लहान मुलांची सुरक्षितता

Submitted by तृप्ती आवटी on 15 June, 2010 - 10:51

काल प्रविणपा ह्यांनी बे एरिया बाफवर टाकलेल्या खालील पोस्टवरुन हा बाफ काढावा असे वाटले:
"काल एक वाईट्ट अपघात घडताना पाहिला. एका SUV चे टायर फुटून ती फास्ट लेन मधून ३-४ कोलांट्या उड्या खात स्लो लेन मध्ये येऊन पडली. गाडीतल्या सर्वांना फार लागलं पण त्यांची ९-१० महिन्यांची मुलगी मात्र साधा एक ओरखडा सुदधा न येता बचावली. तिला तिच्या पालकांनी कार सिट मध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं होतं. मी स्लो लेन मध्ये मर्ज करत होतो. साधारण ५-१० सेकंद जर का माझी मोटर सायकल तिथे अगोदर पोचली असती तर बहुतेक हा मेसेज मी लिहू शकलो नसतो. सर्वांना एकच विनंती आहे की सिट बेल्ट, कार सिट वगैरे safety measures वर compromise करू नका. एका सेकंदात होत्याचं नव्ह्तं होऊ शकतं"

आपल्या मुलांची आपण काळजी घेतोच. पण कधी मुलांच्या तर कधी भारतातुन आलेल्या नातेवाईकांच्या हट्टामुळे मुलांना कार सीटमध्ये न बसवण्यासारखी चूक करु शकतो. इतरांनी केलेल्या आग्रही मतप्रदर्शनामुळे कदाचित असे होणार नाही. सीट बेल्ट व्यतिरिक्त अजून काही सुरक्षेचे उपाय (उदा: किचन गेट) तुम्ही अमलात आणत असाल तर इथे लिहा.

** डाळीच्या पीठाने पोटदुखीचा त्रास होतो ह्यासारखे सल्ले कृपया लहान मुलांचे आरोग्य ह्या धाग्यावर लिहा. इथे लहान मुलांच्या जीवाची सुरक्षा ह्या अनुषंगाने काही लिहिणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मुख्य दाराला वरती चेन लावावी.
अनुमोदन. माझ्या मित्राचा मुलगा आहे २ वर्षाचा. तो आई वडिलांचे लक्ष चुकवून रस्ता क्रॉसकरून मेलबॉक्स बघायला, शेजार्‍यांची बेल वाजवायला जायचा. आधी डेड बोल्ट लावला, मग चेन लावली. तर पट्ठ्या खुर्ची आणून तेही काढतो. मग एकदम उंचावर दरवाजाला चेन लावली आहे आत्ता.

अमेरिकाज फनिएस्ट होम विडीओज मध्ये जे मुलांचे विडीओ विनोदी म्हणून दाखवतात त्यात खरे तर बरेच लागू शकते मुलांना. अगदी अशक्य पण खर्‍या सिच्युएशन्स असतात.

१) पेंट, क्लोरॉक्स, क्लीनिन्ग लिक्विड्स व पावडरी मुलांपासून दूर ठेवावेत.
२) सायकल, ट्रायसिकल चालविताना हेल्मेट
३) स्केटिनग रोलर ब्लेडिन्ग करताना गार्डस घालावेतच.
४) झोपाळा खेळताना मुले पुढे तोल जाऊन मातीत पड्तात. घसरगुंडी व त्यापुढची जमीन यांत जास्त अंतर असेल ( जे भारतात नेहमी असते कल्पनाशून्य पणे) तर पालकांनी पुढे मुलाला रिसीव करायला उभे राहावे.
५) सीसॉ एकदम खाली आल्याने पड्तात छोटी.
६) भरलेल्या बादल्या घरातील स्विमिन्ग पूल वगैरे पाशी मुलांना जावू देऊ नये. सुपरविजन पाहिजेच.
७) मुलांना, तान्ह्यांना आंघोळ घालताना गीझरचा स्विच बंद करून मगच घालावी. पॉवरचा काही प्रोब्लेम आल्यास आपले हात तेव्हा ओले असतात. घरात कोणी नसले तर प्रशन येऊ शकतो. बाथरूम मधील खिड्कीत एक १२ इंची लाकडी स्केल ठेवावी. कधी एकदम पॉवर आउटेज झाल्यास स्विच बंद करायला उपयोगी येते. ( माझ्यावर मुलुंडात ही वेळ आली होती. )
८) पार्क मधील भांडणात सँड्बॉक्स मधील वाळू डोळयात फेकली जावू शकते.
९) नवजात बालकांना अनोळखी / उत्साही लोकांच्या हातात आजिबात देऊ नये. बाळ पड्ल्यास त्याला गंभीर दुखापत होउ शकते आमच्या ओळखीतील एक बाई अशाच लहानपणी पड्ल्या व त्यान्ची मानसिक वाढ थांबली दुर्दैवाने.
१०) मटार, स्टील बॉल्स वगैरे गोल गोष्टी नाकात जावू शकतात.
११) बेबी सिटर, मेड अतिशय विश्वासू हवी नाहीतर वेब कॅम लावून जावे बाहेर.

