ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा
पुढे का सरकत नाहि आहे ?

प्रश्नकर्ता ज्योतिषाची फी दोनशे अडीचशे रूपये भरून काही विचारत असेल तर मी
समजेन तळमळीनेच विचारतोय .फार तर तुम्ही असं म्हणू शकता की माझ्याकडे त्या
नेत्याची कुंडली नाही त्यामुळे तो पंतप्रधान होणार का नाही ते सांगण्यास
असमर्थ आहे .प्रश्नकुंडली विचारण्यास तो नालायक /लायक आहे का हे कशाला
बोलायचे ? फी परत करून टाकायची .

आजारी व्यक्तीचा प्रश्न असेल तर तुम्ही (तुमच्या पध्दतीने लग्नकुंडली
/प्रश्नकुंडली पाहून) उत्तर देऊन मोकळे व्हायचे .

srd,

.प्रश्नकुंडली विचारण्यास तो नालायक /लायक आहे का हे कशाला बोलायचे ? तुम्ही हे कोठे वाचलेत? प्रश्नक्रर्त्याची लायकी ठरवली जात नाहीच आहे आपला गैरसमज झालेला दिसतोय बहुदा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे का नाही आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरे देता येणार नाहीत याव्रर चर्चा चालू आहे.

बाकी पैसे घेऊन किवा विनाशूल्क; कुणाला , कोणती सेवा पुरवायची ते ठरवण्याचा अधिकार सेवा दात्याला असतोच की , त्याचा तारतम्याने वापर करायचा म्हणजे झाले, सिनेमाच्या तिकीटावर सुद्धा लिहलेले असते "प्रवेश हक्क म्यानेजमेंट च्या स्वाधीन'.

"आजारी व्यक्तीचा प्रश्न असेल तर तुम्ही (तुमच्या पध्दतीने लग्नकुंडली /प्रश्नकुंडली पाहून) उत्तर देऊन मोकळे व्हायचे" आजारी व्यक्तीँ संदर्भातले प्रश्न कसे हाताळायचे ह्याच्या वर मी अजून काहीच लिहले नाही, लौकरच लिहणार आहे, राग मानू नका , पण तुमचा 'मोकळे व्हायचे' हा शब्द प्रयोग फारसा रुचला नाही,अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.

करुया नवीन वर्षाचे स्वागत ,
आज शालिवाहन शके १९३६ चैत्र शुक्ल प्रतिपदा .
विसरू गतवर्षीची दु:खे आणि वाद ,
आणू सर्वांसाठी सुखे आणि संवाद .

नव वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्याला सुखासमाधानाचे व भरभराटीचे जावो.

सुहास

>>>> लिंबूभौ वाचतायना सग्ळं ? <<<<<
अहो आज आलोय हापिसात, आत्ता वाचले सगळे..... भन्नाट, मज्जा आली, तुम्ही दोघेही विनोदी देखिल लिहू शकता की. Happy

सुहास, असेच काहीसे बरेचसे अनुभव माझेही आहेत, मला मोफत की मोबदला घेऊन यात तितकेसे गम्य नाही, सुखदु:ख नाही, पण "फिडब्याक" न मिळणे हे मात्र जिव्हारी लागते. गरज सरो वैद्य मरो अशाच प्रकारे लोक सामोरे येतात. कधी कधी सांगितलेले झाले नाही तर मात्र "खनपटीस" बसावयासही येतात. पण चांगले घडले / सांगितल्याबरहुकुम घडले तर ते कळविणे होत नाही.

अर्थात माझा कर्मसिद्धांतावर देखिल प्रखर विश्वास असल्याने, दुसर्‍यांच्या मजप्रतीच्या/ज्योतिषशास्त्राप्रतीच्या असल्या कृतघ्न कर्माची व त्यान्ना त्याबद्दल काय कर्मफल मिळावे याची वास्तपुस्तही मी घ्यायला जात नाही व त्यामुळेच डोके शांत ठेऊ शकतो. अन्यथा चिडचिड वाढून माझे माझ्याच साधनेवरील लक्ष उडू शकेल जे व्हायला नकोय. असो.

उडदामाजी काळेगोरे म्हणायचे अन काय!

सुहासजी, छान, पण असे किशोर भेटणे हा देखिल नशिबाचाच भाग, नाहि का? असो.
आपण आपले नेहेमी शुभंभवतु असेच म्हणायचे. अन असा अनुभव रणरणत्या उन्हातील थन्डगार सावलीसारखा अनुभवायचा.

