लहान मुलांची सुरक्षितता

Submitted by तृप्ती आवटी on 15 June, 2010 - 10:51

काल प्रविणपा ह्यांनी बे एरिया बाफवर टाकलेल्या खालील पोस्टवरुन हा बाफ काढावा असे वाटले:
"काल एक वाईट्ट अपघात घडताना पाहिला. एका SUV चे टायर फुटून ती फास्ट लेन मधून ३-४ कोलांट्या उड्या खात स्लो लेन मध्ये येऊन पडली. गाडीतल्या सर्वांना फार लागलं पण त्यांची ९-१० महिन्यांची मुलगी मात्र साधा एक ओरखडा सुदधा न येता बचावली. तिला तिच्या पालकांनी कार सिट मध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं होतं. मी स्लो लेन मध्ये मर्ज करत होतो. साधारण ५-१० सेकंद जर का माझी मोटर सायकल तिथे अगोदर पोचली असती तर बहुतेक हा मेसेज मी लिहू शकलो नसतो. सर्वांना एकच विनंती आहे की सिट बेल्ट, कार सिट वगैरे safety measures वर compromise करू नका. एका सेकंदात होत्याचं नव्ह्तं होऊ शकतं"

आपल्या मुलांची आपण काळजी घेतोच. पण कधी मुलांच्या तर कधी भारतातुन आलेल्या नातेवाईकांच्या हट्टामुळे मुलांना कार सीटमध्ये न बसवण्यासारखी चूक करु शकतो. इतरांनी केलेल्या आग्रही मतप्रदर्शनामुळे कदाचित असे होणार नाही. सीट बेल्ट व्यतिरिक्त अजून काही सुरक्षेचे उपाय (उदा: किचन गेट) तुम्ही अमलात आणत असाल तर इथे लिहा.

** डाळीच्या पीठाने पोटदुखीचा त्रास होतो ह्यासारखे सल्ले कृपया लहान मुलांचे आरोग्य ह्या धाग्यावर लिहा. इथे लहान मुलांच्या जीवाची सुरक्षा ह्या अनुषंगाने काही लिहिणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञाती आम्ही फायबर चे दणकट फेन्स आणले होते. ते लहान मुलांना सहज काढता येत नाहीत (निदान ३-४ वर्षापर्यंतच्या). साईट सापडली तर देतो.

दुसरे म्हणजे टीव्हीचा स्टॅण्ड असा बघ की जो टेबल ला खिळ्याने किंवा स्क्रू ने लावता येईल, म्हणजे एकूण वजन सहज न ओढता येण्याएवढे होईल.

अहो प्रूफ रीडर बाई , बदलून असं हवं ना ? Proud बदलुन बदलुन दोनदा का लिहिलंय ??? Light 1
बदलून बदलल्याबद्दल धन्यवाद . Wink

इथे बरेच दिवसांपासुन लिहायचे म्हणत विसरत होते.

काही दिवसांपुर्वी एक आर्टिकल आलेले मेलमधे कि फेसबूकवर तुम्ही जे फोटो तुमच्या स्मार्टफोनवरुन अपलोड करता त्याला एक जिओ टॅग(Geo Location tag) असतो. तो फोटोमधुन एक्स्ट्रॅक्ट करणे पण सोपे असते. त्यावरुन तुमच्या घरावर पाळत ठेवणे वगैरे करणार्‍याला जमू शकते.

तुमच्या मुलांचे वगैरे फोटो त्यामुळे फेसबुक/इतर कोणत्याही सईटवर वगैरे अपलोड करताना शक्यतो स्मार्टफोनवरुन वगैरे करु नका. त्यावरुन तुमच्या मुलांचे whereabouts कोणालाही कळू शकतील.

त्या आर्टीकलची लिंक मी बुकमार्क केलिय पण कोठे ते आठवत नाही. मिळाली की इथे देइन. पण हा सारांश आहे त्याचा.

न्युयॉर्क टाईम्समधली बातमी ही - http://www.nytimes.com/2010/08/12/technology/personaltech/12basics.html?...

स्पेसिफिक फेसबुकबद्दल देखील वाचले होते ते शोधते.

धन्यवाद सर्वांना.
टीव्ही स्टँड ला मागे स्क्रु जोडण्यासारखे काही नाहीये. फेन्सेस ची आयडिआ चांगली वाटतेय.
टीव्हीच्या अगदी समोर कॉफी टेबल लाव आणि कॉफी टेबलवर तिची २-३ खेळणी अदलून-बदलून ठेवत जा.>>> हे करते आजच. पण टेबलावरही चढेल काही दिवसात.