अजून एक महत्वाचे म्हणजे शक्य असेल तर CPR ट्रेनिंग घेणे. बर्‍याचदा लहान मुलांना चोकींग चा प्रॉब्लेम येतो तेव्हा ह्याची माहिती असलेली केव्हाही चान्गली. आपल्या गावातील रेड क्रॉस च्या ऑफीसमध्ये चौकशी केल्यास क्लास बद्दल माहिती मिळू शकते.

अगदि उपयुक्त बीबी.
सगळ्यानी सांगितलेल्या सुचना खुप चांगल्या आहेत. सगळ्या वापरण्यात याव्यात.
पण तरि मला वाटत एक महत्वाची गोष्ट सगळे विसरतायेत.
प्रत्येकवेळी मुलांना सांगता हे करु नको. ते करु नको. त्यामागचं कारण बहुतेक जण सांगत नाहीत. मग बालसुलभ वृत्तीने ज्यावेळी मोठी माणसं लक्ष द्यायला नसतात तेव्हा मुलं असले उद्योग करायचा प्रयत्न करतात. कारण एकच. मोठी माणस सारखी नाही म्हणतात मग त्याची जास्त उत्सुकता निर्माण होते.
त्यापेक्षा प्रत्येक नकाराचे कारण सांगावे बाळाला. अगदी लहान बाळ असेल असेल तरि अ‍ॅक्शन करुन सांगावे. म्हणजे गरम वस्तु असेल तर तोंडावर हात धरुन हा हा म्हणावे वैगरे. एकच गोष्ट परत परत सांगावि लागलि तरि चालेल. पण त्यामुळे मुलांना स्वतला हळुहळू कारणं समजतात. ती स्वत: जबाबदारपणे वागतात. अगदी दोन तीन वर्षे वयाच्या मुलांना सुद्धा बर्‍याच गोष्टी कळ्तात. हे अस सांगण्याची सुरुवात रांगणार्‍या बाळापासुन करावी. शब्द कळ्त नसले तरि आपले हावभाव त्यांना समजतातच.
उदा: मी भाजी कापताना वैगरे मुलीला समोर एक ठराविक अंतरावर बसवते. थोडी थोडी कापुन थांबते आणि कापलेली भाजी तिला भाण्ड्यात टाकायला साण्गते. प्रत्येक वेळी सुरिने हात कापेल म्हणुन मधे हात घालु नकोस , मी साण्गेन तेव्हाच ये अस सांगत असते. मी हि अगदि शांतपणे घाई न करता लक्ष देते.
पण ज्यावेळी मला घाई आहे तेव्हा मात्र मी तिला सांगते कि आज घाई आहे आणि तिला जरा लांब खेळायला लावते.
कधीकधी खुप धार नसलेली कात्री / प्लॅस्टिक्ची कात्रीने कागद कापायला देते. पण देताना हे ही सांगते की आई बरोबर असतानाच हे खेळायच. ती हे खेळ्ताना माझ दुसर कोणतहि काम मी करत नाहि. पूर्ण लक्ष तिच्याकडेच असत.
असच बर्‍याच इतर गोष्टीतही करते. काहि गोष्टिमधे मुलांचा सहभाग घेतला तर मुलं स्वताला विचित्र प्रसंगात टाकणे काहि प्रमाणात कमी होते. मुलांशी इण्टरॅक्टिव्ह संभाषणाने , मुलांना प्रश्न विचारायला उद्द्युक्त करण्याने, आणि त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तरे देण्यानेही खुप फायदा होतो.