घन्यवाद लिंबूजी,

हा किशोरभाऊ प्रश्न विचारायला आला होता ते पूर्ण नकारार्थी भूमिका घेऊनच , त्यामुळे माझी नेहमीची प्रश्न कुंड्ली पद्धत वापरता आली नव्ह्ती,पण त्याच्या जन्मकुंड्लीतले योगच इतके स्टॉंग दिसत होते की बस्स. मी त्याला म्हणालो होतो 'चित्रातला राजहंस मोती गिळू शकतो ह्यावर सुद्धा कोणी विश्वास ठेवला नव्हता'

किशोरने परवानगी दिली तर हे भविष्य कसे केले याचे संपूर्ण विश्लेषण द्यायचा प्रयत्न करेन.

किशोरला मेल टाकलीय ,येशील तेव्हा पेढे नको बाकरवडी आण बाबा, काय करणार मधुमेह आलाय ना राशीला...

suhasg , अहो मी तुमच्यापेक्षा ज्ञानाने , अनुभवाने आणि वयाने पण लहान आहे त्यामुळे ' ताई' पेक्षा अनघा / अन्विता म्हटलेले आवडेल . तुम्ही वाचताय त्याबद्दल आणि तुमच्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद !

काल विचार करता करता एक बाब प्रकर्षाने जाणवली अन सुहासजी तुमची आठवण झाली.
विषय असा की, सर्वसाधारणतः जातक स्वतःची कुंडली बरोबर आणतो व स्वतःपुरते प्रश्न विचारतो, (कित्येकदा ते जन्मवेळेचे तपशीलही बरोबर नसतात हा वेगळाच भाग)
पण, अशा वेळेस माझा अनुभव असाही आहे की प्रश्न जातकाचा स्वतःबद्दलचा असला तरी , काही प्रश्नान्ची उत्तरे शोधण्यासाठी जातकाचे मातापिता/पालक तसेच वैवाहिक जोडीदार-अपत्ये इत्यादिंच्या कुंडलीत जातकाच्या प्रश्नांची उत्तरे सापडतात. मला अजुनही नीटशी संगती लावता आलेली नाही, कारणमिमांसा समजली नाही पण जातकाचे स्वतःचे प्रश्नाबाबात त्याचे स्वतःचे कुंडलीत उत्तर न मिळता त्याचे मातापिता वा जोडीदार-अपत्ये यांचे कुंडलीत ती उत्तरे सापडतात.
यावर अधिक अभ्यास करता आलेला नाही, व करणे अवघड जाते कारण जातकास स्वता:च्याच जन्मवेळा पक्क्या माहित नसतात तेव्हा मातापित्यांच्या काय सांगणार? मात्र जातकाचे अपत्य/जोडीदाराचे कुंडलि मिळू शकतात बरेचदा व तिथे हा परिणाम स्पष्ट दृगोच्चर होताना दिसतो.

माझा प्रश्न असा की याप्रकारे किती खोलात जावे? असा परिणाम असतो का? असल्यास मातापिता/पालक किंवा जोडीदार/अपत्ये यांचे कुंडलीचा परिणाम जातकावर होणार असेल्/होत असेल तर ते त्याच्या कुंडलीत नेमके काय सुत्राने आजमावे?
धन्यवाद.

>>माझा प्रश्न असा की याप्रकारे किती खोलात जावे? <<
अगदी बरुब्बर हाये. म्हनून म्हंतात कि बुडत्याचा पाय खोलात.

ग्रेट सुहास,
फक्त असे वाटते की, एक ज्योतिषी म्हणुन अशाप्रकारे बाकी/अन्य व्यक्तिंच्या कुंडली तपासताना, इतकेच काय, अन्य व्यक्तिंच्या तपशीलाची मागणी करताना ज्योतिषाने पराकोटीची सावधानता बाळगायला हवि की अशा प्रकारे कुंडली मागितल्याने त्या त्या व्यक्तिंच्या एकमेकांशी असलेल्या चांगल्या वा ज्या जशा आहेत तशा नातेसंबंधात/सुसंवादात ज्योतिषाकडून कसलीही विपरित भर पडायला नको/संशयाची भूते जमा व्हायला नकोत. हे काम तसे खूप अवघड ठरते.

मीजातका कडून माहीती घेताना हीमाहीती कशासाठी लागणार आहे (थोड्क्यात या माहीतीचा नेमका कसा उपयोग केला जाणारआहे) याची पुर्व कल्पना देतोच. आपण कितीही काळजी घेतली तरी लोक त्यांच्या सोयीचाच अर्थ काढतात, कितीही समजावले तरी उपयोग होत नाही.

Suhasg , ' युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स ' बद्दल तुमच्या ब्लॉग वर वाचायला आवडेल . नवीन नवीन पद्धती कळतील.