आम्हालाही सेम प्रॉब्लेम आला होता. आधी टीव्ही स्टँड म्हणून जो आणला होता तो इतका बुटका होता की त्यावर माझा मुलगा सहज चढून बसायचा. म्हणून मग आम्ही student desk आणलं आणि सरळ टीव्ही त्यावर ठेवला. Happy टेबलाची उंची बर्‍यापैकी असल्याने त्यावर चढून बसणे वगैरे अशक्यच आहे. त्यामुळे आता माझा मुलगा अजिबात टीव्हीजवळ जाऊ शकत नाही.

आम्हाला टिव्ही ओढायचा नव्हता पण, जवळ जावुन त्याच्यावर हात्,खेळणी आपटायचा होता मग, सिंडींने सांगितलेला उपाय केलेला.
काही दिवसानी कॉफि टेबलवर चढुन बसुन (बॉक्स स्टाईलच्या) टिव्हीच्या स्पिकर आणी स्क्रिनवर डॅननच योगर्ट चोपडल होत.

माझा मुलगा लहान असताना त्याचा हात टिव्हीला पोचायला लागल्यावर त्याने बटणे दाबण्याचा उद्योग चालू केला. आम्ही स्टँडवर टिव्हीच्या खाली फोन डिरेक्टरी ठेऊन उंची वाढवली की थोड्याच दिवसात त्याचे हात तिथे पोचायचे. शेवटी कंटाळून आम्ही टिव्ही परत खाली स्टँडवर आणला व टिव्हीसमोर त्याच्या खेळण्यांचा पसारा केला.( त्याची अजूनही तसेच खेळायची पध्दत आहे.)
मग त्याने रिमोट हस्तगत केला व काय दाबले की काहीतरी होते हे शिकून घेतले. आताच्या टिव्हीचा रिमोट कसा वापरायचा हे फक्त त्यालाच कळते.
याशिवाय व्हिसिआर, टिव्ही, काँप्युटर ह्या सर्व वस्तू जीवित असल्याने त्यांना खायला प्यायला लागते अशी त्याची ठाम समजूत होती, त्यामुळे त्यांना आपले जेवण भरवणे, दूध, ज्यूस, पाणी पाजणे, व आपल्याला झोप आली की झोपवणे हे सर्व तो आवडीने करायचा. खाण्याशिवाय व्हिसिआरमधे पेन, कागदपत्रे, लहान खेळणी देखिल घालायचा. टेप्समधल्या रिबन ओढून गुंता करून ठेवायचा. आई इंजिनिअर असल्याचा सगळ्यात फायदा घेतला असेल तर तो त्यानेच. नोकरी करत नसताना हा मला फुल टाईम जॉब होता टिव्ही, व्हिसिआर किंवा इतर तत्सम टेक्नॉलॉजिकल वस्तू बिघडल्या की दुरुस्त करण्याचा.
ज्ञाती, तुला एवढेच सांगू शकते की मुलीला थोडा वेळ दुसर्‍या खेळात गुंतव. टिव्हीला हात लावण्याने सगळी तिच्याकडे जास्त लक्ष देतात असे तिला वाटले, तर ती आणखी हात लावेल. थोडी मोठी होईल तसतशी ती हात लावणारच, व मग आपणही त्याचा फायदा घेऊन त्यासमोरचा वेळ मर्यादित करू शकतो. उदा. "आपण अमुक हा कार्यक्रम बघूया. आता कार्यक्रम संपला, आता चला झोपायची/जेवायची/आंघोळीची वेळ झाली. तू टिव्ही बंद कर."

sorry

आताच्या टिव्हीचा रिमोट कसा वापरायचा हे फक्त त्यालाच कळते.>> Lol

स्वाती धन्यवाद Happy माझ्या लेकीलाही रिमोटने काहीतरी होते हे कळते. सगळे रिमोट हल्ली उंचावर ठेवावे लागतात.

पल्लवी, इथे फक्त लहान मुलांच्या जीवाची सुरक्षा ह्या अनुषंगाने काही लिहिणे अपेक्षित आहे. तुम्ही ह्या आधी योग्य बाफवर तुमचा प्रश्न मांडला होता. कृपया तुमची पोस्ट इथून डिलीट करा.

काही मुलांना (२-३ वर्षांच्या) स्वतःला बेडरूम मध्ये वा बाथरूम मध्ये स्वतःला बंद करून घेण्याची सवय असते. ते स्वतःला लॉक ही करून घेऊ शकतात. तेव्हा लॉकच्या मूठीच्या आकाराचे एक प्लॅस्टिक चे कव्हर मिळते जे वरच्यावर फिरते पण लॉकची मूठ जोरात दाबल्याशिवाय फिरत नाही.

