Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुळून येती रेशीमगाठी
जुळून येती रेशीमगाठी !
http://anaghabhade.blogspot.in/
हरिसभाईला झाली सर्दी, बारीक
हरिसभाईला झाली सर्दी,
बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल बरी दोन चार दिवसात, म्हणून हरिसभाईने दुखणं अंगावरच काढले. सर्दीने जेव्हा उग्र रुप धारण केले तेव्हा कांताबेन (हरिसची बायडी ) म्हणाली :
‘ते डोक्टर कडे जाव ना काय तरी दवा पानी द्येयेल ना ते’ .
‘मला ते का समज्यते नाय का, पन काय हाय ते डोक्टर साला फोकट मंदी दवा देणार नाय, ते पैसा मागनार, हौन ज्याईल दो दिन मंदी बरा तेला काय करायचा दवा दारु , खालीपिली पैसा ज्याणार ना तेच्या पाकीट मंदी‘
आणखी दोन दिवस गेले आणि प्रकरण हरिसभाईच्या सहनशक्तीच्या बाहेर गेले. आता डॉक्टर गाठलाच पाहिजे हे हरिसभाईचा ध्येनामंदी आले पण ‘खालीपिली पैसा ज्याणार ना तेच्या पाकीट मंदी’ हे काही हरिसभाईच्या डोक्यातून जात नव्हते.
कांताबेन म्हणाली ‘ ते आपले कोलनीतला द्येसपांदे डाक्टर हाय ना, च्यांगला दवा देते, तेला विचारनी ‘
‘हा ते च्यांगला हाय पन ते साला पैसा देल्या बिगर तोंड नाय खोलनार ‘
मग हरिसभाईच्या सुपिक मेंदूतन मग एक शक्कल निघाली, त्याला माहीती होते की डॉ. देशपांडे रोज सकाळी कॉलनीतल्या बागेत मॉर्नींग वॉक ला जातात , तेव्हा त्यांना तिथेच गाठून गप्पा गोष्टी केल्याचे नाटक करुन सर्दीचे औषध विचारु घेऊ. हरिसभाईची ट्रिक यशस्वी झाली, हरिसभाईच्या मिठ्ठास बोलण्याच्या भरात येऊन डॉ. देशपांडेंनी औषध सांगून टाकले. एका दिवसात हरिसभाईला आराम पडला. फुकटात काम झाले म्हणून हरिसभाई खुस !
पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण चारच दिवसानंतर हरिसभाईला पोष्टाने डॉ. देशपांडें कडून एक बील आले ‘ वैद्यकीय सल्ला रु 300/- ‘.
हरिसभाईला कळेना “हे साला मला 300 रुपेचा बील कसा काय आला ,मी ते डाक्टरचा दवाखाने मंदी कदी गेला बी नाय तरी साला बील कसा काय पाठवला? गलतीसे मिस्टीक झ्याला असनार ‘ असा समज करुन हरिसभाई ने त्याकडे दुर्लक्ष केले. आठ दिवसांनी डॉ. देशपांडें कडून एक माणूस हरिसभाई कडे आला व रु 300/- ची मागणी करु लागला.
‘अरे तसा काय नाय, माजा कायपन पैसा देयाचा बाकी नाय, काय तर च्युकी जाला आसल , मी द्येसपांदेशी बोलते समदा तु जाव ‘ असे सांगून हरिसभाईने त्या माणसाला कटवला. थोड्याश्या गुश्यातच हरिसभाई दुकानात पोचला. तिथे त्याचे मित्र अॅाडव्होकेट बिपीन मेहता भेटले.