चहा खुप गरम आहे अस नुसत सांगुन बर्‍याचवेळा उपयोग होत नाहि कारण त्यांना गरम म्हणजे काय हेच माहित नसत. मग साधारण गरम कपाला बाहेरुन हात लावु द्यावा. Controlled experience (मराठी शब्द सुचत नाहिये) दिला कि त्यांना नक्की "नाही" कशाला आहे ते कळ्ते. म्हणजे "चहाला हात लावायचा नाहि अस नसुन गरम ने हाताला चटका बसतो म्हणून हात लावायचा नाही" हे कळ्ते. हे कदाचित एकदा सांगुन कळणार नाही, परत परत सांगायचि आपली मानसिक तयारी ठेवावी. हे कळ्ले कि कि कुठ्लीही वस्तु गरम आहे अस सांगितल्यावर "त्याने हात भाजणार , हात लावायचा नाही" हे समीकरण बाळाच्या डोक्यात सहज येतं.

बॅटरि (Cell) हि एक भयानक गोष्ट आहे. तिचा आधी नक्की उपयोग काय हे मुलांना दाखवावे. त्याने खेळ्णी रिमोट चालतात. पण याने खुप भाजु शकते तेपण सांगावे. तोंडात घालायचि वस्तु नाही हे पण सांगावे. आणि कितीही समजुतदार बाळ असेल तरी हातात मिळेल अशी कुठलीच बॅटरी ठेवु नये.

अजुन एक गोष्ट म्हणजे काहि गोष्टी फक्त मोठ्या माणसांनीच करायच्या असतात हे मुलांना ठ्सवुन सांगणे. यात गॅस, इलेक्ट्रीक वस्तु आलेच. यात मुलांचा बघण्याचा सहभाग असेल तर छानच. पण हात लावायला अजिबात परवानगी नसावी, कारणे नीट समजावुन सांगावीत.

मुलांसोबत काम करताना मोबाईल फोन/ फोन कडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. शक्य नसेल तर सरळ बंद करावा. दोन मिनीटे खरच महागात पडु शकतात.

अजून एक दुदैवी घटना, माझ्या पुर्वीच्या एका कलीग च्या मैत्रीणीच्या घरी घडलेली.
त्या बाईच्या मोठ्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी होती. घराच्या मागे स्वीमींग पूल होता.
त्या बाईचा धाकटा मुलगा (वय वर्ष ४), सगळ्या गडबडीत पूल च्या बाजूला कधी गेला व त्यात पडला हे कळाले नाही.
थोडा वेळ आईवडीलांचा समज असेल मुलांच्या मधे, पण बराच वेळ तो दिसला नाही मग शोधाशोध, पण तोवर उशीर झालेला:(
स्वीमिंग पूल कडे जायला वेगळे गेट होत, पण कोणाच्या तरी हातून त्याची कडी नीट लावली गेली नव्हती Sad

लहान बाळं हवेत उडवायची घाणेरडी सवय असते खुप जणांना. कितीही राग येऊ दे किंवा कितीही जवळचा माणुस का असेना, निक्षुन सांगावं त्यांना, असं करु नका म्हणुन.

लहान मुलं असताना किंवा आपल्या आजूबाजूला जरी असली तरी किती सतर्क रहावं लागतं नै? हा धागा व त्यावरचे प्रतिसाद वाचूनच लक्षात येतंय.... मुलांना बागेत वगैरे फिरायला घेऊन गेलात तर तिथेही मुलं कोठे खेळत आहेत, तिथे काही धोकादायक खड्डे, बांधकामे, झुडुपे, प्राणी (हो, भटकी कुत्री वगैरे) नाहीएत ना.... सगळ्याची खात्री करायला लागते. शिवाय मुलं तोंडात काही माती, पानं, गवत, किडे वगैरे घालत नाहीत ना हेही बघावं लागतं! आणि हे सर्व त्यांना खेळता येईल, मजा करता येईल अश्या बेताने! धन्य धन्य ते पालकत्व! Happy

