पालक राईस

Submitted by सायलीमी on 16 June, 2010 - 17:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ ३ वाट्या
पालक बारीक चिरलेला ३ वाट्या
मटार १ वाटी
बटाटा १ (चौकोनी तुकडे )
कांदा १ मोठा (उभा चिरून)
हि. मिरची-आलं-लसूण पेस्ट २ चमचे
खडा मसाला ( ३ लवंगा. ३ काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची)
गरम मसाला
मीठ
दही ( २ जमचे)

क्रमवार पाककृती: 

-३ कप बासमती तांदूळ धुवून ६ कप पाणी व मीठ घालून मोकळा शिजवून घ्या. शिजवताना त्यात १ चमचा तुप घाला.
- पॅन मधे तेलाची फोडणी करून त्यात खडा मसाला, जीरं , मिरची-लसूण-आलं पेस्ट , हळद घाला,
-यावर बटाटा घालून अर्धवट तळून घ्या.
-बटाटा अर्धा शिजला की त्यात कांदा घाला.
- नंतर पालक आणी मटार घालून एक वाफ द्या.
- गरम मसाला, मीठ, दही घालून त्यावर शिजवलेला भात घालून परता.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसे
अधिक टिपा: 

- दही नाही घातले तरी चालते त्याऐवजी लिंबू घालू शकता.
- बीन्स, ब्रोकोली पण हव्यातर घालता येतात.
- दह्यातला रायत्या बरोबर सर्व्ह करा

1.JPG

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणी माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी पण केला होता, ऑलमोस्ट सेम, पण दही नव्हतं टाकलं.
पालका बरोबर कोथिंबिर + आलं किसलेलं आणि ( लसूण ठेचलेला) पण अ‍ॅड केला होता.

सायली चांगली आहे रेसिपी.
पालक राईस मध्ये गाजर किसलेला गारज चांगला लागतो. तसेच ह्याच्या फोडणीत थोडी बडीशेप घातली की चांगली टेस्ट येते.

आजच केला होता पण आधी ही रेसीपी पाहीली न्हवती...
मी पालक राईस मध्ये कांदा आणि बटाटा घालत नाही... क्विक रेसीपी: भात शिजवून घ्या, पालक बारीक चिरून घ्या [थोडा मोठा असेल तरी चालतो]

पॅन मध्ये तुपाची फोडणी [यात फक्त जीरे टाकले, मोहरी नाही] देऊन चिरलेला पालक टाका, थोड्या वेळाने काजू [:)] टाकून परतून घ्या. मग शिजलेला भात घालून, मीठ इ. टाका आणि थोडा वेळ वाफ येऊ द्या.. जास्तीतजास्त २० मि. होतो

Next time तुझ्या पद्धतीने करून पहातो..

मी कालच हा राईस केला. दही नाही घातले. थोड्या मसालेदार फोडणीच्या भातासारखाच लागला. काही विशेष लागला नाही.
काय चुकले असेल?