फिशर प्राइसची बरीच खेळणी, सायकल्स वगैरे रीकॉल झाल्याची बातमी आहे:
http://www.cpsc.gov/cpscpub/prerel/prhtml10/10359.html

http://www.cpsc.gov/cpscpub/prerel/prhtml10/10362.html

http://www.cpsc.gov/cpscpub/prerel/prhtml10/10361.html

तेव्हा लॉकच्या मूठीच्या आकाराचे एक प्लॅस्टिक चे कव्हर मिळते जे वरच्यावर फिरते पण लॉकची मूठ जोरात दाबल्याशिवाय फिरत नाही.>> आमच्या छोट्याने हे चाईल्ड लॉक असताना सुद्धा स्वतःला बेडरुममध्ये लॉक केले होते...लॉकच्या समोरच्या बाजूला जे भोक असते त्यात हात घालून हा दार लॉक करु शकतो हे माझ्या लक्षात आल्यावर त्या भोकाला मी स्कॉच टेपने बंद केले आहे.

ह्या लॉक्सना जनरली मध्ये छोटे भोक असते त्याची किल्ली ( आकड्यासारखी ) जिथे मुलांचा हात पोचणार नाही आणि ज्या खोलीला दार नाही अशा ठिकाणी ठेवावी. एकापेक्षा जास्त असल्यास उत्तम. ( हेअर पिन्स नेहमीच चालतील असं नाही त्यामुळे अपार्टमेंटमध्ये राहत असल्यास त्या लोकांकडून मागून घ्यावी. ) मुलं स्वतःला लॉक करतील असं टेंशन अजिबात येत नाही. माझ्या मुलाने तर आतून दरवाजा लॉक करुन मग बाहेर येऊन दार ओढून घेण्याचे उद्योगही केले आहेत बरेचदा. अजूनही करतो. अशा वेळी ह्या किल्लीचा पर्याय असल्याने मी cool असते Happy

अरे फारच उपयुक्त धागा आहे. माझे आधी कधी लक्ष गेले नव्हते. सुदैवाने माझा पोरगा जरा शांत स्वभावाचा असल्याने तो जीवाला जपूनच खेळत असतो. नाही ते जीवावरचे धाडस केले नाही. पण आता तीन वर्षांचा व्हायला आल्यावर त्याला पाय फुटायला लागले आहेत. इथले बरेच सल्ले तातडीने अंमलात आणायची गरज आहे. सर्वांना माझे मनापासून धन्यवाद.

लहान मुलांच्या कारसीट संबंधी नविन गाईडलाईन्स! २ वर्षापर्यंत मुलांना कारसीटमधे मागे तोंड करुन बसवा.
http://children.webmd.com/news/20110318/new-guidelines-for-childrens-car...

मुंबई/ ठाणे भागात इलेक्ट्रिक आउटलेट कव्हर्स कुठे मिळू शकतील? माझी भाची आजकाल बरीच उपद्व्यापी झालेय. सद्ध्या तिच्या आजोबांनी वापरात नसलेल्या आउटलेटवर चिकटपट्ट्या लावल्यात. Happy

इलेक्ट्रीकल सामान मिळते तिथे मिळतात. आमच्या कडे कुंभारणी (मधमाशीसारखी एक माशी असते) ती इलेक्ट्रीकलच्या ऑटलेट्मधे घरटी करत तेव्हा आम्ही आणलेहोते Proud

लहान मुलांना भुभू दिसलं की त्याला हात लावायचा असतो. खेळायचं असतं. हे छान पुस्तक आहे. साईटवर पोस्टर्स इ आहेत-
How to Greet a Dog
Ebook: Free Download for One Week Only!

http://drsophiayin.com/blog/entry/how-to-greet-a-dog-ebook-free-download...

उत्तम चर्चा!

सावलीची पोस्ट .. अनुमोदन!

मुलांना कळतिल अश्या पद्धतीने उत्तरे दिली की ती गोष्ट करत नाहीत.

माझ्या भाच्याला इस्त्रीचे आकर्षण होते.. तो मध्येच लुडबुड करून हात लावायला बघायचा. एकदा इस्त्री सुसह्य इतकी गरम असताना त्याला हात लावू दिला तर त्यानन्तर लुडबुड आपोआपच थामब्ली!

मुळातच मुलांना कुतूहल असते.. करूच नको म्हटल की ते अधिक उत्सुकतेने आपल्या अपरोक्ष प्रयत्न करू शकतात. त्यापेक्षा त्यांचे कुतुहल योग्य रितीने शमवले आणि धोके समजावून दिले की मुलांना बरोब्बर समज येते.

Pages