इकडे देशात स्विमिन्ग पुल वगैरे नस्ल तरी, रस्त्यावरील्/अन्गणाजवळील उघडे खड्डे/गटारे यान्चा धोका अस्तोच
अत्यन्त महत्वाचे म्हणजे, बाथरुम मधे इकडे देशात तरी बादल्या/टब पाण्याने भरुन ठेवायला लागतात. मुले लहान होती तोवर बाथरुमचे दार बन्द करुन ठेवायचो कारण बादलीत वाकुन बघताना खाली डोक वर पाय अशा अवस्थेत आत बुडालेल्या केसेस ऐकुन माहित होत्या.
गेट वगैरेची सोय नाहि तरी एक लाम्बलचक फळी बाहेरील दरवाजास आडवी ठेवलेली असायचि कायम!
मुले लहान असेस्तोवर कधीही कॉट वर झोपवली नाहीत, किम्बहुना होत्या त्या कॉट काढून टाकल्या, व जमिनीवरच झोपायची सवय केलि, असन्ख्य वेळेस मुले झोपेत कॉटवरुन खाली पडतात व इजा होते, उशीच्या अडसराचा उपयोग होत नाही.
गोट्या, लिमलेटच्या गोळ्या वगैरे कधीही पोरान्च्या हाताला लागु देऊ नये, ते गिळले जाते, पोटात गेले तर धोका थोडा कमी, पण श्वासनलिकेत घुसले तर जागीच खेळ खलास, अशी केस खेडेगावात लिम्बीच्या आईसमोरच बारा वर्षाच्या मुलासोबत झालेली ऐकुन आहे.
आमच्या लहानपणी ग्यास बिस नसायचे, फरफर्‍या आवाजाचा स्टोव्ह हीच चैन असायची, त्या काळात कीचन ओटा वगैरे प्रकारही नसायचा, सगळा कारभार जमिनीवर बसुन, तर आईने स्टोव्ह पेटविण्यासाठी काकडा लावला होता, स्टोव्ह पेटू लागल्यावर पेटता काकडा काढुन जमिनीवर ठेवला, त्याचे आकर्षण वाटून मी रान्गत रान्गत जाऊन तो काकडा मुठीत पकडला अशी आईची (व थोडी माझीही) आठवण आहे. तसे का झाले व पुढे काय झाले त्याचे वर्णन करत नाही.
डोळ्यात तेल घालुन लहान मुले वाढवावी लागतात हे नक्कीच!
(पुढे हीच मुले तुमच्या चप्पला त्यान्च्या पायात येऊ लागल्यावर शिन्गे फुटून अतिशहाणी बनतात तो भाग वेगळा Proud पण त्यावेळेस घ्यावयाच्या खबरदार्‍यान्चा हा बीबी नाही! Wink )

मुन्ग्या/डोन्गळे वगैरे सहसा जिवन्त पण झोपलेल्या माणसाच्या वाटेला जात नाहीत, त्यान्ना कसे कळते काय की! (आफ्रिकेत वगैरे अपवाद असल्यास माहित नाही)
पण, जर बाळाच्या बिछान्याच्या आजुबाजुस, अन्गावर्/कपड्यान्वर, गोड दुध्/फ्यारेक्स्/बोर्नव्हिटा वा तत्सम चिकट्/गोड पदार्थ सान्डलेले असतील, पुसल्यावरही अवशेष शिल्लक असतील, तर त्याच्या वासाने मात्र मुन्ग्या येऊ शकतात, व विपरित वेळेस बाळास त्या चावूही शकतात! तसेच एकीने चावल्यावर बाकीच्या "मेन्ढराप्रमाणेच" चावत सुटण्याचा धोका असतो. तेव्हा परिस्थितीनुरुप, मुन्ग्या, डास, चिलटे, लहानमोठी झुरळे इत्यादी कीटकान्पासून बाळाचे कसोशीने रक्षण करावे लागते!
(आमच्या घरातच फरशिच्या भेगेमधुन वारूळ फुटल्यागत मुन्ग्या बाहेर पडायच्या, त्यामुळे हा बराचसा अनुभव्/अनुभुती मधील सल्ला आहे)

१. हवेत मुलं उडवण्यावरूनः ओळखीच्या एका माणसाला लहान असताना कुणीतरी हवेत उडवलं, त्या माणसाला त्याला झेलता आलं नाही.. हा डोक्यावर पडला..डोक्यावर (समजेत) काही प्रमाणात परिणाम झाला Sad
२. बाप आणि लेक दोघं एकमेकांच्या तोंडात लांबून दाणे फेकत होते आणि खात होते.. मुलाचा दाणा श्वास नलिकेत अडकला आणि तो मुलगा गेला. Sad
३. वर लिंबूनं लिहिल्याप्रमाणे पाण्याच्या बादलीत अडकून गेल्याची घटना मैत्रिणीच्या शेजारच्या घरात घडली.. Sad

ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्टली पाळल्या पाहिजेत.

