काही च्या काही

Submitted by नितीनचंद्र on 12 June, 2010 - 02:04

इथे आल की वाटत
आपण ही लिहाव्यात गद्य कविता
बेबंद बेछंद सुसाट पण खोल...
वेदनांशी नात सांगणार्‍या
आणि ते नात जपणार्‍या

लिहायल्या घेतल्या की उमगत
लिहिणारे असे पिसाट का होतात
सामान्य न पटणारे पण असामान्याना रुचणारे
प्रश्न का विचारतात

जगच भरलय अश्या अबोध गोष्टींनी
सामान्य हे असच चालायच म्हणुन रडतात किंवा कुढतात
पण असामान्य का ?का ?म्हणुन झोडतात

कारण सोप्प आहे
सामान्य रडतात किंवा कुढतात न घडणार्‍या वा नको असलेल्या घटनांनी
असामान्यांना ते जमत नाही
कारण आधी ते सामान्यच असतात
रडुन रडुन त्यांचे डोळे कोरडे होतात

मग काही होतात निर्दयी, नतद्रष्ट
काही विंचवांना पाण्याबाहेर काढणारे संत
प्रवास अनेक जन्मांचा
समजत नाही कुठे अंत

गुलमोहर: