सुकता म्हणून विचारलेले प्रश्न
फुकट भविष्य सांगताहेत तर घ्या विचारुन (गाजराची पुंगी..) म्हणून विचारलेले प्रश्न
आडवळणाने , मूळ हेतू व महत्वाची माहीती दडवुन ठेवून विचारलेले प्रश्न
ज्या प्रश्नात जातकाची कोणतीही आर्थीक, शारीरीक, मानसीक, भावनिक गुंतवणूक नाही असे प्रश्न
ज्योतिषशास्त्राची टिंगल टवाळी करण्याच्या हेतुने वा ज्योतिर्विदची परीक्षा घेण्याच्या हेतुने विचारलेले प्रश्न
एकच प्रश्न त्याच अथवा दुस-या ज्योतिर्विदांना पुन्हा पुन्हा विचारला असता
ज्या प्रश्नाची उकल कशाही त-हेने झाली तरी जातकावर त्याचा काहीहि आघात / परिणाम होणार नसतो असे प्रश्न.
स्वत:चा प्रश्न दुस-याचा आहे किंवा दुस-याचा प्रश्न स्वत:चा आहे असे भासवून विचारलेला प्रश्न
‘भविष्य चुकले तर पैसे परत’ अशी वसुलीची भावना मनात ठेऊन विचारलेले प्रश्न.

उत्तरें मिळतात म्हणून एका जातकाने प्रश्नांचा भडिमार कसा केला त्याचा एक मनोरंजक किस्सा पुढच्या भागात सांगतो.

संपूर्ण लेख माझ्या व्लॉग वर पह:
http://suhasgokhale.wordpress.com/

सुहास

ज्योतिर्विदची परीक्षा घेण्याच्या हेतुने विचारलेले प्रश्न
एकच प्रश्न त्याच अथवा दुस-या ज्योतिर्विदांना पुन्हा पुन्हा विचारला असता
‘भविष्य चुकले तर पैसे परत’ अशी वसुलीची भावना मनात ठेऊन विचारलेले प्रश्न.

>>>

थोडक्यात काय तर ठोस रिझल्ट देण्याची गारंटी देणार नाही, पीअर रिव्यु करणार नाही आणि परीक्षा-पडताळणीस उभे राहणार नाही Happy

टण्या,

>> थोडक्यात काय तर ठोस रिझल्ट देण्याची गारंटी देणार नाही, पीअर रिव्यु करणार नाही आणि परीक्षा-पडताळणीस
>> उभे राहणार नाही

माझ्या माहीतीप्रमाणे वरील चाचण्यांचे पद्धतशीर आयोजन करण्यास नामवंत ज्योतिषांची हरकत नसावी. मात्र जातकाने अकारण परीक्षा (रँडम टेस्टिंग) करू नये. कारण ज्योतिष, देव, गुरू, आयुर्वेदिक औषधे, वैद्य यांच्याविषयी जसा भाव तसं फळ मिळतं.

आ.न.,
-गा.पै.

<<<कारण ज्योतिष, देव, गुरू, आयुर्वेदिक औषधे, वैद्य यांच्याविषयी जसा भाव तसं फळ मिळतं.>>>>,

पैलावान साहेब अगदि सही उत्तर !

बाकी या विषयावर अनेक वेळा चर्चा झालेलीच आहे , नवीन काही नाही.

ग्रंथ परिक्षण: Rahu Ketu Experience by Prash Trivedi

आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे.
...
...
अनुवंशिकता,पुनर्जन्म, ग्रहणें व त्यांचे परिणाम, विष, विखारी वृत्ती, क्षुद्र विचार, खोटेपणा, तंत्रमंत्र, जारण मारण, स्मशाने, मृतात्मे व त्यांचे शाप, पूर्वजन्म व त्याचे भोग, एकांतवास, बंधनयोग, पिशाच्च्य योनी, वाईट स्वप्ने, अघोरी विद्या, चेटूक, लांडया लबाडया, आक्रस्ताळी वृत्ती, विरक्ती, योगसाधना, वैराग्य, तीव्र कठोर तपश्चर्या, संतति, संततितले दोष, घराण्यातले दोष, सर्पशाप, पितृ मातृशाप, संन्याशाचा शाप, गर्भपात, गूढता, विचित्रपणा, अशा अनेक आपल्या आकलना बाहेरच्या गोष्टींशी या दोन ग्रहांचा अत्यंत जवळचा संबंध आहे,

