लहान मुलांची सुरक्षितता

Submitted by तृप्ती आवटी on 15 June, 2010 - 10:51

काल प्रविणपा ह्यांनी बे एरिया बाफवर टाकलेल्या खालील पोस्टवरुन हा बाफ काढावा असे वाटले:
"काल एक वाईट्ट अपघात घडताना पाहिला. एका SUV चे टायर फुटून ती फास्ट लेन मधून ३-४ कोलांट्या उड्या खात स्लो लेन मध्ये येऊन पडली. गाडीतल्या सर्वांना फार लागलं पण त्यांची ९-१० महिन्यांची मुलगी मात्र साधा एक ओरखडा सुदधा न येता बचावली. तिला तिच्या पालकांनी कार सिट मध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं होतं. मी स्लो लेन मध्ये मर्ज करत होतो. साधारण ५-१० सेकंद जर का माझी मोटर सायकल तिथे अगोदर पोचली असती तर बहुतेक हा मेसेज मी लिहू शकलो नसतो. सर्वांना एकच विनंती आहे की सिट बेल्ट, कार सिट वगैरे safety measures वर compromise करू नका. एका सेकंदात होत्याचं नव्ह्तं होऊ शकतं"

आपल्या मुलांची आपण काळजी घेतोच. पण कधी मुलांच्या तर कधी भारतातुन आलेल्या नातेवाईकांच्या हट्टामुळे मुलांना कार सीटमध्ये न बसवण्यासारखी चूक करु शकतो. इतरांनी केलेल्या आग्रही मतप्रदर्शनामुळे कदाचित असे होणार नाही. सीट बेल्ट व्यतिरिक्त अजून काही सुरक्षेचे उपाय (उदा: किचन गेट) तुम्ही अमलात आणत असाल तर इथे लिहा.

** डाळीच्या पीठाने पोटदुखीचा त्रास होतो ह्यासारखे सल्ले कृपया लहान मुलांचे आरोग्य ह्या धाग्यावर लिहा. इथे लहान मुलांच्या जीवाची सुरक्षा ह्या अनुषंगाने काही लिहिणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिकेट पटू अझरुद्दीन यांचा मुलगा १८ वर्षाचा हा बाइक अ‍ॅक्सिडेन्ट मध्ये जबरी जखमी झाला. त्याच्या बरोबर असलेला त्याचा १६ वर्षाचा चुलत भाऊ अजमल जागीच ठार झाला. बाइक सुझुकीची १००० सीसी वाली!.
इथे एक आउटर रिंग रोड म्हणून आहे तिथे दुचाकी तीनचाकी वाहने, पादचार्‍याना परवानगी नाही पण श्रीमंत
मुले, बाईक आवड्णारे लोक तिथे रेसिन्ग करतात रात्रीतून.

ह्यामुलाने नक्की हट्ट करून इद साठी बाइक मागून घेतली असणार. खूप स्पीड होता व लगेच ब्रेक दाबल्यावर बाइक स्किड झाली. कंट्रोल करता आली नाही व ते दोघे बाइक बरोबर खेचले गेले. अगदी नवी होती बाइक रजिस्ट्रेशन पण झाले नव्हते.
१) अपघात झाला तेव्हा मुलाचे वडील लंडन मध्ये आई दुबईत. बरोबर कोणीच नाही. सानिया मिर्जाचे बाबा व गोपीचंद यांनी त्याला हॉस्पिटल मध्ये भेट दिली.
२) अपघात पहाटे झाला तेव्हा हे रेसिंग करत होते का? माहित नाही.
३) बाईक बहुतेक रजिस्टर व्हायच्या आधीच गडबडीत चालवायची घाई.
४) मुले ही मोठे झाल्यासारखी वाटतात तेव्हाच त्यांच्यावर लक्ष द्यावे लागते कि काय.
तो आता अतिदक्षता विभागात आहे. अझर भाई येऊन पोहोचले आहेत. fingers crossed.
सज्ञान मुलांना पण लगेच इतक्या पॉवरफुल बाइक्स देऊ नयेत. व रेसिन्ग तर आजिबात रूल आउट करावे.

अमा +१.

आईवडिलांच्या गैरहजेरीत झालेली दिसतेय घटना. नक्कीच आईवडिलांना त्याचा सुगावा नसणार. आपल्या गैरहजेरीत पोरं जे काय उद्योग करतात त्यावर कितपत नियंत्रण ठेवता येतं अमा?

खूप उपयुक्त सुचना आहेत लेखात. आपल्याला माहिती असलेल्याच असल्या तरीही पुन्हा एकदा स्वतःशीच रिवाईज करण्यासारख्या. धन्यवाद यशव्सिनी, इथे ही लिंक शेअर केल्या बद्दल

आमच्याकडे जिन्याला एका बाजूला लाकडी खांब आणि एका बाजूला भिंत आहे. अशा जिन्याला कोणी गेट बसवले आहे का? असल्यास कोणते गेट वापरले?

अजून एक लिहायचे म्हणजे रांगणारे बाळ असेल तर काम सोडून पुर्ण वेळ लक्ष देत बसावे. निदान ते टाइल्/वूड फ्लोरवर असल्यास तरी. आमच्या शेंडेफळाने रांगताना तोंडावर पडून नुकतेच आलेले दात तोडून घेतले. मेजर ब्लीडिंग झाले होते. अशा वेळी इआर मधले डॉक काहीही करत नाहीत. एमर्जन्सी हाताळणार्‍या लहान मुलांच्या डेंटीस्ट कडे जावे लागते. असे कुणाच्या बाबतीत होउ नये पण आपल्या भागातला असा इमर्जन्सी हाताळणारा डेंटीस्ट माहीत हवा.

ज्ञाती माझ्याकडे एका बाजूला भिंत आणि एकीकडे लोखंडी खांब आहे बारका ज्याला पुढे ग्रिल आहे. तिथे मी असे गेट लावलंय. कारण खिळे मारता येत नाहीत भिंतीला. पण तरी बसतं नीट.

Safety 1st Easy Fit Security Gate
http://www.Diapers.com/p/s-33415?noappbanner=true

यशस्वीनी खूप छान लिंक दिलीत. खरंच यातल्या टीप्स उपयोगी आहेत. त्यातल्या मुलांना किती यातना झाल्या असतील देव जाणे. Sad

भारतात ओके टॉयज ह्यांचं प्ले पेन मिळतं मी २००९ मध्ये घेतलं होतं तेव्हा ते साडे आठ हजाराचं होतं. प्लास्टिकचं आहे पण दीड ते पावने दोन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी चांगलं आहे. तीन साडे तीन फूट व्यास आहे. खूप पटकन लावता येतं काढताही येतं. तसं भारताबाहेरही मिळत असेलच की.

मी मुंबईत राहाते. ते प्ले पेन अजूनही माझ्याकदे आहे. कोणाला हवं आहे का वापरायला?

Pages