<<<<< तुम्ही परत माझ्यानावामागे ' जी ' लावलेच का >>>>>>>

लोक आपणहुन मान देतात तरी तुम्ही नको म्हणता! मी माझी आयडी च अशी निवड्ली की ईच्छा असो वा नसो लोक्सना मला 'जी' म्हणावेच लागते!

बाकी झालेय काय आदरार्थि संबोधनाची मोठी समस्याच झाली आहे , आता 'सुश्री' चालणार नाही 'जयललीता अम्मा' रागावतील कारण ते (सुश्री आणि अम्मा) त्याच्या शिवाय दुसर्‍या कोणासाठी वापरलेले त्यांना आवड्णार नाही. हीच गत 'बहेन' ची, 'मायावतीजी' रागावतील !! 'महामहिन्म' का असेच कै च्या कै आहे पण ते 'प्रतिभाताईं' साठी! इतर कोणासाठी वापरल्यास प्रोटोकॉल आडवा येतो. 'पंडीता' म्हणालो तर 'रमाबाई' पाठीत रट्टा घालतील आणि पाढे व शुद्धलेखन लिहावयास बसवतील (हे तर आणखीनच भयंकर नै का,वाटल्यास अजून दोन रट्टे द्या चालतील ) , 'विदुषी' म्हणून कै तरि आहे म्हणतात पण ते नक्की काय आहे आणि कोणाला म्हणतात त्याचा तपास चालू आहे ,हो, खात्री करुन घ्यायला पाहिजे नै तर व्हायचे काय कोणाला ते 'विदूषका' चे स्त्रीवाचक संबोधन वाटायचे आणि मग आमचा 'हॅप्पी बर्थ डे 'व्हायचा ! 'शास्त्री' ह्या अर्थाने स्त्रीवाचक संबोधन काय होत असावे बरे?

वट्टात काय आजच्या टैमाला आदरार्थि संबोधनाची मोठी समस्याच झाली आहे

हो ना तुमचा id खरेच मस्त आहे त्यामुळे मला पण suhasg लिहिले कि परत ' जी' लावावा लागत नाही. बाकी तुमचे explanation मस्त !
तरीपण आदरार्थी संबोधावे असे माझे काही कर्तुत्व नाही त्यामुळे ' जी' नकोच .

suhasg, शास्त्रीचं स्त्रीलिंगी रूप शास्त्रीणी होईलसं वाटतं. मूळ शब्द शास्त्रिन् दिसतो आहे.
आ.न.,
-गा.पै.

पैलवानजी 'शास्त्रीणी' लॉजीकली पटतय पण प्रत्यक्षात वापरात आलेले आढळत नाही.

मला अशाच काही प्रश्नांची उत्तरें हवी आहेत उदा:

पूर्वे कडचे ते 'पौर्वात्य' , पश्चिमे कड्चे ते 'पाश्चात्य' , दक्षिणे कडचे ते ' दाक्षिणात्य' उत्तरे कडचे ते ??.

पौर्वात्य, पाश्चात्य, दाक्षिणात्य इ शब्द आपल्या सतत वापरात असतात पण उत्तर वाल्यांनी काय घोडे मारलाय देव जाणे, त्यांच्या साठीचा शब्द ? नाही म्हणायला अथवशिर्षात एक उल्लेख आहे ' उत्तरात्तात' पण प्रत्यक्षात वापरात आलेला आढळत नाही.

जय श्री राम

माझ्या इंग्रजी ब्लॉग ( http://suhasastrology.wordpress.com/ ) वर 'Free predictions?,,Never" ही पोष्ट लिहली , (जी मराठी ब्लॉग वर 'मोफत भविष्य नाही सांगणार जा ' अशी प्रकाशीत केली होती) , ती वाचून एका जातकाने हा प्रतिसाद / फिडब्याक दिला आहे, पाच वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यकथनाचा असा फिडब्याक मिळाला की समाधान वाट्ते, ...

" Karthik on April 12, 2014 at 2:22 am said:

Dear Suhas Gokhale ji,
I had asked for a free prediction in June-2009, on a thread titled “PhD Scope”. I clearly remember that you told me that my PhD offer is delayed not denied. You also specified that I will be seeing change post Aug 2011 and then will go abroad for PhD. In Nov 2011 there will be a minor change which will lead me to a change of PhD area by and before first week of Feb 2012. And then things will be running calmly.
And they happened in that same sequence. Everything is running smooth and then I decided to come back and give a feedback, and thank everyone but for some reason due to an inactive profile, I cant login and give a feedback.
Thank you very much. Happy "

म्हणतात ना देरीसे आये दुरुस्त आये.

कार्तीक ला शुभेच्छा !

Pages