आपल्या जीवनातल्या प्रत्येक त्रासाला, समस्येला या ‘राहू केतू’ ना जबाबदार धरता येईल इतके ‘फायर पॉवर’ पोटेंशियल यांच्याकडे आहे, असे काहीसे विनोदाने म्हणता येइल ! फक्त या ग्रहांचे ‘मार्केटिंग’ शनी / मंगळा एव्हढे झालेले नाही!
.....
...,,
हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्वक लिहला आहे यात शंकाच नाही. लेखक स्वत: I.I.T graduate Engineer असल्याने त्याचा प्रभाव ग्रंथाच्या पाना पाना वर दिसून येतो. साधारण ज्योतिष विषयांवरच्या ग्रंथात आढळणारा ‘भोंगळपणा’, ‘विस्कळितपणा’, ‘पाल्हाळ’, ‘परस्पर विरोधी विधाने’, ‘तर्कशुन्यता’, ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ , ‘विषयाचा आवाका लक्षात न घेता केलेली पोपटपंची’, ‘लिखाणातला ,कोणत्याही प्रकारची सुसुत्रता नसणे’, ‘स्वत:चा अभ्यास नसणे’, ‘क्षुल्लक , कमी महत्वाच्या बाबींवर पानेच्या पाने लिहणे व महत्चाच्या पण लेखकाला गैरसोयीच्या (म्हणजे स्वत:लाच न समजलेल्या) बाबींच्या तोंडाला पाने पुसणे’, ‘केलेल्या विधांनाच्या पुष्टयर्थ पुरेशी उदाहरणें न देणे’, ‘विषय समजावून सांगण्यापेक्षा पाने भरवण्याकडे जास्त कल’ या अशा गोष्टीं या ग्रंथात जवळजवळ नाहीत.
......
......
दुसर्‍या प्रकरणात राहू केतू चा विचार आजच्या पाश्चात्य व भारतीय ज्योतिषशस्त्रात कसा केला जातो आहे याचा आढावा घेतला आहे, कालमाना नुसार ज्योतिषांनी सुध्दा बदलले पाहिजे, जुन्या संकल्पनांचा मुळ गाभा कायम ठेवून आधुनिक काळातल्या बदललेल्या आचाराविचारां नुसार व बदललेल्या जीवन शैलींच्या अनुषंगाने भविष्य कथनाचा रोख व बाज बदलता आला पाहिजे. वेळ पडल्यास जुन्या कालबाहय संकल्पनांचा त्याग केला पाहीजे किंवा त्यात कालानुरूप सुसंगत बदल केले पाहिजेत. हयाच बरोबर वैदिक व पाश्चात्य संकल्पनांचा योग्य तो मेळ ही घातला पाहीजे..
....
....
ग्रंथातले तिसरे प्रकरण अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे वाटले, या प्रकरणात या दोन्ही ग्रहांचा Appearance, Attributes and Significance या अंगाने संपूर्ण विचार केला आहे. ‘राहू केतू’ म्हणजे काय रे भाऊ? या प्रश्नाचे इतके चांगले उत्तर देणारा दुसरा ग्रंथ नाही असे मी म्हणालो तर ते चुकीचे ठरणार नाही,

चौथ्या प्रकरणात लेखकाने ‘राहू व केतू’च्या नक्षत्रांवर खूप चांगले लिहले आहे, याच प्रकरणात राहू केतू व नवमांश कुंडलीवर भाष्य केले आहे ते इतर कोणत्याच ग्रथांत तुम्हाला सापडणार नाही.
....
....
पाचवे प्रकरण न्यूमरोलॉजी साठी आहे, माझा न्यूमरोलॉजीचा अभ्यास नाही किंबुहना मी न्यूमरोलॉजी कडे नेहमीच साशंक नजरेने बघत आलेलो आहे, पण या ग्रंथातले हे न्यूमरोलॉजी वरचे प्रकरण वाचताना मला बर्‍याच गोष्टिंचा खुलासा तर झाला तसेच या विषयाबददलची उत्सुकता ही वाढली हे मान्यच करावे लागेल. ज्यांचा न्यूमरोलॉजी चा अभ्यास आहे अथवा या विषयांत रुची आहे त्यांच्या साठी लेखकाने बरेच वैचारीक खादय पुरवले आहे यात शंकाच नाही.
....
....
आठव्या प्रकरणात राहूकेतू संदर्भातल्या काही खास योगांचा विचार केला आहे त्यात शकट योग, गुरु चांडल योग , ग्रहणें व कालसर्प योग या प्रमुख चार महत्वाच्या योगांबद्दल विस्तृत चर्चा केली आहे.