“हरिसभाय, आज जरा गुस्से मा’
‘ए बिपीनभाय, हे बघ ना साला, हे द्येसपांदे डाक्टर कसा पागल जैसा करते, साला तेच्या दवाखाने मंदी कदी गेला नाय, तेचा दवा पन नाय घेतला, तरी साला 300 रुपेचा बील कसा काय पाठवला, आज तेचा आदमीपन येऊन गेला पिसा मागायला’
मग हरिसभाईने बिपीनभाईला समदी इस्टोरी डीट्टेलमंदी सांगीतली. बिपीनभाई म्हणाला :
‘देख हरिसभाय, साला गल्ती तुजाच हाय, तू तेला गार्डन मंदी दवा विचारला नाय का, ते तेचा पैसा मागते बग ’
‘अरे पन तेच्या दवाखाने मंदी जाऊन विचारला तर पैसा देयेल नी पण मी साला तेला गार्डन मंदी दवा विचारला,आपला दोस्तीमंदी , तेचा काय पैसा पडते काय?’
‘हरिसभाय , तेचा काय हाय , घर ,ओफिस , गार्ड्न कवा पन , कंदीपण, ते डाक्टर असते, तू बिमारीचा बात तेचा कडे केला अन तेने दवा सांगीतला , ते तेचा सलाह .तवा तु तेचा सलाह कदी घ्येतला, कुटे घ्येतला तेचा काय पण फरक नाय पड्ते , तुला तेचा पिसा देयालाच पायजे , नाय दिला तर ते कोरट मंदी ज्यायल ’.
चरफडत का होईना हरिसभाय ने डॉ. देशपांडेंचे बील भरुन टाकले ‘साला दोस्तीमंदी काय विचारला ता तेचा पैसा मागते’.
चारच दिवसानंतर हरिसभाईला पोष्टाने अॅकडव्होकेट बिपीन मेहता कडून एक बील आले ‘ कायदेविषयक सल्ला रु 1200/- ‘.
हरिसभाईला कळेना हे साला मला 1200 रुपेचा बील कसा काय आला ,मी ते बिपीनभायाचा ओफीस मंदी कदी गेला बी नाय,माजा कोरट चा काय लफडा बी नाय, तरी साला बील कसा काय?
असे हरिसभाई मला नेहमीच भेटत असतात, कधी ते मित्र बनून येतात, तर कधी शेजारी म्हणून , आणि नातेवाईक तर काय हक्काचेच !
हया हरिसभाईंच्या दृष्टीने ‘तेला काय टाईम लागते, साला पत्रिका घ्येयाची न सांगायचा फटफट’ असे जरी असले तरी मला असे कॅज्युअल राहता येणार नाही, कुंडली हातात घेतल्यावर शास्त्राशी प्रतारणा करता येणार नाही, व्यवस्थित अभ्यास हा करावाच लागतो, द्यायचा तो वेळ द्यायलाच लागतो, मेहनत ही करावी लागते आणि बर्यााच जणांना कल्पना नसते पण या कामाला काही वेळा तीन –चार तास सुद्धा लागू शकतात.
......
http://suhasgokhale.wordpress.com/
............
सुहास
मान्यता प्राप्त डॉक्टर कडे
मान्यता प्राप्त डॉक्टर कडे शासनमान्य असलेला मेडिकल व्यवसायाचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. त्याने रुग्णाला चुकीचे औषध/सल्ला दिला व त्यामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर तो ग्राहक संरक्षण कायद्याखाली दाद मागू शकतो. त्यावर केस होउन प्रसंगी डॉक्टर चे रजिस्ट्रेशन देखील रद्द होउ शकते. वकीला कडे सनद असते त्याने अशिलाला चुकीचा सल्ला/ केस केली तर त्यालाही आपली सनद गमवावी लागू शकते. तो ही ग्राहक संरक्षण कायद्यात येतो ज्योतिषाचे काय? त्याच्याकडे असे काय असते कि जो ग्राहक संरक्षण कायद्याखाली येइल? यापुर्वी मायबोलीवर ही चर्चा झाली होती.फलज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? असे प्रश्न काही लोक विचारु लागले आहेत. अंनिस ने ही मागणी केली आहे. जादू टोणा विरोधी कायद्यात ज्योतिषाचा समावेश नाही.
