खुबानी का मीठा

Submitted by अमा on 13 June, 2010 - 07:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुके जर्दाळू ३०० ग्रॅम
साखर १५० ग्रॅम
बदामाचे काप शोभेसाठी.
वॅनिला आइसक्रीम/ थोडी साखर घालून फेट्लेले क्रीम सोबत देण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

जर्दाळू म्हणजेच खुबानी पाण्यात ४ - ५ तास भिजवून घ्या. ( हा वेळ पाकक्रुतीच्या वेळेत धरलेला नाही)
जर्दाळूच्या बिया काढून घ्याव्यात व जर्दाळू चा गर, साखर व भिजविलेले पाणी शिजवायला ठेवावे.
साखर पूर्ण विरघळून त्यात जर्दाळू नीट शिजले म्हणजे खाली काढावे व गार करावे.
वरून बदामाच्या कापांनी सजवावे. आइस्क्रीम/ क्रीम सोबत सर्व करावे.

वाढणी/प्रमाण: 
४- ६ लोकांसाठी एकेकदा.
अधिक टिपा: 

बर्‍यापैकी हाय कॅलरी पदार्थ आहे. चिनीमातीच्या नाजुक पांढर्‍या, सोनेरी/ चंदेरी कड असलेल्या बोल मध्ये सर्व केल्यास त्याचा ब्राउन रंग सुन्दर दिसतो. मध्यभागी आइस्क्रीमचा एक छोटा स्कूप ठेवावा.
हैद्राबादी बिर्याणीच्या बेता बरोबर उत्तम

माहितीचा स्रोत: 
बेग ची आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉटलकमधे हा पदार्थ खाल्लाय. स्वर्गिय अशी चव आहे.
माझ्या मैत्रिणीने आइस्क्रीमच्या ऐवजी कूल व्हिप घालून सर्व्ह केला होता.

मामी, जर्दाळू शिजलाय हे ओळखण्याची काही खूण आहे का? म्हणजे वास येणे, रंग बदलणे?

रंग डार्क ब्राउन. साखरेचा पाक तयार झाल्यासारखी कन्सिस्टन्सी येते. चमचा उचलल्यास थेंब लगेच पडणार नाही. पण फार पक्का पाक पण नाही झाला पाहिजे. मंद आचेवर केले की जळणार नाही. slightly thick caramel sauce type.

आता देसी ग्रोसरी मधून सुके जर्दाळू आणतेच या आठवड्यात. ताजे जर्दाळू आहेत घरात. पण ते शिजून गोळा व्हायला बराच वेळ लागेल बहुतेक.

ह्म्म्म.. म्हणजे जर्दाळू शिजुन मउ पडतात का त्यात? मग तो पाक (जर्दाळू सोबत) आईस्क्रिमवर घालायचा?

पदार्थ माझ्यासाठी नविन आहे म्हणुन हे प्रश्न Happy फोटो टाका जमल्यास.

मेधा, तुला ताजे जर्दाळू कुठे मिळाले?

अमा, बेग कौन है?
चांगली, सोपी पाककृती आहे. जमेल असं वाटतं...

फोटो दिसत नाही.
------------
बाकी सुके जर्दाळू आणि अंजीर भिजवून,शिजवून (१०मिनिटे ) त्यावर कस्टर्ड ओतलेले खाल्ले आहेत. बरे लागतात.

Mhalsa do not combine khubani ka meetha and double ka meetha. Double ka meetha is aam aadmi ka sweet but khubani ka meetha is khaas . Plain mildly sweet vanilla ice cream will.be great combination. Adding extra sugary and milky sweets in a combo will ruin the khubani ka jaika.

Seemantini Baig is ex colleague. Now a film maker. Drama producer. I was lucky to see their play Bhagmati staged at the taramati baradari. Lovely romantic place in Hyderabad. Great for ghazals on cool nights and chowki dinner. White shararas and silver chandbalis.

हो

आणि थोडा वेळ बी चघळून ते तोंडातच फोडून आतले मगज खाणे

ते पनीरवाले लोकही मला म्हणूनच आवडत नाहीत , दूध , ताक , दही , तूप इथवर ठीक आहे

दुधाचे पनीर करून , ते डीप फ्राय करून ते पुन्हा भाजीत घालून लोक खातात , मला तर फार नवल वाटते बाई ! Proud