नवव्या प्रकरणात दशा व ग्रहगोचरीच्या अंगाने राहू (केतू) चा विचार केला आहे. यात राहू ची दशा ,त्यातल्या वेगवेगळया अंतर्दशा विदशांचा फारच विस्ताराने व सखोल असा विचार केला आहे, हे प्रकरण वाचल्या नंतर इतर ग्रहांच्या दशां बद्दलही असाच विचार करायची प्रेरणा मिळेल आणि असा विचार झाला तरच हे शास्त्र आपल्याला चांगले अवगत होइल असा मला विश्वास वाटतो.
.......
.......
चौदाव्या प्रकरणात लेखकाने आजच्या आधुनिक काळात राहू – केतू चा अन्वयार्थ कसा लावायचा यासाठी काही प्रातिनिधीक उदाहरणें देऊन संकल्पना सुस्पष्ट केली आहे.
.....
.....
एकंदर पाहता राहू – केतू या दोन छाया ग्रहांचा ईतका सांगोपांग विचार केलेला दुसरा कोणताही ग्रंथ माझ्यातरी पाहण्यात नाही. या ग्रथाच्या अभ्यासातून या दोन छाया ग्रहां बद्दल संपूर्ण माहीती तर मिळतेच पण त्याहूनही मह्त्वाचे म्हणजे वाचकाची स्वत:ची विचार करण्याची क्षमता विकसित होते, कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासकाला अशी क्षमता असणे व ती उत्तरोत्तर विकसित होत राहणे आवश्यक असते. अशी क्षमता एकदा का प्राप्त झाली की मग गुरु वा ग्रथांच्या कुबड्या न वापरता अभ्यासक आत्मविश्वासाने या शास्त्रात निश्चीत प्रगती करु शकतो.

लेखकाने राहू-केतू वरील ग्रथांचा अभाव भरुन तर काढलाच आहे शिवाय वर लिहलेली क्षमता निर्माण करण्याच्या हेतू ने ग्रथाची चे लिखाण व मांडणी केली आहे , यातच या लेखकाचे व या ग्रथाचे यश सामावले आहे.
...
...

संपूर्ण लेख माझ्या http://suhasgokhale.wordpress.com/ या ब्लॉग वर उपलब्ध आहे.

suhasg.

ग्रंथाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या अनुदिनीवरील लेखही वाचला. पुस्तकाबद्दल कुतूहल जागृत झाले आहे. मी जरी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक नसलो तरी चाकोरीबाहेरच्या कल्पना चाचपण्यासाठी म्हणून हे पुस्तक वाचेनसं म्हणतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

अन्वीता, अभिप्राया बद्दल धन्यवाद. (तुम्ही गेल्या वेळेला तुमच्या नावा सोबत 'जी' असा प्रत्यय लावायचा नाही अशी सक्त ताकिद दिली असल्याने 'जी' वगळला आहे, बाकी बरेच मानाचे प्रत्यय आपण बाद केले आहेत- पंडिता, विदूषी, महामहिम्न, सुश्री, बहेन इ. फक्त 'मॅडम' राहीले होते पण परवाच्या विलेक्षण मध्ये 'मॅडम' चे जे काही झाले ते बघता आता कोणाला 'मॅडम' म्हणणे गालीप्रदान करण्या सारखेच ना! )

गामा‌ पैलवान साहेब मला तुमच्या बद्दल नेहमीच कुतुहल वाट्त असते. तुमचा प्रतिसाद वाचून समाधान वाटले.

माझ्या संग्रहात ज्योतिषशास्त्रा वरचे ज्याला हार्ड कोअर म्हणता येतील असे ग्रंथ तर आहेतच त्याशिवाय ज्योतिषशास्त्र ही मध्यवर्ती कल्पना ठेऊन पण 'मानसशास्त्र'. 'परामानसशास्त्र' 'तंत्र साधना' या ज्ञानशाखांना स्पर्श करुन जाणारे काही ग्रंथ ही आहेत ,यथावकाश त्यातल्याही काही ग्रंथांची ओळख करुन द्यायचा प्रयत्न करेन.

suhasg, अभिप्रयाबद्दल धन्यवाद! कृपया मला साहेब अथवा जी इत्यादि आदरार्थी प्रत्यय लावून पुकारू नका. Happy उगीचंच वय वाढल्याचा भास होतो! Wink
आ.न.,
-गा.पै.