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मला पण शासन मान्यता प्राप्त
मला पण शासन मान्यता प्राप्त ज्योतिर्विद व्हायचे आहे, मला पण शासनमान्य असलेला ज्योतिष व्यवसायाचा रजिस्ट्रेशन नंबर पायजे. मला पण वकीला सारखी शासन मान्यता प्राप्त सनद पायजे , कोठे भेटेल? परिक्षा द्यायला लागत असेल तर ही आपली फुल्ल तयारी आहे, काय फी भरायची असेल तर माझी तयारी आहे, तुम्ही फक्त सांगा असे शासन मान्यता प्राप्त ठिकाण कोठे आहे,बाकी सर्व मी सांभाळतो. तेव्हा ही माहीती पुरवाच , चेष्टा नाही मला खरेच माहीती नाही म्हणून अगदी मनापासून अशी नम्र आणि कळकळीची विनंती करतो आहे घाट्पांडे साहेब.
अहो इथे देशी दारुचे दुकान
अहो इथे देशी दारुचे दुकान देखील शासनमान्य असत पण बघा बिचार्या ज्योतिषांना शासनमान्यता नाही. अर्थात त्यांनाही त्याची गरज नाहीये, कशाला उगाच ग्राहक संरक्षण कायद्याखाली या? लोकमान्यता असली म्हणजे बास झाले. जो पर्यंत अनिश्चितता आहे तो पर्यंत ज्योतिषाला मरण नाही हे भाकीत आम्ही या ज्योतिषाच काय करायच? मधे वर्तवले आहेच
बरे झाले , आपणच न्यायनिवाडा
बरे झाले , आपणच न्यायनिवाडा करुन टाकला एकदाचा तो.
प्रकाश घाटपांडे, >>
प्रकाश घाटपांडे,
>> लोकमान्यता असली म्हणजे बास झाले.
अगदी मलाही हेच म्हणायचं आहे. एरव्ही लोकांना पाहिजे ते आम्ही देतो म्हणून हिंस्त्रलैंगिक चित्रपट दाखवतात ते चालतं. मग ज्योतिषांनीच काय घोडं मारलंय!
काल लता मंगेशकरांची मैफिल होती. मी तिकीट काढून गेलेलो. कार्यक्रम छान झाला, पण लताबाईंचा आवाज ठीक लागला नाही. त्या नीट गायल्या नाहीत म्हणून मी पैसे परत मागावेत का?
आ.न.,
-गा.पै.
-----------
-----------
sharad upadhyay yancha
sharad upadhyay yancha contact no milu sakel ... ka urgently hava ahee.. kona kade asel tar pls help.
ज्योतिषशास्त्र
ज्योतिषशास्त्र ???
http://anaghabhade.blogspot.in/
कन्या राशीची साडेसाती केव्हा
कन्या राशीची साडेसाती केव्हा संपणार आहे?
>>>>> मला पण शासन मान्यता
>>>>> मला पण शासन मान्यता प्राप्त ज्योतिर्विद व्हायचे आहे, <<<< हो हो सुहासजी, मला पण व्हायचे आहे "शासनमान्य" ज्योतिषी! तुम्हाला कळ्ळे कसे व्हायचे की लग्गेच मलाही कळवाल का?
राहु वक्रि असेल तर राहुचि
राहु वक्रि असेल तर राहुचि शांति केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते का? मला प्लीज सांगा.
कन्या राशीची साडेसाती केव्हा
कन्या राशीची साडेसाती केव्हा संपणार आहे? >>>>>> लवकरच सम्पेल जेव्हा शनि वॄश्चिकेत जाईल नोव्हेम्बर मधे तेव्हा...:)
राहु वक्रि असेल तर राहुचि
राहु वक्रि असेल तर राहुचि शांति केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते का? मला प्लीज सांगा.
राहु वक्रि असेल तर राहुचि
राहु वक्रि असेल तर राहुचि शांति केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते का? मला प्लीज सांगा. >>>> राहु आणि केतु सदा सर्वदा वक्रिच असतात. तुम्हि एकदा खात्री करुन घ्या नक्की ज्योतिषाला काय म्हणायचे आहे...
>>>> राहु वक्रि असेल तर
>>>> राहु वक्रि असेल तर राहुचि <<<< या वक्री उल्लेखाने गोन्धळ होतोय. राहूकेतु नेहेमीच इतर ग्रहांच्या उलट दिशेने जातात.