भारतात दुचाकीवर मागे बसवून मुलं नेणार्‍यांनी लक्षात ठेवावे- साधारण रात्री ८ नंतर मूल दमलेलं असतं आणि त्याला दुचाकीवर वार्‍यामुळे पेंग यायची शक्यता असते. मूल मागे बसलं असेल, तर कळतही नाही कधी पेंगायला लागतं ते, आणि त्याचा तोल जाऊन अपघात व्हायची शक्यता असते. उंची पुरत असेल, तर अशावेळी मूल पुढे उभं करावं आणि त्याला स्पीडोमीटरच्या इथे डोकं टेकवायला सांगावं. उंची जास्त असेल, तर मुलाला मागे बसवून ओढणी त्याच्या मागून गुंडाळून घेऊन आपल्या पोटाजवळ बांधून घ्यावी.

मी आठवीत असताना एका मैत्रीणीचा २ वर्षांचा भाउ पाण्याच्या रांजणात वाकून बघत असताना पडला, मैत्रीण, दोघी लहान बहिणी शाळेत, वडिल कामावर आणि आई किचन मध्ये. १०-१५ मिनिटांनी लक्षात आलं तोपर्यंत उशिर झालेला.

दूचाकीबाबतच अजुन एक, जर गाडी विनागिअरची असेल, तर मुलास उभे करुन गाडी चालु ठेवु नये (कुणाशी बोलताना वा निघताना वा सिग्नलला वगैरे), अगदी जरा उजवी मुठ मोकळी मिळाली तरी मुल ते पिळते व अनवस्था प्रसन्ग ओढवतो. लिम्बीच्या बाबतीत घरातुन निघतानाच ही घटना घडलेली आहे.

कारच्या बाबतीत, लहान मुले बघुन ठेवतात व नन्तर किल्ली फिरवुन स्ट्रार्टर देऊ शकतात, तेव्हा केव्हाही कोणत्याही परिस्थितीत, गाडी बन्द केल्या केल्या किल्ली काढून स्वतःचे खिशात्/ताब्यात सुरक्षित ठेवावी! Happy

लहान मुलांना दुचाकीवर बसवणे टाळता येणार नाहि का?
मला ते ३/४ जणांच कुटुंब बाईक वरुन हायवेने जाताना बघुनच धडधडायला होत.
इथे लहान मुलांना दुचाकी बसवण्यास परवानगी नाहिये.
सायकलवर चालत, जर बेबी सीट लावली असेल तर. कारण सायकल फुटपाथ वरुन चालवावी लागते.

आईग... कितीतरी झोपलेली व पेंगणारी मुलं त्यांच्या पालकांना लक्षात आणून दिली आहेत मी. फार भयानक असते ते दृश्य.. Sad

अगदी ग पूनम, मी दुचाकीवरुन जात असताना प्रचंड काळजी घेते. जुईला कायम मागे बसायचं असत पण थोडा दुरचा आणि संध्याकाळचा प्रवास असेल तर तिला कायम पुढे उभ केलेलं आहे. तेव्हाही तिच्याशी सतत बोलत रहाण महत्वाच. मागे कधी बसवलच तर पोटाला घट्ट पकडुन ठेवायला सांगते. जरा जरी पकड ढिली झाल्यासारखी वाटली तर स्पेशल लक्ष देण्याची गरज आहे हे कळत. आता परत जाईन तेव्हा ती पुढे फार उंच होईल. Sad

हो ग बस्के, मी पण खूप जणांना पाहिलय अस. अजुन एक बेक्कार गोष्ट म्हणजे एकासाईडला पाय ठेवुन बाळांना घेउन बसतात ते. Sad खुप डेंजरस वाटत ते.

सावली, भारतात छोट्या छोट्या अंतरांवर जायला टु व्हिलर बडी पडते. मी देशात असताना लेकीला शाळेत आणि तिच्या गाण्याच्या क्लासला टु व्हिलरनेच सोडत असे. प्रत्येक वेळी कुठे रिक्षा करणार? नवी मुंबईमधे आम्ही जिथे रहातो तिथे बसेसही तासाभराने होत्या.
घेउन जाण्यात हरकत नाहीये. काळजी घेणं आवश्यक आहे.