>>> सुहास, छान चर्चा/व माहिती! >>>>

लिंबूजी , धन्यवाद , हल्ली जरा जास्त 'बिजी' दिसताय ..चांगलैय म्हणा , पण तुमच्या सारख्या 'बुजुर्ग' (काय भारी शब्दप्रयोग आहे नै ,पण मी तो बरोबर लिहलाय ना? ) अभ्यासकां कडून नविन काही पोस्ट नै , काही नै ... एकदम सामसुम असे कसे बॉ ?

>>ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनपर शास्त्र आहे, अडचणीत सापडलेल्यांना क्षणभर का होईना दिलासा देणारे शास्त्र आहे, भविष्य बरोबर आले तर दुधात साखरच , असे दर वेळेस होईलच असे नाही, पण गेला बाजार या शास्त्राच्या आधाराने जातकाच्या मनाला उभारी देता आली तरी ती सुद्धा एक मोलाची मदतच ठरते. कारण बर्‍याच वेळा जातका पाशी तेव्हढाच एक आधार शिल्लक राहीलेला असतो.<<
सुहास जी या बाबत मात्र सहमत आहे. अशा वेळी त्याला जर वैज्ञानिक तत्वे वा दृष्टीकोण सांगण्याच्या भानगडीत पडले तर त्याला ते पचत नाही वा रुचत नाही. भरल्या पोटी तत्वज्ञान सुचते, ज्याचे जळते त्याला कळते.. असे विचार त्याच्या मनात येतात.

प्रकाशजी धन्यवाद,

वरील प्रश्न मी प्रश्न कुंड्ली वरुन सोडवला होता , या खेपेला माझ्या नेहमीच्या क्रुष्णमुर्ती पद्ध्ती ऐवजी (जास्त अचूक अशा) 'खुल्लर कस्पल इंटर्लिंक व 'युरेनियन प्लानेटरी पिक्चर्स ' ' या पद्धतीं चा अवलंब केला होता, जातक जेव्हा अत्यंत अडचणीत असतो, दबावाखाली असतो, खचलेला असतो, तेव्हाच प्रश्न विचारला गेल्यास इतकी रेझर शार्प भाकिते वर्तवता येतात.

Can someone explain the effects on all signs when Jupiter moves to Cancer on 19th June 2014.

> माझ्या माहीतीप्रमाणे वरील चाचण्यांचे पद्धतशीर आयोजन करण्यास नामवंत ज्योतिषांची हरकत नसावी. मात्र जातकाने अकारण परीक्षा (रँडम टेस्टिंग) करू नये. कारण ज्योतिष, देव, गुरू, आयुर्वेदिक औषधे, वैद्य यांच्याविषयी जसा भाव तसं फळ मिळतं.

गापॅ, त्या यादीत अजून कोणकोण आहेत ते सांगून ठेवावं म्हणजे त्यांच्यापासून दूर राहता येईल.

aschig,

मला माहीत असलेल्यांची नावं दिली. बाकी काही शंका आल्यास स्वत: प्रयोग करून पाहणं इष्ट! Happy

आ.न.,
-गा.पै.

अमावस्या म्हणजे मला तशी विश्रांती,, माझे एक मित्र नेमके हाच मोका साधून मला भेटतात , ज्योतिषाचे काम नसले तरी गप्पा भरपूर होतात. बोलता बोलता या मित्राने एका वृत्तपत्राच्या पुरवणीत आलेला लेख वाचायला सांगीतला, त्यावेळी या आमच्या मित्रवर्याच्या डोळ्यातली छद्मी चमक माझ्या लक्षात आली नाही, ताबडतोब लेख वाचायला घेतला , लेख चट्कन वाचून झाला पण त्यावरच्या प्रतिक्रिया वाचण्यातच बराच वेळ गेला ,, दरम्यान आमचे ह्या मित्रवर्यांनी माझा मार चुकवायच्या हेतूने केव्हाच पलायन केले होते. (बर्खुरदार , किधर भागते हो, अमावस्या और भी आनेवाली है)

त्या अफाट बेफाट भन्नाट लेखाची तोंड ओळख करुन देण्याच्या हेतूने एक छोटासा लेख माझ्य ब्लॉग http://suhasgokhale.wordpress.com/ वर लिहला आहे.. पण आधीच सांगून ठेवतो,, "त्या वृत्तपत्रातला लेख मी लिहलेला नाही सबब मी मार खाणार नाही., हात-पाय मोकळे करुन घेण्यासाठी आवश्यक ती लिंक माझ्या ब्लॉग वरच्या लेखात दिली आहे,बाकी आपण सर्व सुज्ञ आहातच."

