आपलं कोण मेलं ?

Submitted by जीएस on 10 June, 2010 - 09:36

भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ?

ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ?

योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक.
अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन.

पण आता खालची बातमी बघा... अँडरसनच्या अटकेची मागणी होऊ शकते हे लक्षात घेऊन तेंव्हा त्याला भोपाळहून ताबडतोब दिल्लीला नेऊन अमेरिकेला पाठवले गेले. २०,००० बळींना जबाबदार अँडरसन भोपाळहून सरकारी विमानाने गेला, विमान तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या आदेशावरून दिले गेले. काय कारवाई होणार आता अर्जुन सिंगवर? अर्जुन सिंग तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींकडे बोट दाखवू शकत असतील तर नक्कीच काहीच कारवाई होणार नाही. प्रकरण दाबले जाईल..

http://news.rediff.com/report/2010/jun/10/got-a-call-from-cms-office-to-...

-----
दाउदने तर भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटानंतर केंद्र सरकारने हात धुवून दाउदच्या मागे लागयचे ठरवले होते. व्होरा कमिटी नेमली होती दाउदची पाळेमुळे खणण्यासाठी. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा व्होरा कमिटीला दिलेला अहवाल सांगतो की शरद पवार, सलिम झकेरिया आणि जावेद खान हे भारतातले प्रमुख लागेबांधे आहेत दाउदचे. त्यांचे एकमेकांशी आर्थिक व्यवहार, स्वतःच्या सरकारी विमानातून दाउदच्या माणसांची शरद पवारांनी केलेली वाहतूक, मुंबईत दंगल उसळताच दाउदच्या आईला चोवीस तासात पासपोर्ट मिळवून देउन तिची केलेली पाठवणी... सगळे अगदी सविस्तर होते त्यात. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर उलटेय म्हटल्यावर दाबला रिपोर्ट, पण आउटलूकने फोडला होता तेंव्हा तो रिपोर्ट.

http://www.outlookindia.com/article.aspx?200793

महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला, पुढे काय झाले.... ?

पण पुढे काय ? जनतेची स्मरणशक्ती तर अगदी तोकडी. आजही हा मनुष्य समाजात उघडपणे केंद्रिय मंत्री म्हणून फिरतो आहे. सगळच मॅनेज करण्याची ताकद आज आहे.
-----

अशा किती केसेस दाखवायच्या ? बघत रहायच्या ?

लोकप्रतिनिधी, नोकरशाही आणि न्यापालिका हे आपण तीन स्तंभ म्हणतो लोकशाहीचे, पण या सगळ्यांनीच संगनमत करून दिवसरात्र फकत देशाचे लचके तोडत रहायचे म्हटल्यावर काय असणार आहे आपले भवितव्य? या तिघांपासून देशाला वाचवण्याचं काम कोण करणार ?

की आपल अजून कोणीच मेलं नाही म्हणून आपण गप्प बसायच आहे ? तोपर्यंत थांबायच आहे ??? जरूर थांबूया.. तो सुदिन लवकरच येईल यात मला तरी काही शंका दिसत नाही.

मला मार्टिन निमोलर या ख्रिस्ती धर्मोपदेशकाचे, नाझींना अटकाव करण्यासंदर्भातल्या जर्मन सुशिक्षितांमधल्या उदासीनतेबद्दलचे वक्तव्य आठवते

THEY CAME FIRST for the Communists,
and I didn't speak up because I wasn't a Communist.

THEN THEY CAME for the trade unionists,
and I didn't speak up because I wasn't a trade unionist.

THEN THEY CAME for the Jews,
and I didn't speak up because I wasn't a Jew.

THEN THEY CAME for me
and by that time no one was left to speak up

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दावुदच्या भारतातल्या माणसांची नावे वाचुन् प्रचंड आणखी एक धक्का बसला....
आणि पवार साहेब किती मोठे आहेत ते परत एकदा समजल !

असे काही वाचले की आपल्याला राग येतो, उद्विग्नता आणि संताप येतो,
थोडासा जळफळाटही होतो आणि कधी-कधी आदळआपटही करतो.

पण आपला असा संताप किती काळ टीकतो?
आपला राग क्षणभंगूर असतो.

आणि थोड्याच वेळानंतर आपल्याला त्यांचे हात "शुभहस्त'' वाटायला लागतात.
त्यांचे वाक्य आपल्याला ब्रम्हवाक्य वाटून टाळ्या वाजविण्यासाठी शीवशीवायला लागतात.

वेतनाआयोगाच्या शिफारशी लागू करतो म्हटले की ही नेतेमंडळी जनतेला "महापुरूष" वाटायला लागतात.

ज्या देशात जनतेची मानसिकता अशी असेल त्या देशात पुढार्‍यांची उत्क्रांती अशीच होणार.

या संबध पुढार्‍यांकडे तुच्छतेने पाहाणे आणि यांना प्रतिष्ठा न देणे हा यावरचा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.

सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले

या संबध पुढार्‍यांकडे तुच्छतेने पाहाणे आणि यांना प्रतिष्ठा न देणे हा यावरचा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.
---- सर्व काळात काही जनता मुर्ख असणारच आणि त्या मुर्खांच्या पाठिंब्याने यांची राजकारणाची खिचडी सदासर्वकाळ शिजत रहाणार... काल मुर्ख असणारे आज तसे नसतील पण आज अजुन दुसरे कुणी असेल.

भोपाळ मेमोरिअल हॉस्पिटल ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा न्या. अहमदी यांनी राजीनामा दिला.गेली १२ वर्ष बीएचएमटीचा कारभार अतिशय कार्यक्षमतेने चालविल्याबद्दल अहमदी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज प्रशंसा केली

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=872...

Pages