अनुभव असा आहे की पितरदोष दर्शविणारा राहूकेतू यांची ख्याती विनाकारण अडथळ्याबाबत आहे व त्यांची शांती केल्यास सकारात्मक परिणाम दिसुन येतात. याव्यतिरिक्त दुर्मिळ प्रसंगी कुम्भ/अर्क विवाहासही निमित्त ठरतात.
यावर खरेतर अत्यंत सोपा घरगुती उपाय म्हणजे रोजच्या रोज दुपारचा काकबली ठेवणे, व जेवायला बसायचे आधी इश्वराचे तसेच पूर्वजांचे स्मरण करणे!
डब्बल पोस्ट (डब्बल म्हणलय,
डब्बल पोस्ट (डब्बल म्हणलय, नीट वाचा, डब्बा नै म्हणल
) सबब उडवली.
लवकरच सम्पेल जेव्हा शनि
लवकरच सम्पेल जेव्हा शनि वॄश्चिकेत जाईल नोव्हेम्बर मधे तेव्हा... >> बापरे!
चनस, प्रत्येक वेळेस
चनस, प्रत्येक वेळेस साडेसातीचा अर्थ काहीतरी त्रास किंवा वाईट असे नसते . शनि तुमच्याच कर्मांची परत फेड करत असतो त्यामुळे चांगले केले कि चांगलेच होते . साडेसाती मध्ये लग्न पण होतात . जबाबदारी वाढते आता हे चांगले कि वाईट तुम्हीच ठरावा .
लग्न करुन सुखी झालाय असा एक
लग्न करुन सुखी झालाय असा एक तरी मनुष्यप्राणी दाखवा
सुहास, जगी सर्व सुखी असा कोण
सुहास, जगी सर्व सुखी असा कोण आहे| विचारी मना तुची शोधोनी पाहे|
साडेसातीमुळे माणसे ताळ्यावर रहातात. लग्न झालेली न झालेली
लग्न करुन सुखी झालाय असा एक
लग्न करुन सुखी झालाय असा एक तरी मनुष्यप्राणी दाखवा>>>. शाहरुख खान.:फिदी:
लग्न करुन सुखी झालाय असा एक
लग्न करुन सुखी झालाय असा एक तरी मनुष्यप्राणी दाखवा ///
Suhasg , हे तुमचे मत आहे कि मिसेस गोखल्यांचे !
अन्विता.. ओक्के.. पण सध्या
अन्विता.. ओक्के.. पण सध्या माझ्याकडे जे चाल्लयं त्याचा शनिसोबत संबध लावुन थोडा दिलासा मिळतोय का हे बघत होते

रश्मी
Suhasg , हे तुमचे मत आहे कि
Suhasg , हे तुमचे मत आहे कि मिसेस गोखल्यांचे ! >>>
माझेच की हो , पण आता बोलून काय फायदा म्हणा,
>>>>> अन्विता.. ओक्के.. पण
>>>>> अन्विता.. ओक्के.. पण सध्या माझ्याकडे जे चाल्लयं त्याचा शनिसोबत संबध लावुन थोडा दिलासा मिळतोय का हे बघत होते स्मित
रश्मी >>>>
आमचे कडे कोणत्याही घटनांचा कोणत्याही ग्रहाशी , महादशेशी पाहीजे तसा संबंध जोडून मिळेल,
सातेसाती व पनवती शी संबंध जोडून पाहिले असल्यास जादा आकार पडेल.
मंगळा बरोबर राहू शी संबंध जोडून घेतल्यास 10% सवलत वर केतू फुकट!
एकदा जोडलेला संबंध बदलून पाहिजे असल्यास जादा आकार पडेल.
साडेसाती http://anaghabhade.b
साडेसाती
http://anaghabhade.blogspot.in/2014/04/blog-post_26.html
---------------
---------------
प्रतिसाद काढ़ून टाकला आहे.
प्रतिसाद काढ़ून टाकला आहे.
Pages