प्रश्नांचा भडीमार !

प्रश्नकुंडलीच्या संदर्भात मागच्या पिढीतले महान ज्योतिर्विद कै. शांताराम केणी यांनी त्यांच्या ‘ज्योतिष सागर’ या ग्रंथात वर्णन केलेला एक मजेदार प्रसंग आठवला. तो इथे देण्याचा मोह आवरत नाही, तो प्रसंग काहीश्या संक्षिप्त (आणि संपादित स्वरुपात) असा:

“एके दिवशी एक तरुण आमच्या कडे आला व ज्योतिषी सल्ल्याची अपेक्षा करु लागला,त्याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण चालू होते व त्या प्रेमप्रकरणाने पुढची पायरी गाठली होती, दोन्ही घरांतून या गोष्टीला जबरदस्त विरोध होता, मुलीचे भाऊ धमक्या देऊ लागले होते , मुलाचे वडिल या मुलाचे लग्न त्यांच्याच नात्यातल्या एका मुलीशी जबरदस्तीने लावण्याचा प्रयत्नात होते आणि मुलीच्या बाजूचे लोक ही अशाच प्रयत्नात होते त्यासाठी त्यांनी मुलीला एका अज्ञात स्थळी हलवले होते.

इकडे या मुलीशी विवाह न झाल्यास संपूर्ण आयुष्य अविवाहित राहण्याचा त्या तरुणाचा निश्चय होता , त्या मुलीचा ही असाच निर्धार होता. या सर्व गोष्टीं सांगून त्या तरुणाने एका मागून एक अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आमच्यावर केला आणि त्या प्रश्नां बाबत ज्योतिष सल्ल्याची अपेक्षा केली. त्याचे प्रश्न असे होते.”