दुचाकीवरून आठवलं,मागे एकदा भारतात असताना काही कामासाठी टू व्हिलरवरून बाहेर गेले. बरोबर भाचीही तयार झाली यायला. येताना मात्र ती अगदीच पेंगुळली होती. मला टेन्शन. सतत तिच्याशी बोलत होते आणि तिला अगदी मागून घट्ट मिठी मारून ठेवायला सांगितलं होतं.

भारतात मुलांना दुचाकीवर शक्यतो बसवु नये असे माझे वै. मत. मागच्या वेळेस जेव्हा गेले होते, तेव्हा (मी एकटीच )पुण्यात टिळक रोडवर बादशाही च्या सिग्नल ला थांबले असताना (समोरच पोलिचे होता ) मागुन येउन एका कार वाल्याने लाल दिवा असुनही न थांबता माझ्या गाडीला जोरात धक्का दिला. मी उडुन रस्त्याच्या कडेला पडले पण नशिबाने काहीही लागले नाही. तेव्हा वाहतुकीची अशी भयंकर अवस्था बघता दुचाकीवर लहान मुलाना बसवायची हिम्मत करु शकणार नाही.

नवजात बालकांना अनोळखी / उत्साही लोकांच्या हातात आजिबात देऊ नये.>>>

लहान बाळं हवेत उडवायची घाणेरडी सवय असते खुप जणांना. कितीही राग येऊ दे किंवा कितीही जवळचा माणुस का असेना, निक्षुन सांगावं त्यांना, असं करु नका म्हणुन.>>>

१०० % अमंलबजावणी झालीच पाहिजे अशी गोष्ट आहे ही... एकदा केल्यावर मुले परत परत कर म्हणुन मागे लागतात.... आणि तसे करणार्याला कोण्त्या भाषेत सांगायचे तेच कळत नाही...

अमृता, तिच्यासाठी पण हेल्मेट असेलच ना ? आता बाइकवर नेशील तर हेल्मेट लावणे सक्तीचे कर तिला सुद्धा. (तू वापरत असशीलच असे गृहीत धरतेय :))

तिच्यासाठीचं हेल्मेट शोधुन पण मिळाल नव्हत मागे. मी घालायचे पण मला हेल्मेट घालायच गिल्टी वाटायचं Sad
वरचा मृदुलाचा इंन्सिडंट वाचल्यानंतर तिला हेल्मेट शिवाय बसवणार नाही आता.

मृदुला,
इथे भारतात दुचाकीवरून मुलांना घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही. ठेचेठेचेला रिक्षा करणं शक्य नसतं गं. रिक्षा येत पण नाहीत. आणि जवळचं अंतर आपण चालून जाऊ शकतो एकटे पण मूल तेवढं चालेलच असं नाही, त्याला उचलून आपल्याला तेवढे जाववेलच असेही नाही.

इथे भारतात दुचाकीवरून मुलांना घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही. ठेचेठेचेला रिक्षा करणं शक्य नसतं गं. >> अनुमोदन. आणी ज्यांना रिक्षा/चारचाकी परवडत नसेल त्यांचं काय?

सीएनएन साइटवर टॉक्सिक अमेरिका नावाचा मोठा लेख आहे तो जरूर वाचा. इथे लिंक द्यायची नाही ना?
रोजच्या वापरातील हानिकारक केमिकल्स वर आहे. जबरी लेख आहे. ते केमिकल्स कार्सिनोजेनिक तर आहेतच पण आईच्या पोटात असतानाच ज्या मुलांना हे केमिकल एक्स्पोजर झाले आहे त्यांच्यात काही तरी डिसोर्डर्स आहेत. खूप डीटेलवारी माहिती आहे.

माझी मुलगी सध्या सारखी टीवीला हात लावायला जाते. आमचा टीवी सध्या टेबलवर आहे. जमिनीपासून साधारण २ फुटावर. ती काही दिवसात अंगावर ओढुन घेइल अशी भीती वाटते.
यासाठी वॉलमाउट करणे सोडून काही ऑप्शन माहीत आहे का कोणाला?

Pages