 1. माझा विवाह होईल की मला आयुष्यभर अविवाहित राहावे लागेल ?
 2. विवाह होणार असल्यास तो केव्हा होईल ?
 3. जिच्याशी माझे प्रेमसंबंध चालू आहेत तिच्याशीच विवाह घडून येईल का ?
 4. तिचा-माझा विवाह घडून आला तर त्या योगे आम्हाला खरीखुरी सुखप्राप्ती होईल का ?
 5. आम्हा दोघांपैकी जास्त सुखी कोण होईल? म्हणजे अघिक सुखावह आणि अधिक समाधानकारक वैवाहिक जीवन आम्हा उभयतांपैकी कोणाचे जाईल?
 6. या प्रेमविवाहा नंतर किंवा तत्पूर्ती आमच्यात बेबनाव येणार नाही ना?
 7. हा आमचा संकल्पित विवाह फिसकटणार नाही ना?
 8. हा संबंध फिसकटणार असला किंवा त्यात व्यत्यय येणार असला तर त्याची कारणें कोणतीं असतील? कोणती व्यक्ती त्या घटनेला कारणीभूत असेल मी , ती का अन्य कोणी?
 9. माझ्या किंवा तिच्या घरची हितसंबंधी माणसे किंवा अन्य हितसंबंधी व्यक्ती काहीतरी कारस्थानें करुन आमच्या प्रेमसंबंधात आणि विवाहात व्यत्यय आणतील का?
 10. या विवाहमुळे हुंड्याच्या रुपाने मला भरपूर रोकड पैसा मिळेल का?
 11. सासरची इस्टेट किंवा सासरच्या माणसांकडून मला विपुल प्रमाणात द्रव्यलाभ होईल का?
 12. आधुनिक सुखसोयींनी युक्त आणि सुसज्ज असा एखादा फ्लॅट विकत घेऊन तो मला देतील काय?
 13. त्या मुलीच्या भावाने मला जी तंबी दिली आहे त्यापासून मला धोका आहे का ? आणि त्यामुळे कोर्टदरबारादि प्रसंग निर्माण होतील काय?
 14. या प्रकरणात मला कोर्टाची पायरी चढायला लागली तर त्या कोर्टप्रकरणात मला यश येईल की माझा प्रतिस्पर्धी विजयी होऊन मला गोत्यात आणेल का?
 15. कोर्ट बाजी करण्यास हवा असलेला पैसा मजपाशी नाही अशा स्थितीत माझी बाजू यशस्वीपणे मांडणारा एखादा वकील मला मिळेल का? तो वकील प्रतीपक्षास फितूर होणार नाही ना? आणि न्यायाधीशाचा दृष्टिकोन माझ्या बाबतीत आणि या एकंदर खटला प्रकरणात कोणता राहील?
 16. यदाकदाचित कोर्टदरबारादि प्रकरण उपस्थित झालेच तर मागाहून लगेच आमच्यात समझौता होऊन खटला लढवण्याचे टळेल का?
 17. माझ्या प्रेमसंबंधातून तिला दिवस गेलेले असावेत अशी आमची कल्पना आहे, तेव्हा ती खरोखरीच गरोदर असेल का? आणि तो गर्भ नऊ महिने पर्यंत टिकेल काय?
 18. ती गरोदर असली तर ही गर्भ धारणा कीती काळापासून झालेली असावी? व तिचा प्रसूतकाल कोणता असेल ?
 19. तिच्या या गरोदरपणास प्रत्यक्ष मीच आणि एकटा मीच कारणीभूत झालेला असेन का?
 20. तिला होणारे मूल मुलगा असेल की मुलगी? ते जुळे असेल का?
 21. जन्मास येणारे हे अपत्य दीर्घायुषी असेल की बालारिष्टास बळी पडेल?
 22. जर ती सध्या गरोदर नसली तर पुढेमागे तिला गर्भधारणा होणे शक्य आहे का ? गर्भप्रतिबंधक उपायांचा यापूर्वीच अवलंब करुन तिने स्वत:ला कृत्रिम वंध्यत्व आणलेले असेल का?
 23. गर्भधारणेची शक्यता असल्यास ती धारणा केव्हा होईल?
 24. माझ्याशी प्रेमसंबंध जडण्यापूर्वी तिचा कौमार्यभंग झालेला असेल का?
 25. माझ्या व्यतीरिक्त अन्य कोणाशी तिचे प्रेमसंबंध चालू आहेत का?
 26. तसे असल्यास तिला होणार्‍या सार्‍या मुलांचे खरेखुरे पितृपद सर्वस्वी माझ्याकडेच राहील ना?
 27. आम्हा उभयतांना एकंदर किती अपत्ये होतील? त्यात पुत्राधिक्य असेल की दीर्घायू होतील का? व ती भाग्यशाली निपजून नावलौकिकास चढतील का?
 28. तिच्या घरची माणसें दुसर्‍या एका श्रीमंत तरुणाशी तिचा विवाह करून देण्याचा जो प्रयत्न करतात तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल का?
 29. अशा विवाहाची तिच्यावर सक्ती झाली तर वैतागाच्या भरात ती स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेणार नाही ना?
 30. तिच्या आयुष्याला काही धोका दिसतो का ?
 31. आम्हा दोघांपैकी जास्त दीर्घायुषी कोण असेल?
 32. एखाद्या अज्ञातस्थळीं जाऊन आम्ही तडकाफडकी विवाहकार्य उरकून घेतले तर असा विवाह कायदेशीर ठरण्यास काही अडचणीं येतील का?
 33. अशा रितीने आम्ही घरच्या मंडळींच्या नकळत विवाह उरकून घेतला तर त्यांच्या संयुक्त असहकारामुळे आमचे आर्थिक नुकसान होऊन आमचे सांसारिक जीवन असह्य होणार नाही ना?
 34. श्रीमंत होण्या इतपत भरपूर पैसा मला मिळेल का ? व तो कोणत्या मार्गाने मिळेल?
 35. डर्बी लॉटरी सारख्या एखाद्या लॉटरीचे तिकीट मी खरेदी केले तर ते बक्षिसप्राप्त ठरुन मला विपुल पैसा मिळेल का?
 36. आमच्या जन्मगावीं वडिलोपार्जित मालकीच्या जुन्या घरात कित्येक पिढ्यांपूर्वी पुरुन ठेवलेला गुप्त खजीना आहे असे जे एक स्वप्न पडले मला होते ते स्वप्न खरे असेल का?
 37. खरोखरीच त्या घरात वा जवळपास असे भूमीगत धन असेल काय ? आणि ,तसे ते असल्यास मला त्याची प्राप्ती होईल का?
 38. ज्या मुलीशी माझी सध्या ताटातूट केली गेली आहे तिची माझी भेट कधी होईल?
 39. ज्या एका नातेवाईक मुलीशी मला विवाहशृंखलेने बद्ध करण्याची माझ्या वडीलांची धांदल सुरु आहे आणि जिला मी आजवर कधीही पाहीली नाही , त्या परक्या मुलीशी विवाहबद्ध होण्याचा प्रसंग माझ्यावर येईल का?
 40. परिस्थितीच्या दडपणाखाली वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी माझा विवाह झाला तर तो टिकेल का?
 41. माझे एकापेक्षा जास्त विवाहसंबंध संभवतात का ? आणि संभवत असल्यास त्याचे कारण कोणते असेल? पहिल्या बायकेचा मृत्यू की घटस्फोट ?
 42. अंती माझा विवाह कोणाशी होईल हे निश्चित सांगाल काय ? माझी भावी पत्नी कशी असेल? तिचे एकंदर वर्णन कराल काय ?
 43. या प्रेमप्रकरणाचा आमच्या ऑफिस मध्ये बभ्रा झाला आहे त्यामुळे नोकरीस मुकण्याची पाळी माझ्यावर येईल काय ? आणि जर अशी वेळ माझ्यावर आलीच तर मला लगेच दुसरी मनाजोगती नोकरी मिळेल काय ?
 44. त्या मुलीच्या आईने माझा ऑफिस मधल्या वरिष्ठांकडे माझ्या विरुद्ध तक्रार केली असून ते वरिष्ठ या प्रकरणाचा गंभीर रीतीने विचार करत आहेत अशी एक बातमी माझ्या कानांवर आली आहे ,तेव्हा ही बातमी वा कुणकुण खरी असेल का? त्यामुळे मला धोका आहे का? जर ही बातमी खरी नसेल तर ही अफवा कोणी पसरवली असेल?
 45. या निराशेच्या भरात मला वेड तर लागणार नाही ना?
 46. माझ्या हातून आत्महत्या तर होणार नाही ना? असल्यास केव्हा?

या तरुणाकडे स्वत:ची अथवा त्याच्या प्रेयसीची कोणाचीच जन्मपत्रिका नव्हती, आणि त्यांच्या जन्मतारखां, जन्मवेळां या बाबतीतही साशंकता होती. अर्थातच त्यावेळी ज्यो.केणींनी “मी या प्रश्नांची उत्तरें द्यायला असमर्थ आहे” असे सांगून त्या जातकाला परत पाठवले. प्रेमवेड्या,बहकलेल्या तरुणाची विचारसरणी आणि मन:स्थिति कशी असते याचे हे एक मासलेवाईक उदाहरण ठरावे. ज्यो.केणी पुढे जाऊन म्हणतात “जन्मपत्रिके अभावी अशा प्रश्नांची सविस्तरच काय पण मोघम उत्तरें सुद्धा देणे शकय नव्हते, उलट अशा मनोवृत्तीचे पाच दहा पृच्छक एखाद्या ज्योतिषाला भेटले तर त्या पृच्छका ऐवजी त्या ज्योतिषालाच वेड लागायची शक्यता!”

असे असले तरी कालांतराने त्यांनी ‘प्रश्नशास्त्रा’चा सखोल अभ्यास करुन या सर्व प्रश्नांची उत्तरें कशी देता येतील हे सोदाहरण स्पष्ट केले.

या ठिकाणी एक मुद्दा खास जाणवतो तो असा की या 46 प्रश्नांपैकी बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरें देणे ‘जन्मकुंडली’वरुन देणे अत्यंत अवघड असते किबहुना यातल्या काही प्रश्नांची उत्तरें ‘जन्मकुंडली’वरुन देणे जवळ्जवळ अशक्यच असते.

या यादीतल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरें ’प्रश्नकुंडली’ च्या माध्यमातून कशी देता येतील ते मी पुढच्या काही लेखांतून द्यायचा प्रयत्न करणार आहे.

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग http://suhasgokhale.wordpress.com/ वर उपलब्ध आहे.

सुहास

लक्ष्मीचे पाऊल!

शाईची बाटली ! गेल्याच महिन्यातली गोष्ट, नुकतीच ‘शेफर’ची शाईची नवी बाटली उघडली होती, फक्त एकदाच काय ते त्यातून शाई भरली होती.

........
........

ही उघडी शाईची बाटली घसरली आणि चक्क वॉशबेसिन मध्ये उपडी झाली, क्षणार्धात सर्व शाई खळखळत वाहून गेली! रु 370 ची शाई चक्क माझ्या डोळ्या देखत वाहून गेली, एक थेंब भर सुद्धा शाई बाटलीत उरली नाही, मला काही करायची उसंत सुद्धा मिळाली नाही. रु 370 असे पाण्यात (नव्हे वॉशबेसिन मध्ये ) गेलेले पाहून क्षणभर वाईट जरुर वाटले,

........
.........

असेच दोन तीन दिवस गेले असतील नसतील, दुसर्‍या एका पेना मध्ये शाई भरताना या शेफरच्या बाटली कडे लक्ष गेले, मनात आले चला लक्षात आलेच आहे तर ही बाटली जरा धूवून तरी ठेवावी म्हणून बाटली हातात घेतली, कॅप उघडली , बाजूला ठेवली आणि बाटली धुण्यासाठी वॉशबेसिनचा नळ चालू करणार ईतक्यात ही कॅप घसरुन वॉशबेसिन मध्ये पडली , अगदि जशी दोन दिवसां पूर्वी बाटली पडली होती तशीच! मी ती कॅप उचलली आणि का कोणास ठाऊक अगदि सहज मी कॅपच्या आत बघितले, आणि पाहतो तो काय आश्चर्य, मला त्या कॅप च्या आतल्या भागात हे चिन्ह दिसले !

हा आकार तिथे कसा आला असावा?

चमत्कार ? शकुन ?

मी श्रद्धाळू (काहींच्या मते अंधश्रद्धाळू !) असल्याने मला हे माता श्री महालक्ष्मी चे पदचिन्ह वाटले. अगदि पूजा आदि काही केली नाही तरी मनोमन नमस्कार केला व हे पदचिन्ह एक शुभशकुन मानून जपून ठेवले.

हे लक्ष्मीचे पाऊल ठरले हे मात्र खरेच कारण त्या प्रसंगापासून लक्ष्मीचा ओघ जो मध्यंतरी अड्खळलेला होता तो जे चालू झाला तो आजतागायत चालूच आहे,खंड नाहीच, त्यातही ज्याची कल्पनाही केली नव्हती , अपेक्षाही धरली नव्हती अशा अनपेक्षित मार्गांनी लक्ष्मी घरात येत आहे !

जय माता लक्ष्मी !

संपूर्ण लेख आणि प्रकाशचित्रे माझ्या या http://suhasgokhale.wordpress.com/ ब्लॉग वर उपलब्ध.

डाऊसिंग पेंडुलम

........
.......

सुमारे तीन वर्षापूर्वी एकदा प्रवासात एका हॉंगकॉंगच्या व्यक्तीशी ओळख़ झाली,ते स्वत: डाऊसिंग मधले तज्ञ असल्याने त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी या विषयावर बरीच माहीती मला दिली एव्हढेच नव्हे एक ‘पेंडुलम’ हॉंगकॉंगहून भेट म्हणून पाठवून दिला. ‘पेंडुलम’ भेट मिळाला हा एक दैवी संकेत मानून मी काही प्रयोग करायला सुरवात केली. सुरवातीला म्हणावे तसे काही दृष्य परिणाम आढळले नाहीत पण नेटाने प्रयत्न चालू ठेवले, हळू हळू या पेंडुलम कडून काही विषीष्ठ संकेत मिळताहेत हे दिसायला लागले, उत्साह वाढला. आणखी काही काळ प्रयोग केल्यानंतर लक्षात आले की भविष्यातल्या घटनांबद्दल अंदाज बांधायला या पेंडूलमचा मर्यादित स्वरुपात का होईना चांगला उपयोग होऊ शकतो.

........
........

आज मी या पद्धतीचे माझे अनुभव आपल्या समोर मांडायचे ठरवले आहे. या पद्धतीचे मूल्यमापन करण्या इतका मी मोठा नाही, किंवा तेव्हढा या पद्धतीचा माझा अभ्यास व अनुभवही नाही.

....
.....

या विषयावर लिहण्यासारखे बोलण्यासारखे बरेच आहे तेव्हा ही एक लेख माला होणार आहे , त्याची एक साधारण रुपरेषा अशी असेल:

हे पेंडुलम, पेंडुलम म्हणजे काय रे भाऊ?
पेंडुलम डाऊसिंग पद्धतीचा धावता आढावा.
पेंडुलम कसा काम करतो?
हा पेंडुलम कोठे भेटेल?
मला हे जमेल?
काही खास ट्रेनिंग लागते का?
कोणती पुर्वतयारी करावी लागेल?
कशाचीही उत्तरें मिळतात का?
पेंडुलम 101
एक टिपीकल ‘पेंडुलम’ सेशन
पेंडुलम डाऊसिंग चा रोजच्या जीवनातला उपयोग
के.पी.आणि पेंडूलम

आणि बरेच काही,

संपूर्ण लेख माझ्या http://suhasgokhale.wordpress.com/ या ब्लॉगवर उपलब्ध आहे.
ही लेखमाला वाचावी, आपली मतें सुचना मला कळवाव्यात ही विनंती.

Pages